إِذَا الشَّمْسُ كُوِّرَتْ (1) १. जेव्हा सूर्य गुंडाळून घेतला जाईल |
وَإِذَا النُّجُومُ انكَدَرَتْ (2) २. आणि जेव्हा तारे निस्तेज होतील |
وَإِذَا الْجِبَالُ سُيِّرَتْ (3) ३. आणि जेव्हा पर्वतांना चालविले जाईल |
وَإِذَا الْعِشَارُ عُطِّلَتْ (4) ४. आणि जेव्हा गर्भधारक सांडणींना सोडून दिले जाईल |
وَإِذَا الْوُحُوشُ حُشِرَتْ (5) ५. आणि जेव्हा हिंस्र पशूंना एकत्रित केले जाईल |
وَإِذَا الْبِحَارُ سُجِّرَتْ (6) ६. आणि जेव्हा समुद्र भडकाविले जातील |
وَإِذَا النُّفُوسُ زُوِّجَتْ (7) ७. आणि जेव्हा प्राणांना (शरीराशी) जोडले जाईल |
وَإِذَا الْمَوْءُودَةُ سُئِلَتْ (8) ८. आणि जेव्हा जिवंत गाडल्या गेलेल्या मुलींना विचारले जाईल |
بِأَيِّ ذَنبٍ قُتِلَتْ (9) ९. की कोणत्या अपराधापायी त्यांची हत्या केली गेली |
وَإِذَا الصُّحُفُ نُشِرَتْ (10) १०. आणि जेव्हा कर्म-लेख उघडले जातील |
وَإِذَا السَّمَاءُ كُشِطَتْ (11) ११. आणि जेव्हा आकाशाची चामडी (आवरण) उतरविली जाईल |
وَإِذَا الْجَحِيمُ سُعِّرَتْ (12) १२. आणि जेव्हा जहन्नम भडकविली जाईल |
وَإِذَا الْجَنَّةُ أُزْلِفَتْ (13) १३. आणि जेव्हा जन्नतला जवळ आणले जाईल |
عَلِمَتْ نَفْسٌ مَّا أَحْضَرَتْ (14) १४. तेव्हा त्या दिवशी प्रत्येक मनुष्य जाणून घेईल, जे काही (सोबत) घेऊन आला असेल |
فَلَا أُقْسِمُ بِالْخُنَّسِ (15) १५. मी शपथ घेतो मागे हटणाऱ्या |
الْجَوَارِ الْكُنَّسِ (16) १६. चालणाऱ्या फिरणाऱ्या, लपणाऱ्या ताऱ्यांची |
وَاللَّيْلِ إِذَا عَسْعَسَ (17) १७. आणि रात्रीची जेव्हा ती जाऊ लागेल |
وَالصُّبْحِ إِذَا تَنَفَّسَ (18) १८. आणि सकाळची जेव्हा चकाकू लागेल |
إِنَّهُ لَقَوْلُ رَسُولٍ كَرِيمٍ (19) १९. निःसंशय, हे एका सन्मानित संदेशवाहकाचे कथन आहे |
ذِي قُوَّةٍ عِندَ ذِي الْعَرْشِ مَكِينٍ (20) २०. जो मोठा शक्तिशाली आहे. अर्शचा स्वामी (अल्लाह) च्या ठायी उच्च दर्जाचा आहे |
مُّطَاعٍ ثَمَّ أَمِينٍ (21) २१. ज्याचे तेथे (आकाशांमध्ये) आज्ञापालन केले जाते, (तो) अमानतदार आहे |
وَمَا صَاحِبُكُم بِمَجْنُونٍ (22) २२. आणि तुमचा साथीदार वेडा नाही |
وَلَقَدْ رَآهُ بِالْأُفُقِ الْمُبِينِ (23) २३. त्याने त्या (फरिश्त्या) ला आकाशाच्या उघड्या किनाऱ्यावर पाहिलेही आहे |
وَمَا هُوَ عَلَى الْغَيْبِ بِضَنِينٍ (24) २४. आणि हा परोक्षाच्या गोष्टी सांगण्यात कंजूसही नाही |
وَمَا هُوَ بِقَوْلِ شَيْطَانٍ رَّجِيمٍ (25) २५. आणि हा (कुरआन) धिःक्कारलेल्या सैतानाचे कथन नाही |
فَأَيْنَ تَذْهَبُونَ (26) २६. मग तुम्ही कोठे जात आहात |
إِنْ هُوَ إِلَّا ذِكْرٌ لِّلْعَالَمِينَ (27) २७. हे तर समस्त विश्ववासीयांकरिता बोधपत्र आहे |
لِمَن شَاءَ مِنكُمْ أَن يَسْتَقِيمَ (28) २८. (खासकरून त्याच्यासाठी,) जो तुमच्यपैकी सरळ मार्गावर चालू इच्छितो |
وَمَا تَشَاءُونَ إِلَّا أَن يَشَاءَ اللَّهُ رَبُّ الْعَالَمِينَ (29) २९. आणि तुम्ही, सर्व विश्वांच्या पालनकर्त्या (अल्लाह) च्या (इच्छे) विना काहीच इच्छू शकत नाही |