إِذَا السَّمَاءُ انشَقَّتْ (1) १. जेव्हा आकाश विदीर्ण होईल |
وَأَذِنَتْ لِرَبِّهَا وَحُقَّتْ (2) २. आणि आपल्या पालनकर्त्याचा आदेश कान लावून ऐकेल, आणि त्याला तसे करणे भाग आहे |
وَإِذَا الْأَرْضُ مُدَّتْ (3) ३. आणि जेव्हा जमिनीला (खेचून) पसरविले जाईल |
وَأَلْقَتْ مَا فِيهَا وَتَخَلَّتْ (4) ४. आणि तिच्यात जे आहे ते ओकून बाहेर काढील आणि अगदी खाली होईल |
وَأَذِنَتْ لِرَبِّهَا وَحُقَّتْ (5) ५. आणि आपल्या पालनकर्त्याचा आदेश कान लावून ऐकेल आणि ती त्यास पात्र आहे |
يَا أَيُّهَا الْإِنسَانُ إِنَّكَ كَادِحٌ إِلَىٰ رَبِّكَ كَدْحًا فَمُلَاقِيهِ (6) ६. हे मानवा! तू आपल्या पालनकर्त्याशी भेट होईपर्यंत हे प्रयत्न आणि सर्व कार्य आणि परिश्रम करून त्याची भेट घेणार आहेस |
فَأَمَّا مَنْ أُوتِيَ كِتَابَهُ بِيَمِينِهِ (7) ७. तर त्या वेळी ज्या माणसाच्या उजव्या हातात कर्म-पत्र दिले जाईल |
فَسَوْفَ يُحَاسَبُ حِسَابًا يَسِيرًا (8) ८. त्याचा हिशोब मोठ्या सहजतेने घेतला जाईल.१ |
وَيَنقَلِبُ إِلَىٰ أَهْلِهِ مَسْرُورًا (9) ९. आणि तो आपल्या कुटुंबियांकडे आनंदित होऊन परत जाईल |
وَأَمَّا مَنْ أُوتِيَ كِتَابَهُ وَرَاءَ ظَهْرِهِ (10) १०. परंतु ज्या माणसाचे कर्म-पत्र त्याच्या पाठीमागून दिले जाईल |
فَسَوْفَ يَدْعُو ثُبُورًا (11) ११. तेव्हा तो मृत्युला बोलावू लागेल |
وَيَصْلَىٰ سَعِيرًا (12) १२. आणि भडकत्या जहन्नममध्ये दाखल होईल |
إِنَّهُ كَانَ فِي أَهْلِهِ مَسْرُورًا (13) १३. हा मनुष्य आपल्या कुटुंबात (जगात) आनंदित होता |
إِنَّهُ ظَنَّ أَن لَّن يَحُورَ (14) १४. तो समजत होता की अल्लाहकडे परतून जाणारच नाही |
بَلَىٰ إِنَّ رَبَّهُ كَانَ بِهِ بَصِيرًا (15) १५. हे कसे शक्य आहे, वास्तविक त्याचा पालनकर्ता त्याला चांगल्या प्रकारे पाहात होता |
فَلَا أُقْسِمُ بِالشَّفَقِ (16) १६. मला संध्याकाळच्या लालिमेची शपथ |
وَاللَّيْلِ وَمَا وَسَقَ (17) १७. आणि रात्रीची आणि तिने गोळा केलेल्या वस्तूंची शपथ |
وَالْقَمَرِ إِذَا اتَّسَقَ (18) १८. आणि पूर्ण चंद्राची शपथ |
لَتَرْكَبُنَّ طَبَقًا عَن طَبَقٍ (19) १९. निःसंशय, तुम्ही एका अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेत पोहोचाल |
فَمَا لَهُمْ لَا يُؤْمِنُونَ (20) २०. त्यांना झाले तरी काय की ईमान राखत नाहीत |
وَإِذَا قُرِئَ عَلَيْهِمُ الْقُرْآنُ لَا يَسْجُدُونَ ۩ (21) २१. आणि जेव्हा त्यांच्यासमोर कुरआन वाचले जाते, तेव्हा सजदा करीत नाहीत |
بَلِ الَّذِينَ كَفَرُوا يُكَذِّبُونَ (22) २२. किंबहुना त्यांनी कुप्र (इन्कार) केला, ते खोटे ठरवित आहेत |
وَاللَّهُ أَعْلَمُ بِمَا يُوعُونَ (23) २३. आणि हे जे काही मनात ठेवतात, अल्लाह ते चांगल्या प्रकारे जाणतो |
فَبَشِّرْهُم بِعَذَابٍ أَلِيمٍ (24) २४. तेव्हा तुम्ही त्यांना दुःखदायक शिक्षा यातनांची खूशखबर द्या |
إِلَّا الَّذِينَ آمَنُوا وَعَمِلُوا الصَّالِحَاتِ لَهُمْ أَجْرٌ غَيْرُ مَمْنُونٍ (25) २५. तथापि ईमान राखणाऱ्या नेक सदाचारी लोकांना अगणित आणि कधीही न संपणारा मोबदला प्रदान केला जाईल |