وَالسَّمَاءِ وَالطَّارِقِ (1) १. शपथ आहे आकाशाची आणि अंधारात प्रकट होणाऱ्याची |
وَمَا أَدْرَاكَ مَا الطَّارِقُ (2) २. तुम्हाला काय माहीत की तो रात्री प्रकट होणारा काय आहे |
النَّجْمُ الثَّاقِبُ (3) ३. तो एक तेजस्वी तारा आहे |
إِن كُلُّ نَفْسٍ لَّمَّا عَلَيْهَا حَافِظٌ (4) ४. असा कोणीही नाही, ज्याच्यावर संरक्षक फरिश्ता (नियुक्त) नसेल |
فَلْيَنظُرِ الْإِنسَانُ مِمَّ خُلِقَ (5) ५. माणसाने विचार केला पाहिजे की त्याला कोणत्या वस्तूपासून निर्माण केले गेले आहे |
خُلِقَ مِن مَّاءٍ دَافِقٍ (6) ६. त्याला एका उसळत्या पाण्यापासून निर्माण केले गेले आहे |
يَخْرُجُ مِن بَيْنِ الصُّلْبِ وَالتَّرَائِبِ (7) ७. जे पाठ आणि छाती यांच्या दरम्यानी भागातून निघते |
إِنَّهُ عَلَىٰ رَجْعِهِ لَقَادِرٌ (8) ८. निःसंशय, तो (अल्लाह) त्याला परत आणण्यावर निश्चितच सामर्थ्य राखणारा आहे |
يَوْمَ تُبْلَى السَّرَائِرُ (9) ९. ज्या दिवशी गुप्त रहस्यभेदांची जांच-पडताळ केली जाईल |
فَمَا لَهُ مِن قُوَّةٍ وَلَا نَاصِرٍ (10) १०. तेव्हा त्याचा ना काही जोर चालेल आणि ना कोणी मदतकर्ता असेल |
وَالسَّمَاءِ ذَاتِ الرَّجْعِ (11) ११. पर्जन्यवृष्टी करणाऱ्या आकाशाची शपथ |
وَالْأَرْضِ ذَاتِ الصَّدْعِ (12) १२. आणि दुभंगणाऱ्या जमिनीची शपथ |
إِنَّهُ لَقَوْلٌ فَصْلٌ (13) १३. निःसंशय, हा (कुरआन) काटेकोर फैसला करणारी भाषा आहे |
وَمَا هُوَ بِالْهَزْلِ (14) १४. ही हास्य-विनोदाची (आणि निरर्थक) गोष्ट नाही |
إِنَّهُمْ يَكِيدُونَ كَيْدًا (15) १५. तथापि इन्कारी लोक कट - कारस्थान करीत आहेत |
وَأَكِيدُ كَيْدًا (16) १६. आणि मी देखील एक डाव चालत आहे |
فَمَهِّلِ الْكَافِرِينَ أَمْهِلْهُمْ رُوَيْدًا (17) १७. तुम्ही या इन्कारी लोकांना सवड देऊन टाका, त्यांना काही दिवस मोकळीक द्या |