الرَّحْمَٰنُ (1) १. दयावान (रहमान) ने |
عَلَّمَ الْقُرْآنَ (2) २. कुरआन शिकविले |
خَلَقَ الْإِنسَانَ (3) ३. त्यानेच मानवाला निर्माण केले |
عَلَّمَهُ الْبَيَانَ (4) ४. त्याला बोलणे शिकविले |
الشَّمْسُ وَالْقَمَرُ بِحُسْبَانٍ (5) ५. सूर्य आणि चंद्र (निर्धारित) हिशोबाचे पालन करतात |
وَالنَّجْمُ وَالشَّجَرُ يَسْجُدَانِ (6) ६. आणि तारे व वृक्ष दोघे सजदा करतात |
وَالسَّمَاءَ رَفَعَهَا وَوَضَعَ الْمِيزَانَ (7) ७. त्यानेच आकाशाला उंच केले आणि त्यानेच तुला (तराजू) राखली |
أَلَّا تَطْغَوْا فِي الْمِيزَانِ (8) ८. यासाठी की तुम्ही तोलण्यात मर्यादेचे उल्लंघन न करावे |
وَأَقِيمُوا الْوَزْنَ بِالْقِسْطِ وَلَا تُخْسِرُوا الْمِيزَانَ (9) ९. आणि न्यायासह तोल उचित राखा आणि तोलण्यात कमी देऊ नका |
وَالْأَرْضَ وَضَعَهَا لِلْأَنَامِ (10) १०. आणि त्यानेच सृष्टीकरिता जमिनीला बिछविले |
فِيهَا فَاكِهَةٌ وَالنَّخْلُ ذَاتُ الْأَكْمَامِ (11) ११. जिच्यात मेवे आहेत आणि गुच्छांच्या खजुरीचे वृक्ष आहेत |
وَالْحَبُّ ذُو الْعَصْفِ وَالرَّيْحَانُ (12) १२. आणि भूसेदार धान्य आहे आणि सुगंधित फुले आहेत |
فَبِأَيِّ آلَاءِ رَبِّكُمَا تُكَذِّبَانِ (13) १३. तेव्हा (हे जिन्नांनो आणि मानवांनो!) तुम्ही आपल्या पालनकर्त्याच्या कोणकोणत्या उपकारांना खोटे ठरवाल |
خَلَقَ الْإِنسَانَ مِن صَلْصَالٍ كَالْفَخَّارِ (14) १४. त्याने मानवाला खणखणणाऱ्या मातीपासून निर्माण केले, जी ठिकरीसारखी होती |
وَخَلَقَ الْجَانَّ مِن مَّارِجٍ مِّن نَّارٍ (15) १५. आणि जिन्नांना अग्निशिखेपासून निर्माण केले |
فَبِأَيِّ آلَاءِ رَبِّكُمَا تُكَذِّبَانِ (16) १६. तेव्हा (हे जिन्नांनो आणि मानवांनो!) तुम्ही आपल्या पालनकर्त्याच्या कोणकोणत्या उपकारांना खोटे ठरवाल |
رَبُّ الْمَشْرِقَيْنِ وَرَبُّ الْمَغْرِبَيْنِ (17) १७. तो दोन्ही पूर्वांचा आणि दोन्ही पश्चिमांचा स्वामी आहे |
فَبِأَيِّ آلَاءِ رَبِّكُمَا تُكَذِّبَانِ (18) १८. तेव्हा (हे जिन्नांनो आणि मानवांनो!) तुम्ही आपल्या पालनकर्त्याच्या कोणकोणत्या उपकारांना खोटे ठरवाल |
مَرَجَ الْبَحْرَيْنِ يَلْتَقِيَانِ (19) १९. त्याने दोन समुद्र प्रवाहित केले जे एकमेकास मिळतात |
بَيْنَهُمَا بَرْزَخٌ لَّا يَبْغِيَانِ (20) २०. त्या दोघांच्या दरम्यान एक आड (पडदा) आहे की त्यापुढे जाऊ शकत नाहीत |
فَبِأَيِّ آلَاءِ رَبِّكُمَا تُكَذِّبَانِ (21) २१. तेव्हा (हे जिन्नांनो आणि मानवांनो!) तुम्ही आपल्या पालनकर्त्याच्या कोणकोणत्या उपकारांना खोटे ठरवाल |
يَخْرُجُ مِنْهُمَا اللُّؤْلُؤُ وَالْمَرْجَانُ (22) २२. त्या दोघांमधून मोती आणि प्रवाळ निघतात |
فَبِأَيِّ آلَاءِ رَبِّكُمَا تُكَذِّبَانِ (23) २३. तेव्हा (हे जिन्नांनो आणि मानवांनो!) तुम्ही आपल्या पालनकर्त्याच्या कोणकोणत्या उपकारांना खोटे ठरवाल |
وَلَهُ الْجَوَارِ الْمُنشَآتُ فِي الْبَحْرِ كَالْأَعْلَامِ (24) २४. आणि अल्लाहच्याच (अधिकारकक्षेत) आहेत ती जहाजे, जी समुद्रात पर्वतांसारखी उंच (उभी) चालत आहेत |
فَبِأَيِّ آلَاءِ رَبِّكُمَا تُكَذِّبَانِ (25) २५. तेव्हा (हे जिन्नांनो आणि मानवांनो!) तुम्ही आपल्या पालनकर्त्याच्या कोणकोणत्या उपकारांना खोटे ठरवाल |
كُلُّ مَنْ عَلَيْهَا فَانٍ (26) २६. जमिनीवर जे काही आहे ते सर्व नाश पावणारे आहे |
وَيَبْقَىٰ وَجْهُ رَبِّكَ ذُو الْجَلَالِ وَالْإِكْرَامِ (27) २७. केवळ तुमच्या पालनकर्त्याचे मुख (अस्तित्व), जो मोठा महान आणि प्रतिष्ठा बाळगणारा आहे, बाकी राहील |
فَبِأَيِّ آلَاءِ رَبِّكُمَا تُكَذِّبَانِ (28) २८. तेव्हा तुम्ही आपल्या पालनकर्त्याच्या कोणकोणत्या उपकारांना खोटे ठरवाल |
يَسْأَلُهُ مَن فِي السَّمَاوَاتِ وَالْأَرْضِ ۚ كُلَّ يَوْمٍ هُوَ فِي شَأْنٍ (29) २९. आकाशांमध्ये व जमिनीवर जे जे आहेत सर्व त्याच्याचकडे याचना करतात, प्रत्येक दिवस तो एका कार्यात आहे.१ |
فَبِأَيِّ آلَاءِ رَبِّكُمَا تُكَذِّبَانِ (30) ३०. तेव्हा तुम्ही आपल्या पालनकर्त्याच्या कोणकोणत्या उपकारांना खोटे ठरवाल |
سَنَفْرُغُ لَكُمْ أَيُّهَ الثَّقَلَانِ (31) ३१. (हे जिन्न आणि मानवांच्या समूहांनो!) लवकरच आम्ही तुमच्याकडे पूर्णतः लक्ष केंद्रित करू |
فَبِأَيِّ آلَاءِ رَبِّكُمَا تُكَذِّبَانِ (32) ३२. तेव्हा तुम्ही आपल्या पालनकर्त्याच्या कोणकोणत्या उपकारांना खोटे ठरवाल |
يَا مَعْشَرَ الْجِنِّ وَالْإِنسِ إِنِ اسْتَطَعْتُمْ أَن تَنفُذُوا مِنْ أَقْطَارِ السَّمَاوَاتِ وَالْأَرْضِ فَانفُذُوا ۚ لَا تَنفُذُونَ إِلَّا بِسُلْطَانٍ (33) ३३. (हे जिन्न आणि मनावांच्या समूहांनो!) जर तुमच्यात आकाशांच्या आणि धरतीच्या किनाऱ्या (सीमा) बाहेर निघण्याचे सामर्थ्य आहे, तर निघून जा (तथापि) वर्चस्व आणि सामर्थ्याविना तुम्ही निघू शकत नाही |
فَبِأَيِّ آلَاءِ رَبِّكُمَا تُكَذِّبَانِ (34) ३४. तेव्हा तुम्ही आपल्या पालनकर्त्याच्या कोणकोणत्या उपकारांना खोटे ठरवाल |
يُرْسَلُ عَلَيْكُمَا شُوَاظٌ مِّن نَّارٍ وَنُحَاسٌ فَلَا تَنتَصِرَانِ (35) ३५. तुमच्यावर आगीचे निखारे आणि धूर सोडला जाईल, मग तुम्ही सामना करू शकणार नाहीत |
فَبِأَيِّ آلَاءِ رَبِّكُمَا تُكَذِّبَانِ (36) ३६. तेव्हा तुम्ही आपल्या पालनकर्त्याच्या कोणकोणत्या उपकारांना खोटे ठरवाल |
فَإِذَا انشَقَّتِ السَّمَاءُ فَكَانَتْ وَرْدَةً كَالدِّهَانِ (37) ३७. मग जेव्हा आकाश विदीर्ण होऊन लाल होईल, जणू लाल चामडे असावे |
فَبِأَيِّ آلَاءِ رَبِّكُمَا تُكَذِّبَانِ (38) ३८. तेव्हा तुम्ही आपल्या पालनकर्त्याच्या कोणकोणत्या उपकारांना खोटे ठरवाल |
فَيَوْمَئِذٍ لَّا يُسْأَلُ عَن ذَنبِهِ إِنسٌ وَلَا جَانٌّ (39) ३९. त्या दिवशी कोणत्याही मानवाला आणि कोणत्याही जिन्नाला त्याच्या अपराधांविषयी विचारणा केली जाणार नाही |
فَبِأَيِّ آلَاءِ رَبِّكُمَا تُكَذِّبَانِ (40) ४०. तेव्हा तुम्ही आपल्या पालनकर्त्याच्या कोणकोणत्या उपकारांना खोटे ठरवाल |
يُعْرَفُ الْمُجْرِمُونَ بِسِيمَاهُمْ فَيُؤْخَذُ بِالنَّوَاصِي وَالْأَقْدَامِ (41) ४१. अपराधी लोक केवळ आपल्या चेहऱ्या-मोहऱ्यावरूनच ओळखले जातील आणि त्यांच्या कपाळाचे केस व पाय धरले जातील |
فَبِأَيِّ آلَاءِ رَبِّكُمَا تُكَذِّبَانِ (42) ४२. तेव्हा तुम्ही आपल्या पालनकर्त्याच्या कोणकोणत्या उपकारांना खोटे ठरवाल |
هَٰذِهِ جَهَنَّمُ الَّتِي يُكَذِّبُ بِهَا الْمُجْرِمُونَ (43) ४३. हीच ती जहन्नम आहे, जिला अपराधी खोटे मानत होते |
يَطُوفُونَ بَيْنَهَا وَبَيْنَ حَمِيمٍ آنٍ (44) ४४. तिच्या गरम उकळत्या पाण्याच्या दरम्यान फेर खातील |
فَبِأَيِّ آلَاءِ رَبِّكُمَا تُكَذِّبَانِ (45) ४५. तेव्हा तुम्ही आपल्या पालनकर्त्याच्या कोणकोणत्या उपकारांना खोटे ठरवाल |
وَلِمَنْ خَافَ مَقَامَ رَبِّهِ جَنَّتَانِ (46) ४६. आणि त्या माणसाकरिता, जो आपल्या पालनकर्त्यासमोर उभे राहण्यास घाबरला , दोन जन्नत आहेत |
فَبِأَيِّ آلَاءِ رَبِّكُمَا تُكَذِّبَانِ (47) ४७. तेव्हा तुम्ही आपल्या पालनकर्त्याच्या कोणकोणत्या उपकारांना खोटे ठरवाल |
ذَوَاتَا أَفْنَانٍ (48) ४८. दोन्हीही जन्नती अनेक शाखा असलेल्या आहेत |
فَبِأَيِّ آلَاءِ رَبِّكُمَا تُكَذِّبَانِ (49) ४९. तेव्हा तुम्ही आपल्या पालनकर्त्याच्या कोणकोणत्या उपकारांना खोटे ठरवाल |
فِيهِمَا عَيْنَانِ تَجْرِيَانِ (50) ५०. त्या दोन्ही जन्नतींमध्ये दोन वाहते झरे आहेत |
فَبِأَيِّ آلَاءِ رَبِّكُمَا تُكَذِّبَانِ (51) ५१. तेव्हा तुम्ही आपल्या पालनकर्त्याच्या कोणकोणत्या उपकारांना खोटे ठरवाल |
فِيهِمَا مِن كُلِّ فَاكِهَةٍ زَوْجَانِ (52) ५२. त्या दोन्हीं (जन्नतीं) मध्ये प्रत्येक मेव्याचे दोन प्रकार असतील |
فَبِأَيِّ آلَاءِ رَبِّكُمَا تُكَذِّبَانِ (53) ५३. तेव्हा तुम्ही आपल्या पालनकर्त्याच्या कोणकोणत्या उपकारांना खोटे ठरवाल |
مُتَّكِئِينَ عَلَىٰ فُرُشٍ بَطَائِنُهَا مِنْ إِسْتَبْرَقٍ ۚ وَجَنَى الْجَنَّتَيْنِ دَانٍ (54) ५४. जन्नतमध्ये राहणारे अशा बिछायतींवर तक्के लावून बसतील, ज्यांचे अस्तर जाड रेशमाचे असेल आणि त्या दोन्ही जन्नतींची फळे (मेवे) खूप जवळ असतील |
فَبِأَيِّ آلَاءِ رَبِّكُمَا تُكَذِّبَانِ (55) ५५. तेव्हा तुम्ही आपल्या पालनकर्त्याच्या कोणकोणत्या उपकारांना खोटे ठरवाल |
فِيهِنَّ قَاصِرَاتُ الطَّرْفِ لَمْ يَطْمِثْهُنَّ إِنسٌ قَبْلَهُمْ وَلَا جَانٌّ (56) ५६. तिथे (लाजाळू) खाली नजर ठेवणाऱ्या हूर (पऱ्या) आहेत, ज्यांना त्यांच्यापूर्वी कोणत्याही जिन्न आणि मानवाने हात लावला नसेल |
فَبِأَيِّ آلَاءِ رَبِّكُمَا تُكَذِّبَانِ (57) ५७. तेव्हा तुम्ही आपल्या पालनकर्त्याच्या कोणकोणत्या उपकारांना खोटे ठरवाल |
كَأَنَّهُنَّ الْيَاقُوتُ وَالْمَرْجَانُ (58) ५८. त्या (हूर-पऱ्या) माणिक (याकूत) आणि प्रवाळासारख्या असतील |
فَبِأَيِّ آلَاءِ رَبِّكُمَا تُكَذِّبَانِ (59) ५९. तेव्हा तुम्ही आपल्या पालनकर्त्याच्या कोणकोणत्या उपकारांना खोटे ठरवाल |
هَلْ جَزَاءُ الْإِحْسَانِ إِلَّا الْإِحْسَانُ (60) ६०. भलेपणाचा मोबदला, भलेपणाशिवाय दुसरा काय आहे |
فَبِأَيِّ آلَاءِ رَبِّكُمَا تُكَذِّبَانِ (61) ६१. तेव्हा तुम्ही आपल्या पालनकर्त्याच्या कोणकोणत्या उपकारांना खोटे ठरवाल |
وَمِن دُونِهِمَا جَنَّتَانِ (62) ६२. आणि त्याच्याखेरीज दोन जन्नती आणखी आहेत |
فَبِأَيِّ آلَاءِ رَبِّكُمَا تُكَذِّبَانِ (63) ६३. तेव्हा तुम्ही आपल्या पालनकर्त्याच्या कोणकोणत्या उपकारांना खोटे ठरवाल |
مُدْهَامَّتَانِ (64) ६४. दोन्ही गाढहिरव्या रंगाच्या |
فَبِأَيِّ آلَاءِ رَبِّكُمَا تُكَذِّبَانِ (65) ६५. तेव्हा तुम्ही आपल्या पालनकर्त्याच्या कोणकोणत्या उपकारांना खोटे ठरवाल |
فِيهِمَا عَيْنَانِ نَضَّاخَتَانِ (66) ६६. त्यांच्यात दोन (वेगाने) उचंबळणारे झरे आहेत |
فَبِأَيِّ آلَاءِ رَبِّكُمَا تُكَذِّبَانِ (67) ६७. तेव्हा तुम्ही आपल्या पालनकर्त्याच्या कोणकोणत्या उपकारांना खोटे ठरवाल |
فِيهِمَا فَاكِهَةٌ وَنَخْلٌ وَرُمَّانٌ (68) ६८. त्या दोघांमध्ये मेवे आणखी खजुरी व डाळींब असतील |
فَبِأَيِّ آلَاءِ رَبِّكُمَا تُكَذِّبَانِ (69) ६९. तेव्हा तुम्ही आपल्या पालनकर्त्याच्या कोणकोणत्या उपकारांना खोटे ठरवाल |
فِيهِنَّ خَيْرَاتٌ حِسَانٌ (70) ७०. त्यांच्यात सत्शील चारित्र्यवान सुंदर स्त्रिया आहेत |
فَبِأَيِّ آلَاءِ رَبِّكُمَا تُكَذِّبَانِ (71) ७१. तेव्हा तुम्ही आपल्या पालनकर्त्याच्या कोणकोणत्या उपकारांना खोटे ठरवाल |
حُورٌ مَّقْصُورَاتٌ فِي الْخِيَامِ (72) ७२. (गौरवर्णीय) हूर (पऱ्या) जन्नतच्या खेम्यांमध्ये राहणाऱ्या आहेत |
فَبِأَيِّ آلَاءِ رَبِّكُمَا تُكَذِّبَانِ (73) ७३. तेव्हा तुम्ही आपल्या पालनकर्त्याच्या कोणकोणत्या उपकारांना खोटे ठरवाल |
لَمْ يَطْمِثْهُنَّ إِنسٌ قَبْلَهُمْ وَلَا جَانٌّ (74) ७४. त्यां (हूर - पऱ्या) ना कोणत्याही मानव आणि जिन्नाने यापूर्वी हात लावला नाही (स्पर्शही केला नाही) |
فَبِأَيِّ آلَاءِ رَبِّكُمَا تُكَذِّبَانِ (75) ७५. तेव्हा तुम्ही आपल्या पालनकर्त्याच्या कोणकोणत्या उपकारांना खोटे ठरवाल |
مُتَّكِئِينَ عَلَىٰ رَفْرَفٍ خُضْرٍ وَعَبْقَرِيٍّ حِسَانٍ (76) ७६. हिरव्या गाद्या आणि सुंदर बिछान्यांवर तक्के लावून बसले असतील |
فَبِأَيِّ آلَاءِ رَبِّكُمَا تُكَذِّبَانِ (77) ७७. तेव्हा तुम्ही आपल्या पालनकर्त्याच्या कोणकोणत्या उपकारांना खोटे ठरवाल |
تَبَارَكَ اسْمُ رَبِّكَ ذِي الْجَلَالِ وَالْإِكْرَامِ (78) ७८. मोठे शुभ (आणि समृद्धशाली) आहे तुमच्या पालनकर्त्याचे नाव, जो मोठा प्रतापशाली आणि मोठा |