وَالْفَجْرِ (1) १. शपथ आहे प्रातःकाळची |
وَلَيَالٍ عَشْرٍ (2) २. आणि दहा रात्रींची |
وَالشَّفْعِ وَالْوَتْرِ (3) ३. आणि सम आणि विषम संख्येची |
وَاللَّيْلِ إِذَا يَسْرِ (4) ४. आणि रात्रीची जेव्हा ती निघू लागावी |
هَلْ فِي ذَٰلِكَ قَسَمٌ لِّذِي حِجْرٍ (5) ५. काय यात बुद्धिमानांसाठी पुरेशी शपथ आहे |
أَلَمْ تَرَ كَيْفَ فَعَلَ رَبُّكَ بِعَادٍ (6) ६. काय तुम्ही नाही पाहिले की तुमच्या पालनकर्त्याने आदच्या लोकांशी काय व्यवहार केला |
إِرَمَ ذَاتِ الْعِمَادِ (7) ७. मोठमोठे खांब बनविणाऱ्या इरमशी |
الَّتِي لَمْ يُخْلَقْ مِثْلُهَا فِي الْبِلَادِ (8) ८. ज्यांच्यासारखा (कोणताही जनसमूह) अन्य भूभागात निर्माण केला गेला नाही |
وَثَمُودَ الَّذِينَ جَابُوا الصَّخْرَ بِالْوَادِ (9) ९. आणि समूदच्या लोकांशी, ज्यांनी दऱ्या-खोऱ्यात मोठमोठे पाषाण कोरले होते |
وَفِرْعَوْنَ ذِي الْأَوْتَادِ (10) १०. आणि फिरऔनशी, जो मेखा बाळगणारा होता |
الَّذِينَ طَغَوْا فِي الْبِلَادِ (11) ११. या सर्वांनी धरतीवर उपद्रव पसरविला होता |
فَأَكْثَرُوا فِيهَا الْفَسَادَ (12) १२. आणि खूप उत्पात (फसाद) माजविला होता |
فَصَبَّ عَلَيْهِمْ رَبُّكَ سَوْطَ عَذَابٍ (13) १३. शेवटी तुमच्या पालनकर्त्याने या सर्वांवर अज़ाबचा आसूड बरसविला |
إِنَّ رَبَّكَ لَبِالْمِرْصَادِ (14) १४. निःसंशय, तुमचा पालनकर्ता लक्ष ठेवून आहे |
فَأَمَّا الْإِنسَانُ إِذَا مَا ابْتَلَاهُ رَبُّهُ فَأَكْرَمَهُ وَنَعَّمَهُ فَيَقُولُ رَبِّي أَكْرَمَنِ (15) १५. माणसा (ची ही दशा आहे की) जेव्हा त्याचा पालनकर्ता त्याची परीक्षा घेतो, आणि त्याला मान प्रतिष्ठा व कृपा देणग्या प्रदान करतो तेव्हा तो म्हणू लागतो की माझ्या पालनकर्त्याने मला सन्मानित केले |
وَأَمَّا إِذَا مَا ابْتَلَاهُ فَقَدَرَ عَلَيْهِ رِزْقَهُ فَيَقُولُ رَبِّي أَهَانَنِ (16) १६. आणि जेव्हा तो (अल्लाह) याची कसोटी घेतो, त्याची आजिविका तंग (कमी) करून टाकतो, तेव्हा तो म्हणू लागतो की माझ्या पालनकर्त्याने माझी अव्हेलना केली (आणि मला अपमानित केले) |
كَلَّا ۖ بَل لَّا تُكْرِمُونَ الْيَتِيمَ (17) १७. असे मुळीच नाही किंबहुना (खरी गोष्ट अशी) की तुम्ही लोक अनाथाचा मान-सन्मान राखत नाही.१ |
وَلَا تَحَاضُّونَ عَلَىٰ طَعَامِ الْمِسْكِينِ (18) १८. आणि गरिबांना जेवू घालण्याचे एकमेकांना प्रोत्साहन देत नाही |
وَتَأْكُلُونَ التُّرَاثَ أَكْلًا لَّمًّا (19) १९. आणि (मेलेल्यांची) वारस संपत्ती गोळा करून खातात |
وَتُحِبُّونَ الْمَالَ حُبًّا جَمًّا (20) २०. आणि धन-संपत्तीशी जीवनापाड प्रेम राखता |
كَلَّا إِذَا دُكَّتِ الْأَرْضُ دَكًّا دَكًّا (21) २१. निःसंशय, जमिनीला जेव्हा कुठून कुठून तिला अगदी सपाट केले जाईल |
وَجَاءَ رَبُّكَ وَالْمَلَكُ صَفًّا صَفًّا (22) २२. आणि तुमचा पालनकर्ता (स्वतः) प्रकट होईल आणि फरिश्ते रांगा बांधून (येतील) |
وَجِيءَ يَوْمَئِذٍ بِجَهَنَّمَ ۚ يَوْمَئِذٍ يَتَذَكَّرُ الْإِنسَانُ وَأَنَّىٰ لَهُ الذِّكْرَىٰ (23) २३. आणि ज्या दिवशी जहन्नमलाही आणले जाईल त्या दिवशी माणूस बोध ग्रहण करील. परंतु आता त्याच्या बोध ग्रहण करण्याचा काय लाभ |
يَقُولُ يَا لَيْتَنِي قَدَّمْتُ لِحَيَاتِي (24) २४. तो म्हणेल की मी आपल्या या जीवनाकरिता काही सत्कर्मे, पहिल्यापासून करून ठेवली असती तर फार बरे झाले असते |
فَيَوْمَئِذٍ لَّا يُعَذِّبُ عَذَابَهُ أَحَدٌ (25) २५. तर आज अल्लाहच्या शिक्षा - यातनेसारखी शिक्षा - यातना अन्य कोणाचीही नसेल |
وَلَا يُوثِقُ وَثَاقَهُ أَحَدٌ (26) २६. ना त्याच्या बंधनासारखे कोणाचे बंधन असेल |
يَا أَيَّتُهَا النَّفْسُ الْمُطْمَئِنَّةُ (27) २७. हे संतुष्ट आत्मा |
ارْجِعِي إِلَىٰ رَبِّكِ رَاضِيَةً مَّرْضِيَّةً (28) २८. तू आपल्या पालनकर्त्याकडे परत चल, अशा अवस्थेत की तू त्याच्याशी राजी, तो तुझ्याशी प्रसन्न |
فَادْخُلِي فِي عِبَادِي (29) २९. तेव्हा, माझ्या खास दासांमध्ये सामील हो |
وَادْخُلِي جَنَّتِي (30) ३०. आणि माझ्या जन्नतमध्ये प्रवेश कर |