لَا أُقْسِمُ بِهَٰذَا الْبَلَدِ (1) १. मी या शहराची शपथ घेतो |
وَأَنتَ حِلٌّ بِهَٰذَا الْبَلَدِ (2) २. आणि तुम्ही या शहरात वास्तव्य करता |
وَوَالِدٍ وَمَا وَلَدَ (3) ३. आणि (शपथ आहे) मानवी पिता आणि संततीची |
لَقَدْ خَلَقْنَا الْإِنسَانَ فِي كَبَدٍ (4) ४. निःसंशय, आम्ही मानवाला (मोठ्या) कष्ट-यातनेत निर्माण केले |
أَيَحْسَبُ أَن لَّن يَقْدِرَ عَلَيْهِ أَحَدٌ (5) ५. काय मनुष्य असे समजतो की तो कोणाच्या नियंत्रणाखाली नाही |
يَقُولُ أَهْلَكْتُ مَالًا لُّبَدًا (6) ६. सांगत (फिरतो) की मी तर भरपूर धन-संपत्ती खर्च करून टाकली |
أَيَحْسَبُ أَن لَّمْ يَرَهُ أَحَدٌ (7) ७. काय, तो (असे) समजतो की कोणी त्याला पाहिलेच नाही |
أَلَمْ نَجْعَل لَّهُ عَيْنَيْنِ (8) ८. काय, आम्ही त्याचे दोन डोळे नाही बनविले |
وَلِسَانًا وَشَفَتَيْنِ (9) ९. आणि एक जीभ व दोन ओठ (नाही बनविले) |
وَهَدَيْنَاهُ النَّجْدَيْنِ (10) १०. आणि त्याला दोन्ही मार्ग दाखवून दिले |
فَلَا اقْتَحَمَ الْعَقَبَةَ (11) ११. तेव्हा, घाटीत प्रवेश करणे त्याला शक्य झाले नाही |
وَمَا أَدْرَاكَ مَا الْعَقَبَةُ (12) १२. तुम्हाला काय माहीत की तो घाटी मार्ग काय आहे |
فَكُّ رَقَبَةٍ (13) १३. एखाद्याची मान (दास, दासी) मुक्त करणे |
أَوْ إِطْعَامٌ فِي يَوْمٍ ذِي مَسْغَبَةٍ (14) १४. किंवा भुकेल्या दिवशी पोटभर जेवु घालणे |
يَتِيمًا ذَا مَقْرَبَةٍ (15) १५. एखाद्या नातेवाईक अनाथाला |
أَوْ مِسْكِينًا ذَا مَتْرَبَةٍ (16) १६. किंवा मातीस मिळालेल्या अतिशय गरीब माणसाला |
ثُمَّ كَانَ مِنَ الَّذِينَ آمَنُوا وَتَوَاصَوْا بِالصَّبْرِ وَتَوَاصَوْا بِالْمَرْحَمَةِ (17) १७. मग त्या लोकांपैकी झाला असता, जे ईमान राखतात, आणि एकमेकांना धीर संयम व दया करुणा करण्याची ताकीद करतात |
أُولَٰئِكَ أَصْحَابُ الْمَيْمَنَةِ (18) १८. हेच लोक आहेत उजव्या बाजूचे |
وَالَّذِينَ كَفَرُوا بِآيَاتِنَا هُمْ أَصْحَابُ الْمَشْأَمَةِ (19) १९. आणि ज्या लोकांनी आमच्या आयतींचा इन्कार केला, तेच लोक डाव्या हाताचे आहेत |
عَلَيْهِمْ نَارٌ مُّؤْصَدَةٌ (20) २०. हेच आगीच्या कोंडीत असतील जी चारी बाजूंनी घेरलेली असेल |