The Quran in Marathi - Surah Adiyat translated into Marathi, Surah Al-Adiyat in Marathi. We provide accurate translation of Surah Adiyat in Marathi - الماراثية, Verses 11 - Surah Number 100 - Page 599.
وَالْعَادِيَاتِ ضَبْحًا (1) १. धापा टाकीत धावणाऱ्या घोड्यांची शपथ |
فَالْمُورِيَاتِ قَدْحًا (2) २. मग टाप मारून चिंगाऱ्या उडविणाऱ्यांची शपथ |
فَالْمُغِيرَاتِ صُبْحًا (3) ३. मग सकाळच्या वेळी हल्ला चढविणाऱ्यांची शपथ |
فَأَثَرْنَ بِهِ نَقْعًا (4) ४. तर त्या वेळी धूळ उडवितात |
فَوَسَطْنَ بِهِ جَمْعًا (5) ५. मग त्याचसोबत सैन्यांमध्ये घुसतात |
إِنَّ الْإِنسَانَ لِرَبِّهِ لَكَنُودٌ (6) ६. निःसंशय, मनुष्य आपल्या पालनकर्त्याशी मोठा कृतघ्न आहे |
وَإِنَّهُ عَلَىٰ ذَٰلِكَ لَشَهِيدٌ (7) ७. आणि खात्रीने तो स्वतःही यावर साक्षी आहे |
وَإِنَّهُ لِحُبِّ الْخَيْرِ لَشَدِيدٌ (8) ८. आणि हा धनाच्या मोहातही मोठा सक्त (कठोर) आहे |
۞ أَفَلَا يَعْلَمُ إِذَا بُعْثِرَ مَا فِي الْقُبُورِ (9) ९. काय याला ती वेळ माहीत नाही जेव्हा कबरीमध्ये जे (काही) आहे, काढून घेतले जाईल |
وَحُصِّلَ مَا فِي الصُّدُورِ (10) १०. आणि मनातल्या गुप्त गोष्टींना उघड केले जाईल |
إِنَّ رَبَّهُم بِهِمْ يَوْمَئِذٍ لَّخَبِيرٌ (11) ११. निःसंशय, यांचा पालनकर्ता त्या दिवशी यांच्या अवस्थेची पुरेपूर खबर राखणारा असेल |