The Quran in Marathi - Surah Maun translated into Marathi, Surah Al-Maun in Marathi. We provide accurate translation of Surah Maun in Marathi - الماراثية, Verses 7 - Surah Number 107 - Page 602.
أَرَأَيْتَ الَّذِي يُكَذِّبُ بِالدِّينِ (1) १. काय तुम्ही (त्यालाही) पाहिले जो मोबदल्याच्या दिवसाला खोटे ठरवितो |
فَذَٰلِكَ الَّذِي يَدُعُّ الْيَتِيمَ (2) २. हाच तो होय, जो अनाथाला धक्के मारतो |
وَلَا يَحُضُّ عَلَىٰ طَعَامِ الْمِسْكِينِ (3) ३. आणि गरीबाला जेवु घालण्यास प्रोत्साहन देत नाही |
فَوَيْلٌ لِّلْمُصَلِّينَ (4) ४. त्या नमाजी लोकांकरिता ‘वैल’ (नामक जहन्नमची एक जागा) आहे |
الَّذِينَ هُمْ عَن صَلَاتِهِمْ سَاهُونَ (5) ५. जे आपल्या नमाजांपासून गाफील आहेत |
الَّذِينَ هُمْ يُرَاءُونَ (6) ६. जे केवळ देखावा दाखवितात |
وَيَمْنَعُونَ الْمَاعُونَ (7) ७. आणि वापरण्याची वस्तू रोखून धरतात |