تَبَارَكَ الَّذِي نَزَّلَ الْفُرْقَانَ عَلَىٰ عَبْدِهِ لِيَكُونَ لِلْعَالَمِينَ نَذِيرًا (1) १. मोठा बरकतशाली (समृद्धशाली) आहे तो अल्लाह ज्याने आपल्या दासावर फुरक़ान१ अवतिरत केले. यासाठी की तो समस्त लोकांकरिता खबरदार करणारा ठरावा |
الَّذِي لَهُ مُلْكُ السَّمَاوَاتِ وَالْأَرْضِ وَلَمْ يَتَّخِذْ وَلَدًا وَلَمْ يَكُن لَّهُ شَرِيكٌ فِي الْمُلْكِ وَخَلَقَ كُلَّ شَيْءٍ فَقَدَّرَهُ تَقْدِيرًا (2) २. त्याच अल्लाहचे अधिराज्य आहे आकाशांवर आणि धरतीवर आणि तो कोणतीही संतती बाळगत नाही, ना त्याच्या राज्यसत्तेत त्याचा कोणी भागीदार आहे, आणि प्रत्येक वस्तूला निर्माण करून त्याने एक निर्धारित स्वरूप दिले आहे |
وَاتَّخَذُوا مِن دُونِهِ آلِهَةً لَّا يَخْلُقُونَ شَيْئًا وَهُمْ يُخْلَقُونَ وَلَا يَمْلِكُونَ لِأَنفُسِهِمْ ضَرًّا وَلَا نَفْعًا وَلَا يَمْلِكُونَ مَوْتًا وَلَا حَيَاةً وَلَا نُشُورًا (3) ३. आणि त्या लोकांनी अल्लाहखेरीज ज्यांना आपले आराध्य दैवत बनवून ठेवले आहे, ते कोणतीही वस्तू निर्माण करू शकत नाही, किंबहुना ते स्वतः(एखाद्याकडून) निर्माण केले जातात ते स्वतः आपल्या लाभ-हानिचा अधिकार बाळगत नाहीत आणि ना जीवन-मृत्युचा आणि ना दुसऱ्यांदा जिवंत होऊन उठण्याचे ते मालक आहेत |
وَقَالَ الَّذِينَ كَفَرُوا إِنْ هَٰذَا إِلَّا إِفْكٌ افْتَرَاهُ وَأَعَانَهُ عَلَيْهِ قَوْمٌ آخَرُونَ ۖ فَقَدْ جَاءُوا ظُلْمًا وَزُورًا (4) ४. आणि काफिर (इन्कारी) लोक म्हणाले, हे तर केवळ त्याने स्वतः रचलेले असत्य आहे ज्या कामात दुसऱ्या लोकांनीही त्याला मदत केली आहे. वस्तुतः हे काफिर मोठे अत्याचारी आणि निव्वळ असत्य आणणारे बनलेत |
وَقَالُوا أَسَاطِيرُ الْأَوَّلِينَ اكْتَتَبَهَا فَهِيَ تُمْلَىٰ عَلَيْهِ بُكْرَةً وَأَصِيلًا (5) ५. आणि ते असेही म्हणाले की या तर पूर्वी होऊन गेलेल्या लोकांच्या कथा-कहाण्या आहेत, ज्या त्याने लिहून ठेवल्या आहेत, आणि त्याच सकाळ-संध्याकाळ त्याच्यासमोर वाचल्या जातात |
قُلْ أَنزَلَهُ الَّذِي يَعْلَمُ السِّرَّ فِي السَّمَاوَاتِ وَالْأَرْضِ ۚ إِنَّهُ كَانَ غَفُورًا رَّحِيمًا (6) ६. सांगा, याला तर त्या अल्लाहने अवतरित केले आहे, जो आकाश व धरतीच्या सर्व लपलेल्या गोष्टी जाणतो. निःसंशय तो मोठा माफ करणारा आणि दया करणारा आहे |
وَقَالُوا مَالِ هَٰذَا الرَّسُولِ يَأْكُلُ الطَّعَامَ وَيَمْشِي فِي الْأَسْوَاقِ ۙ لَوْلَا أُنزِلَ إِلَيْهِ مَلَكٌ فَيَكُونَ مَعَهُ نَذِيرًا (7) ७. आणि ते म्हणाले की हा कसा पैगंबर आहे की भोजन करतो आणि बाजारात चालतो फिरतो, त्याच्याजवळ एखादा फरिश्ता का नाही पाठविला जात की तो देखील त्याच्या सोबतीला राहून खबरदार करणारा बनला असता |
أَوْ يُلْقَىٰ إِلَيْهِ كَنزٌ أَوْ تَكُونُ لَهُ جَنَّةٌ يَأْكُلُ مِنْهَا ۚ وَقَالَ الظَّالِمُونَ إِن تَتَّبِعُونَ إِلَّا رَجُلًا مَّسْحُورًا (8) ८. किंवा त्याच्याजवळ एखादा खजिनाच टाकला गेला असता किंवा त्याची एखादी बाग तरी असती, ज्यातून तो खात राहिला असता. आणि त्या अत्याचारी लोकांनी म्हटले की तुम्ही तर अशा माणसाच्या मागे चालू लागलात, ज्याच्यावर जादू-टोणा केला गेला आहे |
انظُرْ كَيْفَ ضَرَبُوا لَكَ الْأَمْثَالَ فَضَلُّوا فَلَا يَسْتَطِيعُونَ سَبِيلًا (9) ९. जरा विचार करा, हे लोक तुमच्याविषयी कसकशा गोष्टी बोलत आहेत की ज्यामुळे स्वतःच मार्गभ्रष्ट होत आहेत आणि कशाही प्रकारे मार्गावर येऊ शकत नाही |
تَبَارَكَ الَّذِي إِن شَاءَ جَعَلَ لَكَ خَيْرًا مِّن ذَٰلِكَ جَنَّاتٍ تَجْرِي مِن تَحْتِهَا الْأَنْهَارُ وَيَجْعَل لَّكَ قُصُورًا (10) १०. अल्लाह तर असा समृद्धशाली आहे की त्याने इच्छिल्यास तुम्हाला अशा अनेक बागा प्रदान करील, ज्या त्यांनी सांगितलेल्या बागांपेक्षा खूप चांगल्या असतील, ज्यांच्या खाली प्रवाह वाहत असावेत आणि तुम्हाला अनेक पक्के महाल देखील प्रदान करील |
بَلْ كَذَّبُوا بِالسَّاعَةِ ۖ وَأَعْتَدْنَا لِمَن كَذَّبَ بِالسَّاعَةِ سَعِيرًا (11) ११. खरी गोष्ट अशी की लोक कयामतला खोटे समजतात आणि कयामतला खोटे ठरविणाऱ्यांकरिता आम्ही धगधगणारी आग तयार करून ठेवली आहे |
إِذَا رَأَتْهُم مِّن مَّكَانٍ بَعِيدٍ سَمِعُوا لَهَا تَغَيُّظًا وَزَفِيرًا (12) १२. जेव्हा ती यांना दुरून पाहील तेव्हा हे तिचे क्रोधाने बेकाबू होणे आणि भयंकर गर्जना ऐकतील |
وَإِذَا أُلْقُوا مِنْهَا مَكَانًا ضَيِّقًا مُّقَرَّنِينَ دَعَوْا هُنَالِكَ ثُبُورًا (13) १३. आणि जेव्हा यांना जहन्नमच्या एखाद्या तंग (संकुचित) जागेत बांधून फेकून दिले जाईल तेव्हा तिथे आपल्यासाठी मरणाला पुकारतील |
لَّا تَدْعُوا الْيَوْمَ ثُبُورًا وَاحِدًا وَادْعُوا ثُبُورًا كَثِيرًا (14) १४. (त्यांना सांगितले जाईल) आज एकाच मरणाला पुकारू नका, किंबहुना अनेक मरणांना हाक मारा |
قُلْ أَذَٰلِكَ خَيْرٌ أَمْ جَنَّةُ الْخُلْدِ الَّتِي وُعِدَ الْمُتَّقُونَ ۚ كَانَتْ لَهُمْ جَزَاءً وَمَصِيرًا (15) १५. तुम्ही सांगा, काय हे अधिक चांगले आहे१ की ती कायमस्वरूपी जन्नत, जिचा वायदा नेक- सदाचारी लोकांना दिला गेला आहे, जो त्यांचा मोबदला आहे आणि त्यांच्या परतीचे मूळ ठिकाण आहे |
لَّهُمْ فِيهَا مَا يَشَاءُونَ خَالِدِينَ ۚ كَانَ عَلَىٰ رَبِّكَ وَعْدًا مَّسْئُولًا (16) १६. ते जे काही इच्छितील ते त्यांच्यासाठी तिथे हजर असेल, नेहमी राहणारे हा तर तुमच्या पालनकर्त्याचा वायदा आहे, ज्याची मागणी केली गेली पाहिजे |
وَيَوْمَ يَحْشُرُهُمْ وَمَا يَعْبُدُونَ مِن دُونِ اللَّهِ فَيَقُولُ أَأَنتُمْ أَضْلَلْتُمْ عِبَادِي هَٰؤُلَاءِ أَمْ هُمْ ضَلُّوا السَّبِيلَ (17) १७. आणि ज्या दिवशी अल्लाह त्यांना आणि अल्लाहखेरीज ज्याची हे उपासना करीत राहिले त्या सर्वांना एकत्र करून विचारेल, काय माझ्या या दासांना तुम्ही मार्गभ्रष्ट केले की हे स्वतः मार्गापासून विचलित झाले?१ |
قَالُوا سُبْحَانَكَ مَا كَانَ يَنبَغِي لَنَا أَن نَّتَّخِذَ مِن دُونِكَ مِنْ أَوْلِيَاءَ وَلَٰكِن مَّتَّعْتَهُمْ وَآبَاءَهُمْ حَتَّىٰ نَسُوا الذِّكْرَ وَكَانُوا قَوْمًا بُورًا (18) १८. ते उत्तर देतील, पवित्र आहेस तू! स्वतः आमच्यासाठी हे योग्य नव्हते की तुझ्याखेरीज दुसऱ्यांना आपला मित्र- सहाय्यक बनविले असते. खरी गोष्ट अशी की तू यांना आणि यांच्या वाडवडिलांना सुख- संपन्नता प्रदान केली येथेपर्यंत की हे बोध- उपदेश विसरले. हे लोक विनाशास पात्रच होते |
فَقَدْ كَذَّبُوكُم بِمَا تَقُولُونَ فَمَا تَسْتَطِيعُونَ صَرْفًا وَلَا نَصْرًا ۚ وَمَن يَظْلِم مِّنكُمْ نُذِقْهُ عَذَابًا كَبِيرًا (19) १९. तेव्हा त्यांनी तुम्हाला तुमच्या सर्व गोष्टींमध्ये खोटे ठरविले. आता ना तर तुमच्यात आपली शिक्षा टाळण्याची ताकद आहे ना मदत करण्याची. तुमच्यापैकी ज्याने देखील अत्याचार केला, आम्ही त्याला सक्त शिक्षा- यातनेची गोडी चाखवू |
وَمَا أَرْسَلْنَا قَبْلَكَ مِنَ الْمُرْسَلِينَ إِلَّا إِنَّهُمْ لَيَأْكُلُونَ الطَّعَامَ وَيَمْشُونَ فِي الْأَسْوَاقِ ۗ وَجَعَلْنَا بَعْضَكُمْ لِبَعْضٍ فِتْنَةً أَتَصْبِرُونَ ۗ وَكَانَ رَبُّكَ بَصِيرًا (20) २०. आणि आम्ही तुमच्यापूर्वी जेवढे देखील पैगंबर पाठविले ते सर्व भोजनही करीत असत आणि बाजारातही हिंडत फिरत असत, आणि आम्ही तुमच्यापैकी प्रत्येकाला दुसऱ्याच्या कसोटीचे माध्यम बनविले. १ काय तुम्ही धीर- संयम राखाल? आणि तुमचा पालनकर्ता सर्व काही पाहणारा आहे |
۞ وَقَالَ الَّذِينَ لَا يَرْجُونَ لِقَاءَنَا لَوْلَا أُنزِلَ عَلَيْنَا الْمَلَائِكَةُ أَوْ نَرَىٰ رَبَّنَا ۗ لَقَدِ اسْتَكْبَرُوا فِي أَنفُسِهِمْ وَعَتَوْا عُتُوًّا كَبِيرًا (21) २१. आणि ज्यांना आमच्या भेटीची आशा नाही, ते म्हणाले की आमच्यावर फरिश्ते का नाही अवतरित केले जात? किंवा आम्ही (आपल्या डोळ्यांनी) आपल्या पालनकर्त्यास पाहिले असते? त्या लोकांनी स्वतः आपल्यालाच खूप मोठे समजून घेतले आहे आणि फार अवज्ञा केली आहे |
يَوْمَ يَرَوْنَ الْمَلَائِكَةَ لَا بُشْرَىٰ يَوْمَئِذٍ لِّلْمُجْرِمِينَ وَيَقُولُونَ حِجْرًا مَّحْجُورًا (22) २२. ज्या दिवशी हे फरिश्त्यांना पाहतील त्या दिवशी या अपराध्यांकरिता कोणताही आनंद नसेल आणि म्हणतील की वंचितच वंचित ठेवले गेलो |
وَقَدِمْنَا إِلَىٰ مَا عَمِلُوا مِنْ عَمَلٍ فَجَعَلْنَاهُ هَبَاءً مَّنثُورًا (23) २३. आणि त्यांनी जे जे कर्म केले होते आम्ही त्यांच्याकडे पुढे होऊन त्यांना कणांप्रमाणे क्षत-विक्षत करून टाकले |
أَصْحَابُ الْجَنَّةِ يَوْمَئِذٍ خَيْرٌ مُّسْتَقَرًّا وَأَحْسَنُ مَقِيلًا (24) २४. (परंतु) त्या दिवशी जन्नतमध्ये राहणाऱ्यांचे ठिकाण फार चांगले असेल, आणि विश्रामस्थानही सुखदायक असेल |
وَيَوْمَ تَشَقَّقُ السَّمَاءُ بِالْغَمَامِ وَنُزِّلَ الْمَلَائِكَةُ تَنزِيلًا (25) २५. आणि ज्या दिवशी आकाश ढगांसह फाटून जाईल आणि फरिश्ते सतत उतरविले जातील |
الْمُلْكُ يَوْمَئِذٍ الْحَقُّ لِلرَّحْمَٰنِ ۚ وَكَانَ يَوْمًا عَلَى الْكَافِرِينَ عَسِيرًا (26) २६. त्या दिवशी योग्यरित्या राज्यसत्ता केवळ रहमानचीच(कृपाळु) असेल, आणि हा दिवस काफिरांकरिता मोठा सक्त असेल |
وَيَوْمَ يَعَضُّ الظَّالِمُ عَلَىٰ يَدَيْهِ يَقُولُ يَا لَيْتَنِي اتَّخَذْتُ مَعَ الرَّسُولِ سَبِيلًا (27) २७. आणि त्या दिवशी अत्याचारी, आपल्या हातांना चावा घेऊन म्हणेल, अरेरे! मी पैगंबराचा मार्ग अंगीकारला असता तर बरे झाले असते |
يَا وَيْلَتَىٰ لَيْتَنِي لَمْ أَتَّخِذْ فُلَانًا خَلِيلًا (28) २८. अरेरे! मी अमुक एका इसमाला मित्र बनविले नसते तर बरे झाले असते |
لَّقَدْ أَضَلَّنِي عَنِ الذِّكْرِ بَعْدَ إِذْ جَاءَنِي ۗ وَكَانَ الشَّيْطَانُ لِلْإِنسَانِ خَذُولًا (29) २९. त्याने तर मला त्यानंतर मार्गभ्रष्ट केले, जेव्हा उपदेश माझ्याजवळ येऊन पोहोचला होता आणि सैतान तर मानवाला (वेळेवर) दगा देणारा आहे |
وَقَالَ الرَّسُولُ يَا رَبِّ إِنَّ قَوْمِي اتَّخَذُوا هَٰذَا الْقُرْآنَ مَهْجُورًا (30) ३०. आणि पैगंबर म्हणेल की हे माझ्या पालनकर्त्या! निःसंशय, माझ्या जनसमूहाने या कुरआनास सोडून दिले होते |
وَكَذَٰلِكَ جَعَلْنَا لِكُلِّ نَبِيٍّ عَدُوًّا مِّنَ الْمُجْرِمِينَ ۗ وَكَفَىٰ بِرَبِّكَ هَادِيًا وَنَصِيرًا (31) ३१. आणि अशा प्रकारे आम्ही काही अपराध्यांना प्रत्येक पैगंबरांचे शत्रू बनविले आहे आणि तुमचा पालनकर्ताच मार्गदर्शन करणारा आणि मदत करणारा पुरेसा आहे |
وَقَالَ الَّذِينَ كَفَرُوا لَوْلَا نُزِّلَ عَلَيْهِ الْقُرْآنُ جُمْلَةً وَاحِدَةً ۚ كَذَٰلِكَ لِنُثَبِّتَ بِهِ فُؤَادَكَ ۖ وَرَتَّلْنَاهُ تَرْتِيلًا (32) ३२. आणि काफिर म्हणाले की त्याच्यावर संपूर्ण कुरआन एकाच वेळी का नाही अवतरित केले गेले? अशा प्रकारे (आम्ही थोडे थोडे करून अवतरित केले) यासाठी की याद्वआरे आम्ही तुमच्या हृदयास मजबूती प्रदान करावी. आणि आम्ही त्यास थांबून थांबूनच वाचून ऐकविले आहे |
وَلَا يَأْتُونَكَ بِمَثَلٍ إِلَّا جِئْنَاكَ بِالْحَقِّ وَأَحْسَنَ تَفْسِيرًا (33) ३३. आणि हे तुमच्याजवळ जे काही उदाहरण घेऊन येतील आम्ही त्याचे खरे उत्तर आणि योग्य स्पष्टीकरण सांगू |
الَّذِينَ يُحْشَرُونَ عَلَىٰ وُجُوهِهِمْ إِلَىٰ جَهَنَّمَ أُولَٰئِكَ شَرٌّ مَّكَانًا وَأَضَلُّ سَبِيلًا (34) ३४. जे लोक तोंडघशी पाडून जहन्नमकडे एकत्र केले जातील, तर तेच मोठ्या वाईट ठिकाणाचे आणि भ्रष्ट मार्गाचे आहेत |
وَلَقَدْ آتَيْنَا مُوسَى الْكِتَابَ وَجَعَلْنَا مَعَهُ أَخَاهُ هَارُونَ وَزِيرًا (35) ३५. आणि निःसंशय, आम्ही मूसाला ग्रंथ प्रदान केला आणि त्यांच्यासोबत त्यांचा भाऊ हारूनला त्यांचा सहाय्यक बनविले |
فَقُلْنَا اذْهَبَا إِلَى الْقَوْمِ الَّذِينَ كَذَّبُوا بِآيَاتِنَا فَدَمَّرْنَاهُمْ تَدْمِيرًا (36) ३६. आणि सांगितले की तुम्ही दोघे त्या लोकांकडे जा, जे आमच्या निशाण्यांना खोटे ठरवित आहेत. मग आम्ही त्यांचा अगदी सर्वनाश केला |
وَقَوْمَ نُوحٍ لَّمَّا كَذَّبُوا الرُّسُلَ أَغْرَقْنَاهُمْ وَجَعَلْنَاهُمْ لِلنَّاسِ آيَةً ۖ وَأَعْتَدْنَا لِلظَّالِمِينَ عَذَابًا أَلِيمًا (37) ३७. आणि नूहच्या जनसमूहानेही जेव्हा पैगंबरांना खोटे ठरविले, तेव्हा आम्ही त्यांना बुडवून टाकले आणि लोकांकरिता त्यांना बोधप्राप्तीचे चिन्ह बनविले आणि आम्ही अत्याचारींकरिता मोठी कठोर शिक्षा तयार करून ठेवली आहे |
وَعَادًا وَثَمُودَ وَأَصْحَابَ الرَّسِّ وَقُرُونًا بَيْنَ ذَٰلِكَ كَثِيرًا (38) ३८. आणि ‘आद’ जनसमूह आणि ‘समूद’ जनसमूह आणि विहीरवाल्यांना आणि त्यांच्या दरम्यानच्या अनेक संप्रदायांना नष्ट करून टाकले |
وَكُلًّا ضَرَبْنَا لَهُ الْأَمْثَالَ ۖ وَكُلًّا تَبَّرْنَا تَتْبِيرًا (39) ३९. आणि आम्ही प्रत्येकासमोर उदाहरणे प्रस्तुत केली, मग प्रत्येकाला पूर्णतः नष्ट केले |
وَلَقَدْ أَتَوْا عَلَى الْقَرْيَةِ الَّتِي أُمْطِرَتْ مَطَرَ السَّوْءِ ۚ أَفَلَمْ يَكُونُوا يَرَوْنَهَا ۚ بَلْ كَانُوا لَا يَرْجُونَ نُشُورًا (40) ४०. आणि हे लोक त्या वस्तीजवळूनही ये-जा करतात, जिच्यावर मोठा वाईट प्रकारचा पाऊस पाडला गेला.१ काय हे तरीही ते पाहत नाहीत? खरी गोष्ट अशी की त्यांना मेल्यानंतर दुसऱ्यांदा जिवंत होऊन उभे राहण्यावर विश्वासच नाही |
وَإِذَا رَأَوْكَ إِن يَتَّخِذُونَكَ إِلَّا هُزُوًا أَهَٰذَا الَّذِي بَعَثَ اللَّهُ رَسُولًا (41) ४१. आणि तुम्हाला जेव्हा कधी पाहतात, तेव्हा तुमची थट्टा उडवू लागतात, हाच काय तो माणूस ज्याला अल्लाहने रसूल बनवून पाठविला आहे |
إِن كَادَ لَيُضِلُّنَا عَنْ آلِهَتِنَا لَوْلَا أَن صَبَرْنَا عَلَيْهَا ۚ وَسَوْفَ يَعْلَمُونَ حِينَ يَرَوْنَ الْعَذَابَ مَنْ أَضَلُّ سَبِيلًا (42) ४२. (एवढे बरे) की आम्ही अटळ राहिलो, अन्यथा याने तर आम्हाला आमच्या आराध्य दैवतांपासून विचलित करण्यात काहीच कसर सोडली नव्हती. आणि जेव्हा हे (अल्लाहच्या) शिक्षा- यातनांना पाहतील तेव्हा त्यांना स्पष्टतः कळून येईल की पूर्णपणे मार्गापासून भटकलेला कोण होता |
أَرَأَيْتَ مَنِ اتَّخَذَ إِلَٰهَهُ هَوَاهُ أَفَأَنتَ تَكُونُ عَلَيْهِ وَكِيلًا (43) ४३. काय तुम्ही त्यालाही पाहिले ज्याने आपल्या इच्छा-आकांक्षांना देवता (उपास्य) बनवून ठेवले आहे. काय तुम्ही त्याची जबाबदारी घेऊ शकता |
أَمْ تَحْسَبُ أَنَّ أَكْثَرَهُمْ يَسْمَعُونَ أَوْ يَعْقِلُونَ ۚ إِنْ هُمْ إِلَّا كَالْأَنْعَامِ ۖ بَلْ هُمْ أَضَلُّ سَبِيلًا (44) ४४. काय तुम्ही याच विचारात आहात की त्यांच्यापैकी बहुतेक जण ऐकतात किंवा समजतात. ते तर अगदी जनावरांसारखे आहेत, किंबहुना त्यांच्यापेक्षाही अधिक वाट चुकलेले |
أَلَمْ تَرَ إِلَىٰ رَبِّكَ كَيْفَ مَدَّ الظِّلَّ وَلَوْ شَاءَ لَجَعَلَهُ سَاكِنًا ثُمَّ جَعَلْنَا الشَّمْسَ عَلَيْهِ دَلِيلًا (45) ४५. काय तुम्ही नाही पाहिले की तुमच्या पालनकर्त्याने सावलीला कशा प्रकारे विस्तृत केले आहे. त्याने इच्छिले असते तर तिला स्थिर केले असते, मग सूर्याला आम्ही त्यावर प्रमाण ठरविले |
ثُمَّ قَبَضْنَاهُ إِلَيْنَا قَبْضًا يَسِيرًا (46) ४६. मग आम्ही त्याला हळू हळू आपल्याकडे ओढून घेतले |
وَهُوَ الَّذِي جَعَلَ لَكُمُ اللَّيْلَ لِبَاسًا وَالنَّوْمَ سُبَاتًا وَجَعَلَ النَّهَارَ نُشُورًا (47) ४७. आणि तोच आहे, ज्याने रात्रीला तुमच्यासाठी पोषाख बनविले, आणि झोपेला सुख शांतीमय बनविले आणि दिवसाला उठून उभे राहण्याची वेळ |
وَهُوَ الَّذِي أَرْسَلَ الرِّيَاحَ بُشْرًا بَيْنَ يَدَيْ رَحْمَتِهِ ۚ وَأَنزَلْنَا مِنَ السَّمَاءِ مَاءً طَهُورًا (48) ४८. आणि तोच आहे जो कृपास्वरूप पावसापूर्वी खूशखबर देणाऱ्या हवेला पाठवितो आणि आम्ही आकाशातून अतिशय स्वच्छ- शुद्ध (पाक) पाणी वर्षवितो |
لِّنُحْيِيَ بِهِ بَلْدَةً مَّيْتًا وَنُسْقِيَهُ مِمَّا خَلَقْنَا أَنْعَامًا وَأَنَاسِيَّ كَثِيرًا (49) ४९. यासाठी की त्याच्याद्वारे मृत झालेल्या शहराला जिवंत करावे आणि ते आम्ही आपल्या निर्मितीपैकी अधिकांश जनावरांना आणि माणसांना पाजतो |
وَلَقَدْ صَرَّفْنَاهُ بَيْنَهُمْ لِيَذَّكَّرُوا فَأَبَىٰ أَكْثَرُ النَّاسِ إِلَّا كُفُورًا (50) ५०. आणि निःसंशय, आम्ही यास त्यांच्या दरम्यान अनेक प्रकारे वर्णन केले यासाठी की त्यांनी बोध प्राप्त करावा, परंतु तरीही अधिकांश लोकांनी कृतघ्नतेखेरीज (आणखी काही) मानले नाही |
وَلَوْ شِئْنَا لَبَعَثْنَا فِي كُلِّ قَرْيَةٍ نَّذِيرًا (51) ५१. आणि आम्ही जर इच्छिले असते तर प्रत्येक वस्तीत एक भय दाखविणारा पाठविला असता |
فَلَا تُطِعِ الْكَافِرِينَ وَجَاهِدْهُم بِهِ جِهَادًا كَبِيرًا (52) ५२. तेव्हा तुम्ही काफिरांचे म्हणणे मान्य करू नका आणि कुरआनद्वारे पूर्ण शक्तीने त्यांच्याशी महाधर्मयुद्ध (जिहाद) करा |
۞ وَهُوَ الَّذِي مَرَجَ الْبَحْرَيْنِ هَٰذَا عَذْبٌ فُرَاتٌ وَهَٰذَا مِلْحٌ أُجَاجٌ وَجَعَلَ بَيْنَهُمَا بَرْزَخًا وَحِجْرًا مَّحْجُورًا (53) ५३. आणि तोच आहे ज्याने दोन समुद्रांना आपसात मिळवून ठेवले आहे. एक आहे गोड चवदार आणि दुसरा खारा कडू आणि आणि या दोघांच्या दरम्यान एक आड पडदा आणि भक्कम आड उभा केला |
وَهُوَ الَّذِي خَلَقَ مِنَ الْمَاءِ بَشَرًا فَجَعَلَهُ نَسَبًا وَصِهْرًا ۗ وَكَانَ رَبُّكَ قَدِيرًا (54) ५४. आणि तोच आहे ज्याने पाण्यापासून मानवाला निर्माण केले, मग त्याला वंश बाळगणारा आणि सासरवाडीचे नातेसंबंध राखणारा बनविले. निःसंशय, तुमचा पालनकर्ता प्रत्येक गोष्ट करण्यास समर्थ आहे |
وَيَعْبُدُونَ مِن دُونِ اللَّهِ مَا لَا يَنفَعُهُمْ وَلَا يَضُرُّهُمْ ۗ وَكَانَ الْكَافِرُ عَلَىٰ رَبِّهِ ظَهِيرًا (55) ५५. आणि हे अल्लाहऐवजी अशांची उपासना करतात जे ना त्यांना काही लाभ पोहचवू शकतात आणि ना काही हानि पोहचवू शकतात. काफिर तर आहेच आपल्या पालनकर्त्याविरूद्ध (सैताना) चा सहाय्यक |
وَمَا أَرْسَلْنَاكَ إِلَّا مُبَشِّرًا وَنَذِيرًا (56) ५६. आणि आम्ही तुम्हाला खूशखबर देणारा आणि खबरदार करणारा (पैगंबर) बनवून पाठविले आहे |
قُلْ مَا أَسْأَلُكُمْ عَلَيْهِ مِنْ أَجْرٍ إِلَّا مَن شَاءَ أَن يَتَّخِذَ إِلَىٰ رَبِّهِ سَبِيلًا (57) ५७. सांगा की मी (कुरआन पोहचविल्याबद्दल) तुमच्याकडून कसलेही पारिश्रमिक इच्छित नाही, परंतु हे की जो इच्छिल त्याने आपल्या पालनकर्त्याचा मार्ग अंगीकारावा |
وَتَوَكَّلْ عَلَى الْحَيِّ الَّذِي لَا يَمُوتُ وَسَبِّحْ بِحَمْدِهِ ۚ وَكَفَىٰ بِهِ بِذُنُوبِ عِبَادِهِ خَبِيرًا (58) ५८. आणि त्या चिरकाल राहणाऱ्या अल्लाहवर पूर्ण विश्वास राखावा, ज्याला कधीही मृत्यु नाही त्याच्या प्रशंसेसह त्याची पवित्रता (तस्बीह) वर्णन करीत राहावे. तो आपल्या दासांचे अपराध चांगल्या प्रकारे जाणतो |
الَّذِي خَلَقَ السَّمَاوَاتِ وَالْأَرْضَ وَمَا بَيْنَهُمَا فِي سِتَّةِ أَيَّامٍ ثُمَّ اسْتَوَىٰ عَلَى الْعَرْشِ ۚ الرَّحْمَٰنُ فَاسْأَلْ بِهِ خَبِيرًا (59) ५९. तोच आहे ज्याने आकाशांना आणि जमिनीला आणि त्यांच्या दरम्यान असलेल्या समस्त वस्तूंना सहा दिवसांत निर्माण केले, मग तो अर्श (ईश-सिंहासना) वर बुलंद झाला. तो रहमान आहे, तुम्ही त्याच्याविषयी एखाद्या जाणकाराला विचारा |
وَإِذَا قِيلَ لَهُمُ اسْجُدُوا لِلرَّحْمَٰنِ قَالُوا وَمَا الرَّحْمَٰنُ أَنَسْجُدُ لِمَا تَأْمُرُنَا وَزَادَهُمْ نُفُورًا ۩ (60) ६०. आणि त्यांना जेव्हा देखील सांगितले जाते की रहमान (दयावान अल्लाह) ला सजदा करा (त्याच्यापुढे माथा टेका) तेव्हा ते म्हणतात की रहमान काय आहे? काय आम्ही त्याला सजदा करावा, ज्याचा आदेश तुम्ही आम्हाला देत आहात आणि (या आवाहनाने) त्यांच्या तिरस्कारात वाढच होते |
تَبَارَكَ الَّذِي جَعَلَ فِي السَّمَاءِ بُرُوجًا وَجَعَلَ فِيهَا سِرَاجًا وَقَمَرًا مُّنِيرًا (61) ६१. मोठा शुभ- मंगलप्रद आहे तो ज्याने आकाशात बुरुज बनविले, आणि त्यात सूर्य बनविला आणि प्रकाशमान चंद्र देखील |
وَهُوَ الَّذِي جَعَلَ اللَّيْلَ وَالنَّهَارَ خِلْفَةً لِّمَنْ أَرَادَ أَن يَذَّكَّرَ أَوْ أَرَادَ شُكُورًا (62) ६२. आणि त्यानेच रात्र आणि दिवसाला एका पाठोपाठ ये-जा करणारा बनविले त्या माणसाच्या बोध- उपदेशाकरिता, जो बोध प्राप्त करण्याचा किंवा कृतज्ञशील होण्याचा इरादा राखत असेल |
وَعِبَادُ الرَّحْمَٰنِ الَّذِينَ يَمْشُونَ عَلَى الْأَرْضِ هَوْنًا وَإِذَا خَاطَبَهُمُ الْجَاهِلُونَ قَالُوا سَلَامًا (63) ६३. आणि रहमान (दयावान अल्लाह) चे सच्चे दास ते आहेत, जे जमिनीवर नरमीने चालतात आणि जेव्हा अज्ञानी लोक त्यांच्याशी बोलू लागतात, तेव्हा ते म्हणतात सलाम आहे.१ |
وَالَّذِينَ يَبِيتُونَ لِرَبِّهِمْ سُجَّدًا وَقِيَامًا (64) ६४. आणि जे आपल्या पालनकर्त्यासमोर सजदा करतात आणि उभे राहून (नमाजच्या अवस्थेत) रात्र घालवितात |
وَالَّذِينَ يَقُولُونَ رَبَّنَا اصْرِفْ عَنَّا عَذَابَ جَهَنَّمَ ۖ إِنَّ عَذَابَهَا كَانَ غَرَامًا (65) ६५. आणि जे दुआ (प्रार्थना) करतात की हे आमच्या पालनकर्त्या! जहन्नमच्या शिक्षा- यातनेला आमच्यापासून दूरच ठेव, कारण तिची शिक्षा अगदी चिकटून राहणारी आहे. १ |
إِنَّهَا سَاءَتْ مُسْتَقَرًّا وَمُقَامًا (66) ६६. ते कायमस्वरूपी ठिकाण आणि निवासाच्या दृष्टीने मोठी वाईट जागा आहे |
وَالَّذِينَ إِذَا أَنفَقُوا لَمْ يُسْرِفُوا وَلَمْ يَقْتُرُوا وَكَانَ بَيْنَ ذَٰلِكَ قَوَامًا (67) ६७. आणि जे खर्च करतानाही ना उधळपट्टी करतात, ना कंजूसपणा, किंबहुना या दोघांमधील समतोल मार्ग असतो |
وَالَّذِينَ لَا يَدْعُونَ مَعَ اللَّهِ إِلَٰهًا آخَرَ وَلَا يَقْتُلُونَ النَّفْسَ الَّتِي حَرَّمَ اللَّهُ إِلَّا بِالْحَقِّ وَلَا يَزْنُونَ ۚ وَمَن يَفْعَلْ ذَٰلِكَ يَلْقَ أَثَامًا (68) ६८. आणि जे अल्लाहसोबत दुसऱ्या एखाद्या उपास्याला पुकारत नाही, आणि एखाद्या अशा माणसाला, ज्याची हत्या करणे अल्लाहने हराम (अवैध) केले असावे, त्याची नाहक हत्या करीत नाही, ना ते व्यभिचार करतात१ आणि जो कोणी हे कर्म करील तर तो स्वतःवर कठोर शिक्षा ओढवून घेईल |
يُضَاعَفْ لَهُ الْعَذَابُ يَوْمَ الْقِيَامَةِ وَيَخْلُدْ فِيهِ مُهَانًا (69) ६९. त्याला कयामतच्या दिवशी दुप्पट अज़ाब (शिक्षा- यातना) दिला जाईल आणि तो अपमान आणि अनादरासह सदैव तेथेच राहील |
إِلَّا مَن تَابَ وَآمَنَ وَعَمِلَ عَمَلًا صَالِحًا فَأُولَٰئِكَ يُبَدِّلُ اللَّهُ سَيِّئَاتِهِمْ حَسَنَاتٍ ۗ وَكَانَ اللَّهُ غَفُورًا رَّحِيمًا (70) ७०. त्या लोकांखेरीज, जे माफी मागतील आणि ईमान राखतील आणि नेकीचे कर्म करतील तर अशा लोकांचे अपराध, अल्लाह सत्कमर्मात बदलतो. अल्लाह मोठा माफ करणारा आणि दया करणारा आहे |
وَمَن تَابَ وَعَمِلَ صَالِحًا فَإِنَّهُ يَتُوبُ إِلَى اللَّهِ مَتَابًا (71) ७१. आणि जो मनुष्य माफी मागेल आणि सत्कर्म करत राहील तर तो वास्तविकपणे अल्लाहकडे खरा झुकाव राखतो |
وَالَّذِينَ لَا يَشْهَدُونَ الزُّورَ وَإِذَا مَرُّوا بِاللَّغْوِ مَرُّوا كِرَامًا (72) ७२. आणि जे खोटी साक्ष देत नाहीत, आणि जेव्हा ते एखाद्या निरर्थक आणि व्यर्थ गोष्टीजवळून जातात, तेव्हा प्रतिष्ठापूर्वक जातात |
وَالَّذِينَ إِذَا ذُكِّرُوا بِآيَاتِ رَبِّهِمْ لَمْ يَخِرُّوا عَلَيْهَا صُمًّا وَعُمْيَانًا (73) ७३. आणि जेव्हा त्यांना त्यांच्या पालनकर्त्या (ची वचने आणि वायद्यांसंबंधी) च्या आयती ऐकविल्या जातात तेव्हा ते त्यावर आंधळे-बहीरे होऊन उडी घेत नाहीत |
وَالَّذِينَ يَقُولُونَ رَبَّنَا هَبْ لَنَا مِنْ أَزْوَاجِنَا وَذُرِّيَّاتِنَا قُرَّةَ أَعْيُنٍ وَاجْعَلْنَا لِلْمُتَّقِينَ إِمَامًا (74) ७४. आणि अशी दुआ (प्रार्थना) करतात की हे आमच्या पालनकर्त्या! तू आम्हाला आमच्या पत्न्या आणि संततीद्वारे नेत्रांना शितलता प्रदान कर आणि आम्हाला नेक- सदाचारी लोकांचा नेता बनव |
أُولَٰئِكَ يُجْزَوْنَ الْغُرْفَةَ بِمَا صَبَرُوا وَيُلَقَّوْنَ فِيهَا تَحِيَّةً وَسَلَامًا (75) ७५. हेच ते लोक होत, ज्यांना त्यांच्या सहनशीलतेच्या मोबदल्यात (जन्नतचे उंच) सज्जे प्रदान केले जातील, तिथे त्यांना आशीर्वाद आणि सलाम पोहचविला जाईल |
خَالِدِينَ فِيهَا ۚ حَسُنَتْ مُسْتَقَرًّا وَمُقَامًا (76) ७६. तिथे ते नेहमी नेहमी राहतील, ती अतिशय चांगली जागा आणि आरामाचे ठिकाण आहे |
قُلْ مَا يَعْبَأُ بِكُمْ رَبِّي لَوْلَا دُعَاؤُكُمْ ۖ فَقَدْ كَذَّبْتُمْ فَسَوْفَ يَكُونُ لِزَامًا (77) ७७. सांगा, जर तुमची मृदु- कोमल दुआ (प्रार्थना) नसती, तर माझ्या पालनकर्त्याने तुमची कदापि पर्वा केली नसती. तुम्ही तर खोटे ठरविले आहे. आता लवकरच त्याची शिक्षा तुम्हाला येऊन धरेल |