وَالنَّجْمِ إِذَا هَوَىٰ (1) १. ताऱ्याची शपथ आहे, जेव्हा तो कोसळेल |
مَا ضَلَّ صَاحِبُكُمْ وَمَا غَوَىٰ (2) २. की तुमचा साथीदार ना वाट चुकलेला आहे, ना तो वाकड्या मार्गावर आहे |
وَمَا يَنطِقُ عَنِ الْهَوَىٰ (3) ३. आणि ना आपल्या मर्जीने तो काही बोलतो |
إِنْ هُوَ إِلَّا وَحْيٌ يُوحَىٰ (4) ४. ती तर केवळ वहयी (आकाशवाणी) आहे, जी अवतरित केली जाते |
عَلَّمَهُ شَدِيدُ الْقُوَىٰ (5) ५. त्याला पूर्ण सामर्थ्यशाली फरिश्त्याने शिकविले आहे |
ذُو مِرَّةٍ فَاسْتَوَىٰ (6) ६. जो मोठा शक्तिशाली आहे, मग तो सरळ उभा राहिला |
وَهُوَ بِالْأُفُقِ الْأَعْلَىٰ (7) ७. आणि तो अति उच्च आकाशाच्या किनाऱ्या (क्षितिजा) वर होता |
ثُمَّ دَنَا فَتَدَلَّىٰ (8) ८. मग जवळ आला आणि अवतरला |
فَكَانَ قَابَ قَوْسَيْنِ أَوْ أَدْنَىٰ (9) ९. तेव्हा तो दोन कमानीइतक्या अंतरावर राहिला, किंबहुना त्याहून कमी |
فَأَوْحَىٰ إِلَىٰ عَبْدِهِ مَا أَوْحَىٰ (10) १०. मग त्याने अल्लाहच्या दासाला संदेश पोहचविला, जो काही पोहचविला |
مَا كَذَبَ الْفُؤَادُ مَا رَأَىٰ (11) ११. हृदयाने खोटे म्हटले नाही, जे (पैगंबरा) ने पाहिले |
أَفَتُمَارُونَهُ عَلَىٰ مَا يَرَىٰ (12) १२. काय तुम्ही त्या गोष्टीबद्दल वाद घालता, जे पैगंबर पाहतात |
وَلَقَدْ رَآهُ نَزْلَةً أُخْرَىٰ (13) १३. त्याला तर आणखी एका वेळी पाहिले होते |
عِندَ سِدْرَةِ الْمُنتَهَىٰ (14) १४. ‘सिदरतुल मुन्तहा’च्या जवळ |
عِندَهَا جَنَّةُ الْمَأْوَىٰ (15) १५. त्याच्याच निकट ‘जन्नतुल मावा’ आहे |
إِذْ يَغْشَى السِّدْرَةَ مَا يَغْشَىٰ (16) १६. जेव्हा सिदरला लपवून घेत होती, ती वस्तू, जी त्यावर आच्छादित होत होती |
مَا زَاغَ الْبَصَرُ وَمَا طَغَىٰ (17) १७. ना तर दृष्टी वळली, ना मर्यादेच्या पुढे गेली |
لَقَدْ رَأَىٰ مِنْ آيَاتِ رَبِّهِ الْكُبْرَىٰ (18) १८. निश्चितच त्याने आपल्या पालनकर्त्याच्या मोठमोठ्या निशाण्यांपैकी काही निशाण्या पाहिल्या होत्या |
أَفَرَأَيْتُمُ اللَّاتَ وَالْعُزَّىٰ (19) १९. काय तुम्ही ‘लात’ आणि ‘उज्जा’ला पाहिले |
وَمَنَاةَ الثَّالِثَةَ الْأُخْرَىٰ (20) २०. आणि तिसऱ्या अंतिम ‘मनात’ला?१ |
أَلَكُمُ الذَّكَرُ وَلَهُ الْأُنثَىٰ (21) २१. काय तुमच्यासाठी पुत्र आणि त्या (अल्लाह) साठी कन्या आहेत |
تِلْكَ إِذًا قِسْمَةٌ ضِيزَىٰ (22) २२. ही तर मोठी अन्यायपूर्ण वाटणी आहे |
إِنْ هِيَ إِلَّا أَسْمَاءٌ سَمَّيْتُمُوهَا أَنتُمْ وَآبَاؤُكُم مَّا أَنزَلَ اللَّهُ بِهَا مِن سُلْطَانٍ ۚ إِن يَتَّبِعُونَ إِلَّا الظَّنَّ وَمَا تَهْوَى الْأَنفُسُ ۖ وَلَقَدْ جَاءَهُم مِّن رَّبِّهِمُ الْهُدَىٰ (23) २३. वास्तविक ती केवळ नावे आहेत, जी तुम्ही आणि तुमच्या वाडवडिलांनी त्यांना ठेवली आहेत. अल्लाहने त्यांची कोणतीही सनद अवतरित केली नाही. हे लोक तर केवळ अटकळ (भ्रम) आणि आपल्या मनाच्या इच्छा आकांक्षांमागे लागले आहेत. आणि निःसंशय, त्यांच्या पालनकर्त्यातर्फे त्यांच्याजवळ मार्गदर्शन येऊन पोहोचले आहे |
أَمْ لِلْإِنسَانِ مَا تَمَنَّىٰ (24) २४. काय प्रत्येक मनुष्य जी कामना देखील करील ती त्याला साध्य होईल |
فَلِلَّهِ الْآخِرَةُ وَالْأُولَىٰ (25) २५. अल्लाहकरिताच आहे हे विश्व आणि ती आखिरत |
۞ وَكَم مِّن مَّلَكٍ فِي السَّمَاوَاتِ لَا تُغْنِي شَفَاعَتُهُمْ شَيْئًا إِلَّا مِن بَعْدِ أَن يَأْذَنَ اللَّهُ لِمَن يَشَاءُ وَيَرْضَىٰ (26) २६. आणखी कितीतरी फरिश्ते आकाशांमध्ये आहेत, ज्यांची शिफारस काहीच उपयोगी पडू शकत नाही, मात्र ही गोष्ट वेगळी की अल्लाह आपल्या इच्छेने व आपल्या खुशीने ज्याला इच्छिल आज्ञा (अनुमती) देईल.१ |
إِنَّ الَّذِينَ لَا يُؤْمِنُونَ بِالْآخِرَةِ لَيُسَمُّونَ الْمَلَائِكَةَ تَسْمِيَةَ الْأُنثَىٰ (27) २७. निःसंशय, जे लोक आखिरतवर ईमान राखत नाही, ते फरिश्त्यांना स्त्रीरूपी देवतांची नावे देतात |
وَمَا لَهُم بِهِ مِنْ عِلْمٍ ۖ إِن يَتَّبِعُونَ إِلَّا الظَّنَّ ۖ وَإِنَّ الظَّنَّ لَا يُغْنِي مِنَ الْحَقِّ شَيْئًا (28) २८. वास्तविक त्यांना याचे काहीच ज्ञान नाही. ते केवळ आपल्या भ्रमाच्या मागे लागले आहेत आणि निःसंशय, भ्रम (आणि अनुमान) सत्यासमोर काहीच उपयोगी पडत नाही |
فَأَعْرِضْ عَن مَّن تَوَلَّىٰ عَن ذِكْرِنَا وَلَمْ يُرِدْ إِلَّا الْحَيَاةَ الدُّنْيَا (29) २९. तेव्हा तुम्ही त्याच्याकडून तोंड फिरवून घ्या, जो आमच्या स्मरणांपासून तोंड फिरविल आणि ज्यांचा उद्देश केवळ ऐहिक जीवनाखेरीज काही नसावा |
ذَٰلِكَ مَبْلَغُهُم مِّنَ الْعِلْمِ ۚ إِنَّ رَبَّكَ هُوَ أَعْلَمُ بِمَن ضَلَّ عَن سَبِيلِهِ وَهُوَ أَعْلَمُ بِمَنِ اهْتَدَىٰ (30) ३०. हीच त्यांच्या ज्ञानाची सीमा आहे. तुमचा पालनकर्ता त्याला चांगल्या प्रकारे जाणतो, जो त्याच्या मार्गापासून विचलित झाला आहे आणि तोच चांगल्या प्रकारे जाणतो त्याला देखील, जो सन्मार्गावर आहे |
وَلِلَّهِ مَا فِي السَّمَاوَاتِ وَمَا فِي الْأَرْضِ لِيَجْزِيَ الَّذِينَ أَسَاءُوا بِمَا عَمِلُوا وَيَجْزِيَ الَّذِينَ أَحْسَنُوا بِالْحُسْنَى (31) ३१. आणि अल्लाहचेच आहे, जे काही आकाशांमध्ये आहे आणि जे काही धरतीत आहे, यासाठी की त्याने (अल्लाहने) दुष्कर्म करणाऱ्यांना त्यांच्या कर्मांचा मोबदला द्यावा आणि सत्कर्म करणाऱ्या लोकांना चांगला मोबदला द्यावा |
الَّذِينَ يَجْتَنِبُونَ كَبَائِرَ الْإِثْمِ وَالْفَوَاحِشَ إِلَّا اللَّمَمَ ۚ إِنَّ رَبَّكَ وَاسِعُ الْمَغْفِرَةِ ۚ هُوَ أَعْلَمُ بِكُمْ إِذْ أَنشَأَكُم مِّنَ الْأَرْضِ وَإِذْ أَنتُمْ أَجِنَّةٌ فِي بُطُونِ أُمَّهَاتِكُمْ ۖ فَلَا تُزَكُّوا أَنفُسَكُمْ ۖ هُوَ أَعْلَمُ بِمَنِ اتَّقَىٰ (32) ३२. जे लोक मोठमोठे अपराध आणि उघड निर्लज्जतेच्या कृत्यांपासून दूर राहतात, याखेरीज की काही लहान सहान अपराध त्यांच्याकडून घडतात, निःसंशय, (अशा लोकांसाठी) तुमच्या पालनकर्त्याची क्षमाशीलता अति विशाल आहे. तो तुम्हाला चांगल्या प्रकारे जाणतो, जेव्हा त्याने तुम्हाला जमिनीतून निर्माण केले आणि जेव्हा तुम्ही आपल्या मातांच्या गर्भात मूल (अर्भक) होते तेव्हा तुम्ही आपले पावित्र्य स्वतः सांगू नका. तोच नेक - सदाचारी लोकांना चांगल्या प्रकारे जाणतो |
أَفَرَأَيْتَ الَّذِي تَوَلَّىٰ (33) ३३. काय तुम्ही त्याला पाहिले, ज्याने तोंड फिरवून घेतले |
وَأَعْطَىٰ قَلِيلًا وَأَكْدَىٰ (34) ३४. आणि फार कमी दिले आणि हात रोखला |
أَعِندَهُ عِلْمُ الْغَيْبِ فَهُوَ يَرَىٰ (35) ३५. काय त्याला परोक्ष ज्ञान आहे की तो (सर्व काही) पाहत आहे |
أَمْ لَمْ يُنَبَّأْ بِمَا فِي صُحُفِ مُوسَىٰ (36) ३६. काय त्याला त्या गोष्टीची खबर नाही दिली गेली, जी मूसा (अलै.) च्या ग्रंथात होती |
وَإِبْرَاهِيمَ الَّذِي وَفَّىٰ (37) ३७. आणि एकनिष्ठ इब्राहीम (अलै.) च्या ग्रंथात होती |
أَلَّا تَزِرُ وَازِرَةٌ وِزْرَ أُخْرَىٰ (38) ३८. की कोणताही मनुष्य दुसऱ्या कोणाचेही ओझे उचलणार नाही |
وَأَن لَّيْسَ لِلْإِنسَانِ إِلَّا مَا سَعَىٰ (39) ३९. आणि हे की प्रत्येक माणसाकरिता केवळ तेच आहे, ज्याचा त्याने स्वतः प्रयत्न केला |
وَأَنَّ سَعْيَهُ سَوْفَ يُرَىٰ (40) ४०. आणि हे की निःसंशय, त्याचा प्रयत्न लवकरच पाहिला जाईल |
ثُمَّ يُجْزَاهُ الْجَزَاءَ الْأَوْفَىٰ (41) ४१. मग त्याला पुरेपूर मोबदला दिला जाईल |
وَأَنَّ إِلَىٰ رَبِّكَ الْمُنتَهَىٰ (42) ४२. आणि हे की तुमच्या पालनकर्त्या (अल्लाह) कडेच पोहचायचे आहे |
وَأَنَّهُ هُوَ أَضْحَكَ وَأَبْكَىٰ (43) ४३. आणि हे की तोच हसवितो आणि तोच रडवितो |
وَأَنَّهُ هُوَ أَمَاتَ وَأَحْيَا (44) ४४. आणि हे की तोच मारतो आणि तोच जिवंत करतो |
وَأَنَّهُ خَلَقَ الزَّوْجَيْنِ الذَّكَرَ وَالْأُنثَىٰ (45) ४५. आणि हे की त्यानेच जोडा अर्थात नर - मादी निर्माण केला |
مِن نُّطْفَةٍ إِذَا تُمْنَىٰ (46) ४६. वीर्यापासून जेव्हा तो टपकविला जातो |
وَأَنَّ عَلَيْهِ النَّشْأَةَ الْأُخْرَىٰ (47) ४७. आणि हे की दुसऱ्यांदा जिवंत करणे त्याचीच जबाबदारी आहे |
وَأَنَّهُ هُوَ أَغْنَىٰ وَأَقْنَىٰ (48) ४८. आणि हे की तोच धनवान बनवितो आणि धन देतो |
وَأَنَّهُ هُوَ رَبُّ الشِّعْرَىٰ (49) ४९. आणि हे की तोच शेअरा (ताऱ्या) चा स्वामी व पालनकर्ता आहे |
وَأَنَّهُ أَهْلَكَ عَادًا الْأُولَىٰ (50) ५०. आणि हे की त्यानेच पहिल्या आदला नष्ट केले आहे |
وَثَمُودَ فَمَا أَبْقَىٰ (51) ५१. आणि समूदला देखील, (ज्यापैकी) एकालाही शिल्लक ठेवले नाही |
وَقَوْمَ نُوحٍ مِّن قَبْلُ ۖ إِنَّهُمْ كَانُوا هُمْ أَظْلَمَ وَأَطْغَىٰ (52) ५२. आणि त्याच्यापूर्वी नूहच्या जनसमूहाला. निःसंशय, ते मोठे अत्याचारी आणि उध्दट लोक होते |
وَالْمُؤْتَفِكَةَ أَهْوَىٰ (53) ५३. आणि ‘मुतफिका’ (शहर किंवा पालथ्या पडलेल्या वस्त्यांना) त्यानेच पालथे घातले |
فَغَشَّاهَا مَا غَشَّىٰ (54) ५४. मग त्यांच्यावर आच्छादित केले, जे काही आच्छादित केले |
فَبِأَيِّ آلَاءِ رَبِّكَ تَتَمَارَىٰ (55) ५५. तेव्हा हे मानवा! तू आपल्या पालनकर्त्याच्या कोणकोणत्या कृपा देणगी (नेमत) बद्दल वाद करशील |
هَٰذَا نَذِيرٌ مِّنَ النُّذُرِ الْأُولَىٰ (56) ५६. हे (पैगंबर) खबरदार करणारे आहेत, पूर्वी होऊन गेलेल्या खबरदार करणाऱ्यांपैकी |
أَزِفَتِ الْآزِفَةُ (57) ५७. येणारी वेळ (घटिका) जवळ येऊन ठेपली आहे |
لَيْسَ لَهَا مِن دُونِ اللَّهِ كَاشِفَةٌ (58) ५८. अल्लाहशिवाय तिला जाहीर करणारा अन्य कोणी नाही |
أَفَمِنْ هَٰذَا الْحَدِيثِ تَعْجَبُونَ (59) ५९. तेव्हा काय तुम्ही या गोष्टीवर आश्चर्य करता |
وَتَضْحَكُونَ وَلَا تَبْكُونَ (60) ६०. आणि हसत आहात, रडत नाही |
وَأَنتُمْ سَامِدُونَ (61) ६१. (किंबहुना) तुम्ही खेळत आहात |
فَاسْجُدُوا لِلَّهِ وَاعْبُدُوا ۩ (62) ६२. आता अल्लाहसमोर सजदे करा (माथा टेका) आणि (त्याचीच) उपासना करा |