سَبَّحَ لِلَّهِ مَا فِي السَّمَاوَاتِ وَمَا فِي الْأَرْضِ ۖ وَهُوَ الْعَزِيزُ الْحَكِيمُ (1) १. आकाशांची आणि धरतीची प्रत्येक वस्तू अल्लाहच्या पवित्रतेसह गुणगान करते आणि तो मोठा वर्चस्वशाली, हिकमत बाळगणारा आहे |
هُوَ الَّذِي أَخْرَجَ الَّذِينَ كَفَرُوا مِنْ أَهْلِ الْكِتَابِ مِن دِيَارِهِمْ لِأَوَّلِ الْحَشْرِ ۚ مَا ظَنَنتُمْ أَن يَخْرُجُوا ۖ وَظَنُّوا أَنَّهُم مَّانِعَتُهُمْ حُصُونُهُم مِّنَ اللَّهِ فَأَتَاهُمُ اللَّهُ مِنْ حَيْثُ لَمْ يَحْتَسِبُوا ۖ وَقَذَفَ فِي قُلُوبِهِمُ الرُّعْبَ ۚ يُخْرِبُونَ بُيُوتَهُم بِأَيْدِيهِمْ وَأَيْدِي الْمُؤْمِنِينَ فَاعْتَبِرُوا يَا أُولِي الْأَبْصَارِ (2) २. तोच आहे ज्याने ग्रंथधारकांमधल्या काफिरांना त्यांच्या घरातून पहिल्या हश्र (एकत्र होण्याचा) वेळी काढले. तुम्हाला कल्पनाही नव्हती की ते निघतील आणि ते स्वतः समजत होते की त्याचे मजबूत किल्ले त्यांना अल्लाहच्या शिक्षा यातनेपासून वाचवून घेतील. तेव्हा त्यांच्यावर अल्लाह (चा प्रकोप) अशा ठिकाणाहून येऊन कोसळला की त्यांना त्याचे अनुमानही नव्हती आणि त्यांच्या मनात अल्लाहने भय टाकले, ते आपल्या घरांना आपल्याच हातांनी ओसाड करीत होते आणि ईमान राखणाऱ्यांच्या हातून (नष्ट करीत होते) तेव्हा, हे डोळे राखणाऱ्यांनो! बोध ग्रहण करा |
وَلَوْلَا أَن كَتَبَ اللَّهُ عَلَيْهِمُ الْجَلَاءَ لَعَذَّبَهُمْ فِي الدُّنْيَا ۖ وَلَهُمْ فِي الْآخِرَةِ عَذَابُ النَّارِ (3) ३. आणि जर अल्लाहने त्यांच्यासाठी हद्दपारी लिहिली नसती तर निश्चितच त्यांना या जगातच शिक्षा यातना दिली असती आणि आखिरतमध्ये (तर) त्यांच्यासाठी आगीची शिक्षा आहेच |
ذَٰلِكَ بِأَنَّهُمْ شَاقُّوا اللَّهَ وَرَسُولَهُ ۖ وَمَن يُشَاقِّ اللَّهَ فَإِنَّ اللَّهَ شَدِيدُ الْعِقَابِ (4) ४. हे अशासाठी की त्यांनी अल्लाह आणि त्याच्या पैगंबराचा विरोध केला, आणि जो देखील अल्लाहचा विरोध करील तर अल्लाह देखील मोठी कठोर शिक्षा यातना देणारा आहे |
مَا قَطَعْتُم مِّن لِّينَةٍ أَوْ تَرَكْتُمُوهَا قَائِمَةً عَلَىٰ أُصُولِهَا فَبِإِذْنِ اللَّهِ وَلِيُخْزِيَ الْفَاسِقِينَ (5) ५. खजुरींची जी झाडे तुम्ही कापून टाकलीत आणि ज्यांना तुम्ही त्यांच्या मुळासकट बाकी राहू दिले तर हे सर्व अल्लाहच्या आदेशाने झाले, आणि यासाठीही की दुराचारी लोकांना अल्लाहने अपमानित करावे |
وَمَا أَفَاءَ اللَّهُ عَلَىٰ رَسُولِهِ مِنْهُمْ فَمَا أَوْجَفْتُمْ عَلَيْهِ مِنْ خَيْلٍ وَلَا رِكَابٍ وَلَٰكِنَّ اللَّهَ يُسَلِّطُ رُسُلَهُ عَلَىٰ مَن يَشَاءُ ۚ وَاللَّهُ عَلَىٰ كُلِّ شَيْءٍ قَدِيرٌ (6) ६. आणि त्यांची जी संपत्ती अल्लाहने आपल्या पैगंबराच्या हाती दिली ज्यासाठी तुम्ही ना घोडे दौडविले आहेत ना ऊंट, किंबहुना अल्लाह आपल्या पैगंबराला, ज्याच्यावर इच्छितो वर्चस्वशाली करतो आणि अल्लाह प्रत्येक गोष्ट करण्यास समर्थ आहे |
مَّا أَفَاءَ اللَّهُ عَلَىٰ رَسُولِهِ مِنْ أَهْلِ الْقُرَىٰ فَلِلَّهِ وَلِلرَّسُولِ وَلِذِي الْقُرْبَىٰ وَالْيَتَامَىٰ وَالْمَسَاكِينِ وَابْنِ السَّبِيلِ كَيْ لَا يَكُونَ دُولَةً بَيْنَ الْأَغْنِيَاءِ مِنكُمْ ۚ وَمَا آتَاكُمُ الرَّسُولُ فَخُذُوهُ وَمَا نَهَاكُمْ عَنْهُ فَانتَهُوا ۚ وَاتَّقُوا اللَّهَ ۖ إِنَّ اللَّهَ شَدِيدُ الْعِقَابِ (7) ७. वस्त्यावाल्यांचे जे धन अल्लाहने तुमच्या लढण्याविनाच आपल्या पैगंबराच्या हाती दिले, ते अल्लाहचे आहे आणि पैगंबराचे आहे, जवळच्या नातेवाईकांचे, अनाथांचे, गोरगरीबांचे व प्रवाशांचे आहे यासाठी की तुमच्यातल्या धनवानांच्याच हातात हे धन फिरत राहू नये आणि तुम्हाला पैगंबर जे काही देईल ते घ्या आणि ज्यापासून रोखेल त्यापासून अलिप्त राहा आणि अल्लाहचे भय बाळगत राहा. निःसंशय, अल्लाह मोठी सक्त शिक्षा यातना देणारा आहे |
لِلْفُقَرَاءِ الْمُهَاجِرِينَ الَّذِينَ أُخْرِجُوا مِن دِيَارِهِمْ وَأَمْوَالِهِمْ يَبْتَغُونَ فَضْلًا مِّنَ اللَّهِ وَرِضْوَانًا وَيَنصُرُونَ اللَّهَ وَرَسُولَهُ ۚ أُولَٰئِكَ هُمُ الصَّادِقُونَ (8) ८. हे धन त्या गरीब मुहाजिर लोकां (देशत्याग केलेल्या ईमानधारकां) करिता आहे, ज्यांना आपल्या घरातून आणि आपल्या संपत्तीतून बाहेर काढले गेले आहे. ते अल्लाहची दया कृपा व प्रसन्नता इच्छितात आणि अल्लाहची आणि त्याच्या पैगंबराची मदत करतात. हेच लोक सच्चे आहेत |
وَالَّذِينَ تَبَوَّءُوا الدَّارَ وَالْإِيمَانَ مِن قَبْلِهِمْ يُحِبُّونَ مَنْ هَاجَرَ إِلَيْهِمْ وَلَا يَجِدُونَ فِي صُدُورِهِمْ حَاجَةً مِّمَّا أُوتُوا وَيُؤْثِرُونَ عَلَىٰ أَنفُسِهِمْ وَلَوْ كَانَ بِهِمْ خَصَاصَةٌ ۚ وَمَن يُوقَ شُحَّ نَفْسِهِ فَأُولَٰئِكَ هُمُ الْمُفْلِحُونَ (9) ९. आणि (त्यांच्याकरिता) ज्यांनी या घरात (अर्थात मदीनेत) आणि ईमान राखण्यात त्यांच्यापूर्वी स्थान बनवून घेतले आणि आपल्याकडे हिजरत (देशत्याग) करून येणाऱ्यांशी प्रेम राखतात आणि देशत्याग केलेल्यां (मुहाजिर लोकां) ना जे काही दिले जाते, त्याबद्दल ते आपल्या छातीत (मनात) कसलाही संकोच करीत नाहीत, उलट स्वतः आपल्यावर त्यांना प्राधान्य देतात, मग ते स्वतः कितीही गरजवंत असोत (खरी गोष्ट अशी की) जो कोणी आपल्या मनाच्या इच्छा अभिलाषांपासून वाचविला गेला, तोच सफलता प्राप्त करणारा आहे.१ |
وَالَّذِينَ جَاءُوا مِن بَعْدِهِمْ يَقُولُونَ رَبَّنَا اغْفِرْ لَنَا وَلِإِخْوَانِنَا الَّذِينَ سَبَقُونَا بِالْإِيمَانِ وَلَا تَجْعَلْ فِي قُلُوبِنَا غِلًّا لِّلَّذِينَ آمَنُوا رَبَّنَا إِنَّكَ رَءُوفٌ رَّحِيمٌ (10) १०. आणि (त्यांच्यासाठी) जे त्यांच्यानंतर आले, जे म्हणतील की, हे आमच्या पालनकर्त्या! आम्हाला माफ कर आणि आमच्या त्या बांधवांनाही, ज्यांनी आमच्या आधी ईमान राखले आहे आणि ईमान राखणाऱ्यांच्याविषयी आमच्या मनात कपट (आणि वैरभावना) आणू नको. हे आमच्या पालनकर्त्या! निःसंशय, तू प्रेम आणि दया करणारा आहे |
۞ أَلَمْ تَرَ إِلَى الَّذِينَ نَافَقُوا يَقُولُونَ لِإِخْوَانِهِمُ الَّذِينَ كَفَرُوا مِنْ أَهْلِ الْكِتَابِ لَئِنْ أُخْرِجْتُمْ لَنَخْرُجَنَّ مَعَكُمْ وَلَا نُطِيعُ فِيكُمْ أَحَدًا أَبَدًا وَإِن قُوتِلْتُمْ لَنَنصُرَنَّكُمْ وَاللَّهُ يَشْهَدُ إِنَّهُمْ لَكَاذِبُونَ (11) ११. काय तुम्ही त्या दांभिक (मुनाफिक) लोकांना नाही पाहिले, जे आपल्या ग्रंथ बाळगणाऱ्यांमधील काफिर बांधवांना म्हणतात की जर तुम्हाला देशाबाहेर घालविले गेले तर आम्हीही अवश्य तुमच्यासोबत देशत्याग करू आणि तुमच्याविषयी कधीही कोणाचे म्हणणे मान्य करणार नाही आणि जर तुमच्याशी युद्ध केले केले तर निश्चित आम्ही तुमची मदत करू, परंतु अल्लाह साक्ष देतो की हे अगदी खोटारडे आहेत |
لَئِنْ أُخْرِجُوا لَا يَخْرُجُونَ مَعَهُمْ وَلَئِن قُوتِلُوا لَا يَنصُرُونَهُمْ وَلَئِن نَّصَرُوهُمْ لَيُوَلُّنَّ الْأَدْبَارَ ثُمَّ لَا يُنصَرُونَ (12) १२. जर त्यांना देशाबाहेर घालविले गेले तर हे त्यांच्यासोबत जाणार नाहीत आणि जर त्यांच्याशी युद्ध छेडले गेले तर हे त्यांची मदतही करणार नाहीत आणि (समजा) हे मदत करण्यास तयारही झालेत तर पाठ दाखवून (पळ काढतील) मग त्यांची मदत केली जाणार नाही |
لَأَنتُمْ أَشَدُّ رَهْبَةً فِي صُدُورِهِم مِّنَ اللَّهِ ۚ ذَٰلِكَ بِأَنَّهُمْ قَوْمٌ لَّا يَفْقَهُونَ (13) १३. (मुसलमानांनो! विश्वास करा) की तुमचे भय त्यांच्या छातीत (मनात) अल्लाहच्या भयाच्या तुलनेत फार जास्त आहे, हे यासाठी की ते सुज्ञता बाळगत नाही |
لَا يُقَاتِلُونَكُمْ جَمِيعًا إِلَّا فِي قُرًى مُّحَصَّنَةٍ أَوْ مِن وَرَاءِ جُدُرٍ ۚ بَأْسُهُم بَيْنَهُمْ شَدِيدٌ ۚ تَحْسَبُهُمْ جَمِيعًا وَقُلُوبُهُمْ شَتَّىٰ ۚ ذَٰلِكَ بِأَنَّهُمْ قَوْمٌ لَّا يَعْقِلُونَ (14) १४. हे सर्व मिळूनही तुमच्याशी लढू शकत नाही, मात्र ही गोष्ट वेगळी की किल्ल्याने घेरलेल्या ठिकाणी असावेत किंवा भिंतींच्या आडोशाला असावेत. त्यांची लढाई तर आपसातच मोठी सक्त आहे. जरी तुम्ही त्यांना एकसंघ समजत आहात तरी, वस्तुतः त्यांची मने आपसात विभक्त आहेत हे अशासाठी की हे निर्बुद्ध लोक आहेत |
كَمَثَلِ الَّذِينَ مِن قَبْلِهِمْ قَرِيبًا ۖ ذَاقُوا وَبَالَ أَمْرِهِمْ وَلَهُمْ عَذَابٌ أَلِيمٌ (15) १५. त्या लोकांसारखे, जे त्यांच्या थोड्याचपूर्वी होऊन गेलेत, ज्यांनी आपल्या दुष्कर्मांची गोडी चाखली आणि ज्यांच्यासाठी दुःखदायक शिक्षा (तयार) आहे |
كَمَثَلِ الشَّيْطَانِ إِذْ قَالَ لِلْإِنسَانِ اكْفُرْ فَلَمَّا كَفَرَ قَالَ إِنِّي بَرِيءٌ مِّنكَ إِنِّي أَخَافُ اللَّهَ رَبَّ الْعَالَمِينَ (16) १६. सैतानासारखे की तो माणसाला म्हणतो, कुप्र (इन्कार) कर, मग जेव्हा तो कुप्र करून बसतो, तेव्हा म्हणतो, मी तुझ्यापासून वेगळा आहे. मी तर साऱ्या विश्वांच्या पालनकर्त्यांचे भय बाळगतो |
فَكَانَ عَاقِبَتَهُمَا أَنَّهُمَا فِي النَّارِ خَالِدَيْنِ فِيهَا ۚ وَذَٰلِكَ جَزَاءُ الظَّالِمِينَ (17) १७. तेव्हा दोघांचा परिणाम हा झाला की (जहन्नमच्या) आगीत नेहमी नेहमीकरिता गेले आणि अत्याचारी लोकांची हीच शिक्षा आहे |
يَا أَيُّهَا الَّذِينَ آمَنُوا اتَّقُوا اللَّهَ وَلْتَنظُرْ نَفْسٌ مَّا قَدَّمَتْ لِغَدٍ ۖ وَاتَّقُوا اللَّهَ ۚ إِنَّ اللَّهَ خَبِيرٌ بِمَا تَعْمَلُونَ (18) १८. हे ईमान राखणाऱ्यांनो! अल्लाहचे भय बाळगत राहा१ आणि प्रत्येक माणसाने हे बघावे की उद्या (कयामतकरिता) त्याने कर्मांचे कोणते (भांडार) पाठविले आहे,२ आणि (प्रत्येक क्षणी) अल्लाहचे भय राखा, अल्लाह तुमच्या समस्त कर्मांशी परिचित आहे |
وَلَا تَكُونُوا كَالَّذِينَ نَسُوا اللَّهَ فَأَنسَاهُمْ أَنفُسَهُمْ ۚ أُولَٰئِكَ هُمُ الْفَاسِقُونَ (19) १९. आणि तुम्ही त्या लोकांसारखे होऊ नका, ज्यांनी अल्लाह (च्या आदेशा) चा विसर पाडला, तेव्हा अल्लाहने त्यांना स्वतःचेच विस्मरण घडविले. असेच लोक दुराचारी असतात |
لَا يَسْتَوِي أَصْحَابُ النَّارِ وَأَصْحَابُ الْجَنَّةِ ۚ أَصْحَابُ الْجَنَّةِ هُمُ الْفَائِزُونَ (20) २०. जहन्नमवाले आणि जन्नतवाले (आपसात) समान नाहीत.३ जे जन्नतवाले आहेत तेच सफल आहेत |
لَوْ أَنزَلْنَا هَٰذَا الْقُرْآنَ عَلَىٰ جَبَلٍ لَّرَأَيْتَهُ خَاشِعًا مُّتَصَدِّعًا مِّنْ خَشْيَةِ اللَّهِ ۚ وَتِلْكَ الْأَمْثَالُ نَضْرِبُهَا لِلنَّاسِ لَعَلَّهُمْ يَتَفَكَّرُونَ (21) २१. जर आम्ही कुरआनाला एखाद्या पर्वतावर अवतरित केले असते तेव्हा तुम्ही पाहिले असते की अल्लाहच्या भयाने तो झुकून चूर चूर (कण कण) झाला असता. आम्ही ही उदाहरणे लोकांसाठी निवेदित आहोत यासाठी की त्यांनी विचार चिंतन करावे |
هُوَ اللَّهُ الَّذِي لَا إِلَٰهَ إِلَّا هُوَ ۖ عَالِمُ الْغَيْبِ وَالشَّهَادَةِ ۖ هُوَ الرَّحْمَٰنُ الرَّحِيمُ (22) २२. तोच अल्लाह आहे, ज्याच्याखेरीज कोणीही उपासनीय (पूज्य) नाही. लपलेल्या व उघड गोष्टी जाणणारा, तोच माफ व दया करणारा |
هُوَ اللَّهُ الَّذِي لَا إِلَٰهَ إِلَّا هُوَ الْمَلِكُ الْقُدُّوسُ السَّلَامُ الْمُؤْمِنُ الْمُهَيْمِنُ الْعَزِيزُ الْجَبَّارُ الْمُتَكَبِّرُ ۚ سُبْحَانَ اللَّهِ عَمَّا يُشْرِكُونَ (23) २३. तोच अल्लाह आहे, ज्याच्याखेरीज कोणी सच्चा माबूद (उपास्य) नाही. मालक (स्वामी) अतिशय पवित्र, सर्व व्यंग दोषांपासून मुक्त शांती (सलामती) प्रदान करणारा, संरक्षक, वर्चस्वशाली, शक्तिशाली, महानतम पवित्र आहे अल्लाह त्या गोष्टींपासून ज्यांना हे त्याचा सहभागी ठरवितात |
هُوَ اللَّهُ الْخَالِقُ الْبَارِئُ الْمُصَوِّرُ ۖ لَهُ الْأَسْمَاءُ الْحُسْنَىٰ ۚ يُسَبِّحُ لَهُ مَا فِي السَّمَاوَاتِ وَالْأَرْضِ ۖ وَهُوَ الْعَزِيزُ الْحَكِيمُ (24) २४. तोच अल्लाह आहे निर्माणकर्ता, रचयिता, स्वरूप देणारा, त्याच्याचसाठी (अतिशय) उत्तम नावे आहेत. प्रत्येक वस्तू मग ती आकाशात असो किंवा धरतीत असो, त्याचेच पवित्र वर्णन करते आणि तोच मोठा जबरदस्त आणि बुद्धिकौशल्य बाळगणारा आहे |