قَدْ أَفْلَحَ الْمُؤْمِنُونَ (1) १. निःसंशय, ईमान राखणाऱ्यांनी सफलता प्राप्त केली |
الَّذِينَ هُمْ فِي صَلَاتِهِمْ خَاشِعُونَ (2) २. जे आपल्या नमाजमध्ये विनम्रता अंगिकारतात |
وَالَّذِينَ هُمْ عَنِ اللَّغْوِ مُعْرِضُونَ (3) ३. जे निरर्थक गोष्टींपासून तोंड फिरवतात |
وَالَّذِينَ هُمْ لِلزَّكَاةِ فَاعِلُونَ (4) ४. जे जकात (धर्मदान) अदा करणारे आहेत |
وَالَّذِينَ هُمْ لِفُرُوجِهِمْ حَافِظُونَ (5) ५. जे अपल्या लज्जास्थानांचे (गुप्तांगांचे) संरक्षण करणारे आहेत |
إِلَّا عَلَىٰ أَزْوَاجِهِمْ أَوْ مَا مَلَكَتْ أَيْمَانُهُمْ فَإِنَّهُمْ غَيْرُ مَلُومِينَ (6) ६. आपल्या पत्न्या आणि स्वामित्वात असलेल्या दासींखेरीज. निःसंशय यांच्याबाबतीत त्यांच्यावर कसलाही दोष नाही |
فَمَنِ ابْتَغَىٰ وَرَاءَ ذَٰلِكَ فَأُولَٰئِكَ هُمُ الْعَادُونَ (7) ७. मात्र याच्याखेरीज जो इतर शोधील तर तेच मर्यादेचे उल्लंघन करणारे आहेत |
وَالَّذِينَ هُمْ لِأَمَانَاتِهِمْ وَعَهْدِهِمْ رَاعُونَ (8) ८. जे आपल्या अमानतीची आणि वायद्याची रक्षा करणारे आहेत |
وَالَّذِينَ هُمْ عَلَىٰ صَلَوَاتِهِمْ يُحَافِظُونَ (9) ९. जे आपल्या नामाजांचे संरक्षण करतात |
أُولَٰئِكَ هُمُ الْوَارِثُونَ (10) १०. हेच लोक उत्तराधिकारी आहेत |
الَّذِينَ يَرِثُونَ الْفِرْدَوْسَ هُمْ فِيهَا خَالِدُونَ (11) ११. जे फिर्दोस (जन्नतच्या सर्वोच्च दर्जा) चे वारस होतील, जिथे सदैव राहतील |
وَلَقَدْ خَلَقْنَا الْإِنسَانَ مِن سُلَالَةٍ مِّن طِينٍ (12) १२. आणि निःसंशय आम्ही मानवाला खणखणणाऱ्या मातीच्या सत्वापासून निर्माण केले |
ثُمَّ جَعَلْنَاهُ نُطْفَةً فِي قَرَارٍ مَّكِينٍ (13) १३. मग त्याला वीर्य बनवून सुरिक्षत स्थानी ठेवले |
ثُمَّ خَلَقْنَا النُّطْفَةَ عَلَقَةً فَخَلَقْنَا الْعَلَقَةَ مُضْغَةً فَخَلَقْنَا الْمُضْغَةَ عِظَامًا فَكَسَوْنَا الْعِظَامَ لَحْمًا ثُمَّ أَنشَأْنَاهُ خَلْقًا آخَرَ ۚ فَتَبَارَكَ اللَّهُ أَحْسَنُ الْخَالِقِينَ (14) १४. मग वीर्याला आम्ही जमलेल्या रक्ताचे स्वरूप दिले, मग त्या रक्ताच्या गोळ्याला मांसाचा तुकडा बनिवले, मग मांसाच्या तुकड्यात हाडे बनिवली, मग हाडांवर मांस जढविले, मग एका दुसऱ्या स्वरूपात त्याला निर्माण केले. तेव्हा मोठा समृद्धशाली आहे तो अल्लाह जो सर्वोत्तम निर्मिती करणारा आहे |
ثُمَّ إِنَّكُم بَعْدَ ذَٰلِكَ لَمَيِّتُونَ (15) १५. यानंतर तुम्ही सर्वच्या सर्व निश्चित मरण पावणार आहात |
ثُمَّ إِنَّكُمْ يَوْمَ الْقِيَامَةِ تُبْعَثُونَ (16) १६. मग कयामतच्या दिवशी, अवश्य तुम्ही सर्व उठविले जाल |
وَلَقَدْ خَلَقْنَا فَوْقَكُمْ سَبْعَ طَرَائِقَ وَمَا كُنَّا عَنِ الْخَلْقِ غَافِلِينَ (17) १७. आणि आम्ही तुमच्यावर सात आकाश बनविले आहेत आणि आम्ही आपल्या निर्मितीपासून गाफील नाहीत |
وَأَنزَلْنَا مِنَ السَّمَاءِ مَاءً بِقَدَرٍ فَأَسْكَنَّاهُ فِي الْأَرْضِ ۖ وَإِنَّا عَلَىٰ ذَهَابٍ بِهِ لَقَادِرُونَ (18) १८. आणि आम्ही एका उचित प्रमाणात आकाशातून पाणी वर्षवितो, मग त्याला जमिनीवर संचयित करतो आणि आम्ही ते घेऊन जाण्यास खात्रीने समर्थ आहोत |
فَأَنشَأْنَا لَكُم بِهِ جَنَّاتٍ مِّن نَّخِيلٍ وَأَعْنَابٍ لَّكُمْ فِيهَا فَوَاكِهُ كَثِيرَةٌ وَمِنْهَا تَأْكُلُونَ (19) १९. याच पाण्याद्वारे आम्ही तुमच्यासाठी खजूर आणि द्राक्षांच्या बागा निर्माण करतो. त्यात तुमच्याकरिता अनेक फळे आहेत, त्यातून तुम्ही खाता |
وَشَجَرَةً تَخْرُجُ مِن طُورِ سَيْنَاءَ تَنبُتُ بِالدُّهْنِ وَصِبْغٍ لِّلْآكِلِينَ (20) २०. आणि ते झाड जे सैना नावाच्या पर्वतावर उगते, ज्यातून तेल निघते, आणि खाणाऱ्यांसाठी रस्सा (कालवण) |
وَإِنَّ لَكُمْ فِي الْأَنْعَامِ لَعِبْرَةً ۖ نُّسْقِيكُم مِّمَّا فِي بُطُونِهَا وَلَكُمْ فِيهَا مَنَافِعُ كَثِيرَةٌ وَمِنْهَا تَأْكُلُونَ (21) २१. तुमच्यासाठी चार पायांच्या गुरांमध्येही मोठा बोध आहे. त्यांच्या उदरांपासून आम्ही तुम्हाला (दूध) पाजतो आणि इतरही अनेक फायदे तुमच्यासाठी त्यांच्यात आहेत, त्यांच्यापैकी काहींना तुम्ही खातादेखील |
وَعَلَيْهَا وَعَلَى الْفُلْكِ تُحْمَلُونَ (22) २२. आणि त्यांच्यावर आणि नौकांवर स्वार केले जातात |
وَلَقَدْ أَرْسَلْنَا نُوحًا إِلَىٰ قَوْمِهِ فَقَالَ يَا قَوْمِ اعْبُدُوا اللَّهَ مَا لَكُم مِّنْ إِلَٰهٍ غَيْرُهُ ۖ أَفَلَا تَتَّقُونَ (23) २३. निःसंशय आम्ही नूहला त्याच्या जनसमूहाकडे (रसूल बनवून) पाठविले. नूह म्हणाले, हे माझ्या जनसमूहाच्या लोकांनो! अल्लाहची उपासना करा आणि त्याच्याखेरीज तुमचा कोणीही उपास्य नाही. काय तुम्ही अल्लाहचे भय नाही बाळगत |
فَقَالَ الْمَلَأُ الَّذِينَ كَفَرُوا مِن قَوْمِهِ مَا هَٰذَا إِلَّا بَشَرٌ مِّثْلُكُمْ يُرِيدُ أَن يَتَفَضَّلَ عَلَيْكُمْ وَلَوْ شَاءَ اللَّهُ لَأَنزَلَ مَلَائِكَةً مَّا سَمِعْنَا بِهَٰذَا فِي آبَائِنَا الْأَوَّلِينَ (24) २४. त्यांच्या समाजाच्या काफीर सरदारांनी स्पष्ट सांगितले की हा तर तुमच्यासारखाच मनुष्य आहे. हा तुमच्यावर श्रेष्ठत्व (आणि वर्चस्व) प्राप्त करू इच्छितो. जर अल्लाहनेच इच्छिले असते तर एखाद्या फरिश्त्याला अवतरित केले असते. आम्ही तर याबाबत आपल्या पूर्वजांच्या काळात ऐकलेही नाही |
إِنْ هُوَ إِلَّا رَجُلٌ بِهِ جِنَّةٌ فَتَرَبَّصُوا بِهِ حَتَّىٰ حِينٍ (25) २५. निःसंशय, या माणसाला वेड लागले आहे, तेव्हा तुम्ही त्याला एका निर्धारित वेळपर्यंत सूट (ढील) द्या |
قَالَ رَبِّ انصُرْنِي بِمَا كَذَّبُونِ (26) २६. नूह यांनी दुआ (प्रार्थना) केली, हे माझ्या पालनकर्त्या! यांनी मला खोटे ठरविले आहे, तेव्हा तू माझी मदत कर |
فَأَوْحَيْنَا إِلَيْهِ أَنِ اصْنَعِ الْفُلْكَ بِأَعْيُنِنَا وَوَحْيِنَا فَإِذَا جَاءَ أَمْرُنَا وَفَارَ التَّنُّورُ ۙ فَاسْلُكْ فِيهَا مِن كُلٍّ زَوْجَيْنِ اثْنَيْنِ وَأَهْلَكَ إِلَّا مَن سَبَقَ عَلَيْهِ الْقَوْلُ مِنْهُمْ ۖ وَلَا تُخَاطِبْنِي فِي الَّذِينَ ظَلَمُوا ۖ إِنَّهُم مُّغْرَقُونَ (27) २७. मग आम्ही त्यांच्याकडे वहयी पाठविली की तुम्ही आमच्या डोळ्यांसमोर आमच्या वहयीनुसार एक नौका तयार करा, जेव्हा आमचा आदेश येऊन पोहोचेल, आणि तंदूर उतू लागेल, तेव्हा तुम्ही प्रत्येक प्रकारचा एक एक जोडा त्यात ठेवून घ्या, आणि आपल्या कुटुंबियांनाही, मात्र त्यांच्याखेरीज, ज्यांच्याबाबत आधीच फैसला केला गेला आहे. खबरदार! ज्या लोकांनी जुलूम- अत्याचार केला आहे, त्यांच्याविषयी माझ्याशी काही बोलू नका. ते तर सर्व बुडविले जातील |
فَإِذَا اسْتَوَيْتَ أَنتَ وَمَن مَّعَكَ عَلَى الْفُلْكِ فَقُلِ الْحَمْدُ لِلَّهِ الَّذِي نَجَّانَا مِنَ الْقَوْمِ الظَّالِمِينَ (28) २८. जेव्हा तुम्ही आणि तुमचे साथीदार नौकेत चांगल्या प्रकारे स्वार व्हाल तेव्हा म्हणा, समस्त स्तुती-प्रशंसा अल्लाहकरिता आहे ज्याने आम्हा लोकांना अत्याचारी जनसमूहापासून मुक्ती दिली |
وَقُل رَّبِّ أَنزِلْنِي مُنزَلًا مُّبَارَكًا وَأَنتَ خَيْرُ الْمُنزِلِينَ (29) २९. आणि दुआ (प्रार्थना) करा, हे माझ्या पालनकर्त्या! मला सुरक्षितपणे उतरव आणि तूच उत्तम रीतीने उतरविणारा आहेस |
إِنَّ فِي ذَٰلِكَ لَآيَاتٍ وَإِن كُنَّا لَمُبْتَلِينَ (30) ३०. निःसंशय, या (घटने) त मोठमोठी बोधचिन्हे आहेत आणि निश्चितच आम्ही कसोटी घेणारे आहोत |
ثُمَّ أَنشَأْنَا مِن بَعْدِهِمْ قَرْنًا آخَرِينَ (31) ३१. मग त्यांच्यानंतर आम्ही दुसरे समुदाय देखील निर्माण केले |
فَأَرْسَلْنَا فِيهِمْ رَسُولًا مِّنْهُمْ أَنِ اعْبُدُوا اللَّهَ مَا لَكُم مِّنْ إِلَٰهٍ غَيْرُهُ ۖ أَفَلَا تَتَّقُونَ (32) ३२. मग त्यांच्यात, त्यांच्यामधून पैगंबरही पाठविला (या आवाहनासह) की तुम्ही सर्व अल्लाहची उपासना करा, त्याच्याखेरीज तुमचा दुसरा कोणी उपास्य नाही, तेव्हा तुम्ही भय का नाही बाळगत |
وَقَالَ الْمَلَأُ مِن قَوْمِهِ الَّذِينَ كَفَرُوا وَكَذَّبُوا بِلِقَاءِ الْآخِرَةِ وَأَتْرَفْنَاهُمْ فِي الْحَيَاةِ الدُّنْيَا مَا هَٰذَا إِلَّا بَشَرٌ مِّثْلُكُمْ يَأْكُلُ مِمَّا تَأْكُلُونَ مِنْهُ وَيَشْرَبُ مِمَّا تَشْرَبُونَ (33) ३३. आणि जनसमूहाच्या सरदारांनी उत्तर दिले, जे कुप्र (इन्कार) करीत असत आणि आखिरतच्या भेटीस खोटे ठरवित असत आणि आम्ही त्यांना ऐहिक जीवनात सुखी ठेवले होते, म्हणू लागले, हा तर तुमच्यासारखाच एक मनुष्य आहे. जे तुम्ही खाता तेच तो खातो आणि जे पाणी तुम्ही पिता, तेच तो देखील पितो |
وَلَئِنْ أَطَعْتُم بَشَرًا مِّثْلَكُمْ إِنَّكُمْ إِذًا لَّخَاسِرُونَ (34) ३४. आणि जर तुम्ही आपल्यासारख्याच माणसाचे आज्ञापालन मान्य करून घेतले तर निश्चितच तुम्ही मोठ्या तोट्यात आहात |
أَيَعِدُكُمْ أَنَّكُمْ إِذَا مِتُّمْ وَكُنتُمْ تُرَابًا وَعِظَامًا أَنَّكُم مُّخْرَجُونَ (35) ३५. काय हा तुम्हाला या गोष्टीचे वचन देतो की जेव्हा तुम्ही मेल्यावर केवळ माती आणि हाडे बनून राहाल, तर तुम्ही पुन्हा जिवंत केले जाल |
۞ هَيْهَاتَ هَيْهَاتَ لِمَا تُوعَدُونَ (36) ३६. नव्हे. दूर आणि अतिशय दूर आहे ती गोष्ट, जिचे वचन तुम्हाला दिले जात आहे |
إِنْ هِيَ إِلَّا حَيَاتُنَا الدُّنْيَا نَمُوتُ وَنَحْيَا وَمَا نَحْنُ بِمَبْعُوثِينَ (37) ३७. जीवन तर केवळ याच जगाचे जीवन आहे, ज्यात आम्ही मरत जगत असतो हे नव्हे की आम्हाला (मेल्यानंतर) पुन्हा उठविले जाईल |
إِنْ هُوَ إِلَّا رَجُلٌ افْتَرَىٰ عَلَى اللَّهِ كَذِبًا وَمَا نَحْنُ لَهُ بِمُؤْمِنِينَ (38) ३८. हा तर तो मनुष्य आहे, ज्याने अल्लाहवर असत्य रचले आहे. आम्ही तर याच्यावर ईमान राखणार नाही |
قَالَ رَبِّ انصُرْنِي بِمَا كَذَّبُونِ (39) ३९. पैगंबराने दुआ (प्रार्थना) केली, हे पालनकर्त्या! यांनी मला खोटे ठरविले आहे, तेव्हा तू माझी मदत कर |
قَالَ عَمَّا قَلِيلٍ لَّيُصْبِحُنَّ نَادِمِينَ (40) ४०. उत्तर मिळाले की, लवकरच हे आपल्या कृतकर्मांवर पश्चात्ताप करतील |
فَأَخَذَتْهُمُ الصَّيْحَةُ بِالْحَقِّ فَجَعَلْنَاهُمْ غُثَاءً ۚ فَبُعْدًا لِّلْقَوْمِ الظَّالِمِينَ (41) ४१. शेवटी न्यायाच्या नियमानुसार एका भयंकर आवाजाने त्यांना येऊन धरले आणि आम्ही त्यांना केरकचरा करून टाकले. तेव्हा अशा अत्याचारी लोकांकरिता लांबचे अंतर असो |
ثُمَّ أَنشَأْنَا مِن بَعْدِهِمْ قُرُونًا آخَرِينَ (42) ४२. मग त्यांच्यानंतर आम्ही दुसरेही जनसमूह निर्माण केले |
مَا تَسْبِقُ مِنْ أُمَّةٍ أَجَلَهَا وَمَا يَسْتَأْخِرُونَ (43) ४३. कोणताही जनसमूह आपल्या मुदतीपूर्वी नाश पावला आणि ना मागे राहिला |
ثُمَّ أَرْسَلْنَا رُسُلَنَا تَتْرَىٰ ۖ كُلَّ مَا جَاءَ أُمَّةً رَّسُولُهَا كَذَّبُوهُ ۚ فَأَتْبَعْنَا بَعْضَهُم بَعْضًا وَجَعَلْنَاهُمْ أَحَادِيثَ ۚ فَبُعْدًا لِّقَوْمٍ لَّا يُؤْمِنُونَ (44) ४४. त्यानंतर आम्ही सातत्याने रसूल (पैगंबर) पाठविले. ज्या जनसमूहाजवळ ज्या ज्या वेळेस त्याचा पैगंबर आला, त्याने त्यास खोटे ठरविले तेव्हा एका पाठोपाठ एक जनसमूह नष्ट करीत राहिलो आणि त्यांना किस्सा- कहाणी बनवून सोडले. धिःक्कार असो त्या लोकांचा जे ईमान स्वीकारत नाहीत |
ثُمَّ أَرْسَلْنَا مُوسَىٰ وَأَخَاهُ هَارُونَ بِآيَاتِنَا وَسُلْطَانٍ مُّبِينٍ (45) ४५. मग आम्ही मूसाला आणि त्यांचा भाऊ हारुनला आपल्या निशाण्या आणि स्पष्ट प्रमाणांसह पाठविले |
إِلَىٰ فِرْعَوْنَ وَمَلَئِهِ فَاسْتَكْبَرُوا وَكَانُوا قَوْمًا عَالِينَ (46) ४६. फिरऔन आणि त्याच्या सैन्याकडे, परंतु त्यांनी गर्व केला आणि ते होतेच घमेंड करणारे लोक |
فَقَالُوا أَنُؤْمِنُ لِبَشَرَيْنِ مِثْلِنَا وَقَوْمُهُمَا لَنَا عَابِدُونَ (47) ४७. ते म्हणाले, काय आम्ही आपल्यासारख्या दोन माणसांवर ईमान राखावे वास्तविक त्यांचा स्वतःचा जनसमूह आमची गुलामी करीत आहे |
فَكَذَّبُوهُمَا فَكَانُوا مِنَ الْمُهْلَكِينَ (48) ४८. तेव्हा त्यांनी त्या दोघांना खोटे ठरविले. शेवटी ते लोकही नाश पावलेल्या लोकांत सामील झाले |
وَلَقَدْ آتَيْنَا مُوسَى الْكِتَابَ لَعَلَّهُمْ يَهْتَدُونَ (49) ४९. आणि आम्ही तर मूसाला ग्रंथही प्रदान केला, यासाठी की लोकांनी सत्य मार्गावर यावे |
وَجَعَلْنَا ابْنَ مَرْيَمَ وَأُمَّهُ آيَةً وَآوَيْنَاهُمَا إِلَىٰ رَبْوَةٍ ذَاتِ قَرَارٍ وَمَعِينٍ (50) ५०. आणि आम्ही मरियमचा पुत्र आणि त्याच्या मातेला एक निशाणी बनविले१ आणि त्या दोघांना उंच, आरामदायी आणि वाहते पाणी असलेल्या ठिकाणी आश्रय दिला |
يَا أَيُّهَا الرُّسُلُ كُلُوا مِنَ الطَّيِّبَاتِ وَاعْمَلُوا صَالِحًا ۖ إِنِّي بِمَا تَعْمَلُونَ عَلِيمٌ (51) ५१. पैगंबरांनो! हलाल (वैध) वस्तू खा आणि सत्कर्म करा. तुम्ही जे काही करीत आहात, ते मी चांगल्या प्रकारे जाणतो |
وَإِنَّ هَٰذِهِ أُمَّتُكُمْ أُمَّةً وَاحِدَةً وَأَنَا رَبُّكُمْ فَاتَّقُونِ (52) ५२. आणि निःसंशय तुमचा हा दीन (धर्म) एकच दीन (धर्म) आहे १ आणि मी तुम्हा सर्वांचा पालनकर्ता आहे, तेव्हा माझेच भय बाळगून राहा |
فَتَقَطَّعُوا أَمْرَهُم بَيْنَهُمْ زُبُرًا ۖ كُلُّ حِزْبٍ بِمَا لَدَيْهِمْ فَرِحُونَ (53) ५३. मग त्यांनी स्वतःच आपल्या धर्मांचे आपसात तुकडे तुकडे करून टाकले. प्रत्येक संप्रदाय, त्याच्याजवळ जे काही आहे, त्यावरच घमेंड करीत आहे |
فَذَرْهُمْ فِي غَمْرَتِهِمْ حَتَّىٰ حِينٍ (54) ५४. तेव्हा तुम्ही देखील त्यांना त्यांच्या गफलतीत काही काळ पडून राहू द्या |
أَيَحْسَبُونَ أَنَّمَا نُمِدُّهُم بِهِ مِن مَّالٍ وَبَنِينَ (55) ५५. काय यांनी असे समजून घेतले आहे की आम्ही जी काही यांची धन-संपत्ती आणि संतती वाढवित आहोत |
نُسَارِعُ لَهُمْ فِي الْخَيْرَاتِ ۚ بَل لَّا يَشْعُرُونَ (56) ५६. ते त्याच्यासाठी शुभ-मांगल्यात घाई करीत आहोत? नव्हे, किंबहुना यांना समजतच नाही |
إِنَّ الَّذِينَ هُم مِّنْ خَشْيَةِ رَبِّهِم مُّشْفِقُونَ (57) ५७. निःसंशय, जे लोक आपल्या पालनकर्त्या (अल्लाहचे) भय बाळगतात |
وَالَّذِينَ هُم بِآيَاتِ رَبِّهِمْ يُؤْمِنُونَ (58) ५८. आणि जे आपल्या पालनकर्त्याच्या आयतींवर ईमान राखतात |
وَالَّذِينَ هُم بِرَبِّهِمْ لَا يُشْرِكُونَ (59) ५९. आणि जे आपल्या पालनकर्त्यासोबत दुसऱ्या कुणाला सहभागी ठरवित नाही |
وَالَّذِينَ يُؤْتُونَ مَا آتَوا وَّقُلُوبُهُمْ وَجِلَةٌ أَنَّهُمْ إِلَىٰ رَبِّهِمْ رَاجِعُونَ (60) ६०. आणि जे लोक देतात, जे काही देतात, अशा स्थितीत की त्यांची हृदये भयाने थरथर कांपत असतात की ते आपल्या पालनकर्त्याकडे परतणार आहेत |
أُولَٰئِكَ يُسَارِعُونَ فِي الْخَيْرَاتِ وَهُمْ لَهَا سَابِقُونَ (61) ६१. हेच आहेत जे तत्परतेने नेकी (सत्कर्म) प्राप्ता करीत आहेत आणि हेच आहेत जे त्यांच्याकडे धाव घेणारे आहेत |
وَلَا نُكَلِّفُ نَفْسًا إِلَّا وُسْعَهَا ۖ وَلَدَيْنَا كِتَابٌ يَنطِقُ بِالْحَقِّ ۚ وَهُمْ لَا يُظْلَمُونَ (62) ६२. आम्ही कोणत्याही जीवावर त्याच्या कुवतीपेक्षा जास्त भार टाकत नाही. आमच्याजवळ एक ग्रंथ आहे, जो सत्य तेच सांगतो आणि त्यांच्यावर किंचितही अत्याचार केला जाणार नाही |
بَلْ قُلُوبُهُمْ فِي غَمْرَةٍ مِّنْ هَٰذَا وَلَهُمْ أَعْمَالٌ مِّن دُونِ ذَٰلِكَ هُمْ لَهَا عَامِلُونَ (63) ६३. परंतु त्यांची हृदये या गोष्टीकडून गाफील (असावध) आहेत आणि त्यांच्यासाठी याखेरीजही अनेक कर्म आहेत, जी ते करणार आहेत |
حَتَّىٰ إِذَا أَخَذْنَا مُتْرَفِيهِم بِالْعَذَابِ إِذَا هُمْ يَجْأَرُونَ (64) ६४. येथेपर्यंत की जेव्हा आम्ही त्यांच्यातल्या सुख-संपन्न अवस्थेच्या लोकांना शिक्षा- यातनेत धरले तेव्हा ते किंचाळू लागले |
لَا تَجْأَرُوا الْيَوْمَ ۖ إِنَّكُم مِّنَّا لَا تُنصَرُونَ (65) ६५. आज गयावया करू नका. निःसंशय आमच्याकडून तुम्हाला मदत मिळणार नाही |
قَدْ كَانَتْ آيَاتِي تُتْلَىٰ عَلَيْكُمْ فَكُنتُمْ عَلَىٰ أَعْقَابِكُمْ تَنكِصُونَ (66) ६६. माझ्या आयती तर तुमच्यासमोर वाचून ऐकविल्या जात होत्या, तरीही तुम्ही आपल्या टाचांवर उलटपावली पळ काढत होते |
مُسْتَكْبِرِينَ بِهِ سَامِرًا تَهْجُرُونَ (67) ६७. घमेंड करीत, ताठरता दाखवित, कथा- कहाणी बनवून त्यास सोडून देत |
أَفَلَمْ يَدَّبَّرُوا الْقَوْلَ أَمْ جَاءَهُم مَّا لَمْ يَأْتِ آبَاءَهُمُ الْأَوَّلِينَ (68) ६८. काय त्यांनी या गोष्टीवर विचार- चिंतन नाही केले? किंवा त्यांच्याजवळ ती गोष्ट आली, जी यांच्या पूर्वजांजवळ आली नव्हती |
أَمْ لَمْ يَعْرِفُوا رَسُولَهُمْ فَهُمْ لَهُ مُنكِرُونَ (69) ६९. किंवा यांनी आपल्या पैगंबराला ओळखले नाही, म्हणून त्याचा इन्कार करणारे झालेत |
أَمْ يَقُولُونَ بِهِ جِنَّةٌ ۚ بَلْ جَاءَهُم بِالْحَقِّ وَأَكْثَرُهُمْ لِلْحَقِّ كَارِهُونَ (70) ७०. किंवा हे म्हणतात की याचे डोके फिरले आहे. किंबहुना तो तर त्यांच्याजवळ सत्य घेऊन आला आहे. होय त्यांच्यापैकी अधिकांश लोक सत्यापासून चिडणारे आहेत |
وَلَوِ اتَّبَعَ الْحَقُّ أَهْوَاءَهُمْ لَفَسَدَتِ السَّمَاوَاتُ وَالْأَرْضُ وَمَن فِيهِنَّ ۚ بَلْ أَتَيْنَاهُم بِذِكْرِهِمْ فَهُمْ عَن ذِكْرِهِم مُّعْرِضُونَ (71) ७१. जर सत्यच त्यांच्या इच्छा-आकांक्षांचे अनुयायी झाले तर धरती आणि आकाश आणि त्यांच्या दरम्यान जेवढ्या वस्तू आहेत सर्व अस्ताव्यस्त होतील. खरी गोष्ट अशी की आम्ही त्यांना त्यांचा बोध- उपदेश पोहचविला आहे, परंतु ते आपल्या बोध- उपदेशापासून तोंड फिरविणारे आहेत |
أَمْ تَسْأَلُهُمْ خَرْجًا فَخَرَاجُ رَبِّكَ خَيْرٌ ۖ وَهُوَ خَيْرُ الرَّازِقِينَ (72) ७२. काय तुम्ही त्यांच्याकडून काही पारिश्रमिक मागता? लक्षात ठेवा, तुमच्या पालनकर्त्याने दिलेले पारिश्रमिक अधिक उत्तम आहे आणि तो सर्वांत उत्तम रोजी (आजिविका) पोहचविणारा आहे |
وَإِنَّكَ لَتَدْعُوهُمْ إِلَىٰ صِرَاطٍ مُّسْتَقِيمٍ (73) ७३. निःसंशय, तुम्ही तर त्यांना सरळ मार्गाकडे बोलावित आहात |
وَإِنَّ الَّذِينَ لَا يُؤْمِنُونَ بِالْآخِرَةِ عَنِ الصِّرَاطِ لَنَاكِبُونَ (74) ७४. आणि निःसंशय, जे लोक आखिरतवर ईमान राखत नाहीत ते सरळ मार्गापासून विचलित होणारे आहेत |
۞ وَلَوْ رَحِمْنَاهُمْ وَكَشَفْنَا مَا بِهِم مِّن ضُرٍّ لَّلَجُّوا فِي طُغْيَانِهِمْ يَعْمَهُونَ (75) ७५. आणि जर आम्ही त्यांच्यावर दया- कृपा केली आणि त्यांची कष्ट- यातना दूर केली तर ते आपल्या विद्रोहात अधिक मजबूत होऊन भटकत राहतील |
وَلَقَدْ أَخَذْنَاهُم بِالْعَذَابِ فَمَا اسْتَكَانُوا لِرَبِّهِمْ وَمَا يَتَضَرَّعُونَ (76) ७६. आणि आम्ही त्यांना शिक्षा- यातनाग्रस्तही केले तरीही हे लोक ना तर आपल्या पालनकर्त्यासमोर झुकले आणि ना विनम्रतेचा मार्ग पत्करला |
حَتَّىٰ إِذَا فَتَحْنَا عَلَيْهِم بَابًا ذَا عَذَابٍ شَدِيدٍ إِذَا هُمْ فِيهِ مُبْلِسُونَ (77) ७७. येथेपर्यंत की जेव्हा आम्ही त्यांच्यावर कठोर शिक्षा- यातनेचे द्वार खुले केले तेव्हा त्याच वेळी त्वरित निराश झाले |
وَهُوَ الَّذِي أَنشَأَ لَكُمُ السَّمْعَ وَالْأَبْصَارَ وَالْأَفْئِدَةَ ۚ قَلِيلًا مَّا تَشْكُرُونَ (78) ७८. तोच (अल्लाह) आहे, ज्याने तुमच्यासाठी कान, डोळे आणि हृदय बनविले, परंतु तुम्ही फार कमी आभार मानता |
وَهُوَ الَّذِي ذَرَأَكُمْ فِي الْأَرْضِ وَإِلَيْهِ تُحْشَرُونَ (79) ७९. आणि तोच आहे, ज्याने तुम्हाला (निर्माण करून) जमिनीवर पसरविले आणि त्याच्याचकडे तुम्ही एकत्रित केले जाल |
وَهُوَ الَّذِي يُحْيِي وَيُمِيتُ وَلَهُ اخْتِلَافُ اللَّيْلِ وَالنَّهَارِ ۚ أَفَلَا تَعْقِلُونَ (80) ८०. आणि तोच होय जो जिवंत राखतो आणि मृत्यु देतो आणि रात्र व दिवसाचा फेरबदल करण्याचा अधिकारही तोच राखतो. काय तुम्ही अकलेचा वापर करीत नाही |
بَلْ قَالُوا مِثْلَ مَا قَالَ الْأَوَّلُونَ (81) ८१. किंबहुना त्या लोकांनी देखील तेच सांगितले, जे पूर्वीचे लोक सांगत आले आहेत |
قَالُوا أَإِذَا مِتْنَا وَكُنَّا تُرَابًا وَعِظَامًا أَإِنَّا لَمَبْعُوثُونَ (82) ८२. म्हणतात की जेव्हा मेल्यानंतर आम्ही माती आणि हाडे होऊन जाऊ, काय तरीही आम्ही अवश्य उभे केले जाऊ |
لَقَدْ وُعِدْنَا نَحْنُ وَآبَاؤُنَا هَٰذَا مِن قَبْلُ إِنْ هَٰذَا إِلَّا أَسَاطِيرُ الْأَوَّلِينَ (83) ८३. आमच्याशी आणि आमच्या पूर्वजां (बुजूर्ग लोकां) शी पूर्वीपासूनच हा वायदा होत आला आहे. काही नाही, या केवळ पूर्वी होऊन गेलेल्या लोकांच्या कथा- कहाण्या आहेत |
قُل لِّمَنِ الْأَرْضُ وَمَن فِيهَا إِن كُنتُمْ تَعْلَمُونَ (84) ८४. यांना विचारा, जर जाणत असाल तर सांगा की धरती आणि तिच्या समस्त वस्तू कोणाच्या मालकीच्या आहेत |
سَيَقُولُونَ لِلَّهِ ۚ قُلْ أَفَلَا تَذَكَّرُونَ (85) ८५. ते त्वरित उत्तर देतील की अल्लाहच्या, सांगा तर मग तुम्ही बोध प्राप्त का नाही करीत |
قُلْ مَن رَّبُّ السَّمَاوَاتِ السَّبْعِ وَرَبُّ الْعَرْشِ الْعَظِيمِ (86) ८६. त्यांना विचारा, आकाशांचा आणि अतिशय महान ईशसिंहासना (अर्श) चा स्वामी कोण आहे |
سَيَقُولُونَ لِلَّهِ ۚ قُلْ أَفَلَا تَتَّقُونَ (87) ८७. ते लोक उत्तर देतील, अल्लाहच आहे. सांगा, मग तुम्ही भय का नाही राखत |
قُلْ مَن بِيَدِهِ مَلَكُوتُ كُلِّ شَيْءٍ وَهُوَ يُجِيرُ وَلَا يُجَارُ عَلَيْهِ إِن كُنتُمْ تَعْلَمُونَ (88) ८८. यांना विचारा की सर्व गोष्टींचा अधिकार कोणाच्या हाती आहे, जो आश्रय देतो आणि ज्याच्या तुलनेत (विरोधात) कोणी आश्रय देऊ शकत नाही. तुम्ही जाणत असाल तर सांगा |
سَيَقُولُونَ لِلَّهِ ۚ قُلْ فَأَنَّىٰ تُسْحَرُونَ (89) ८९. हेच उत्तर देतील की, अल्लाहच आहे. सांगा, मग तुमच्यावर कोणीकडून जादूटोणा होतो |
بَلْ أَتَيْنَاهُم بِالْحَقِّ وَإِنَّهُمْ لَكَاذِبُونَ (90) ९०. खरी गोष्ट अशी की आम्ही त्यांच्यापर्यंत सत्य पोहचविले आहे, आणि निःसंशय हे अगदी खोटारडे आहेत |
مَا اتَّخَذَ اللَّهُ مِن وَلَدٍ وَمَا كَانَ مَعَهُ مِنْ إِلَٰهٍ ۚ إِذًا لَّذَهَبَ كُلُّ إِلَٰهٍ بِمَا خَلَقَ وَلَعَلَا بَعْضُهُمْ عَلَىٰ بَعْضٍ ۚ سُبْحَانَ اللَّهِ عَمَّا يَصِفُونَ (91) ९१. ना तर अल्लाहने कोणाला पुत्र बनविले आहे आणि ना त्याच्यासोबत दुसरा कोणी उपास्य आहे, अन्यथा प्रत्येक ईश्वर आपल्या निर्मितीला घेऊन फिरत राहिला असता आणि प्रत्येकजण एकमेकावर श्रेष्ठतम होण्याचा प्रयत्न करीत राहिला असता. जी गुणवैशिट्ये हे सांगतात अल्लाह त्यापासून पवित्र आहे |
عَالِمِ الْغَيْبِ وَالشَّهَادَةِ فَتَعَالَىٰ عَمَّا يُشْرِكُونَ (92) ९२. तो गुप्त - उघड जाणणारा आहे आणि जो शिर्क (अनेकेश्वरवादी गोष्टी) हे करतात, अल्लाह त्याहून अतिशय उच्चतम आहे |
قُل رَّبِّ إِمَّا تُرِيَنِّي مَا يُوعَدُونَ (93) ९३. (तुम्ही) दुआ (प्रार्थना) करा की हे माझ्या पालनकर्त्या! जर तू मला ते दाखवशील, ज्याचा वायदा या लोकंना दिला जात आहे |
رَبِّ فَلَا تَجْعَلْنِي فِي الْقَوْمِ الظَّالِمِينَ (94) ९४. तेव्हा हे माझ्या पालनकर्त्या! तू मला या अत्याचारी समूहात समील करू नकोस |
وَإِنَّا عَلَىٰ أَن نُّرِيَكَ مَا نَعِدُهُمْ لَقَادِرُونَ (95) ९५. आणि आम्ही जे काही वायदे- वचन त्यांना देत आहोत, ते सर्व तुम्हाला दाखवून देण्याचे सामर्थ्य बाळगतो |
ادْفَعْ بِالَّتِي هِيَ أَحْسَنُ السَّيِّئَةَ ۚ نَحْنُ أَعْلَمُ بِمَا يَصِفُونَ (96) ९६. वाईट गोष्टीला अशा रीतीने दूर करा जी पूर्णतः भलेपणाची असावी. हे जे काही सांगतात ते आम्ही चांगल्या प्रकारे जाणतो |
وَقُل رَّبِّ أَعُوذُ بِكَ مِنْ هَمَزَاتِ الشَّيَاطِينِ (97) ९७. आणि दुआ (प्रार्थना) करा की हे माझ्या पालनकत्या! सैतानांद्वारे (मनात येणाऱ्या) शंका-कुशंकांपासून मी तुझे शरण मागतो |
وَأَعُوذُ بِكَ رَبِّ أَن يَحْضُرُونِ (98) ९८. आणि हे माझ्या पालनकर्त्या! मी या गोष्टीपासूनही तुझे शरण मागतो की त्यांनी माझ्याजवळ यावे |
حَتَّىٰ إِذَا جَاءَ أَحَدَهُمُ الْمَوْتُ قَالَ رَبِّ ارْجِعُونِ (99) ९९. येथेपर्यंत की त्यांच्यापैकी एखाद्याचे मरण येऊन ठेपले तेव्हा तो म्हणतो की हे माझ्या पालनकर्त्या! मला परत पाठव |
لَعَلِّي أَعْمَلُ صَالِحًا فِيمَا تَرَكْتُ ۚ كَلَّا ۚ إِنَّهَا كَلِمَةٌ هُوَ قَائِلُهَا ۖ وَمِن وَرَائِهِم بَرْزَخٌ إِلَىٰ يَوْمِ يُبْعَثُونَ (100) १००. अशासाठी की आपल्या सोडून आलेल्या जगात जाऊन सत्कर्म करावे, असे कदापि होणार नाही. हे केवळ एक कथन आहे, जे सांगणारा हा आहे त्यांच्या पाठीमागे एक पट आहे. त्यांचे दुसऱ्यांदा जिवंत होण्याच्या दिवसापर्यंत.१ |
فَإِذَا نُفِخَ فِي الصُّورِ فَلَا أَنسَابَ بَيْنَهُمْ يَوْمَئِذٍ وَلَا يَتَسَاءَلُونَ (101) १०१. मग जेव्हा सूर (शंख) फुंकला जाईल, त्या दिवशी ना तर आपसातील संबंध राहतील ना एकमेकांची विचारपूस |
فَمَن ثَقُلَتْ مَوَازِينُهُ فَأُولَٰئِكَ هُمُ الْمُفْلِحُونَ (102) १०२. तेव्हा ज्यांच्या तराजूचे पारडे वजनदार असेल, ते तर सफलता प्राप्त करणारे ठरतील |
وَمَنْ خَفَّتْ مَوَازِينُهُ فَأُولَٰئِكَ الَّذِينَ خَسِرُوا أَنفُسَهُمْ فِي جَهَنَّمَ خَالِدُونَ (103) १०३. आणि ज्यांच्या तराजूचे पारडे वजनात हलके राहील तर हे असे लोक आहेत, ज्यांनी आपले नुकसान स्वतः करून घेतले, जे नेहमीकरिता जहन्नममध्ये दाखल झाले |
تَلْفَحُ وُجُوهَهُمُ النَّارُ وَهُمْ فِيهَا كَالِحُونَ (104) १०४. त्यांच्या चेहऱ्यांना आग होरपळत राहील. ते तिथे विद्रुप आणि भयानक बनलेले असतील |
أَلَمْ تَكُنْ آيَاتِي تُتْلَىٰ عَلَيْكُمْ فَكُنتُم بِهَا تُكَذِّبُونَ (105) १०५. काय माझ्या आयतींचे पठण तुमच्यासमोर केले जात नव्हते? तरीही तुम्ही त्यांना खोटे ठरवित होते |
قَالُوا رَبَّنَا غَلَبَتْ عَلَيْنَا شِقْوَتُنَا وَكُنَّا قَوْمًا ضَالِّينَ (106) १०६. ते म्हणतील, हे आमच्या पालनकर्त्या! आमचे दुर्दैव आमच्यावर प्रभावशाली झाले. खरोखर आम्ही मार्गभ्रष्ट लोक होतो |
رَبَّنَا أَخْرِجْنَا مِنْهَا فَإِنْ عُدْنَا فَإِنَّا ظَالِمُونَ (107) १०७. हे आमच्या पालनकर्त्या! आम्हाला येथून बाहेर काढ. जर आम्ही पुन्हा असे केले तर निश्चितच आम्ही अत्याचारी ठरू |
قَالَ اخْسَئُوا فِيهَا وَلَا تُكَلِّمُونِ (108) १०८. (अल्लाह) फर्माविल, धिःक्कार असो तुमचा, यातच पडून राहा, आणि माझ्याशी बोलू नका |
إِنَّهُ كَانَ فَرِيقٌ مِّنْ عِبَادِي يَقُولُونَ رَبَّنَا آمَنَّا فَاغْفِرْ لَنَا وَارْحَمْنَا وَأَنتَ خَيْرُ الرَّاحِمِينَ (109) १०९. माझ्या दासांचा एक समूह असा होता, जो सतत हेच म्हणत राहिला की हे आमच्या पालनकर्त्या! आम्ही ईमान राखले आहे. तू आम्हाला माफ कर आणि आमच्यावर दया कर. तू सर्व दया करणाऱ्यांपेक्षा जास्त दया करणारा आहेस |
فَاتَّخَذْتُمُوهُمْ سِخْرِيًّا حَتَّىٰ أَنسَوْكُمْ ذِكْرِي وَكُنتُم مِّنْهُمْ تَضْحَكُونَ (110) ११०. (परंतु) तुम्ही त्यांची थट्टाच उडवित राहिले, येथे पर्यंत की (त्यांच्या मागे लागून) तुम्ही माझे स्मरण देखील विसरले आणि त्यांना हसण्यावारी घेत राहिले |
إِنِّي جَزَيْتُهُمُ الْيَوْمَ بِمَا صَبَرُوا أَنَّهُمْ هُمُ الْفَائِزُونَ (111) १११. आज मी त्यांच्या सहनशीलता (आणि सदाचारा) चा असा मोबदला दिला की ते सफलता प्राप्त करणारे ठरले |
قَالَ كَمْ لَبِثْتُمْ فِي الْأَرْضِ عَدَدَ سِنِينَ (112) ११२. (सर्वश्रेष्ठ अल्लाह) विचारील, तुम्ही धरतीवर वर्षांच्या गणनेनुसार किती दिवस राहिलात |
قَالُوا لَبِثْنَا يَوْمًا أَوْ بَعْضَ يَوْمٍ فَاسْأَلِ الْعَادِّينَ (113) ११३. (ते) म्हणतील, एक दिवस किंवा एका दिवसापेक्षाही कमी. गणना करणाऱ्यांनाही विचारा |
قَالَ إِن لَّبِثْتُمْ إِلَّا قَلِيلًا ۖ لَّوْ أَنَّكُمْ كُنتُمْ تَعْلَمُونَ (114) ११४. (सर्वश्रेष्ठ अल्लाह) फर्माविल, खरी गोष्ट अशी की तुम्ही तिथे फार कमी काळ राहिलात. हे तुम्ही पहिल्यापासून जाणून घेतले असते तर |
أَفَحَسِبْتُمْ أَنَّمَا خَلَقْنَاكُمْ عَبَثًا وَأَنَّكُمْ إِلَيْنَا لَا تُرْجَعُونَ (115) ११५. काय तुम्ही असे समजून बसला आहात की आम्ही तुम्हाला व्यर्थच निर्माण केले आहे, आणि हे की तुम्ही आमच्याकडे परतविले जाणार नाहीत |
فَتَعَالَى اللَّهُ الْمَلِكُ الْحَقُّ ۖ لَا إِلَٰهَ إِلَّا هُوَ رَبُّ الْعَرْشِ الْكَرِيمِ (116) ११६. सर्वश्रेष्ठ अल्लाह खराखुरा बादशहा आहे, तो अतिउच्च आहे, त्याच्याखेरीज कोणीही उपासनीय नाही. तोच सन्मानित सिंहासना (अर्श) चा स्वामी आहे |
وَمَن يَدْعُ مَعَ اللَّهِ إِلَٰهًا آخَرَ لَا بُرْهَانَ لَهُ بِهِ فَإِنَّمَا حِسَابُهُ عِندَ رَبِّهِ ۚ إِنَّهُ لَا يُفْلِحُ الْكَافِرُونَ (117) ११७. आणि जो मनुष्य, अल्लाहसोबत अन्य एखाद्या ईश्वराला पुकारेल ज्याचे त्याच्याजवळ कोणतेही प्रमाण (पुरावा) नाही तर त्याचा हिशोब त्याच्या पालनकर्त्याजवळ आहे. निःसंशय काफिर (अविश्वाशी) लोक सफलतेपासून वंचित आहेत |
وَقُل رَّبِّ اغْفِرْ وَارْحَمْ وَأَنتَ خَيْرُ الرَّاحِمِينَ (118) ११८. आणि म्हणा की हे माझ्या पालनकर्त्या! तू माफ कर आणि दया कृपा कर, आणि तू सर्व दया करणाऱ्यांपेक्षा उत्तम दया करणारा आहेस |