×

Surah Az-Zumar in Marathi

Quran Marathi ⮕ Surah Zumar

Translation of the Meanings of Surah Zumar in Marathi - الماراثية

The Quran in Marathi - Surah Zumar translated into Marathi, Surah Az-Zumar in Marathi. We provide accurate translation of Surah Zumar in Marathi - الماراثية, Verses 75 - Surah Number 39 - Page 458.

بسم الله الرحمن الرحيم

تَنزِيلُ الْكِتَابِ مِنَ اللَّهِ الْعَزِيزِ الْحَكِيمِ (1)
१. या ग्रंथाला अवतरित करणे अल्लाहतर्फे आहे, जो मोठा वर्चस्वशाली, आणि हिकमत बाळगणारा आहे
إِنَّا أَنزَلْنَا إِلَيْكَ الْكِتَابَ بِالْحَقِّ فَاعْبُدِ اللَّهَ مُخْلِصًا لَّهُ الدِّينَ (2)
२. निःसंशय, आम्ही हा ग्रंथ सत्यासह तुमच्याकडे अवतरित केला आहे, तेव्हा तुम्ही केवळ अल्लाहचीच भक्ती - उपासना करा, त्याच्याचकरिता दीन (धर्मा) ला विशुद्ध करीत
أَلَا لِلَّهِ الدِّينُ الْخَالِصُ ۚ وَالَّذِينَ اتَّخَذُوا مِن دُونِهِ أَوْلِيَاءَ مَا نَعْبُدُهُمْ إِلَّا لِيُقَرِّبُونَا إِلَى اللَّهِ زُلْفَىٰ إِنَّ اللَّهَ يَحْكُمُ بَيْنَهُمْ فِي مَا هُمْ فِيهِ يَخْتَلِفُونَ ۗ إِنَّ اللَّهَ لَا يَهْدِي مَنْ هُوَ كَاذِبٌ كَفَّارٌ (3)
३. ऐका! अल्लाहच्याचकरिता विशुद्ध (निर्भेळ) उपासना करणे आहे,१ आणि ज्या लोकांनी त्याच्याखेरीज अवलिया बनवून ठेवले आहेत (आणि असे म्हणतात) की आम्ही यांची उपासना केवळ एवढ्यासाठी करतो की हे (बुजुर्ग, थोर) आम्हाला अल्लाहच्या निकट करतील, हे लोक ज्या गोष्टीबाबत मतभेद करीत आहेत, तिचा (न्यायसंगत) फैसला अल्लाह स्वतः करील, खोट्या आणि कृतघ्न लोकांना अल्लाह मार्ग दाखवित नाही
لَّوْ أَرَادَ اللَّهُ أَن يَتَّخِذَ وَلَدًا لَّاصْطَفَىٰ مِمَّا يَخْلُقُ مَا يَشَاءُ ۚ سُبْحَانَهُ ۖ هُوَ اللَّهُ الْوَاحِدُ الْقَهَّارُ (4)
४. जर अल्लाहने संततीच इच्छिली असती, तर आपल्या निर्मितीमधून ज्याला इच्छिले असते त्याची निवड केली असती (परंतु) तो तर पवित्र (व्यंग-दोषविरहित) आहे. तोच अल्लाह आहे एक आणि शक्ती - सामर्थ्य राखणारा
خَلَقَ السَّمَاوَاتِ وَالْأَرْضَ بِالْحَقِّ ۖ يُكَوِّرُ اللَّيْلَ عَلَى النَّهَارِ وَيُكَوِّرُ النَّهَارَ عَلَى اللَّيْلِ ۖ وَسَخَّرَ الشَّمْسَ وَالْقَمَرَ ۖ كُلٌّ يَجْرِي لِأَجَلٍ مُّسَمًّى ۗ أَلَا هُوَ الْعَزِيزُ الْغَفَّارُ (5)
५. खूप चांगल्या पद्धतीने त्याने आकाशांची आणि धरतीची निर्मिती केली. तो रात्रीला दिवसावर आणि दिवसाला रात्रीवर गुंडाळतो आणि त्याने सूर्य व चंद्राला कार्यरत केले आहे. प्रत्येक निर्धारित अवधीपर्यंत चालत आहे. विश्वास करा की तोच वर्चस्वशाली आणि अपराधांना माफ करणारा आहे
خَلَقَكُم مِّن نَّفْسٍ وَاحِدَةٍ ثُمَّ جَعَلَ مِنْهَا زَوْجَهَا وَأَنزَلَ لَكُم مِّنَ الْأَنْعَامِ ثَمَانِيَةَ أَزْوَاجٍ ۚ يَخْلُقُكُمْ فِي بُطُونِ أُمَّهَاتِكُمْ خَلْقًا مِّن بَعْدِ خَلْقٍ فِي ظُلُمَاتٍ ثَلَاثٍ ۚ ذَٰلِكُمُ اللَّهُ رَبُّكُمْ لَهُ الْمُلْكُ ۖ لَا إِلَٰهَ إِلَّا هُوَ ۖ فَأَنَّىٰ تُصْرَفُونَ (6)
६. त्याने तुम्हा सर्वांना एकाच जिवापासून निर्माण केले, मग त्यापासून त्याची जोडी निर्माण केली आणि तुमच्याकरिता जनावरांपैकी आठ जोडे (नर-मादा) अवतरित केले. तो तुम्हाला तुमच्या मातांच्या गर्भामध्ये एका स्वरूपानंतर दुसऱ्या स्वरुपात घडवितो, तीन तीन अंधारामध्ये हाच अल्लाह तुमचा रब (स्वामी व पालनकर्ता) आहे त्याच्याचकरिता राज्यसत्ता आहे, त्याच्याखेरीज कोणीही उपास्य नाही. मग तुम्ही कोठे भटकत जात आहात
إِن تَكْفُرُوا فَإِنَّ اللَّهَ غَنِيٌّ عَنكُمْ ۖ وَلَا يَرْضَىٰ لِعِبَادِهِ الْكُفْرَ ۖ وَإِن تَشْكُرُوا يَرْضَهُ لَكُمْ ۗ وَلَا تَزِرُ وَازِرَةٌ وِزْرَ أُخْرَىٰ ۗ ثُمَّ إِلَىٰ رَبِّكُم مَّرْجِعُكُمْ فَيُنَبِّئُكُم بِمَا كُنتُمْ تَعْمَلُونَ ۚ إِنَّهُ عَلِيمٌ بِذَاتِ الصُّدُورِ (7)
७. जर तुम्ही कृतघ्नता कराल तर (लक्षात ठेवा की) अल्लाह तुम्हा सर्वांपासून निःस्पृह आहे आणि तो आपल्या दासांच्या कृतघ्नतेने खूश नाही आणि जर तुम्ही कृतज्ञता व्यक्त कराल तर तो त्यास तुमच्यासाठी पसंत करील आणि कोणीही कोणाचे ओझे उचलणार नाही, मग तुम्हा सर्वांचे परतणे तुमच्या पालनकर्त्याकडेच आहे, तो तुम्हाला दाखवून देईल, जे काही तुम्ही करत होते. निःसंशय, तो मनातल्या गोष्टी देखील जाणतो
۞ وَإِذَا مَسَّ الْإِنسَانَ ضُرٌّ دَعَا رَبَّهُ مُنِيبًا إِلَيْهِ ثُمَّ إِذَا خَوَّلَهُ نِعْمَةً مِّنْهُ نَسِيَ مَا كَانَ يَدْعُو إِلَيْهِ مِن قَبْلُ وَجَعَلَ لِلَّهِ أَندَادًا لِّيُضِلَّ عَن سَبِيلِهِ ۚ قُلْ تَمَتَّعْ بِكُفْرِكَ قَلِيلًا ۖ إِنَّكَ مِنْ أَصْحَابِ النَّارِ (8)
८. आणि माणसाला जेव्हा एखादे दुःख पोहोचते, तेव्हा तो खूप ध्यान एकवटून आपल्या पालनकर्त्यास पुकारतो. मग जेव्हा अल्लहा आपल्याकडुन त्याला सुख प्रदान करतो तो याच्यापूर्वी जी दुआ - प्रार्थना करीत होता, तिला पूर्णपणे विसरतो, आणि अल्लाहचे भागीदार ठरवू लागतो. ज्याद्वारे (इतरांनाही) त्याच्या मार्गापासून विचलित करावे. (तुम्ही) सांगा की आपल्या कुप्र (सत्य-विरोधा) चा फायदा आणखी काही दिवस उचलून घ्या, (शेवटी) तू जहन्नमवासींपैकी होणार आहेस
أَمَّنْ هُوَ قَانِتٌ آنَاءَ اللَّيْلِ سَاجِدًا وَقَائِمًا يَحْذَرُ الْآخِرَةَ وَيَرْجُو رَحْمَةَ رَبِّهِ ۗ قُلْ هَلْ يَسْتَوِي الَّذِينَ يَعْلَمُونَ وَالَّذِينَ لَا يَعْلَمُونَ ۗ إِنَّمَا يَتَذَكَّرُ أُولُو الْأَلْبَابِ (9)
९. काय तो मनुष्य, जो रात्रीच्या वेळी सजदा आणि उभे राहण्याच्या अवस्थेत उपासना करण्यात घालवित असेल, आखिरतचे भय बाळगत असेल आणि आपल्या पालनकर्त्याच्या दया - कृपेची आस बाळगत असेल, आणि तो, जो याच्या उलट असेल, समान असू शकतात, बरे हे सांगा की विद्वान आणि अज्ञानी दोघे समान आहेत? निःसंशय, बोध तर तेच प्राप्त करतात, जे बुद्धिमान असतील
قُلْ يَا عِبَادِ الَّذِينَ آمَنُوا اتَّقُوا رَبَّكُمْ ۚ لِلَّذِينَ أَحْسَنُوا فِي هَٰذِهِ الدُّنْيَا حَسَنَةٌ ۗ وَأَرْضُ اللَّهِ وَاسِعَةٌ ۗ إِنَّمَا يُوَفَّى الصَّابِرُونَ أَجْرَهُم بِغَيْرِ حِسَابٍ (10)
१०. सांगा, (अल्लाह फर्मावितो) की हे माझ्या ईमान राखणाऱ्या दासांनो! आपल्या पालनकर्त्याचे भय बाळगत राहा. जे या जगात सत्कर्म करीत राहतात त्याच्यासाठी उत्तम मोबदला आहे आणि अल्लाहची धरती मोठी विशाल (विस्तृत) आहे. धीर संयम राखणाऱ्यांनाच त्यांचा पुरेपूर अगणित मोबदला दिला जातो
قُلْ إِنِّي أُمِرْتُ أَنْ أَعْبُدَ اللَّهَ مُخْلِصًا لَّهُ الدِّينَ (11)
११. (तुम्ही) सांगा की, मला हा आदेश दिला गेला आहे की अल्लाहची अशा प्रकारे उपासना करावी की त्याच्याचकरिता उपासनेला विशुद्ध (निर्भेळ) करून
وَأُمِرْتُ لِأَنْ أَكُونَ أَوَّلَ الْمُسْلِمِينَ (12)
१२. आणि मला आदेश दिला गेला आहे की मी सर्वांत प्रथम आज्ञाधारक (मुस्लिम) व्हावे
قُلْ إِنِّي أَخَافُ إِنْ عَصَيْتُ رَبِّي عَذَابَ يَوْمٍ عَظِيمٍ (13)
१३. सांगा की मला तर आपल्या पालनकर्त्या (अल्लाह) ची अवज्ञा करताना मोठ्या दिवसाच्या अज़ाब (शिक्षा - यातने) चे भय वाटते
قُلِ اللَّهَ أَعْبُدُ مُخْلِصًا لَّهُ دِينِي (14)
१४. सांगा की मी तर अगदी सचोटीने (निखालसपणे) केवळ अल्लाहचीच उपासना करतो
فَاعْبُدُوا مَا شِئْتُم مِّن دُونِهِ ۗ قُلْ إِنَّ الْخَاسِرِينَ الَّذِينَ خَسِرُوا أَنفُسَهُمْ وَأَهْلِيهِمْ يَوْمَ الْقِيَامَةِ ۗ أَلَا ذَٰلِكَ هُوَ الْخُسْرَانُ الْمُبِينُ (15)
१५. तुम्ही त्याच्याखेरीज वाटेल त्याची भक्ती - उपासना करीत राहा, सांगा की वस्तुतः तोट्यात तेच आहेत, जे स्वतःला आणि आपल्या कुटुंबियांना कयामतच्या दिवशी हानीग्रस्त करतील. लक्षात ठेवा, उघड स्वरूपाचा तोटा हाच आहे
لَهُم مِّن فَوْقِهِمْ ظُلَلٌ مِّنَ النَّارِ وَمِن تَحْتِهِمْ ظُلَلٌ ۚ ذَٰلِكَ يُخَوِّفُ اللَّهُ بِهِ عِبَادَهُ ۚ يَا عِبَادِ فَاتَّقُونِ (16)
१६. त्यांना वरून-खालून आगीच्या ज्वाला छतासारख्या झाकत असतील. हाच अज़ाब होय, ज्यापासून अल्लाह आपल्या दासांना भय दाखवित आहे. हे माझ्या दासांनो! माझे भय बाळगत राहा
وَالَّذِينَ اجْتَنَبُوا الطَّاغُوتَ أَن يَعْبُدُوهَا وَأَنَابُوا إِلَى اللَّهِ لَهُمُ الْبُشْرَىٰ ۚ فَبَشِّرْ عِبَادِ (17)
१७. आणि जे लोक अल्लाहखेरीज तागूत (इतरां) ची उपासना करण्यापासून अलिप्त राहिले आणि तन-मनपूर्वक अल्लाहकडे आकर्षित राहिले, ते शुभ-समाचाराचे हक्कदार आहेत. तेव्हा माझ्या दासांना खूशखबर ऐकवा
الَّذِينَ يَسْتَمِعُونَ الْقَوْلَ فَيَتَّبِعُونَ أَحْسَنَهُ ۚ أُولَٰئِكَ الَّذِينَ هَدَاهُمُ اللَّهُ ۖ وَأُولَٰئِكَ هُمْ أُولُو الْأَلْبَابِ (18)
१८. जे लोक कथनास कान लावून (लक्ष्यपूर्वक) ऐकतात, मग जी मोठी चांगली गोष्ट असेल, तिच्यानुसार आचरण करतात, हेच ते लोक होत, ज्यांना अल्लाहने मार्गदर्शन केले आहे आणि हेच लोक बुद्धिमानही आहेत
أَفَمَنْ حَقَّ عَلَيْهِ كَلِمَةُ الْعَذَابِ أَفَأَنتَ تُنقِذُ مَن فِي النَّارِ (19)
१९. बरे, ज्या माणसाला अज़ाब (शिक्षे) चे फर्मान लागू झाले आहे तर काय तुम्ही त्याला, जो जहन्नमध्ये आहे, सोडवू शकता
لَٰكِنِ الَّذِينَ اتَّقَوْا رَبَّهُمْ لَهُمْ غُرَفٌ مِّن فَوْقِهَا غُرَفٌ مَّبْنِيَّةٌ تَجْرِي مِن تَحْتِهَا الْأَنْهَارُ ۖ وَعْدَ اللَّهِ ۖ لَا يُخْلِفُ اللَّهُ الْمِيعَادَ (20)
२०. मात्र ते लोक, जे आपल्या पालनकर्त्याचे भय बाळगत राहिले, त्यांच्यासाठी उच्च घरे आहेत. ज्यांच्यावर देखील मजले बनले आहेत आणि त्यांच्या खाली जलप्रवाह (झरे) वाहत आहेत. हा अल्लाहचा वायदा आहे आणि तो वचन भंग करीत नाही
أَلَمْ تَرَ أَنَّ اللَّهَ أَنزَلَ مِنَ السَّمَاءِ مَاءً فَسَلَكَهُ يَنَابِيعَ فِي الْأَرْضِ ثُمَّ يُخْرِجُ بِهِ زَرْعًا مُّخْتَلِفًا أَلْوَانُهُ ثُمَّ يَهِيجُ فَتَرَاهُ مُصْفَرًّا ثُمَّ يَجْعَلُهُ حُطَامًا ۚ إِنَّ فِي ذَٰلِكَ لَذِكْرَىٰ لِأُولِي الْأَلْبَابِ (21)
२१. काय तुम्ही नाही पाहिले की अल्लाह आकाशातून पाणी अवतरित करतो आणि त्यास जमिनीच्या झऱ्यांमध्ये पोहचवितो, मग त्याच्याचद्वारे अनेक प्रकारची शेती उगवितो, मग ती (शेते) सुकतात आणि तुम्ही त्यांना पिवळ्या रंगात पाहतात, मग त्यांचा अगदी चुराडा करून टाकतो. यात बुद्धिमानांकरिता मोठा बोध आहे
أَفَمَن شَرَحَ اللَّهُ صَدْرَهُ لِلْإِسْلَامِ فَهُوَ عَلَىٰ نُورٍ مِّن رَّبِّهِ ۚ فَوَيْلٌ لِّلْقَاسِيَةِ قُلُوبُهُم مِّن ذِكْرِ اللَّهِ ۚ أُولَٰئِكَ فِي ضَلَالٍ مُّبِينٍ (22)
२२. काय तो मनुष्य ज्याची छाती (हृदय) अल्लाहने इस्लामकरिता खुली केलीी आहे, तर तो आपल्या पालनकर्त्यातर्फे एका नूर (प्रकाशा) वर आहे, आणि सर्वनाश आहे त्या लोकांकरिता, ज्यांची हृदये अल्लाहच्या स्मरणाने (प्रभावित होत नाही, किंबहुना) कठोर झाली आहेत. हे लोक पूर्णतः मार्गभ्रष्टतेत पडले आहेत
اللَّهُ نَزَّلَ أَحْسَنَ الْحَدِيثِ كِتَابًا مُّتَشَابِهًا مَّثَانِيَ تَقْشَعِرُّ مِنْهُ جُلُودُ الَّذِينَ يَخْشَوْنَ رَبَّهُمْ ثُمَّ تَلِينُ جُلُودُهُمْ وَقُلُوبُهُمْ إِلَىٰ ذِكْرِ اللَّهِ ۚ ذَٰلِكَ هُدَى اللَّهِ يَهْدِي بِهِ مَن يَشَاءُ ۚ وَمَن يُضْلِلِ اللَّهُ فَمَا لَهُ مِنْ هَادٍ (23)
२३. अल्लाहने सर्वांत उत्तम वाणी अवतरित केली आहे, जो असा ग्रंथ आहे की आपसात मिळताजुळता आणि वारंवार पुनरावृत्ती केलेल्या आयतींचा आहे, ज्याद्वारे त्या लोकांच्या शरीरांचा थरकाप होतो, जे आपल्या पालनकर्त्याचे भय राखतात. शेवटी त्यांची शरीरे आणि हृदये अल्लाहच्या नामःस्मरणाकडे (कोमल होऊन) झुकतात. हे आहे अल्लाहचे मार्गदर्शन. ज्याच्याद्वारे तो ज्याला इच्छितो सत्य-मार्गाला लावतो, आणि ज्याला अल्लाहच मार्गाचा विसर पाडील तर त्याला मार्ग दाखविणारा कोणी नाही
أَفَمَن يَتَّقِي بِوَجْهِهِ سُوءَ الْعَذَابِ يَوْمَ الْقِيَامَةِ ۚ وَقِيلَ لِلظَّالِمِينَ ذُوقُوا مَا كُنتُمْ تَكْسِبُونَ (24)
२४. बरे, जो मनुष्य कयामतच्या दिवसाच्या फार अधिक वाईट शिक्षा-यातनांची ढाल आपल्या चेहऱ्याला बनविल (तर अशा) अत्याचारी लोकांना सांगितले जाईल की आपल्या कृत कर्मांची गोडी चाखा
كَذَّبَ الَّذِينَ مِن قَبْلِهِمْ فَأَتَاهُمُ الْعَذَابُ مِنْ حَيْثُ لَا يَشْعُرُونَ (25)
२५. त्यांच्यापूर्वी होऊन गेलेल्या लोकांनीही खोटे ठरविले, मग त्यांच्यावर तेथून अज़ाब येऊन कोसळला, जेथून (येण्याचे) त्यांना अनुमानही नव्हते
فَأَذَاقَهُمُ اللَّهُ الْخِزْيَ فِي الْحَيَاةِ الدُّنْيَا ۖ وَلَعَذَابُ الْآخِرَةِ أَكْبَرُ ۚ لَوْ كَانُوا يَعْلَمُونَ (26)
२६. आणि अल्लाहने त्यांना या जगाच्या जीवनात अपमानाची गोडी चाखवली आणि अजून आखिरतचा अजाब तर मोठा सक्त आणि कठोर आहे. या लोकांनी हे समजून घेतले असते तर
وَلَقَدْ ضَرَبْنَا لِلنَّاسِ فِي هَٰذَا الْقُرْآنِ مِن كُلِّ مَثَلٍ لَّعَلَّهُمْ يَتَذَكَّرُونَ (27)
२७. निश्चितच आम्ही या कुरआनात लोकांकरिता प्रत्येक प्रकारचे उदाहरण सांगितले आहे. संभवतः त्यांनी बोध प्राप्त करून घ्यावा
قُرْآنًا عَرَبِيًّا غَيْرَ ذِي عِوَجٍ لَّعَلَّهُمْ يَتَّقُونَ (28)
२८. अरबी भाषेत कुरआन आहे, ज्यात कसलीही वक्रता नाही, संभवतः त्यांनी संयम (दुराचारापासून अलिप्तता) अंगिकारावा
ضَرَبَ اللَّهُ مَثَلًا رَّجُلًا فِيهِ شُرَكَاءُ مُتَشَاكِسُونَ وَرَجُلًا سَلَمًا لِّرَجُلٍ هَلْ يَسْتَوِيَانِ مَثَلًا ۚ الْحَمْدُ لِلَّهِ ۚ بَلْ أَكْثَرُهُمْ لَا يَعْلَمُونَ (29)
२९. अल्लाह एक उदाहरण निवेदन करीत आहे की एक असा मनुष्य, ज्यात अनेक आपसात भिन्नता राखणारे भागीदार आहेत आणि दुसरा तो मनुष्य, जो फक्त एकाचाच दास आहे. काय हे दोघे गुणवैशिष्ट्यात एकसमान आहेत?१ सर्व प्रशंसा अल्लाहकरिता आहे. वास्तविक, त्यांच्यापैकी अधिकांश लोक जाणत नाहीत
إِنَّكَ مَيِّتٌ وَإِنَّهُم مَّيِّتُونَ (30)
३०. निःसंशय, स्वतः तुम्हालाही मृत्यु येईल आणि हे सर्व देखील मरण पावणार आहेत.१
ثُمَّ إِنَّكُمْ يَوْمَ الْقِيَامَةِ عِندَ رَبِّكُمْ تَخْتَصِمُونَ (31)
३१. मग तुम्ही सर्वच्या सर्व कयामतच्या दिवशी आपल्या पालनकर्त्यासमोर तंटा-विवाद कराल
۞ فَمَنْ أَظْلَمُ مِمَّن كَذَبَ عَلَى اللَّهِ وَكَذَّبَ بِالصِّدْقِ إِذْ جَاءَهُ ۚ أَلَيْسَ فِي جَهَنَّمَ مَثْوًى لِّلْكَافِرِينَ (32)
३२. त्याहून जास्त अत्याचारी कोण आहे, जो अल्लाहच्या संबंधाने खोटे बोलेल आणि सत्य (धर्म) त्याच्याजवळ आला असता, तो त्यास खोटे असल्याचे सांगेल? काय अशा काफिरांचे ठिकाण जहन्नम नव्हे
وَالَّذِي جَاءَ بِالصِّدْقِ وَصَدَّقَ بِهِ ۙ أُولَٰئِكَ هُمُ الْمُتَّقُونَ (33)
३३. आणि जे लोक सत्य (धर्म) घेऊन आले, आणि ज्यांनी त्यास सत्य जाणले, हेच लोक अल्लाहचे भय बाळगणारे आहेत
لَهُم مَّا يَشَاءُونَ عِندَ رَبِّهِمْ ۚ ذَٰلِكَ جَزَاءُ الْمُحْسِنِينَ (34)
३४. त्यांच्यासाठी, त्याच्या पालनकर्त्याजवळ ती प्रत्येक गोष्ट आहे, जी ते इच्छितील नेक सदाचारी लोकांचा हाच मोबदला आहे
لِيُكَفِّرَ اللَّهُ عَنْهُمْ أَسْوَأَ الَّذِي عَمِلُوا وَيَجْزِيَهُمْ أَجْرَهُم بِأَحْسَنِ الَّذِي كَانُوا يَعْمَلُونَ (35)
३५. यासाठी की अल्लाहने त्यांच्यापासून त्यांच्या दुष्कर्मांना दूर करावे आणि जी सत्कर्मे त्यांनी केली आहेत, त्यांचा उत्तम मोबदला त्यांना प्रदान करावा
أَلَيْسَ اللَّهُ بِكَافٍ عَبْدَهُ ۖ وَيُخَوِّفُونَكَ بِالَّذِينَ مِن دُونِهِ ۚ وَمَن يُضْلِلِ اللَّهُ فَمَا لَهُ مِنْ هَادٍ (36)
३६. काय अल्लाह आपल्या दासांकरिता पर्याप्त नाही? हे लोक तुम्हाला अल्लाहखेरीज इतरांचे भय दाखवित आहेत, आणि ज्याला अल्लाह मार्गभ्रष्ट करील, त्याला मार्ग दाखविणारा कोणीही नाही
وَمَن يَهْدِ اللَّهُ فَمَا لَهُ مِن مُّضِلٍّ ۗ أَلَيْسَ اللَّهُ بِعَزِيزٍ ذِي انتِقَامٍ (37)
३७. आणि ज्याला अल्लाह मार्गदर्शन प्रदान करील, त्याला कोणी मार्गभ्रष्ट करणारा नाही. काय अल्लाह वर्चस्वशाली आणि प्रतिशोध घेणार नाही
وَلَئِن سَأَلْتَهُم مَّنْ خَلَقَ السَّمَاوَاتِ وَالْأَرْضَ لَيَقُولُنَّ اللَّهُ ۚ قُلْ أَفَرَأَيْتُم مَّا تَدْعُونَ مِن دُونِ اللَّهِ إِنْ أَرَادَنِيَ اللَّهُ بِضُرٍّ هَلْ هُنَّ كَاشِفَاتُ ضُرِّهِ أَوْ أَرَادَنِي بِرَحْمَةٍ هَلْ هُنَّ مُمْسِكَاتُ رَحْمَتِهِ ۚ قُلْ حَسْبِيَ اللَّهُ ۖ عَلَيْهِ يَتَوَكَّلُ الْمُتَوَكِّلُونَ (38)
३८. जर तुम्ही त्यांना विचाराल की आकाशांना व धरतीला कोणी निर्माण केले आहे, तर ते निश्चित हेच उत्तर देतील की अल्लाहने! तुम्ही त्यांना सांगा की, बरे हे तर सांगा की ज्यांना तुम्ही अल्लाहखेरीज पुकारता, जर अल्लाह मला नुकसान पोहोचवू इच्छिल, तर काय हे त्याच्या नुकसानाला हटवू शकतात किंवा जर अल्लाह माझ्यावर कृपा करू इच्छित असेल तर काय हे त्याच्या कृपेला अडवू शकतात? (तुम्ही) सांगा की अल्लाह (महान) मला पुरेसा आहे. भरवसा राखणारे त्याच्यावरच भरवसा राखतात
قُلْ يَا قَوْمِ اعْمَلُوا عَلَىٰ مَكَانَتِكُمْ إِنِّي عَامِلٌ ۖ فَسَوْفَ تَعْلَمُونَ (39)
३९. सांगा की, हे माझ्या जनसमुदाया (उम्मत) च्या लोकांनो! तुम्ही आपल्या जागी कर्म करीत राहा, मी आपल्या जागी कर्म करीत आहे.१ लवकरच तुम्ही (परिणाम) जाणून घ्याल
مَن يَأْتِيهِ عَذَابٌ يُخْزِيهِ وَيَحِلُّ عَلَيْهِ عَذَابٌ مُّقِيمٌ (40)
४०. की कोणावर अपमानित करणारा अज़ाब अवतरतो आणि कोणावर निरंतर (कायमस्वरुपी) अपमानित करणारा अज़ाब अवतरित होतो
إِنَّا أَنزَلْنَا عَلَيْكَ الْكِتَابَ لِلنَّاسِ بِالْحَقِّ ۖ فَمَنِ اهْتَدَىٰ فَلِنَفْسِهِ ۖ وَمَن ضَلَّ فَإِنَّمَا يَضِلُّ عَلَيْهَا ۖ وَمَا أَنتَ عَلَيْهِم بِوَكِيلٍ (41)
४१. निःसंशय, आम्ही तुमच्यावर सत्यासह हा ग्रंथ लोकांसाठी अवतरित केला आहे, तेव्हा जो मनुष्य सरळ मार्गावर येईल तर ते त्याच्या स्वतःच्या (फायद्या) करिता आहे आणि जो मार्गभ्रष्ट होईल तर त्याच्या मार्गभ्रष्टतेचे ओझे त्याच्याच (शिरा) वर आहे. तुम्ही त्यांच्याबाबत जबाबदार नाही
اللَّهُ يَتَوَفَّى الْأَنفُسَ حِينَ مَوْتِهَا وَالَّتِي لَمْ تَمُتْ فِي مَنَامِهَا ۖ فَيُمْسِكُ الَّتِي قَضَىٰ عَلَيْهَا الْمَوْتَ وَيُرْسِلُ الْأُخْرَىٰ إِلَىٰ أَجَلٍ مُّسَمًّى ۚ إِنَّ فِي ذَٰلِكَ لَآيَاتٍ لِّقَوْمٍ يَتَفَكَّرُونَ (42)
४२. अल्लाहच जीवांना (आत्म्यांना) त्यांच्या मृत्युसमयी आणि ज्यांचा मृत्यु आला नाही त्यांना त्यांच्या निद्रावस्थेत काबीज करून घेतो, मग ज्यांच्या मृत्युचा आदेश दिला गेला आहे, त्यांना तो रोखून घेतो आणि इतर (आत्म्यांना) एका निर्धारित वेळेपर्यर्ंत सोडून देतो. विचार चिंतन करणाऱ्यांसाठी यात निश्चितपणे अनेक निशाण्या आहेत
أَمِ اتَّخَذُوا مِن دُونِ اللَّهِ شُفَعَاءَ ۚ قُلْ أَوَلَوْ كَانُوا لَا يَمْلِكُونَ شَيْئًا وَلَا يَعْقِلُونَ (43)
४३. काय त्या लोकांनी अल्लाहखेरीज (दुसऱ्यांना) शिफारस करणारे निर्धारित करून ठेवले आहेत? (तुम्ही) सांगा की मग ते काहीच हक्क राखत नसले तरी आणि काही अक्कल राखत नसले तरीही
قُل لِّلَّهِ الشَّفَاعَةُ جَمِيعًا ۖ لَّهُ مُلْكُ السَّمَاوَاتِ وَالْأَرْضِ ۖ ثُمَّ إِلَيْهِ تُرْجَعُونَ (44)
४४. सांगा की सर्व शिफारसींचा मालक अल्लाहच आहे. सर्व आकाशांचे आणि धरतीचे राज्य त्याच्याचकरिता आहे, मग तुम्ही सर्व त्याच्याचकडे परतविले जाल
وَإِذَا ذُكِرَ اللَّهُ وَحْدَهُ اشْمَأَزَّتْ قُلُوبُ الَّذِينَ لَا يُؤْمِنُونَ بِالْآخِرَةِ ۖ وَإِذَا ذُكِرَ الَّذِينَ مِن دُونِهِ إِذَا هُمْ يَسْتَبْشِرُونَ (45)
४५. आणि जेव्हा एकमेव अल्लाहचे वर्णन केले जाते तेव्हा त्या लोकांची हृदये तिरस्कार करू लागतात, जे आखिरतवर ईमान राखत नाहीत, आणि जेव्हा त्याच्याखेरीज (इतरां) चे वर्णन केले जाते, तेव्हा त्यांची हृदये स्पष्टतः आनंदित होतात.१
قُلِ اللَّهُمَّ فَاطِرَ السَّمَاوَاتِ وَالْأَرْضِ عَالِمَ الْغَيْبِ وَالشَّهَادَةِ أَنتَ تَحْكُمُ بَيْنَ عِبَادِكَ فِي مَا كَانُوا فِيهِ يَخْتَلِفُونَ (46)
४६. (तुम्ही) सांगा की हे अल्लाह! आकाशांना आणि धरतीला निर्माण करणाऱ्या, लपलेल्या व उघड गोष्टी जाणणाऱ्या! तूच आपल्या दासांच्या दरम्यान त्या गोष्टींचा फैसला करशील, ज्या गोष्टींमध्ये ते मतभेद करीत होते
وَلَوْ أَنَّ لِلَّذِينَ ظَلَمُوا مَا فِي الْأَرْضِ جَمِيعًا وَمِثْلَهُ مَعَهُ لَافْتَدَوْا بِهِ مِن سُوءِ الْعَذَابِ يَوْمَ الْقِيَامَةِ ۚ وَبَدَا لَهُم مِّنَ اللَّهِ مَا لَمْ يَكُونُوا يَحْتَسِبُونَ (47)
४७. आणि अत्याचारी लोकांजवळ जर ते सर्व काही असावे जे धरतीवर आहे, आणि त्यासोबत आणखी तेवढेच असावे तरी देखील कठोर शिक्षा यातनेच्या मोबदल्यात कयामतच्या दिवशी हे सर्व काही देऊन टाकतील, आणि त्यांच्यासमोर अल्लाहतर्फे असे जाहीर होईल ज्याचे त्यांनी अनुमानही केले नव्हते
وَبَدَا لَهُمْ سَيِّئَاتُ مَا كَسَبُوا وَحَاقَ بِهِم مَّا كَانُوا بِهِ يَسْتَهْزِئُونَ (48)
४८. आणि जे काही (कर्म) त्यांनी केले होते, त्याची दुष्परिणती त्यांच्यावर उघड होईल आणि ज्या गोष्टीची ते थट्टा उडवित होते, ती त्यांना येऊन घेरील
فَإِذَا مَسَّ الْإِنسَانَ ضُرٌّ دَعَانَا ثُمَّ إِذَا خَوَّلْنَاهُ نِعْمَةً مِّنَّا قَالَ إِنَّمَا أُوتِيتُهُ عَلَىٰ عِلْمٍ ۚ بَلْ هِيَ فِتْنَةٌ وَلَٰكِنَّ أَكْثَرَهُمْ لَا يَعْلَمُونَ (49)
४९. माणसाला जेव्हा एखादे दुःख यातना पोहोचते तेव्हा तो आम्हाला पुकारतो, मग जेव्हा आम्ही त्याला आपल्यातर्फे एखादे सुखप्रदान करतो, तेव्हा म्हणू लागतो की हे तर मला केवळ आपल्या अक्कल हुशारीमुळे प्रदान केले गेले आहे, किंबहुना ही कसोटी आहे, परंतु त्यांच्यापैकी बहुतेक लोक हे जाणत नाहीत
قَدْ قَالَهَا الَّذِينَ مِن قَبْلِهِمْ فَمَا أَغْنَىٰ عَنْهُم مَّا كَانُوا يَكْسِبُونَ (50)
५०. यांच्या पूर्वीचे लोक देखील हीच गोष्ट बोलले आहेत, तेव्हा त्यांची कृत कर्मे त्यांच्या काहीच उपयोगी पडली नाहीत
فَأَصَابَهُمْ سَيِّئَاتُ مَا كَسَبُوا ۚ وَالَّذِينَ ظَلَمُوا مِنْ هَٰؤُلَاءِ سَيُصِيبُهُمْ سَيِّئَاتُ مَا كَسَبُوا وَمَا هُم بِمُعْجِزِينَ (51)
५१. मग त्यांच्या (कर्मांची) समस्त दुष्परिणती त्यांच्यावर येऊन कोसळली आणि यांच्यापैकी जे दुराचारी आहेत, त्यांच्या कृत-कर्मांची दुष्परिणतीही आता त्यांच्यावर येऊन कोसळेल. हे (आम्हाला) परास्त करणारे नाहीत
أَوَلَمْ يَعْلَمُوا أَنَّ اللَّهَ يَبْسُطُ الرِّزْقَ لِمَن يَشَاءُ وَيَقْدِرُ ۚ إِنَّ فِي ذَٰلِكَ لَآيَاتٍ لِّقَوْمٍ يُؤْمِنُونَ (52)
५२. काय त्यांना हे नाही माहीत की अल्लाह ज्याच्यासाठी इच्छितो आजिविका वाढवितो आणि ज्याच्यासाठी इच्छितो मोजून मापून देतो, ईमान राखणाऱ्यांकरिता यात मोठमोठ्या निशाण्या आहेत
۞ قُلْ يَا عِبَادِيَ الَّذِينَ أَسْرَفُوا عَلَىٰ أَنفُسِهِمْ لَا تَقْنَطُوا مِن رَّحْمَةِ اللَّهِ ۚ إِنَّ اللَّهَ يَغْفِرُ الذُّنُوبَ جَمِيعًا ۚ إِنَّهُ هُوَ الْغَفُورُ الرَّحِيمُ (53)
५३. (माझ्यातर्फे) सांगा की, हे माझ्या दासांनो! ज्यांनी आपल्या प्राणांवर अत्याचार केला आहे, तुम्ही अल्लाहच्या कृपेपासून निराश होऊ नका. निःसंशय, अल्लाह समस्त अपराधांना माफ करतो. वस्तुतः तो मोठा माफ करणारा, मोठा दया करणारा आहे
وَأَنِيبُوا إِلَىٰ رَبِّكُمْ وَأَسْلِمُوا لَهُ مِن قَبْلِ أَن يَأْتِيَكُمُ الْعَذَابُ ثُمَّ لَا تُنصَرُونَ (54)
५४. आणि तुम्ही सर्व आपल्या पालनकर्त्याकडे झुका आणि त्याचे आज्ञापालन करीत राहा, यापूर्वी की तुमच्याजवळ अज़ाब येऊन पोहचावा, मग तुमची मदत न केली जावी
وَاتَّبِعُوا أَحْسَنَ مَا أُنزِلَ إِلَيْكُم مِّن رَّبِّكُم مِّن قَبْلِ أَن يَأْتِيَكُمُ الْعَذَابُ بَغْتَةً وَأَنتُمْ لَا تَشْعُرُونَ (55)
५५. आणि अनुसरण करा त्या सर्वांत उत्तम गोष्टीचे, जी तुमच्याकडे तुमच्या पालनकर्त्यातर्फे अवतरित केली गेली आहे, यापूर्वी की तुमच्यावर अचानक अल्लाहची शिक्षा यातना यावी आणि तुम्हाला खबरही न व्हावी
أَن تَقُولَ نَفْسٌ يَا حَسْرَتَا عَلَىٰ مَا فَرَّطتُ فِي جَنبِ اللَّهِ وَإِن كُنتُ لَمِنَ السَّاخِرِينَ (56)
५६. (असे न व्हावे की) एखाद्या माणसाने म्हणावे की, अरेरे! खेद आहे या गोष्टीवर की मी अल्लाहच्या बाबतीत सुस्ती केली, किंबहुना मी थट्टा उडविणाऱ्यांमध्येच राहिलो
أَوْ تَقُولَ لَوْ أَنَّ اللَّهَ هَدَانِي لَكُنتُ مِنَ الْمُتَّقِينَ (57)
५७. किंवा म्हणावे की जर अल्लाहने मला मार्ग दाखविला असता तर मी देखील अल्लाहचे भय राखणाऱ्यांपैकी राहिलो असतो
أَوْ تَقُولَ حِينَ تَرَى الْعَذَابَ لَوْ أَنَّ لِي كَرَّةً فَأَكُونَ مِنَ الْمُحْسِنِينَ (58)
५८. किंवा शिक्षा यातनांना पाहून म्हणू लागावे, कशाही प्रकारे माझे परत जाणे झाले असते तर मी देखील नेक सदाचारी लोकांपैकी राहिलो असतो
بَلَىٰ قَدْ جَاءَتْكَ آيَاتِي فَكَذَّبْتَ بِهَا وَاسْتَكْبَرْتَ وَكُنتَ مِنَ الْكَافِرِينَ (59)
५९. का नाही? निश्चितच तुमच्याजवळ माझ्या आयती पोहचल्या होत्या ज्यांना तू खोटे ठरविले आणि घमेंड (व गर्व) केला आणि तू काफिर (सत्यविरोधक) लोकांपैकीच होतास
وَيَوْمَ الْقِيَامَةِ تَرَى الَّذِينَ كَذَبُوا عَلَى اللَّهِ وُجُوهُهُم مُّسْوَدَّةٌ ۚ أَلَيْسَ فِي جَهَنَّمَ مَثْوًى لِّلْمُتَكَبِّرِينَ (60)
६०. आणि ज्या लोकांनी अल्लाहविषयी असत्य रचले आहे, तर तुम्ही पाहाल की कयामतच्या दिवशी त्यांचे चेहरे काळे झाले असतील. काय घमेंड करणाऱ्यांचे ठिकाण जहन्नममध्ये नाही
وَيُنَجِّي اللَّهُ الَّذِينَ اتَّقَوْا بِمَفَازَتِهِمْ لَا يَمَسُّهُمُ السُّوءُ وَلَا هُمْ يَحْزَنُونَ (61)
६१. आणि ज्या लोकांनी अल्लाहचे भय (तकवा) बाळगले, त्यांना अल्लाह त्यांच्या सफलतेसह वाचविल, त्यांना एखादे दुःख स्पर्शही करू शकणार नाही आणि ना ते कशाही प्रकारे दुःखी होतील
اللَّهُ خَالِقُ كُلِّ شَيْءٍ ۖ وَهُوَ عَلَىٰ كُلِّ شَيْءٍ وَكِيلٌ (62)
६२. अल्लाह समस्त वस्तूंचा निर्माणकर्ता आहे, आणि तोच प्रत्येक वस्तूचा संरक्षक आहे
لَّهُ مَقَالِيدُ السَّمَاوَاتِ وَالْأَرْضِ ۗ وَالَّذِينَ كَفَرُوا بِآيَاتِ اللَّهِ أُولَٰئِكَ هُمُ الْخَاسِرُونَ (63)
६३. आकाशांच्या आणि धरतीच्या चाव्यांचा मालक तोच आहेे ज्या ज्या लोकांनी अल्लाहच्या आयतींचा इन्कार केला आहे, तेच नुकसान भोगणारे आहेत
قُلْ أَفَغَيْرَ اللَّهِ تَأْمُرُونِّي أَعْبُدُ أَيُّهَا الْجَاهِلُونَ (64)
६४. (तुम्ही) सांगा की हे मूर्खांनो! काय तुम्ही मला, अल्लाहखेरीज इतरांची उपासना करण्यास सांगता
وَلَقَدْ أُوحِيَ إِلَيْكَ وَإِلَى الَّذِينَ مِن قَبْلِكَ لَئِنْ أَشْرَكْتَ لَيَحْبَطَنَّ عَمَلُكَ وَلَتَكُونَنَّ مِنَ الْخَاسِرِينَ (65)
६५. आणि निःसंशय, तुमच्याकडेही आणि तुमच्यापूर्वीच्या (सर्व पैगंबरां) कडेही वहयी केली गेली आहे की जर तुम्ही शिर्क (अल्लाहखेरीज दुसऱ्यांची भक्ती उपासना) केल्यास, निश्चितच तुमचे सर्व कर्म वाया जाईल आणि खात्रीने तुम्ही नुकसान उचलणाऱ्यांपैकी व्हाल
بَلِ اللَّهَ فَاعْبُدْ وَكُن مِّنَ الشَّاكِرِينَ (66)
६६. किंबहुना तुम्ही अल्लाहचीच उपासना करा आणि कृतज्ञता व्यक्त करणाऱ्यांपैकी व्हा
وَمَا قَدَرُوا اللَّهَ حَقَّ قَدْرِهِ وَالْأَرْضُ جَمِيعًا قَبْضَتُهُ يَوْمَ الْقِيَامَةِ وَالسَّمَاوَاتُ مَطْوِيَّاتٌ بِيَمِينِهِ ۚ سُبْحَانَهُ وَتَعَالَىٰ عَمَّا يُشْرِكُونَ (67)
६७. आणि त्या लोकांनी, अल्लाहचा जसा सन्मान करायला पाहिजे होता तसा केला नाही. समस्त धरती, कयामतच्या दिवशी त्याच्या मुठीत असेल आणि संपूर्ण आकाश त्याच्या उजव्या हातात गुंडाळलेले असेल तो मोठा पवित्र आणि अति उच्च आहे, त्या प्रत्येक वस्तू (व गोष्टी) पासून जिला लोक त्याचा सहभागी ठरवितात
وَنُفِخَ فِي الصُّورِ فَصَعِقَ مَن فِي السَّمَاوَاتِ وَمَن فِي الْأَرْضِ إِلَّا مَن شَاءَ اللَّهُ ۖ ثُمَّ نُفِخَ فِيهِ أُخْرَىٰ فَإِذَا هُمْ قِيَامٌ يَنظُرُونَ (68)
६८. आणि सूर (कयामतचा आरंभ दर्शविणारा शंख) फुंकला जाईल, तेव्हा आकाशांमध्ये आणि धरतीत अस्तित्वात असणारे सर्व बेशुद्ध होऊन कोसळतील तथापि ज्याला अल्लाह इच्छिल (तो सलामत राहील), मग दुसऱ्यांदा सूर फुंकला जाईल तेव्हा ते अचानक उभे राहून पाहू लागतील
وَأَشْرَقَتِ الْأَرْضُ بِنُورِ رَبِّهَا وَوُضِعَ الْكِتَابُ وَجِيءَ بِالنَّبِيِّينَ وَالشُّهَدَاءِ وَقُضِيَ بَيْنَهُم بِالْحَقِّ وَهُمْ لَا يُظْلَمُونَ (69)
६९. आणि धरती आपल्या पालनकर्त्याच्या दिव्य तेजाने लख्ख चकाकेल. कर्म-लेख सादर केले जातील. पैगंबरांना आणि साक्षींना आणले जाईल आणि लोकांच्या दरम्यान न्यायपूर्वक फैसले केले जातील आणि त्यांच्यावर अत्याचार केला जाणार नाही
وَوُفِّيَتْ كُلُّ نَفْسٍ مَّا عَمِلَتْ وَهُوَ أَعْلَمُ بِمَا يَفْعَلُونَ (70)
७०. आणि ज्या माणसाने जे काही केले आहे ते त्याला पूर्णपणे दिले जाईल आणि लोक जे काही करीत आहेत ते तो चांगल्या प्रकारे जाणतो
وَسِيقَ الَّذِينَ كَفَرُوا إِلَىٰ جَهَنَّمَ زُمَرًا ۖ حَتَّىٰ إِذَا جَاءُوهَا فُتِحَتْ أَبْوَابُهَا وَقَالَ لَهُمْ خَزَنَتُهَا أَلَمْ يَأْتِكُمْ رُسُلٌ مِّنكُمْ يَتْلُونَ عَلَيْكُمْ آيَاتِ رَبِّكُمْ وَيُنذِرُونَكُمْ لِقَاءَ يَوْمِكُمْ هَٰذَا ۚ قَالُوا بَلَىٰ وَلَٰكِنْ حَقَّتْ كَلِمَةُ الْعَذَابِ عَلَى الْكَافِرِينَ (71)
७१. आणि काफिरांचे झुंडच्या झुंड जहन्नमकडे हाकत नेले जातील जेव्हा ते तिच्याजवळ पोहचतील, तिचे दरवाजे त्यांच्यासाठी उघडले जातील आणि तिथले रक्षक त्यांना विचारतील की काय तुमच्या जवळ तुमच्याचमधून रसूल (संदेशवाहक) आले नव्हते? जे तुम्हाला तुमच्या पालनकर्त्यांच्या आयती वाचून ऐकवित होते आणि तुम्हाला या दिवसाच्या भेटीबाबत सावध करीत होते. हे उत्तर देतील की होय! का नाही? परंतु अज़ाब (शिक्षा यातने) चे फर्मान काफिरांना (शेवटी) लागू झाले
قِيلَ ادْخُلُوا أَبْوَابَ جَهَنَّمَ خَالِدِينَ فِيهَا ۖ فَبِئْسَ مَثْوَى الْمُتَكَبِّرِينَ (72)
७२. फर्माविले जाईल, आता जहन्नमच्या दरवाज्यांमध्ये दाखल व्हा जिथे ते नेहमी राहतील, तेव्हा अवज्ञाकारी लोकांचे ठिकाण मोठे वाईट आहे
وَسِيقَ الَّذِينَ اتَّقَوْا رَبَّهُمْ إِلَى الْجَنَّةِ زُمَرًا ۖ حَتَّىٰ إِذَا جَاءُوهَا وَفُتِحَتْ أَبْوَابُهَا وَقَالَ لَهُمْ خَزَنَتُهَا سَلَامٌ عَلَيْكُمْ طِبْتُمْ فَادْخُلُوهَا خَالِدِينَ (73)
७३. आणि जे लोक आपल्या पालनकर्त्याचे भय राखत होते, त्यांचे समूहच्या समूह जन्नतकडे पाठविले जातील, येथेपर्यर्ंत की जेव्हा ते जन्नतजवळ पोहोचतील आणि दरवाजे उघडले जातील,१ आणि तिथले रक्षक त्यांना म्हणतील की तुमच्यावर सलाम असो, तुम्ही खूश राहा. तर तुम्ही यांच्यात सदैवकाळाकरिता या
وَقَالُوا الْحَمْدُ لِلَّهِ الَّذِي صَدَقَنَا وَعْدَهُ وَأَوْرَثَنَا الْأَرْضَ نَتَبَوَّأُ مِنَ الْجَنَّةِ حَيْثُ نَشَاءُ ۖ فَنِعْمَ أَجْرُ الْعَامِلِينَ (74)
७४. आणि हे म्हणतील की, आभारी आहोत अल्लाहचे, ज्याने आपला वायदा पूर्ण केला, आणि आम्हाला या धरतीचा वारस बनविले की जन्नतमध्ये वाटेल तिथे राहावे. तेव्हा सत्कर्म करणाऱ्यांचा किती चांगला मोबदला आहे
وَتَرَى الْمَلَائِكَةَ حَافِّينَ مِنْ حَوْلِ الْعَرْشِ يُسَبِّحُونَ بِحَمْدِ رَبِّهِمْ ۖ وَقُضِيَ بَيْنَهُم بِالْحَقِّ وَقِيلَ الْحَمْدُ لِلَّهِ رَبِّ الْعَالَمِينَ (75)
७५. आणि तुम्ही फरिश्त्यांना अल्लाहच्या अर्श (सिंहासना) भोवती घेरा बनवित, आपल्या पालनकर्त्याची प्रशंसा आणि पावित्र्याचे गुणगान करताना पाहाल, १ आणि त्यांच्या दरम्यान न्यायपूर्ण फैसला केला जाईल, आणि सांगितले जाईल की समस्त प्रशंसा अल्लाहकरिताच आहे, जो समस्त विश्वाचा स्वामी व पालनकर्ता आहे
❮ Previous Next ❯

Surahs from Quran :

1- Fatiha2- Baqarah
3- Al Imran4- Nisa
5- Maidah6- Anam
7- Araf8- Anfal
9- Tawbah10- Yunus
11- Hud12- Yusuf
13- Raad14- Ibrahim
15- Hijr16- Nahl
17- Al Isra18- Kahf
19- Maryam20- TaHa
21- Anbiya22- Hajj
23- Muminun24- An Nur
25- Furqan26- Shuara
27- Naml28- Qasas
29- Ankabut30- Rum
31- Luqman32- Sajdah
33- Ahzab34- Saba
35- Fatir36- Yasin
37- Assaaffat38- Sad
39- Zumar40- Ghafir
41- Fussilat42- shura
43- Zukhruf44- Ad Dukhaan
45- Jathiyah46- Ahqaf
47- Muhammad48- Al Fath
49- Hujurat50- Qaf
51- zariyat52- Tur
53- Najm54- Al Qamar
55- Rahman56- Waqiah
57- Hadid58- Mujadilah
59- Al Hashr60- Mumtahina
61- Saff62- Jumuah
63- Munafiqun64- Taghabun
65- Talaq66- Tahrim
67- Mulk68- Qalam
69- Al-Haqqah70- Maarij
71- Nuh72- Jinn
73- Muzammil74- Muddathir
75- Qiyamah76- Insan
77- Mursalat78- An Naba
79- Naziat80- Abasa
81- Takwir82- Infitar
83- Mutaffifin84- Inshiqaq
85- Buruj86- Tariq
87- Al Ala88- Ghashiya
89- Fajr90- Al Balad
91- Shams92- Lail
93- Duha94- Sharh
95- Tin96- Al Alaq
97- Qadr98- Bayyinah
99- Zalzalah100- Adiyat
101- Qariah102- Takathur
103- Al Asr104- Humazah
105- Al Fil106- Quraysh
107- Maun108- Kawthar
109- Kafirun110- Nasr
111- Masad112- Ikhlas
113- Falaq114- An Nas