×

Surah An-Naml in Marathi

Quran Marathi ⮕ Surah Naml

Translation of the Meanings of Surah Naml in Marathi - الماراثية

The Quran in Marathi - Surah Naml translated into Marathi, Surah An-Naml in Marathi. We provide accurate translation of Surah Naml in Marathi - الماراثية, Verses 93 - Surah Number 27 - Page 377.

بسم الله الرحمن الرحيم

طس ۚ تِلْكَ آيَاتُ الْقُرْآنِ وَكِتَابٍ مُّبِينٍ (1)
१. ता - सीन या आयती आहेत कुरआनच्या (अर्थात स्पष्ट) आणि दिव्य ग्रंथाच्या
هُدًى وَبُشْرَىٰ لِلْمُؤْمِنِينَ (2)
२. मार्गदर्शन आणि खूशखबर, ईमान राखणाऱ्यांकरिता
الَّذِينَ يُقِيمُونَ الصَّلَاةَ وَيُؤْتُونَ الزَّكَاةَ وَهُم بِالْآخِرَةِ هُمْ يُوقِنُونَ (3)
३. जे नमाज कायम करतात आणि जकात अदा करतात आणि आखिरतवर ईमान राखतात
إِنَّ الَّذِينَ لَا يُؤْمِنُونَ بِالْآخِرَةِ زَيَّنَّا لَهُمْ أَعْمَالَهُمْ فَهُمْ يَعْمَهُونَ (4)
४. जे लोक कयामतवर ईमान राखत नाही, आम्ही त्यांच्यासाठी त्यांची कर्मे सुशोभित करून दाखविली आहेत, यास्तव ते भटकत फिरतात
أُولَٰئِكَ الَّذِينَ لَهُمْ سُوءُ الْعَذَابِ وَهُمْ فِي الْآخِرَةِ هُمُ الْأَخْسَرُونَ (5)
५. हेच ते लोक होत, ज्यांच्यासाठी मोठी वाईट शिक्षा- यातना आहे, आणि आखिरतमध्येही ते मोठे नुकसान उचलणारे आहेत
وَإِنَّكَ لَتُلَقَّى الْقُرْآنَ مِن لَّدُنْ حَكِيمٍ عَلِيمٍ (6)
६. आणि निःसंशय तुम्हाला कुरआन शिकविला जात आहे, हिकमतशाली आणि सर्वकाही जाणणाऱ्या अल्लाहतर्फे
إِذْ قَالَ مُوسَىٰ لِأَهْلِهِ إِنِّي آنَسْتُ نَارًا سَآتِيكُم مِّنْهَا بِخَبَرٍ أَوْ آتِيكُم بِشِهَابٍ قَبَسٍ لَّعَلَّكُمْ تَصْطَلُونَ (7)
७. जेव्हा मूसा आपल्या कुटुंबियांना म्हणाले, मी आग पाहिली आहे. मी तेथून एक तर काही बातमी घेऊन येईन किंवा आगीचा एखादा धगधगता विस्तव घेऊन लगेच तुमच्याजवळ येईन, यासाठी की तुम्ही शेकून घ्यावे
فَلَمَّا جَاءَهَا نُودِيَ أَن بُورِكَ مَن فِي النَّارِ وَمَنْ حَوْلَهَا وَسُبْحَانَ اللَّهِ رَبِّ الْعَالَمِينَ (8)
८. जेव्हा तिथे पोहोचले तेव्हा त्यांना हाक दिली गेली की शुभ आहे तो, जो त्या आगीत आहे आणि शुभ आहे तो जो तिच्याजवळ पास आहे आणि मोठा पवित्र आहे अल्लाह, सर्व विश्वांचा स्वामी व पालनकर्ता
يَا مُوسَىٰ إِنَّهُ أَنَا اللَّهُ الْعَزِيزُ الْحَكِيمُ (9)
९. मूसा (ऐका) खरी गोष्ट ही की मीच अल्लाह आहे जबरदस्त आणि हिकमत (बुद्धीकौशल्य) बाळगणारा
وَأَلْقِ عَصَاكَ ۚ فَلَمَّا رَآهَا تَهْتَزُّ كَأَنَّهَا جَانٌّ وَلَّىٰ مُدْبِرًا وَلَمْ يُعَقِّبْ ۚ يَا مُوسَىٰ لَا تَخَفْ إِنِّي لَا يَخَافُ لَدَيَّ الْمُرْسَلُونَ (10)
१०. आणि तुम्ही आपली काठी खाली टाका. (हजरत मूसा यांनी) जेव्हा तिला हालचाल करताना पाहिले अशा प्रकारे की जणू साप आहे, तेव्हा तोंड फिरवून पाठ वळवून पळाले आणि मागे वळूनही पाहिले नाही. हे मूसा! भिऊ नका. माझ्यासमोर पैगंबर भित नसतात
إِلَّا مَن ظَلَمَ ثُمَّ بَدَّلَ حُسْنًا بَعْدَ سُوءٍ فَإِنِّي غَفُورٌ رَّحِيمٌ (11)
११. परंतु जे लोक अत्याचार करतील, मग त्यास नेकी (सत्कर्मा) ने बदलतील त्या दुराचारानंतर तर मी देखील माफ करणारा, दया करणारा आहे
وَأَدْخِلْ يَدَكَ فِي جَيْبِكَ تَخْرُجْ بَيْضَاءَ مِنْ غَيْرِ سُوءٍ ۖ فِي تِسْعِ آيَاتٍ إِلَىٰ فِرْعَوْنَ وَقَوْمِهِ ۚ إِنَّهُمْ كَانُوا قَوْمًا فَاسِقِينَ (12)
१२. आणि आपला हात आपल्या गळपट्टीत टाका तो शुभ्र (आणि तेजस्वी) होऊन निघेल, कसल्याही व्याधीविना. (तुम्ही) नऊ निशाण्या घेऊन फिरऔन आणि त्याच्या अनुयायींजवळ (जा) निःसंशय तो दुराचारी लोकांचा समूह आहे
فَلَمَّا جَاءَتْهُمْ آيَاتُنَا مُبْصِرَةً قَالُوا هَٰذَا سِحْرٌ مُّبِينٌ (13)
१३. यास्तव, जेव्हा त्यांच्याजवळ डोळे उघडविणारे आमचे चमत्कार (मोजिजे) पोहोचले, तेव्हा ते म्हणू लागले की ही तर उघड जादू आहे
وَجَحَدُوا بِهَا وَاسْتَيْقَنَتْهَا أَنفُسُهُمْ ظُلْمًا وَعُلُوًّا ۚ فَانظُرْ كَيْفَ كَانَ عَاقِبَةُ الْمُفْسِدِينَ (14)
१४. आणि त्यांनी इन्कार केला, वास्तिवक त्यांच्या मनात विश्वास बसला होता केवळ अत्याचार व घमेंडीमुळे (त्यांनी इन्कार केला) तर पाहा, त्या दुराचारी लोकांचा काय शेवट झाला
وَلَقَدْ آتَيْنَا دَاوُودَ وَسُلَيْمَانَ عِلْمًا ۖ وَقَالَا الْحَمْدُ لِلَّهِ الَّذِي فَضَّلَنَا عَلَىٰ كَثِيرٍ مِّنْ عِبَادِهِ الْمُؤْمِنِينَ (15)
१५. आणि निःसंशय, आम्ही दाऊद आणि सुलेमानला ज्ञान प्रदान केले होते आणि दोघे म्हणाले, सर्व प्रशंसा त्या अल्लाहकरिता आहे, ज्याने आम्हाला आपल्या अनेक ईमानधारक दासांवर श्रेष्ठत्व प्रदान केले आहे
وَوَرِثَ سُلَيْمَانُ دَاوُودَ ۖ وَقَالَ يَا أَيُّهَا النَّاسُ عُلِّمْنَا مَنطِقَ الطَّيْرِ وَأُوتِينَا مِن كُلِّ شَيْءٍ ۖ إِنَّ هَٰذَا لَهُوَ الْفَضْلُ الْمُبِينُ (16)
१६. आणि दाऊदचे वारस सुलेमान झाले आणि म्हणाले, लोकांनो! आम्हाला पक्ष्यांची बोली (भाषा) शिकिवली गेली आहे. आणि आम्हाला सर्व काही दिले गेले आहेे. निःसंशय हा (अल्लाहचा) मोठा उघड उपकार आहे
وَحُشِرَ لِسُلَيْمَانَ جُنُودُهُ مِنَ الْجِنِّ وَالْإِنسِ وَالطَّيْرِ فَهُمْ يُوزَعُونَ (17)
१७. आणि सुलेमानच्या समोर त्यांचे सर्व सैन्य जिन्न आणि मनुष्य आणि पक्षी जमा केले गेले (प्रत्येक प्रकाराला) वेगवेगळे उभे केले गेले
حَتَّىٰ إِذَا أَتَوْا عَلَىٰ وَادِ النَّمْلِ قَالَتْ نَمْلَةٌ يَا أَيُّهَا النَّمْلُ ادْخُلُوا مَسَاكِنَكُمْ لَا يَحْطِمَنَّكُمْ سُلَيْمَانُ وَجُنُودُهُ وَهُمْ لَا يَشْعُرُونَ (18)
१८. जेव्हा ते मुंग्यांच्या मैदानात पोहोचले, तेव्हा एक मुंगी म्हणाली, हे मुंग्यानो! आपापल्या बिळात पटकन घुसा (असे न व्हावे की) असावधानीमुळे सुलेमान आणि त्यांच्या सैन्याने तुम्हाला पायाखाली तुडवावे
فَتَبَسَّمَ ضَاحِكًا مِّن قَوْلِهَا وَقَالَ رَبِّ أَوْزِعْنِي أَنْ أَشْكُرَ نِعْمَتَكَ الَّتِي أَنْعَمْتَ عَلَيَّ وَعَلَىٰ وَالِدَيَّ وَأَنْ أَعْمَلَ صَالِحًا تَرْضَاهُ وَأَدْخِلْنِي بِرَحْمَتِكَ فِي عِبَادِكَ الصَّالِحِينَ (19)
१९. तिच्या या बोलण्यावर (हजरत सुलेमान) यांनी स्मितहास्य केले आणि दुआ (प्रार्थना) करू लागले की हे माझ्या पालनकर्त्या! तू मला तौफिक (सुबुद्धी) प्रदान कर की मी तुझ्या या देणग्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त करावी, ज्या तू माझ्यावर केल्या आहेत आणि माझ्या माता-पित्यांवर आणि मी अशी सत्कर्मे करीत राहावे, ज्यामुळे तू प्रसन्न राहावे आणि मला आपल्या दया- कृपेने आपल्या नेक- सदाचारी दासांमध्ये सामील कर
وَتَفَقَّدَ الطَّيْرَ فَقَالَ مَا لِيَ لَا أَرَى الْهُدْهُدَ أَمْ كَانَ مِنَ الْغَائِبِينَ (20)
२०. आणि त्यांनी पक्ष्यांचे निरीक्षण केले व म्हणाले, काय गोष्ट आहे की मला हुद हुद दिसून येत नाही? काय खरोखर तो हजर नाही
لَأُعَذِّبَنَّهُ عَذَابًا شَدِيدًا أَوْ لَأَذْبَحَنَّهُ أَوْ لَيَأْتِيَنِّي بِسُلْطَانٍ مُّبِينٍ (21)
२१. निःसंशय मी त्याला कठोर दंड देईन किंवा त्याला कापून टाकीन किंवा त्याने माझ्यासमोर योग्य कारण सादर करावे
فَمَكَثَ غَيْرَ بَعِيدٍ فَقَالَ أَحَطتُ بِمَا لَمْ تُحِطْ بِهِ وَجِئْتُكَ مِن سَبَإٍ بِنَبَإٍ يَقِينٍ (22)
२२. काही जास्त वेळ झाला नव्हता, तेवढ्यात तो (येऊन) म्हणाला, मी अशा गोष्टीची खबर आणली आहे की ज्याविषयी तुम्ही जाणतच नाही. मी ‘सबा’ची अगदी विश्वसनीय बातमी घेऊन तुमच्याजवळ आलो आहे
إِنِّي وَجَدتُّ امْرَأَةً تَمْلِكُهُمْ وَأُوتِيَتْ مِن كُلِّ شَيْءٍ وَلَهَا عَرْشٌ عَظِيمٌ (23)
२३. मी पाहिले की एक स्त्री त्यांच्यावर राज्य करीत आहे, जिला सर्व प्रकारच्या वस्तूंपैकी काही न काही प्रदान केले गेले आहे आणि तिचे सिंहासन देखील मोठे भव्य आहे
وَجَدتُّهَا وَقَوْمَهَا يَسْجُدُونَ لِلشَّمْسِ مِن دُونِ اللَّهِ وَزَيَّنَ لَهُمُ الشَّيْطَانُ أَعْمَالَهُمْ فَصَدَّهُمْ عَنِ السَّبِيلِ فَهُمْ لَا يَهْتَدُونَ (24)
२४. मी तिला आणि तिच्या जनसमूहाच्या लोकांना अल्लाहऐवजी सूर्याला सजदा करताना पाहिले. सैतानाने त्याची कर्मे त्यांना भले चांगले असल्याचे दाखवून सत्य मार्गापासून त्यांना रोखले आहे, यास्तव त्यांना सन्मार्ग प्राप्त होत नाही
أَلَّا يَسْجُدُوا لِلَّهِ الَّذِي يُخْرِجُ الْخَبْءَ فِي السَّمَاوَاتِ وَالْأَرْضِ وَيَعْلَمُ مَا تُخْفُونَ وَمَا تُعْلِنُونَ (25)
२५. की केवळ त्याच अल्लाहला सजदा करावा, जो आकाशांच्या आणि धरतीच्या लपलेल्या वस्तूंना बाहेर काढतो, आणि जे काही तुम्ही लपवून ठेवता आणि जाहीर करता तो ते सर्व काही जाणतो
اللَّهُ لَا إِلَٰهَ إِلَّا هُوَ رَبُّ الْعَرْشِ الْعَظِيمِ ۩ (26)
२६. (अर्थात) अल्लाह! त्याच्याखेरीज कोणीही उपासनीय नाही. तोच महान अर्श (ईश-सिंहासनां) चा स्वामी आहे
۞ قَالَ سَنَنظُرُ أَصَدَقْتَ أَمْ كُنتَ مِنَ الْكَاذِبِينَ (27)
२७. (सुलेमान) म्हणाले, आता आम्ही पाहतो की तू खरे बोललास की तू खोटा आहे
اذْهَب بِّكِتَابِي هَٰذَا فَأَلْقِهْ إِلَيْهِمْ ثُمَّ تَوَلَّ عَنْهُمْ فَانظُرْ مَاذَا يَرْجِعُونَ (28)
२८. माझे हे पत्र नेऊन त्यांना दे, मग त्यांच्यापासून दूर होऊन पाहा की ते काय उत्तर देतात
قَالَتْ يَا أَيُّهَا الْمَلَأُ إِنِّي أُلْقِيَ إِلَيَّ كِتَابٌ كَرِيمٌ (29)
२९. ती म्हणाली, हे सरदारांनो! माझ्याजवळ एक महत्त्वपूर्ण पत्र टाकले गेले आहे
إِنَّهُ مِن سُلَيْمَانَ وَإِنَّهُ بِسْمِ اللَّهِ الرَّحْمَٰنِ الرَّحِيمِ (30)
३०. जे सुलेमानतर्फे आहे आणि ज्याचा आरंभ अतिशय दयावान, मोठ्या मेहरबान अल्लाहच्या नावाने आहे
أَلَّا تَعْلُوا عَلَيَّ وَأْتُونِي مُسْلِمِينَ (31)
३१. हे की तुम्ही माझ्यासमोर विद्रोह करू नका आणि मुस्लिम होऊन माझ्याजवळ या
قَالَتْ يَا أَيُّهَا الْمَلَأُ أَفْتُونِي فِي أَمْرِي مَا كُنتُ قَاطِعَةً أَمْرًا حَتَّىٰ تَشْهَدُونِ (32)
३२. ती (राणी) म्हणाली, हे माझ्या दरबारी लोकांनो! तुम्ही माझ्या या समस्येबाबत मला सल्ला द्या. मी कोणत्याही गोष्टीचा अंतिम फैसला, जोपर्यंत तुमची उपिस्थती आणि मत नसेल, करत नसते
قَالُوا نَحْنُ أُولُو قُوَّةٍ وَأُولُو بَأْسٍ شَدِيدٍ وَالْأَمْرُ إِلَيْكِ فَانظُرِي مَاذَا تَأْمُرِينَ (33)
३३. त्या सर्वांनी उत्तर दिले, आम्ही मोठे मजबूत आणि शक्तिशाली आणि खूप लढवय्ये आहोत. आता यापुढे तुमचा अधिकार आहे. तुम्ही स्वतःच विचार करा की तुम्ही आम्हाला कोणता आदेश देता
قَالَتْ إِنَّ الْمُلُوكَ إِذَا دَخَلُوا قَرْيَةً أَفْسَدُوهَا وَجَعَلُوا أَعِزَّةَ أَهْلِهَا أَذِلَّةً ۖ وَكَذَٰلِكَ يَفْعَلُونَ (34)
३४. ती (राणी) म्हणाली, बादशाह (राजे-महाराजे) जेव्हा एखाद्या वस्तीत प्रवेश करतात, तेव्हा तिला ओसाड करून टाकतात आणि तिथल्या प्रतिष्ठित लोकांना अपमानित करतात तेव्हा लोक देखील असेच करतील
وَإِنِّي مُرْسِلَةٌ إِلَيْهِم بِهَدِيَّةٍ فَنَاظِرَةٌ بِمَ يَرْجِعُ الْمُرْسَلُونَ (35)
३५. आणि मी त्यांना एक नजराणा पाठविणार आहे, मग पाहते की दूत काय उत्तर घेऊन परत येतात
فَلَمَّا جَاءَ سُلَيْمَانَ قَالَ أَتُمِدُّونَنِ بِمَالٍ فَمَا آتَانِيَ اللَّهُ خَيْرٌ مِّمَّا آتَاكُم بَلْ أَنتُم بِهَدِيَّتِكُمْ تَفْرَحُونَ (36)
३६. यास्तव (राजदूत) जेव्हा (हजरत) सुलेमानजवळ पोहोचला, तेव्हा सुलेमान म्हणाले, काय तुम्ही लोक धन देऊन माझी मदत करू इच्छिता? मला तर माझ्या पालनकर्त्याने याहून खूप जास्त देऊन ठेवले आहे, जे त्याने तुम्हाला दिले आहे. तेव्हा आपल्या नजराण्याने तुम्हीच खूश राहा
ارْجِعْ إِلَيْهِمْ فَلَنَأْتِيَنَّهُم بِجُنُودٍ لَّا قِبَلَ لَهُم بِهَا وَلَنُخْرِجَنَّهُم مِّنْهَا أَذِلَّةً وَهُمْ صَاغِرُونَ (37)
३७. जा, परत जा, त्यांच्याकडे आम्ही त्यांच्यावर असे सैन्य पाठवू की ज्याचा सामना करण्याची त्यांच्यात ताकत नाही आणि आम्ही त्यांना अपमानित व पराभूत करून तिथून बाहेर घालवू
قَالَ يَا أَيُّهَا الْمَلَأُ أَيُّكُمْ يَأْتِينِي بِعَرْشِهَا قَبْلَ أَن يَأْتُونِي مُسْلِمِينَ (38)
३८. (सुलेमान) म्हणाले, हे सरदारांनो! तुमच्यापैकी कोणी असा आहे, जो त्यांचे मुस्लिम होऊन पोहचण्यापूर्वीच, तिचे सिंहासन माझ्याजवळ आणून देईल
قَالَ عِفْرِيتٌ مِّنَ الْجِنِّ أَنَا آتِيكَ بِهِ قَبْلَ أَن تَقُومَ مِن مَّقَامِكَ ۖ وَإِنِّي عَلَيْهِ لَقَوِيٌّ أَمِينٌ (39)
३९. एक बलाढ्य जिन्न म्हणाला, तुम्ही आपल्या जागेवरून उठण्यापूर्वीच मी ते तुमच्याजवळ आणतो. विश्वास राखा, मी याचे सामर्थ्य राखतो. आणि मी अमानतदार (विस्वस्त) ही आहे
قَالَ الَّذِي عِندَهُ عِلْمٌ مِّنَ الْكِتَابِ أَنَا آتِيكَ بِهِ قَبْلَ أَن يَرْتَدَّ إِلَيْكَ طَرْفُكَ ۚ فَلَمَّا رَآهُ مُسْتَقِرًّا عِندَهُ قَالَ هَٰذَا مِن فَضْلِ رَبِّي لِيَبْلُوَنِي أَأَشْكُرُ أَمْ أَكْفُرُ ۖ وَمَن شَكَرَ فَإِنَّمَا يَشْكُرُ لِنَفْسِهِ ۖ وَمَن كَفَرَ فَإِنَّ رَبِّي غَنِيٌّ كَرِيمٌ (40)
४०. ज्याच्याजवळ ग्रंथाचे ज्ञान होते, तो म्हणाले, की तुमची पापणी लवण्यापूर्वीच मी त्यास तुमच्याजवळ पोहचवू शकतो. जेव्हा पैगंबर (सुलेमान) ने ते (सिंहासन) आपल्याजवळ हजर असलेले पाहिले, तेव्हा म्हणाले, हा माझ्या पालनकर्त्याचा उपकार आहे. यासाठी की त्याने माझी कसोटी घ्यावी की मी कृतज्ञता दर्शवितो की कृतघ्नता. कृतज्ञता व्यक्त करणारा आपल्या फायद्यासाठीच कृतज्ञता व्यक्त करतो. आणि जो कृतघ्नता दर्शवील तर माझा पालनकर्ता मोठा निःस्पृह आणि मोठा मेहेरबान आहे
قَالَ نَكِّرُوا لَهَا عَرْشَهَا نَنظُرْ أَتَهْتَدِي أَمْ تَكُونُ مِنَ الَّذِينَ لَا يَهْتَدُونَ (41)
४१. (हजरत सुलेमानने) आदेश दिला की राणीच्या सिंहासनाचे स्वरूप काहीसे बदलून टाका. मग पाहू या, ती मार्गदर्शन प्राप्त करते की त्या लोकांपैकी ठरते जे मार्गदर्शन प्राप्त करीत नाही
فَلَمَّا جَاءَتْ قِيلَ أَهَٰكَذَا عَرْشُكِ ۖ قَالَتْ كَأَنَّهُ هُوَ ۚ وَأُوتِينَا الْعِلْمَ مِن قَبْلِهَا وَكُنَّا مُسْلِمِينَ (42)
४२. मग जेव्हा ती हजर झाली तेव्हा तिला विचारले गेले की तुमचे सिंहासन असेच आहे? तिने उत्तर दिले, हे जणू तेच आहे आम्हाला याच्यापूर्वीच ज्ञान दिले गेले होते आणि आम्ही मुस्लिम होतो
وَصَدَّهَا مَا كَانَت تَّعْبُدُ مِن دُونِ اللَّهِ ۖ إِنَّهَا كَانَتْ مِن قَوْمٍ كَافِرِينَ (43)
४३. आणि तिला त्यांनी रोखून ठेवले होते, ज्यांची ती अल्लाहखेरीज उपासना करीत राहिली, निःसंशय ती काफिर लोकांपैकी होती
قِيلَ لَهَا ادْخُلِي الصَّرْحَ ۖ فَلَمَّا رَأَتْهُ حَسِبَتْهُ لُجَّةً وَكَشَفَتْ عَن سَاقَيْهَا ۚ قَالَ إِنَّهُ صَرْحٌ مُّمَرَّدٌ مِّن قَوَارِيرَ ۗ قَالَتْ رَبِّ إِنِّي ظَلَمْتُ نَفْسِي وَأَسْلَمْتُ مَعَ سُلَيْمَانَ لِلَّهِ رَبِّ الْعَالَمِينَ (44)
४४. तिला सांगितले गेले की महालात प्रवेश करा. जेव्हा तिने पाहिले तेव्हा तिला असे वाटले की हा जलाशय (हौद) आहे, तिने आपल्या पोटऱ्या उघड्या केल्या (सुलेमान) म्हणाले, हा तर काचेचा बनलेला आहे. ती म्हणाली, हे माझ्या पालनकर्त्या! मी आपल्या प्राणावर अत्याचार केला. आता मी सुलेमानसोबत, सर्व विश्वांच्या पालनकर्त्या अल्लाहची आज्ञाधारक बनते
وَلَقَدْ أَرْسَلْنَا إِلَىٰ ثَمُودَ أَخَاهُمْ صَالِحًا أَنِ اعْبُدُوا اللَّهَ فَإِذَا هُمْ فَرِيقَانِ يَخْتَصِمُونَ (45)
४५. आणि निःसंशय, आम्ही ‘समूद’कडे त्यांचा भाऊ ‘स्वालेह’ला पाठविले (या संदेशासह) की तुम्ही सर्व अल्लाहची उपासना करा. तरीही ते दोन गट बनून आपसात भांडणतंटा करू लागले
قَالَ يَا قَوْمِ لِمَ تَسْتَعْجِلُونَ بِالسَّيِّئَةِ قَبْلَ الْحَسَنَةِ ۖ لَوْلَا تَسْتَغْفِرُونَ اللَّهَ لَعَلَّكُمْ تُرْحَمُونَ (46)
४६. (पैगंबर स्वालेह) म्हणाले, हे माझ्या जनसमूहाच्या लोकांनो! तुम्ही भलेपणाच्या आदी वाईट गोष्टीची घाई का माजवित आहात. तुम्ही अल्लाहजवळ माफी का नाही मागत? यासाठी की तुमच्यावर दया केली जावी
قَالُوا اطَّيَّرْنَا بِكَ وَبِمَن مَّعَكَ ۚ قَالَ طَائِرُكُمْ عِندَ اللَّهِ ۖ بَلْ أَنتُمْ قَوْمٌ تُفْتَنُونَ (47)
४७. (ते) म्हणाले की आम्ही तर तुम्हाला आणि तुमच्या साथीदारांना अपशकुनी समजतो (पैगंबरानी) उत्तर दिले, तुमचा अपशकून अल्लाहजवळ आहे. किंबहुना तुम्ही तर कसोटीत पडलेले लोक आहात
وَكَانَ فِي الْمَدِينَةِ تِسْعَةُ رَهْطٍ يُفْسِدُونَ فِي الْأَرْضِ وَلَا يُصْلِحُونَ (48)
४८. या शहरात नऊ (प्रमुख) माणसे होती, जे धरतीत उत्पात (फसाद) पसरवित होते आणि सुधारणेचे काम करीत नव्हते
قَالُوا تَقَاسَمُوا بِاللَّهِ لَنُبَيِّتَنَّهُ وَأَهْلَهُ ثُمَّ لَنَقُولَنَّ لِوَلِيِّهِ مَا شَهِدْنَا مَهْلِكَ أَهْلِهِ وَإِنَّا لَصَادِقُونَ (49)
४९. त्यांनी आपसात अल्लाहची शपथ घेऊन प्रतिज्ञा केली की रात्रीतूनच ‘स्वालेह’ आणि त्यांच्या कुटुंबियांवर हल्ला चढवू आणि त्यांच्या वारसदाराला सांगू की आम्ही त्यांच्या कुटुंबाच्या हत्येच्या वेळी हजर नव्हतो आणि आम्ही खरे बोलत आहोत
وَمَكَرُوا مَكْرًا وَمَكَرْنَا مَكْرًا وَهُمْ لَا يَشْعُرُونَ (50)
५०. आणि त्यांनी डाव खेळा आणि आम्ही देखील आणि ते त्यास समजतच नव्हते
فَانظُرْ كَيْفَ كَانَ عَاقِبَةُ مَكْرِهِمْ أَنَّا دَمَّرْنَاهُمْ وَقَوْمَهُمْ أَجْمَعِينَ (51)
५१. आता पाहा, त्यांच्या कट-कारस्थानाचा काय परिणाम झाला? आम्ही त्यांना आणि त्यांच्या जनसमूहाला, सर्वांनाच नष्ट करून टाकले
فَتِلْكَ بُيُوتُهُمْ خَاوِيَةً بِمَا ظَلَمُوا ۗ إِنَّ فِي ذَٰلِكَ لَآيَةً لِّقَوْمٍ يَعْلَمُونَ (52)
५२. ही त्यांची घरे आहेत, जी त्यांच्या अत्याचारामुळे ओसाड पडली आहेत. जे लोक ज्ञान बाळगतात, त्यांच्यासाठी त्यात मोठी निशाणी आहे
وَأَنجَيْنَا الَّذِينَ آمَنُوا وَكَانُوا يَتَّقُونَ (53)
५३. आणि आम्ही त्यांना, ज्यांनी ईमान राखले होते आणि जे सत्कर्म करीत होते, पूर्णपणे वाचविले
وَلُوطًا إِذْ قَالَ لِقَوْمِهِ أَتَأْتُونَ الْفَاحِشَةَ وَأَنتُمْ تُبْصِرُونَ (54)
५४. आणि लूतचा (उल्लेख करा) जेव्हा ते आपल्या जनसमूहाला म्हणाले, की जाणूनबुजूनही तुम्ही कुकर्म (पुरुष सहवास) करता
أَئِنَّكُمْ لَتَأْتُونَ الرِّجَالَ شَهْوَةً مِّن دُونِ النِّسَاءِ ۚ بَلْ أَنتُمْ قَوْمٌ تَجْهَلُونَ (55)
५५. ही काय गोष्ट आहे? की तुम्ही स्त्रियांना सोडून पुरुषांजवळ कामवासनापूर्तीसाठी येता? खरी गोष्टी अशी की तुम्ही मोठे अज्ञान पूर्ण काम करीत आहात
۞ فَمَا كَانَ جَوَابَ قَوْمِهِ إِلَّا أَن قَالُوا أَخْرِجُوا آلَ لُوطٍ مِّن قَرْيَتِكُمْ ۖ إِنَّهُمْ أُنَاسٌ يَتَطَهَّرُونَ (56)
५६. त्यांच्या जनसमूहाचे उत्तर या बोलण्याव्यतिरिक्त दुसरे काही नव्हते की लूतच्या कुटुंबियांना आपल्या शहरातून बाहेर घालवा, हे लोक मोठी पवित्रतता (सत्शीलता) दाखवित आहेत
فَأَنجَيْنَاهُ وَأَهْلَهُ إِلَّا امْرَأَتَهُ قَدَّرْنَاهَا مِنَ الْغَابِرِينَ (57)
५७. आणि आम्ही त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला, त्याच्या पत्नीखेरीज सर्वांना वाचिवले. याचे अनुमान(र्तक) तर मागे राहणाऱ्यांमध्ये आम्ही लावलेच होते
وَأَمْطَرْنَا عَلَيْهِم مَّطَرًا ۖ فَسَاءَ مَطَرُ الْمُنذَرِينَ (58)
५८. आणि त्यांच्यावर एक (विशेष प्रकारचा) पाऊस पाडला. यास्तव त्या खबरदार केल्या गेलेल्या लोकांवर वाईट पाऊस पडला
قُلِ الْحَمْدُ لِلَّهِ وَسَلَامٌ عَلَىٰ عِبَادِهِ الَّذِينَ اصْطَفَىٰ ۗ آللَّهُ خَيْرٌ أَمَّا يُشْرِكُونَ (59)
५९. तेव्हा तुम्ही सांगा की समस्त प्रशंसा अल्लाहकरिताच आहे आणि त्याच्या निवडक दासांवर सलाम (शांति) आहे. काय अल्लाह अधिक चांगला आहे की ते, ज्यांना हे लोक (अल्लाहचा) सहभागी बनवत आहेत
أَمَّنْ خَلَقَ السَّمَاوَاتِ وَالْأَرْضَ وَأَنزَلَ لَكُم مِّنَ السَّمَاءِ مَاءً فَأَنبَتْنَا بِهِ حَدَائِقَ ذَاتَ بَهْجَةٍ مَّا كَانَ لَكُمْ أَن تُنبِتُوا شَجَرَهَا ۗ أَإِلَٰهٌ مَّعَ اللَّهِ ۚ بَلْ هُمْ قَوْمٌ يَعْدِلُونَ (60)
६०. (बरे हे सांगा) आकाशांना आणि जमिनीला कोणी निर्माण केले? कोणी आकाशातून पाऊस पाडला? मग त्याद्वारे हिरव्या टवटवीत सुंदर बागा कोणी उगविल्या ? या बागांचे वृक्ष तुम्ही कधीही उगवू शकत नाही. काय अल्लाहखेरीज दुसरा कोणी उपासना करण्यायोग्य आहे? किंबहुना हे लोक (सरळ मार्गापासून) दूर होतात
أَمَّن جَعَلَ الْأَرْضَ قَرَارًا وَجَعَلَ خِلَالَهَا أَنْهَارًا وَجَعَلَ لَهَا رَوَاسِيَ وَجَعَلَ بَيْنَ الْبَحْرَيْنِ حَاجِزًا ۗ أَإِلَٰهٌ مَّعَ اللَّهِ ۚ بَلْ أَكْثَرُهُمْ لَا يَعْلَمُونَ (61)
६१. काय तो, ज्याने धरतीला निवासस्थान बनविले, तिच्या दरम्यान नद्या प्रवाहित केल्या, तिच्यासाठी पर्वत बनविले आणि दोन समुद्रांच्या दरम्यान आड पडदा घातला, काय अल्लाहसोबत दुसरा कोणी उपासना करण्यायोग्य आहे? किंबहुना त्यांच्यापैकी बहुतेक लोक जाणतच नाहीत
أَمَّن يُجِيبُ الْمُضْطَرَّ إِذَا دَعَاهُ وَيَكْشِفُ السُّوءَ وَيَجْعَلُكُمْ خُلَفَاءَ الْأَرْضِ ۗ أَإِلَٰهٌ مَّعَ اللَّهِ ۚ قَلِيلًا مَّا تَذَكَّرُونَ (62)
६२. विवश आणि अगतिक व्यक्तीचे आर्जव, जेव्हा तो पुकारतो, कोण स्वीकारून त्याच्या त्रास- यातनेस दूर करतो, आणि तुम्हाला धरतीचा खलीफ़ा (सत्ताधिकारी) बनवितो. काय अल्लाहसोबत दुसरा कोणी उपासना करण्यायोग्य आहे? तुम्ही लोक फार कमी बोध ग्रहण करतात
أَمَّن يَهْدِيكُمْ فِي ظُلُمَاتِ الْبَرِّ وَالْبَحْرِ وَمَن يُرْسِلُ الرِّيَاحَ بُشْرًا بَيْنَ يَدَيْ رَحْمَتِهِ ۗ أَإِلَٰهٌ مَّعَ اللَّهِ ۚ تَعَالَى اللَّهُ عَمَّا يُشْرِكُونَ (63)
६३. असा कोण आहे, जो तुम्हाला खुष्की आणि समुद्राच्या अंधारात मार्ग दाखवितो आणि जो आपल्या कृपेच्या (येण्या) पूर्वीच खूशखबर देणारी हवा (वारे) पाठवितो. काय अल्लाहसोबत दुसरे एखादे आराध्या दैवतही आहे? ज्यांना हे (अल्लाहचा) सहभागी ठरवितात, त्या सर्वांपेक्षा अल्लाह अति उच्च आहे
أَمَّن يَبْدَأُ الْخَلْقَ ثُمَّ يُعِيدُهُ وَمَن يَرْزُقُكُم مِّنَ السَّمَاءِ وَالْأَرْضِ ۗ أَإِلَٰهٌ مَّعَ اللَّهِ ۚ قُلْ هَاتُوا بُرْهَانَكُمْ إِن كُنتُمْ صَادِقِينَ (64)
६४. असा कोण आहे जो सृष्टीनिर्मितीला पहिल्यांदा निर्माण करतो, मग तिला पुन्हा निर्माण करील जो तुम्हाला आकाश आणि जमिनितून आजिविका प्रदान करीत आहे. काय अल्लाहसोबत दुसराही कोणी उपास्य आहे? सांगा, सच्चे असाल तर आपले प्रमाण (पुरावा) आणा
قُل لَّا يَعْلَمُ مَن فِي السَّمَاوَاتِ وَالْأَرْضِ الْغَيْبَ إِلَّا اللَّهُ ۚ وَمَا يَشْعُرُونَ أَيَّانَ يُبْعَثُونَ (65)
६५. सांगा की आकाशवाल्यांपैकी आणि धरतीवाल्यांपैकी, अल्लाहखेरीज कोणीही परोक्ष ज्ञान बाळगत नाही१ ते तर हे देखील जाणत नाहीत की त्यांना दुसऱ्यांदा केव्हा जिवंत केले जाईल
بَلِ ادَّارَكَ عِلْمُهُمْ فِي الْآخِرَةِ ۚ بَلْ هُمْ فِي شَكٍّ مِّنْهَا ۖ بَلْ هُم مِّنْهَا عَمُونَ (66)
६६. किंबहुना आखिरत (मरणोत्तर जीवना) विषयी त्यांचे ज्ञान संपुष्टात आले आहे, किंबहुना हे त्या संदर्भात संशयग्रस्त आहेत, एवढेच नव्हे तर हे त्यापासून आंधळे आहेत
وَقَالَ الَّذِينَ كَفَرُوا أَإِذَا كُنَّا تُرَابًا وَآبَاؤُنَا أَئِنَّا لَمُخْرَجُونَ (67)
६७. काफिर (सत्य-विरोधक) म्हणाले, काय जेव्हा आम्ही माती होऊन जाऊ आणि आमचे वाडवडीलही, काय आम्ही पुन्हा बाहेर काढले जाऊ
لَقَدْ وُعِدْنَا هَٰذَا نَحْنُ وَآبَاؤُنَا مِن قَبْلُ إِنْ هَٰذَا إِلَّا أَسَاطِيرُ الْأَوَّلِينَ (68)
६८. आम्हाला आणि आमच्या पूर्वजांना फार पूर्वीपासून हे वायदे दिले जात राहिले. काही नाही, या तर पूर्वी होऊन गेलेल्या लोकांच्या काल्पनिक कथा मात्र आहेत
قُلْ سِيرُوا فِي الْأَرْضِ فَانظُرُوا كَيْفَ كَانَ عَاقِبَةُ الْمُجْرِمِينَ (69)
६९. सांगा की, जमिनीवर जरा हिंडून फिरून पाहा की अपराधी लोकांचा काय परिणाम झाला
وَلَا تَحْزَنْ عَلَيْهِمْ وَلَا تَكُن فِي ضَيْقٍ مِّمَّا يَمْكُرُونَ (70)
७०. आणि तुम्ही त्यांच्याविषयी चिंताग्रस्त होऊ नका आणि त्यांच्या कट-कारस्थानांमुळे मन संकुचित करू नका
وَيَقُولُونَ مَتَىٰ هَٰذَا الْوَعْدُ إِن كُنتُمْ صَادِقِينَ (71)
७१. आणि म्हणतात की हा वायदा केव्हा पूर्ण होईल, सच्चे असाल तर सांगा
قُلْ عَسَىٰ أَن يَكُونَ رَدِفَ لَكُم بَعْضُ الَّذِي تَسْتَعْجِلُونَ (72)
७२. त्यांना उत्तर द्या की कदाचित काही अशा गोष्टी, ज्यांची तुम्ही एवढी घाई माजवित आहात, तुमच्या खूप जवळ येऊन ठेपल्या आहेत
وَإِنَّ رَبَّكَ لَذُو فَضْلٍ عَلَى النَّاسِ وَلَٰكِنَّ أَكْثَرَهُمْ لَا يَشْكُرُونَ (73)
७३. आणि निःसंशय, तुमचा पालनकर्ता समस्त लोकांवर मोठा कृपावान आहे, परंतु अधिकांश लोक कृतज्ञता दाखवित नाही
وَإِنَّ رَبَّكَ لَيَعْلَمُ مَا تُكِنُّ صُدُورُهُمْ وَمَا يُعْلِنُونَ (74)
७४. आणि निःसंशय, तुमचा पालनकर्ता, त्या गोष्टींनाही जाणतो, ज्यांना ते आपल्या मनात लपवित आहेत, आणि ज्यांना व्यक्त करीत आहेत
وَمَا مِنْ غَائِبَةٍ فِي السَّمَاءِ وَالْأَرْضِ إِلَّا فِي كِتَابٍ مُّبِينٍ (75)
७५. आकाश आणि धरतीची कोणतीही लपलेली गोष्ट अशी नाही, जी दिव्य स्पष्ट ग्रंथात सामील नसावी
إِنَّ هَٰذَا الْقُرْآنَ يَقُصُّ عَلَىٰ بَنِي إِسْرَائِيلَ أَكْثَرَ الَّذِي هُمْ فِيهِ يَخْتَلِفُونَ (76)
७६. निःसंशय हा कुरआन इस्राईलच्या संततीसमोर अधिक तर त्या गोष्टींचे निवेदन करीत आहे, ज्यात हे मतभेद करतात.१
وَإِنَّهُ لَهُدًى وَرَحْمَةٌ لِّلْمُؤْمِنِينَ (77)
७७. आणि हा (कुरआन) ईमान राखणाऱ्यांकरिता निश्चितच मार्गदर्शन आणि दया- कृपा आहे
إِنَّ رَبَّكَ يَقْضِي بَيْنَهُم بِحُكْمِهِ ۚ وَهُوَ الْعَزِيزُ الْعَلِيمُ (78)
७८. तुमचा पालनकर्ता त्यांच्या दरम्यान आपल्या आदेशाने (सर्व) फैसला करील. तो मोठा वर्चस्वशाली आणि ज्ञान राखणारा आहे
فَتَوَكَّلْ عَلَى اللَّهِ ۖ إِنَّكَ عَلَى الْحَقِّ الْمُبِينِ (79)
७९. तेव्हा, तुम्ही अल्लाहवरच भरवसा राखा. निःसंशय, तुम्ही सत्य आणि उघड अशा दीन (धर्मा) वर आहात
إِنَّكَ لَا تُسْمِعُ الْمَوْتَىٰ وَلَا تُسْمِعُ الصُّمَّ الدُّعَاءَ إِذَا وَلَّوْا مُدْبِرِينَ (80)
८०. निःसंशय, तुम्ही ना मृतांना ऐकवू शकता आणि ना बहिऱ्यांना आपली पुकार (हाक) ऐकवू शकता, जेव्हा ते पाठ फिरवून विमुख होत असतील
وَمَا أَنتَ بِهَادِي الْعُمْيِ عَن ضَلَالَتِهِمْ ۖ إِن تُسْمِعُ إِلَّا مَن يُؤْمِنُ بِآيَاتِنَا فَهُم مُّسْلِمُونَ (81)
८१. आणि ना तुम्ही आंधळ्यांना त्यांच्या मार्गभ्रष्टतेपासून हटवून, सन्मार्गाला लावू शकता, तुम्ही तर केवळ त्यांना ऐकवू शकता, ज्यांनी आमच्या आयतींवर ईमान राखले आहे, मग ते आज्ञाधारक होतात
۞ وَإِذَا وَقَعَ الْقَوْلُ عَلَيْهِمْ أَخْرَجْنَا لَهُمْ دَابَّةً مِّنَ الْأَرْضِ تُكَلِّمُهُمْ أَنَّ النَّاسَ كَانُوا بِآيَاتِنَا لَا يُوقِنُونَ (82)
८२. आणि जेव्हा त्यांच्यावर शिक्षा- यातने (अज़ाब) चा वायदा लागू होईल, आम्ही जमिनीतून त्यांच्यासाठी एक जनावर बाहेर काढू, जे त्यांच्याशी बोलत असेल की लोक आमच्या आयतींवर विश्वास ठेवत नव्हते.१
وَيَوْمَ نَحْشُرُ مِن كُلِّ أُمَّةٍ فَوْجًا مِّمَّن يُكَذِّبُ بِآيَاتِنَا فَهُمْ يُوزَعُونَ (83)
८३. आणि ज्या दिवशी आम्ही प्रत्येक जनसमूहामधून, अशा लोकांचे समूह, जे आमच्या आयतींना खोटे ठरवित होते, घेरून आणू, मग ते सर्वच्या सर्व वेगळे केले जातील
حَتَّىٰ إِذَا جَاءُوا قَالَ أَكَذَّبْتُم بِآيَاتِي وَلَمْ تُحِيطُوا بِهَا عِلْمًا أَمَّاذَا كُنتُمْ تَعْمَلُونَ (84)
८४. जेव्हा सर्वच्या सर्व येऊन पोहचतील तेव्हा अल्लाह फर्माविल की तुम्ही माझ्या आयतींना, यानंतरही की तुम्हाला त्यांचे पूर्ण ज्ञान नव्हते, का खोटे ठरविले? आणि हेही सांगा की तुम्ही काय (कर्म) करीत राहिलात
وَوَقَعَ الْقَوْلُ عَلَيْهِم بِمَا ظَلَمُوا فَهُمْ لَا يَنطِقُونَ (85)
८५. आणि याचे कारण हे की त्यांनी अत्याचार केला होता, त्यामुळे आमचे फर्मान त्याच्यावर लागू होईल आणि ते काहीच बोलू शकणार नाहीत
أَلَمْ يَرَوْا أَنَّا جَعَلْنَا اللَّيْلَ لِيَسْكُنُوا فِيهِ وَالنَّهَارَ مُبْصِرًا ۚ إِنَّ فِي ذَٰلِكَ لَآيَاتٍ لِّقَوْمٍ يُؤْمِنُونَ (86)
८६. काय ते पाहत नाहीत की आम्ही रात्र अशासाठी बनविली आहे की त्यांनी तिच्यात आराम करू शकावे आणि दिवसाला आम्ही दाखविणारा बनविले आहे. निःसंशय यात त्या लोकांकरिता निशाण्या आहेत, जे ईमान राखतात
وَيَوْمَ يُنفَخُ فِي الصُّورِ فَفَزِعَ مَن فِي السَّمَاوَاتِ وَمَن فِي الْأَرْضِ إِلَّا مَن شَاءَ اللَّهُ ۚ وَكُلٌّ أَتَوْهُ دَاخِرِينَ (87)
८७. आणि ज्या दिवशी सूर फुंकला जाईल तेव्हा ते सर्वच्या सर्व, जे आकाशांमध्ये आणि जमिनीवर आहेत घाबरून उठतील,१ परंतु ज्याला अल्लाह इच्छिल (सुरक्षित ठेवील) आणि सर्वच्या सर्व विवश, लाचार होऊन त्याच्यासमोर हजर होतील
وَتَرَى الْجِبَالَ تَحْسَبُهَا جَامِدَةً وَهِيَ تَمُرُّ مَرَّ السَّحَابِ ۚ صُنْعَ اللَّهِ الَّذِي أَتْقَنَ كُلَّ شَيْءٍ ۚ إِنَّهُ خَبِيرٌ بِمَا تَفْعَلُونَ (88)
८८. आणि तुम्ही पर्वतांना आपल्या जागी निश्चित व स्थिर समजता, परंतु ते देखील ढगासारखे उडत फिरतील. ही निर्मिती (कार्यकुशलता) आहे अल्लाहची, ज्याने प्रत्येक वस्तू मजबूत बनविली आहे. तुम्ही जे काही करता, अल्लाह ते चांगल्या प्रकारे जाणतो
مَن جَاءَ بِالْحَسَنَةِ فَلَهُ خَيْرٌ مِّنْهَا وَهُم مِّن فَزَعٍ يَوْمَئِذٍ آمِنُونَ (89)
८९. जो मनुष्य सत्कर्म घेऊन येईल, त्याला त्याहून चांगला मोबदला मिळेल आणि असे लोक त्या दिवसाच्या दहशतीपासून निर्धास्त असतील
وَمَن جَاءَ بِالسَّيِّئَةِ فَكُبَّتْ وُجُوهُهُمْ فِي النَّارِ هَلْ تُجْزَوْنَ إِلَّا مَا كُنتُمْ تَعْمَلُونَ (90)
९०. आणि जे लोक दुष्कर्म घेऊन येतील त्यांना अधोमुखी (जहन्नमच्या) आगीत झोकले जाईल. तुम्हाला केवळ त्याचाच मोबदला दिला जाईल, जे तुम्ही करीत राहिले
إِنَّمَا أُمِرْتُ أَنْ أَعْبُدَ رَبَّ هَٰذِهِ الْبَلْدَةِ الَّذِي حَرَّمَهَا وَلَهُ كُلُّ شَيْءٍ ۖ وَأُمِرْتُ أَنْ أَكُونَ مِنَ الْمُسْلِمِينَ (91)
९१. मला तर केवळ हाच आदेश दिला गेला आहे की मी या शहराच्या पालनकर्त्याची उपासना करीत राहावे, ज्याने यास आदर सन्मानपूर्ण बनविले आहे आणि जो प्रत्येक वस्तूचा स्वामी आहे आणि मला हा आदेशही दिला गेला आहे की मी मुस्लमान (आज्ञाधारकां) पैकी व्हावे
وَأَنْ أَتْلُوَ الْقُرْآنَ ۖ فَمَنِ اهْتَدَىٰ فَإِنَّمَا يَهْتَدِي لِنَفْسِهِ ۖ وَمَن ضَلَّ فَقُلْ إِنَّمَا أَنَا مِنَ الْمُنذِرِينَ (92)
९२. आणि मी कुरआनाचे पठण करीत राहावे, तेव्हा जो मार्गदर्शन अंगीकारील, आणि जो मार्गभ्रष्ट होईल तर सांगा, मी केवळ सावधान करणाऱ्यांपैकी आहे
وَقُلِ الْحَمْدُ لِلَّهِ سَيُرِيكُمْ آيَاتِهِ فَتَعْرِفُونَهَا ۚ وَمَا رَبُّكَ بِغَافِلٍ عَمَّا تَعْمَلُونَ (93)
९३. आणि सांगा, समस्त प्रशंसा अल्लाहकरिताच आहे. तो लवकरच तुम्हाला आपल्या निशाण्या दाखविल, ज्या तुम्ही स्वतः ओळखून घ्याल, आणि जे काही तुम्ही करीत आहात, तुमचा पालनकर्ता त्यापासून अनभिज्ञ (अजाण) नाही
❮ Previous Next ❯

Surahs from Quran :

1- Fatiha2- Baqarah
3- Al Imran4- Nisa
5- Maidah6- Anam
7- Araf8- Anfal
9- Tawbah10- Yunus
11- Hud12- Yusuf
13- Raad14- Ibrahim
15- Hijr16- Nahl
17- Al Isra18- Kahf
19- Maryam20- TaHa
21- Anbiya22- Hajj
23- Muminun24- An Nur
25- Furqan26- Shuara
27- Naml28- Qasas
29- Ankabut30- Rum
31- Luqman32- Sajdah
33- Ahzab34- Saba
35- Fatir36- Yasin
37- Assaaffat38- Sad
39- Zumar40- Ghafir
41- Fussilat42- shura
43- Zukhruf44- Ad Dukhaan
45- Jathiyah46- Ahqaf
47- Muhammad48- Al Fath
49- Hujurat50- Qaf
51- zariyat52- Tur
53- Najm54- Al Qamar
55- Rahman56- Waqiah
57- Hadid58- Mujadilah
59- Al Hashr60- Mumtahina
61- Saff62- Jumuah
63- Munafiqun64- Taghabun
65- Talaq66- Tahrim
67- Mulk68- Qalam
69- Al-Haqqah70- Maarij
71- Nuh72- Jinn
73- Muzammil74- Muddathir
75- Qiyamah76- Insan
77- Mursalat78- An Naba
79- Naziat80- Abasa
81- Takwir82- Infitar
83- Mutaffifin84- Inshiqaq
85- Buruj86- Tariq
87- Al Ala88- Ghashiya
89- Fajr90- Al Balad
91- Shams92- Lail
93- Duha94- Sharh
95- Tin96- Al Alaq
97- Qadr98- Bayyinah
99- Zalzalah100- Adiyat
101- Qariah102- Takathur
103- Al Asr104- Humazah
105- Al Fil106- Quraysh
107- Maun108- Kawthar
109- Kafirun110- Nasr
111- Masad112- Ikhlas
113- Falaq114- An Nas