يُسَبِّحُ لِلَّهِ مَا فِي السَّمَاوَاتِ وَمَا فِي الْأَرْضِ ۖ لَهُ الْمُلْكُ وَلَهُ الْحَمْدُ ۖ وَهُوَ عَلَىٰ كُلِّ شَيْءٍ قَدِيرٌ (1) १. आकाशांची आणि धरतीची प्रत्येक वस्तू अल्लाहची पवित्रता वर्णन करते, त्याचीच राज्य-सत्ता आहे आणि त्याचीच स्तुती-प्रशंसा आहे. आणि तो प्रत्येक गोष्टीचे सामर्थ्य बाळगतो |
هُوَ الَّذِي خَلَقَكُمْ فَمِنكُمْ كَافِرٌ وَمِنكُم مُّؤْمِنٌ ۚ وَاللَّهُ بِمَا تَعْمَلُونَ بَصِيرٌ (2) २. त्यानेच तुम्हाला निर्माण केले आहे, मग तुमच्यापैकी काही काफिर (इन्कारी) आहेत आणि काही ईमान राखणारे आहेत आणि तुम्ही जे काही करीत आहात, अल्लाह ते चांगल्या प्रकारे पाहत आहे |
خَلَقَ السَّمَاوَاتِ وَالْأَرْضَ بِالْحَقِّ وَصَوَّرَكُمْ فَأَحْسَنَ صُوَرَكُمْ ۖ وَإِلَيْهِ الْمَصِيرُ (3) ३. त्यानेच आकाशांना आणि धरतीला सत्यासह (बुद्धिकौशल्याने) निर्माण केले, त्यानेच तुमचे चेहरे मोहरे बनविले आणि खूप सुंदर बनविले आणि त्याच्याचकडे परतायचे आहे |
يَعْلَمُ مَا فِي السَّمَاوَاتِ وَالْأَرْضِ وَيَعْلَمُ مَا تُسِرُّونَ وَمَا تُعْلِنُونَ ۚ وَاللَّهُ عَلِيمٌ بِذَاتِ الصُّدُورِ (4) ४. तो आकाशांच्या आणि जमिनीच्या सर्व वस्तूंचे ज्ञान राखतो, आणि जे काही तुम्ही लपविता आणि जाहीर करता ते सर्व तो जाणतो. अल्लाह तर छातीतल्या (मनातल्या) गोष्टी देखील जाणतो |
أَلَمْ يَأْتِكُمْ نَبَأُ الَّذِينَ كَفَرُوا مِن قَبْلُ فَذَاقُوا وَبَالَ أَمْرِهِمْ وَلَهُمْ عَذَابٌ أَلِيمٌ (5) ५. काय तुम्हाला या पूर्वीच्या काफिरांची खबर नाही पोहचली, ज्यांनी आपल्या कर्मांच्या परिणामांचा स्वाद चाखला, आणि ज्यांच्यासाठी दुःखदायक शिक्षा यातना आहे |
ذَٰلِكَ بِأَنَّهُ كَانَت تَّأْتِيهِمْ رُسُلُهُم بِالْبَيِّنَاتِ فَقَالُوا أَبَشَرٌ يَهْدُونَنَا فَكَفَرُوا وَتَوَلَّوا ۚ وَّاسْتَغْنَى اللَّهُ ۚ وَاللَّهُ غَنِيٌّ حَمِيدٌ (6) ६. हे या कारणास्तव की त्यांच्याजवळ त्यांचे पैगंबर स्पष्ट प्रमाण (पुरावे) घेऊन आले तेव्हा ते म्हणाले की काय एक मनुष्य आम्हाला मार्गदर्शन करील?१ आणि इन्कार केला व तोंड फिरविले आणि अल्लाहने त्यांची पर्वा केली नाही, आणि अल्लाह तर आहेच मोठा निःस्पृह, सर्वगुण संपन्न |
زَعَمَ الَّذِينَ كَفَرُوا أَن لَّن يُبْعَثُوا ۚ قُلْ بَلَىٰ وَرَبِّي لَتُبْعَثُنَّ ثُمَّ لَتُنَبَّؤُنَّ بِمَا عَمِلْتُمْ ۚ وَذَٰلِكَ عَلَى اللَّهِ يَسِيرٌ (7) ७. त्या काफिर (इन्कारी) लोकांनी असे गृहीत धरले आहे की त्यांना दुसऱ्यांदा जिवंत केले जाणार नाही. तुम्ही सांगा की का नाही? अल्लाहची शपथ! तुम्हाला अवश्य पुन्हा जिवंत केले जाईल, मग जे काही (कर्म) तुम्ही केले आहे त्याची खबर तुम्हाला दिली जाईल आणि अल्लाहकरिता हे फारच सोपे आहे |
فَآمِنُوا بِاللَّهِ وَرَسُولِهِ وَالنُّورِ الَّذِي أَنزَلْنَا ۚ وَاللَّهُ بِمَا تَعْمَلُونَ خَبِيرٌ (8) ८. तेव्हा तुम्ही अल्लाहवर आणि त्याच्या पैगंबरावर आणि त्या दिव्य तेजावर जो आम्ही अवतरित केला आहे, ईमान राखा, आणि अल्लाह तुमच्या प्रत्येक कर्माला (चांगल्या प्रकारे) जाणून आहे |
يَوْمَ يَجْمَعُكُمْ لِيَوْمِ الْجَمْعِ ۖ ذَٰلِكَ يَوْمُ التَّغَابُنِ ۗ وَمَن يُؤْمِن بِاللَّهِ وَيَعْمَلْ صَالِحًا يُكَفِّرْ عَنْهُ سَيِّئَاتِهِ وَيُدْخِلْهُ جَنَّاتٍ تَجْرِي مِن تَحْتِهَا الْأَنْهَارُ خَالِدِينَ فِيهَا أَبَدًا ۚ ذَٰلِكَ الْفَوْزُ الْعَظِيمُ (9) ९. ज्या दिवशी अल्लाह तुम्हा सर्वांना, त्या एकत्रित केले जाण्याच्या दिवशी एकत्र करील, तोच पराजय आणि विजयाचा दिवस आहे, आणि जो (मनुष्य) अल्लाहवर ईमान राखून सत्कर्म करील, अल्लाह त्याच्यापासून त्याची दुष्कर्मे दूर करील आणि त्याला जन्नतीमध्ये दाखल करील, ज्यांच्या खाली प्रवाह वाहत आहेत, ज्यांच्यात ते सदैवकाळ राहतील. हीच फार मोठी सफलता आहे |
وَالَّذِينَ كَفَرُوا وَكَذَّبُوا بِآيَاتِنَا أُولَٰئِكَ أَصْحَابُ النَّارِ خَالِدِينَ فِيهَا ۖ وَبِئْسَ الْمَصِيرُ (10) १०. आणि ज्या लोकांनी कुप्र (इन्कार) केला आणि आमच्या आयतींना खोटे ठरविले, ते सर्वच जहन्नममध्ये जाणारे आहेत, ज्यात ते नेहमी राहतील. ते मोठे वाईट ठिकाण आहे |
مَا أَصَابَ مِن مُّصِيبَةٍ إِلَّا بِإِذْنِ اللَّهِ ۗ وَمَن يُؤْمِن بِاللَّهِ يَهْدِ قَلْبَهُ ۚ وَاللَّهُ بِكُلِّ شَيْءٍ عَلِيمٌ (11) ११. कोणतेही संकट अल्लाहच्या आज्ञेविना पोहचू शकत नाही आणि जो कोणी अल्लाहवर ईमान राखतो, अल्लाह त्याच्या हृदयाला मार्गदर्शन करतो, आणि अल्लाह प्रत्येक गोष्ट चांगल्या प्रकारे जाणणारा आहे |
وَأَطِيعُوا اللَّهَ وَأَطِيعُوا الرَّسُولَ ۚ فَإِن تَوَلَّيْتُمْ فَإِنَّمَا عَلَىٰ رَسُولِنَا الْبَلَاغُ الْمُبِينُ (12) १२. (लोकांनो!) अल्लाहच्या आदेशाचे पालन करा आणि पैगंबराचे आज्ञापालन करा, मग जर तुम्ही तोंड फिरविणारे व्हाल तर आमच्या पैगंबराचे कर्तव्य केवळ स्पष्टपणे (संदेश) पोहचविणे आहे |
اللَّهُ لَا إِلَٰهَ إِلَّا هُوَ ۚ وَعَلَى اللَّهِ فَلْيَتَوَكَّلِ الْمُؤْمِنُونَ (13) १३. अल्लाहखेरीज कोणीही सच्चा माबूद (खरा उपास्य) नाही, आणि ईमान राखणाऱ्यांनी केवळ अल्लाहवरच भरवसा ठेवला पाहिजे |
يَا أَيُّهَا الَّذِينَ آمَنُوا إِنَّ مِنْ أَزْوَاجِكُمْ وَأَوْلَادِكُمْ عَدُوًّا لَّكُمْ فَاحْذَرُوهُمْ ۚ وَإِن تَعْفُوا وَتَصْفَحُوا وَتَغْفِرُوا فَإِنَّ اللَّهَ غَفُورٌ رَّحِيمٌ (14) १४. हे ईमान राखणाऱ्यांनो! तुमच्या काही पत्न्या आणि संततीपैकी काही तुमचे शत्रू आहेत, तेव्हा त्यांच्यापासून सतर्क राहा आणि जर तुम्ही माफ कराल, व सोडून द्याल आणि माफ कराल तर अल्लाह माफ करणारा, दयाळू आहे |
إِنَّمَا أَمْوَالُكُمْ وَأَوْلَادُكُمْ فِتْنَةٌ ۚ وَاللَّهُ عِندَهُ أَجْرٌ عَظِيمٌ (15) १५. तुमची धन-संपत्ती आणि तुमची संतती (तर खात्रीने) तुमची कसोटी आहे१ आणि फार मोठा मोबदला, अल्लाहजवळ आहे |
فَاتَّقُوا اللَّهَ مَا اسْتَطَعْتُمْ وَاسْمَعُوا وَأَطِيعُوا وَأَنفِقُوا خَيْرًا لِّأَنفُسِكُمْ ۗ وَمَن يُوقَ شُحَّ نَفْسِهِ فَأُولَٰئِكَ هُمُ الْمُفْلِحُونَ (16) १६. तेव्हा यथासंभव अल्लाहचे भय बाळगत राहा आणि ऐकत व आज्ञापालन करीत राहा, आणि (अल्लाहच्या मार्गात) दान करीत राहा, जे तुमच्यासाठी अधिक चांगले आहे आणि जे लोक आपल्या मनाच्या लालसेपासून सुरक्षित ठेवले गेले, तेच सफल आहेत |
إِن تُقْرِضُوا اللَّهَ قَرْضًا حَسَنًا يُضَاعِفْهُ لَكُمْ وَيَغْفِرْ لَكُمْ ۚ وَاللَّهُ شَكُورٌ حَلِيمٌ (17) १७. जर तुम्ही अल्लाहला चांगले कर्ज द्याल (अर्थात त्याच्या मार्गात खर्च कराल) तर तो ते तुमच्यासाठी वाढवित जाईल आणि तुमचे अपराधही माफ करील. आणि अल्लाह मोठा कदर करणारा आणि सहन करणारा आहे |
عَالِمُ الْغَيْبِ وَالشَّهَادَةِ الْعَزِيزُ الْحَكِيمُ (18) १८. तो लपलेल्या आणि उघड गोष्टी जाणणारा, जबरदस्त व हिकमतशाली आहे |