اقْرَأْ بِاسْمِ رَبِّكَ الَّذِي خَلَقَ (1) १. पठण करा आपल्या पालनकर्त्याच्या नावाने, ज्याने निर्माण केले |
خَلَقَ الْإِنسَانَ مِنْ عَلَقٍ (2) २. ज्याने मानवाला रक्ताच्या लोथड्या (गोळ्या) पासून निर्माण केले |
اقْرَأْ وَرَبُّكَ الْأَكْرَمُ (3) ३. तुम्ही पठण करीत राहा तुमचा पालनकर्ता मोठा कृपाशील आहे |
الَّذِي عَلَّمَ بِالْقَلَمِ (4) ४. ज्याने लेखणीद्वारे (ज्ञान) शिकविले |
عَلَّمَ الْإِنسَانَ مَا لَمْ يَعْلَمْ (5) ५. ज्याने माणसाला ते शिकविले, जे तो जाणत नव्हता |
كَلَّا إِنَّ الْإِنسَانَ لَيَطْغَىٰ (6) ६. खरोखर मनुष्य तर स्वतःवर काबू ठेवत नाही |
أَن رَّآهُ اسْتَغْنَىٰ (7) ७. अशासाठी की तो स्वतःला निश्चिंत (किंवा श्रीमंत) समजतो |
إِنَّ إِلَىٰ رَبِّكَ الرُّجْعَىٰ (8) ८. निःसंशय, तुमच्या पालनकर्त्याकडेच परत जायचे आहे |
أَرَأَيْتَ الَّذِي يَنْهَىٰ (9) ९. (बरे) त्यालाही तुम्ही पाहिले, जो (एका दासाला) रोखतो |
عَبْدًا إِذَا صَلَّىٰ (10) १०. वास्तिवक तो दास नमाज अदा करतो |
أَرَأَيْتَ إِن كَانَ عَلَى الْهُدَىٰ (11) ११. आता तुम्हीच सांगा जर तो सन्मार्गावर असेल |
أَوْ أَمَرَ بِالتَّقْوَىٰ (12) १२. किंवा अल्लाहचे भय राखून वागण्याचा आदेश देत असेल |
أَرَأَيْتَ إِن كَذَّبَ وَتَوَلَّىٰ (13) १३. बरे पाहा तर, जर हा खोटे ठरवित असेल आणि तोंड फिरवित असेल |
أَلَمْ يَعْلَم بِأَنَّ اللَّهَ يَرَىٰ (14) १४. काय हा हे नाही जाणत की सर्वश्रेष्ठ अल्लाह त्याला चांगल्या प्रकारे पाहात आहे |
كَلَّا لَئِن لَّمْ يَنتَهِ لَنَسْفَعًا بِالنَّاصِيَةِ (15) १५. निश्चितच, जर त्याने आपले वाईट वर्तन सोडले नाही तर आम्ही त्याच्या माथ्यावरचे केस धरून त्याला फरफटत ओढू |
نَاصِيَةٍ كَاذِبَةٍ خَاطِئَةٍ (16) १६. असा माथा जो खोटा व गुन्हेगार आहे |
فَلْيَدْعُ نَادِيَهُ (17) १७. त्याने आपल्या बैठकीतल्या लोकांना बोलावून घ्यावे |
سَنَدْعُ الزَّبَانِيَةَ (18) १८. आम्हीही जहन्नमच्या रक्षकांना बोलावून घेऊ |
كَلَّا لَا تُطِعْهُ وَاسْجُدْ وَاقْتَرِب ۩ (19) १९. खबरदार! त्याचे म्हणणे मुळीच मान्य करू नका आणि सजदा करा व (अल्लाहशी) निकट व्हा |