عَبَسَ وَتَوَلَّىٰ (1) १. त्याने तोंड आंबट केले आणि तोंड फिरविले |
أَن جَاءَهُ الْأَعْمَىٰ (2) २. (केवळ अशासाठी) की त्याच्याजवळ एक आंधळा आला |
وَمَا يُدْرِيكَ لَعَلَّهُ يَزَّكَّىٰ (3) ३. तुम्हाला काय माहीत, कदाचित तो सुधारला असता |
أَوْ يَذَّكَّرُ فَتَنفَعَهُ الذِّكْرَىٰ (4) ४. किंवा त्याने उपदेश ऐकला असता आणि त्याला उपदेश लाभदायक ठरला असता |
أَمَّا مَنِ اسْتَغْنَىٰ (5) ५. (परंतु) जो बेपर्वाईने वागतो |
فَأَنتَ لَهُ تَصَدَّىٰ (6) ६. त्याच्याकडे तर तुम्ही पुरेपूर लक्ष देत आहात |
وَمَا عَلَيْكَ أَلَّا يَزَّكَّىٰ (7) ७. वास्तविक त्याच्या न सुधारण्याने तुमची काहीच हानी नाही |
وَأَمَّا مَن جَاءَكَ يَسْعَىٰ (8) ८. आणि जो मनुष्य तुमच्याजवळ धावत येतो |
وَهُوَ يَخْشَىٰ (9) ९. आणि तो भीत (ही) आहे |
فَأَنتَ عَنْهُ تَلَهَّىٰ (10) १०. तर त्याच्याशी तुम्ही उपेक्षावृत्ती दाखविता |
كَلَّا إِنَّهَا تَذْكِرَةٌ (11) ११. हे योग्य नाही.१ कुरआन तर बोध (दायक वस्तू) आहे |
فَمَن شَاءَ ذَكَرَهُ (12) १२. ज्याची इच्छा होईल (त्याने) यापासून बोध घ्यावा |
فِي صُحُفٍ مُّكَرَّمَةٍ (13) १३. (हा तर) आदर-सन्मान पूर्ण ग्रंथांमध्ये आहे |
مَّرْفُوعَةٍ مُّطَهَّرَةٍ (14) १४. जे उच्चतम व पवित्र आणि स्वच्छ शुद्ध आहेत |
بِأَيْدِي سَفَرَةٍ (15) १५. अशा लिहिणाऱ्यांच्या हातात आहे |
كِرَامٍ بَرَرَةٍ (16) १६. जे उच्च दर्जाचे पवित्र आहेत |
قُتِلَ الْإِنسَانُ مَا أَكْفَرَهُ (17) १७. अल्लाहची मार असो मानवावर, कसा कृतघ्न आहे |
مِنْ أَيِّ شَيْءٍ خَلَقَهُ (18) १८. याला (अल्लाहने) कोणत्या वस्तूपासून निर्माण केले |
مِن نُّطْفَةٍ خَلَقَهُ فَقَدَّرَهُ (19) १९. (याला) एका वीर्यबिंदूपासून मग अनुमानावर राखले त्याला |
ثُمَّ السَّبِيلَ يَسَّرَهُ (20) २०. मग त्याच्यासाठी मार्ग सोपा केला |
ثُمَّ أَمَاتَهُ فَأَقْبَرَهُ (21) २१. मग त्याला मरण दिले आणि मग कबरीत गाडले |
ثُمَّ إِذَا شَاءَ أَنشَرَهُ (22) २२. मग जेव्हा इच्छा होईल, त्याला जिवंत करील |
كَلَّا لَمَّا يَقْضِ مَا أَمَرَهُ (23) २३. मुळीच नाही. त्याने आतापर्यंत अल्लाहच्या आदेशाचे पालन केले नाही |
فَلْيَنظُرِ الْإِنسَانُ إِلَىٰ طَعَامِهِ (24) २४. माणसाने आपल्या भोजनावर नजर टाकली पाहिजे |
أَنَّا صَبَبْنَا الْمَاءَ صَبًّا (25) २५. की आम्ही भरपूर पाणी वर्षविले |
ثُمَّ شَقَقْنَا الْأَرْضَ شَقًّا (26) २६. मग जमिनीला चांगल्या प्रकारे फाडले |
فَأَنبَتْنَا فِيهَا حَبًّا (27) २७. मग तिच्यातून अन्न (धान्य) उगविले |
وَعِنَبًا وَقَضْبًا (28) २८. आणि द्राक्ष व भाजीपाला |
وَزَيْتُونًا وَنَخْلًا (29) २९. आणि जैतून व खजूर |
وَحَدَائِقَ غُلْبًا (30) ३०. आणि घनदाट बागा |
وَفَاكِهَةً وَأَبًّا (31) ३१. आणि मेवे व (गवत) चारा (देखील उगविला) |
مَّتَاعًا لَّكُمْ وَلِأَنْعَامِكُمْ (32) ३२. तुमच्या वापराकरिता व फायद्याकरिता आणि तुमच्या चार पायांच्या जनावरांकरिता |
فَإِذَا جَاءَتِ الصَّاخَّةُ (33) ३३. मग जेव्हा कान बधीर करून टाकणारी (कयामत) येईल |
يَوْمَ يَفِرُّ الْمَرْءُ مِنْ أَخِيهِ (34) ३४. त्या दिवशी माणूस पळ काढील आपल्या भावापासून |
وَأُمِّهِ وَأَبِيهِ (35) ३५. आणि आपल्या माता व पित्यापासून |
وَصَاحِبَتِهِ وَبَنِيهِ (36) ३६. आणि आपल्या पत्नी व आपल्या संततीपासून |
لِكُلِّ امْرِئٍ مِّنْهُمْ يَوْمَئِذٍ شَأْنٌ يُغْنِيهِ (37) ३७. त्यांच्यापैकी प्रत्येकाला त्या दिवशी अशी चिंता (लागून) राहील, जी त्याला (व्यस्त राखण्या) साठी पुरेशी असेल |
وُجُوهٌ يَوْمَئِذٍ مُّسْفِرَةٌ (38) ३८. त्या दिवशी अनेक चेहरे उज्वल असतील |
ضَاحِكَةٌ مُّسْتَبْشِرَةٌ (39) ३९. (जे) हसत आणि आनंदित असतील |
وَوُجُوهٌ يَوْمَئِذٍ عَلَيْهَا غَبَرَةٌ (40) ४०. आणि बहुतेक चेहरे त्या दिवशी धुळीने माखलेले असतील |
تَرْهَقُهَا قَتَرَةٌ (41) ४१. त्यांच्यावर काळिमा आच्छादित असेल |
أُولَٰئِكَ هُمُ الْكَفَرَةُ الْفَجَرَةُ (42) ४२. हे तेच इन्कारी, दुराचारी लोक असतील |