وَاللَّيْلِ إِذَا يَغْشَىٰ (1) १. शपथ आहे रात्रीची जेव्हा ती पसरते |
وَالنَّهَارِ إِذَا تَجَلَّىٰ (2) २. आणि शपथ आहे दिवसाची जेव्हा तो प्रकाशमान होतो |
وَمَا خَلَقَ الذَّكَرَ وَالْأُنثَىٰ (3) ३. आणि शपथ आहे त्याची ज्याने नर व मादी निर्माण केले |
إِنَّ سَعْيَكُمْ لَشَتَّىٰ (4) ४. निःसंशय, तुमचे प्रयत्न वेगवेगळ्या प्रकारचे आहेत |
فَأَمَّا مَنْ أَعْطَىٰ وَاتَّقَىٰ (5) ५. तर जो (अल्लाहच्या मार्गात) देत राहिला आणि भय बाळगत राहिला |
وَصَدَّقَ بِالْحُسْنَىٰ (6) ६. आणि भलाईपूर्ण गोष्टीचे सत्य-समर्थन करीत राहिला |
فَسَنُيَسِّرُهُ لِلْيُسْرَىٰ (7) ७. तर आम्हीही त्याला सहज सुलभता प्रदान करू |
وَأَمَّا مَن بَخِلَ وَاسْتَغْنَىٰ (8) ८. परंतु ज्याने कंजूसी केली आणि बेपर्वाई दाखविली |
وَكَذَّبَ بِالْحُسْنَىٰ (9) ९. आणि सत्कर्माच्या गोष्टींना खोटे ठरविले |
فَسَنُيَسِّرُهُ لِلْعُسْرَىٰ (10) १०. तर आम्हीही त्याच्यासाठी तंगी अडचणीची सामुग्री उपलब्ध करू |
وَمَا يُغْنِي عَنْهُ مَالُهُ إِذَا تَرَدَّىٰ (11) ११. त्याची धन-संपत्ती त्याला (तोंडघशी) पडतेवेळी काहीच उपयोगी पडणार नाही |
إِنَّ عَلَيْنَا لَلْهُدَىٰ (12) १२. निःसंशय, मार्ग दाखविण्याची जबाबदारी आमची आहे |
وَإِنَّ لَنَا لَلْآخِرَةَ وَالْأُولَىٰ (13) १३. आणि आमच्याच हाती आखिरत आणि ही दुनिया आहे |
فَأَنذَرْتُكُمْ نَارًا تَلَظَّىٰ (14) १४. मी तर तुम्हाला अंगारे(निखारे) मारणाऱ्या आगीपासून भयभीत केले आहे |
لَا يَصْلَاهَا إِلَّا الْأَشْقَى (15) १५. जिच्यात फक्त तोच कमनशिबी दाखल होईल |
الَّذِي كَذَّبَ وَتَوَلَّىٰ (16) १६. ज्याने खोटे ठरविले आणि (याचे अनुसरण करण्यापासून) तोंड फिरविले |
وَسَيُجَنَّبُهَا الْأَتْقَى (17) १७. आणि या (आगी) पासून असा मनुष्य दूर ठेवला जाईल, जो अल्लाहचे मोठे भय राखून वागणारा असेल |
الَّذِي يُؤْتِي مَالَهُ يَتَزَكَّىٰ (18) १८. जो स्वच्छ शुद्धता (पाकी) प्राप्त करण्यासाठी आपले धन देतो |
وَمَا لِأَحَدٍ عِندَهُ مِن نِّعْمَةٍ تُجْزَىٰ (19) १९. कोणाचा त्याच्यावर काही उपकार नाही की ज्याची फेड केली जात असावी |
إِلَّا ابْتِغَاءَ وَجْهِ رَبِّهِ الْأَعْلَىٰ (20) २०. किंबहुना, केवळ आपल्या अतिउच्च व सर्वश्रेष्ठ पालनकर्त्याची प्रसन्नता प्राप्त करण्याकरिता |
وَلَسَوْفَ يَرْضَىٰ (21) २१. निःसंशय, तो (अल्लाह देखील) लवकरच राजी होईल |