لَا أُقْسِمُ بِيَوْمِ الْقِيَامَةِ (1) १. मी शपथ घेतो कयामतच्या दिवसाची |
وَلَا أُقْسِمُ بِالنَّفْسِ اللَّوَّامَةِ (2) २. आणि मी शपथ घेतो, धिःक्कार करणाऱ्या मना (आत्म्या) ची |
أَيَحْسَبُ الْإِنسَانُ أَلَّن نَّجْمَعَ عِظَامَهُ (3) ३. काय मनुष्य असा विचार करतो की आम्ही त्याची हाडे एकत्र करणारच नाहीत |
بَلَىٰ قَادِرِينَ عَلَىٰ أَن نُّسَوِّيَ بَنَانَهُ (4) ४. होय अवश्य करू, आम्हाला सामर्थ्य आहे की त्याच्या बोटांचे एक एक पेर ठीक करावे |
بَلْ يُرِيدُ الْإِنسَانُ لِيَفْجُرَ أَمَامَهُ (5) ५. परंतु मनुष्य तर इच्छितो की पुढे अवज्ञा आणि अवहेलना करीत राहावे |
يَسْأَلُ أَيَّانَ يَوْمُ الْقِيَامَةِ (6) ६. विचारतो की कयामतचा दिवस केव्हा येईल |
فَإِذَا بَرِقَ الْبَصَرُ (7) ७. तर जेव्हा डोळे जडवत होतील |
وَخَسَفَ الْقَمَرُ (8) ८. आणि चंद्र निस्तेज होईल |
وَجُمِعَ الشَّمْسُ وَالْقَمَرُ (9) ९. आणि सूर्य व चंद्र एकत्र केले जातील |
يَقُولُ الْإِنسَانُ يَوْمَئِذٍ أَيْنَ الْمَفَرُّ (10) १०. त्या दिवशी मनुष्य म्हणेल की आज पळून जाण्यास जागा कोठे आहे |
كَلَّا لَا وَزَرَ (11) ११. नाही नाही, आश्रय घेण्याचे कोणतेही ठिकाण नाही |
إِلَىٰ رَبِّكَ يَوْمَئِذٍ الْمُسْتَقَرُّ (12) १२. आज तर तुझ्या पालनकर्त्याकडेच (आश्रयाचे) ठिकाण आहे |
يُنَبَّأُ الْإِنسَانُ يَوْمَئِذٍ بِمَا قَدَّمَ وَأَخَّرَ (13) १३. आज माणसाला, त्याने जे काही पुढे पाठविले आणि जे काही मागे सोडले, त्याविषयी अवगत करून दिले जाईल |
بَلِ الْإِنسَانُ عَلَىٰ نَفْسِهِ بَصِيرَةٌ (14) १४. किंबहुना मनुष्य स्वतःच स्वतःवर प्रमाण आहे |
وَلَوْ أَلْقَىٰ مَعَاذِيرَهُ (15) १५. मग तो कितीही सबबी सादर करीत असला तरी |
لَا تُحَرِّكْ بِهِ لِسَانَكَ لِتَعْجَلَ بِهِ (16) १६. (हे पैगंबर!) तुम्ही कुरआनास त्वरित तोंडी पाठ करण्यासाठी आपल्या जीभेला (घाईने) हलवू नका |
إِنَّ عَلَيْنَا جَمْعَهُ وَقُرْآنَهُ (17) १७. त्यास एकत्र करणे आणि (तुमच्या तोंडून) पठण करविणे आमची जबाबदारी आहे |
فَإِذَا قَرَأْنَاهُ فَاتَّبِعْ قُرْآنَهُ (18) १८. (यास्तव) आम्ही जेव्हा त्याचे पठण संपवू तेव्हा तुम्ही त्याच्या पठणाचे अनुसरण करा |
ثُمَّ إِنَّ عَلَيْنَا بَيَانَهُ (19) १९. त्यास स्पष्ट करणे आमचे काम आहे |
كَلَّا بَلْ تُحِبُّونَ الْعَاجِلَةَ (20) २०. नव्हे, तुम्ही तर लवकर प्राप्त होणाऱ्या (जगा) शी प्रेम राखता |
وَتَذَرُونَ الْآخِرَةَ (21) २१. आणि आखिरतला सोडून बसला आहात |
وُجُوهٌ يَوْمَئِذٍ نَّاضِرَةٌ (22) २२. त्या दिवशी अनेक चेहरे ताजे टवटवीत (व तेजस्वी) असतील |
إِلَىٰ رَبِّهَا نَاظِرَةٌ (23) २३. आपल्या पालनकर्त्याकडे पाहत असतील |
وَوُجُوهٌ يَوْمَئِذٍ بَاسِرَةٌ (24) २४. आणि कित्येक चेहरे त्या दिवशी (कुरुप आणि) उदास असतील |
تَظُنُّ أَن يُفْعَلَ بِهَا فَاقِرَةٌ (25) २५. समजत असतील की त्यांच्याशी कंबर तोडणारा व्यवहार केला जाईल |
كَلَّا إِذَا بَلَغَتِ التَّرَاقِيَ (26) २६. नाही नाही जेव्हा (प्राण) कंठाशी पोहचतील |
وَقِيلَ مَنْ ۜ رَاقٍ (27) २७. आणि सांगितले जाईल की कोणी झाड फुंक (तंत्र मंत्र) करणारा आहे |
وَظَنَّ أَنَّهُ الْفِرَاقُ (28) २८. आणि त्याने खात्री केली की ही वियोगाची वेळ आहे |
وَالْتَفَّتِ السَّاقُ بِالسَّاقِ (29) २९. आणि पोटरीशी पोटरी बिलगेल |
إِلَىٰ رَبِّكَ يَوْمَئِذٍ الْمَسَاقُ (30) ३०. आज तुझ्या पालनकर्त्याकडे जायचे आहे |
فَلَا صَدَّقَ وَلَا صَلَّىٰ (31) ३१. तेव्हा त्याने ना तर समर्थन केले, ना नमाज अदा केली |
وَلَٰكِن كَذَّبَ وَتَوَلَّىٰ (32) ३२. उलट खोटे ठरविले आणि विमुख झाला |
ثُمَّ ذَهَبَ إِلَىٰ أَهْلِهِ يَتَمَطَّىٰ (33) ३३. मग आपल्या कुटुंबियांकडे तोऱ्यात गेला |
أَوْلَىٰ لَكَ فَأَوْلَىٰ (34) ३४. खेद आहे तुझ्याबद्दल! पश्चात्ताप आहे तुझ्यावर |
ثُمَّ أَوْلَىٰ لَكَ فَأَوْلَىٰ (35) ३५. पुन्हा दुःख आहे आणि दुर्दशा आहे तुझ्यासाठी |
أَيَحْسَبُ الْإِنسَانُ أَن يُتْرَكَ سُدًى (36) ३६. काय मनुष्य असे समजतो की त्याला व्यर्थ असे सोडून दिले जाईल |
أَلَمْ يَكُ نُطْفَةً مِّن مَّنِيٍّ يُمْنَىٰ (37) ३७. काय तो एक गाढ पाण्याचा थेंब नव्हता, जो टपकविला जातो |
ثُمَّ كَانَ عَلَقَةً فَخَلَقَ فَسَوَّىٰ (38) ३८. मग तो रक्ताचा गोळा बनला, मग (अल्लाहने) त्याला निर्माण केले आणि योग्यरित्या बनविले |
فَجَعَلَ مِنْهُ الزَّوْجَيْنِ الذَّكَرَ وَالْأُنثَىٰ (39) ३९. मग त्यापासून जोडी अर्थात नर-मादा बनविले |
أَلَيْسَ ذَٰلِكَ بِقَادِرٍ عَلَىٰ أَن يُحْيِيَ الْمَوْتَىٰ (40) ४०. काय (अल्लाह) या गोष्टी समर्थ नाही की मेलेल्यास जिवंत करावं |