سَبَّحَ لِلَّهِ مَا فِي السَّمَاوَاتِ وَمَا فِي الْأَرْضِ ۖ وَهُوَ الْعَزِيزُ الْحَكِيمُ (1) १. आकाशांची आणि धरतीची प्रत्येक वस्तू अल्लाहच्या पवित्रतेचे गुणगान करते आणि तोच वर्चस्वशाली आणि हिकमत बाळगणारा आहे |
يَا أَيُّهَا الَّذِينَ آمَنُوا لِمَ تَقُولُونَ مَا لَا تَفْعَلُونَ (2) २. हे ईमान राखणाऱ्यांनो! तुम्ही ती गोष्ट का सांगता, जी (स्वतः) करीत नाही |
كَبُرَ مَقْتًا عِندَ اللَّهِ أَن تَقُولُوا مَا لَا تَفْعَلُونَ (3) ३. तुम्ही जे करीत नाही ते बोलणे अल्लाहला नापसंत आहे |
إِنَّ اللَّهَ يُحِبُّ الَّذِينَ يُقَاتِلُونَ فِي سَبِيلِهِ صَفًّا كَأَنَّهُم بُنْيَانٌ مَّرْصُوصٌ (4) ४. निःसंशय, अल्लाह त्या लोकांना प्रिय राखतो, जे त्याच्या मार्गात पंक्तिबद्ध (रांगारांगांनी) होऊन जिहाद करतात, जणू ते शिसा पाजलेली इमारत होय |
وَإِذْ قَالَ مُوسَىٰ لِقَوْمِهِ يَا قَوْمِ لِمَ تُؤْذُونَنِي وَقَد تَّعْلَمُونَ أَنِّي رَسُولُ اللَّهِ إِلَيْكُمْ ۖ فَلَمَّا زَاغُوا أَزَاغَ اللَّهُ قُلُوبَهُمْ ۚ وَاللَّهُ لَا يَهْدِي الْقَوْمَ الْفَاسِقِينَ (5) ५. आणि (स्मरण करा) जेव्हा मूसाने आपल्या समुदायाच्या लोकांना म्हटले की हे माझ्या जनसमूहाच्या लोकांनो! तुम्ही मला क्लेश यातना का देत आहात, वास्तविक तुम्हाला चांगले माहीत आहे की मी तुमच्याकडे अल्लाहचा रसूल (पैगंबर) आहे. तर जेव्हा ते लोक वाकडेच राहिले तेव्हा अल्लाहने त्यांच्या हृदयांना आणखी वाकडे करून टाकले, आणि अल्लाह अवज्ञाकारी जनसमूहाला मार्ग दाखवित नाही |
وَإِذْ قَالَ عِيسَى ابْنُ مَرْيَمَ يَا بَنِي إِسْرَائِيلَ إِنِّي رَسُولُ اللَّهِ إِلَيْكُم مُّصَدِّقًا لِّمَا بَيْنَ يَدَيَّ مِنَ التَّوْرَاةِ وَمُبَشِّرًا بِرَسُولٍ يَأْتِي مِن بَعْدِي اسْمُهُ أَحْمَدُ ۖ فَلَمَّا جَاءَهُم بِالْبَيِّنَاتِ قَالُوا هَٰذَا سِحْرٌ مُّبِينٌ (6) ६. आणि जेव्हा मरियमचे पुत्र ईसा म्हणाले, हे (माझ्या लोकांनो!) इस्राईलची संतती! मी तुम्हा सर्वांकडे अल्लाहचा रसूल (पैगंबर) आहे, माझ्या पूर्वीचा ग्रंथ तौरातचे समर्थन करणारा आहे आणि आपल्यानंतर येणाऱ्या एका पैगंबराची खूशखबर ऐकविणारा आहे, ज्यांचे नाव अहमद आहे. मग जेव्हा ते त्यांच्यासमोर स्पष्ट निशाण्या घेऊन आले, तेव्हा ते म्हणू लागले की ही तर उघड जादू आहे |
وَمَنْ أَظْلَمُ مِمَّنِ افْتَرَىٰ عَلَى اللَّهِ الْكَذِبَ وَهُوَ يُدْعَىٰ إِلَى الْإِسْلَامِ ۚ وَاللَّهُ لَا يَهْدِي الْقَوْمَ الظَّالِمِينَ (7) ७. आणि त्या माणसाहून अधिक अत्याचारी कोण असेल, जो अल्लाहबद्दल असत्य रचेल? वास्तविक त्याला इस्लामकडे बोलाविले जाते. आणि अल्लाह अशा अत्याचारी लोकांना मार्गदर्शन करीत नाही |
يُرِيدُونَ لِيُطْفِئُوا نُورَ اللَّهِ بِأَفْوَاهِهِمْ وَاللَّهُ مُتِمُّ نُورِهِ وَلَوْ كَرِهَ الْكَافِرُونَ (8) ८. अल्लाहच्या दिव्य तेजाला (नूरला) ते आपल्या फुंकीन विझवू इच्छितात. आणि अल्लाह आपले दिव्य तेच उच्च पदांपर्यंत घेऊन जाणारा आहे, मग इन्कार करणाऱ्या (काफिरांना) कितीही वाईट वाटो |
هُوَ الَّذِي أَرْسَلَ رَسُولَهُ بِالْهُدَىٰ وَدِينِ الْحَقِّ لِيُظْهِرَهُ عَلَى الدِّينِ كُلِّهِ وَلَوْ كَرِهَ الْمُشْرِكُونَ (9) ९. तोच आहे ज्याने आपल्या पैगंबराला मार्गदर्शन आणि सत्य धर्म देऊन पाठविले, यासाठी की त्यास अन्य सर्व धर्मांवर वर्चस्वशाली करावे, मग अनेक ईश्वरांची भक्ती-उपासना करणाऱ्यांना कितीही अप्रिय वाटो |
يَا أَيُّهَا الَّذِينَ آمَنُوا هَلْ أَدُلُّكُمْ عَلَىٰ تِجَارَةٍ تُنجِيكُم مِّنْ عَذَابٍ أَلِيمٍ (10) १०. हे ईमान राखणाऱ्यांनो! काय मी तुम्हाला तो व्यापार दाखवू जो तुम्हाला कष्ट यातनादायक शिक्षा-यातनेपासून वाचविल.१ |
تُؤْمِنُونَ بِاللَّهِ وَرَسُولِهِ وَتُجَاهِدُونَ فِي سَبِيلِ اللَّهِ بِأَمْوَالِكُمْ وَأَنفُسِكُمْ ۚ ذَٰلِكُمْ خَيْرٌ لَّكُمْ إِن كُنتُمْ تَعْلَمُونَ (11) ११. अल्लाह आणि त्याच्या पैगंबरावर ईमान राखा आणि अल्लाहच्या मार्गात आपल्या तन, मन आणि धनाने जिहाद करा, हे तुमच्यासाठी अधिक चांगले आहे जर तुम्ही ज्ञान बाळगत असाल |
يَغْفِرْ لَكُمْ ذُنُوبَكُمْ وَيُدْخِلْكُمْ جَنَّاتٍ تَجْرِي مِن تَحْتِهَا الْأَنْهَارُ وَمَسَاكِنَ طَيِّبَةً فِي جَنَّاتِ عَدْنٍ ۚ ذَٰلِكَ الْفَوْزُ الْعَظِيمُ (12) १२. अल्लाह तुमचे अपराध माफ करील आणि तुम्हाला त्या जन्नतींमध्ये दाखल करील ज्यांच्या खाली प्रवाह वाहत असतील आणि स्वच्छ शुद्ध घरांमध्ये, जे ‘अदन’च्या जन्नतमध्ये असतील. ही फार मोठी सफलता आहे |
وَأُخْرَىٰ تُحِبُّونَهَا ۖ نَصْرٌ مِّنَ اللَّهِ وَفَتْحٌ قَرِيبٌ ۗ وَبَشِّرِ الْمُؤْمِنِينَ (13) १३. आणि तुम्हाला एक दुसरी देणगीही प्रदान करील, जी तुम्ही इच्छिता, ती आहे अल्लाहची मदत आणि लवकरच प्राप्त होणारा विजय आणि ईमान राखणाऱ्यांना खूशखबर द्या |
يَا أَيُّهَا الَّذِينَ آمَنُوا كُونُوا أَنصَارَ اللَّهِ كَمَا قَالَ عِيسَى ابْنُ مَرْيَمَ لِلْحَوَارِيِّينَ مَنْ أَنصَارِي إِلَى اللَّهِ ۖ قَالَ الْحَوَارِيُّونَ نَحْنُ أَنصَارُ اللَّهِ ۖ فَآمَنَت طَّائِفَةٌ مِّن بَنِي إِسْرَائِيلَ وَكَفَرَت طَّائِفَةٌ ۖ فَأَيَّدْنَا الَّذِينَ آمَنُوا عَلَىٰ عَدُوِّهِمْ فَأَصْبَحُوا ظَاهِرِينَ (14) १४. हे ईमान राखणाऱ्यांनो! तुम्ही अल्लाहचे सहाय्यक बना,१ ज्याप्रमाणे (हजरत) मरियमचे पुत्र (हजरत) ईसा यांनी हवारींना (मित्रांना) सांगितले, कोण आहे जो अल्लाहच्या मार्गात माझा मदतनीस बनेल? (त्यांचे) मित्र म्हणाले की, आम्ही अल्लाहच्या मार्गात मदतनीस आहोत. तेव्हा इस्राईलच्या संततीपैकी एका गटाने तर ईमान राखले आणि एका गटाने कुप्र (इन्कार) केला,२ तर आम्ही ईमान राखणाऱ्यांना त्यांच्या शत्रूंच्या |