وَالنَّازِعَاتِ غَرْقًا (1) १. बुडून कठोरतापूर्वक खेचणाऱ्यांची शपथ.१ |
وَالنَّاشِطَاتِ نَشْطًا (2) २. बंधन उकलून सोडविणाऱ्यांची शपथ |
وَالسَّابِحَاتِ سَبْحًا (3) ३. आणि पोहणाऱ्या फिरणाऱ्यांची शपथ. १ |
فَالسَّابِقَاتِ سَبْقًا (4) ४. मग धावत पुढे जाणाऱ्यांची शपथ |
فَالْمُدَبِّرَاتِ أَمْرًا (5) ५. मग कार्याची योजना करणाऱ्यांची शपथ |
يَوْمَ تَرْجُفُ الرَّاجِفَةُ (6) ६. ज्या दिवशी थरथर कांपणारी थरथर कांपेल |
تَتْبَعُهَا الرَّادِفَةُ (7) ७. त्यानंतर एक मागे येणारी (मागोमाग) येईल |
قُلُوبٌ يَوْمَئِذٍ وَاجِفَةٌ (8) ८. (अनेक) हृदय त्या दिवशी धडधड करतील |
أَبْصَارُهَا خَاشِعَةٌ (9) ९. ज्यांच्या नजरा खाली असतील |
يَقُولُونَ أَإِنَّا لَمَرْدُودُونَ فِي الْحَافِرَةِ (10) १०. असे म्हणतात की, काय आम्हाला पहिल्यासारख्या अवस्थेकडे पुन्हा परतविले जाईल |
أَإِذَا كُنَّا عِظَامًا نَّخِرَةً (11) ११. काय अशा वेळी की जेव्हा आम्ही अगदी जीर्णशीर्ण हाडे होऊन जाऊ |
قَالُوا تِلْكَ إِذًا كَرَّةٌ خَاسِرَةٌ (12) १२. म्हणतात की मग तर हे परतणे नुकसानदायक आहे. (माहीत असले पाहिजे) |
فَإِنَّمَا هِيَ زَجْرَةٌ وَاحِدَةٌ (13) १३. की ती तर केवळ एक (भयानक) दरडावणी आहे |
فَإِذَا هُم بِالسَّاهِرَةِ (14) १४. (जी दिली जाताच) ते एकदम मैदानात जमा होतील |
هَلْ أَتَاكَ حَدِيثُ مُوسَىٰ (15) १५. काय, मूसा (अलैहिस्सलाम) चा वृत्तांत तुम्हास पोहचला आहे |
إِذْ نَادَاهُ رَبُّهُ بِالْوَادِ الْمُقَدَّسِ طُوًى (16) १६. जेव्हा त्यांना त्यांच्या पालनकर्त्याने तूवाच्या पवित्र मैदानात पुकारले |
اذْهَبْ إِلَىٰ فِرْعَوْنَ إِنَّهُ طَغَىٰ (17) १७. (की) तुम्ही फिरऔनजवळ जा, त्याने बंडखोरी (उदंडता) अंगीकारली आहे |
فَقُلْ هَل لَّكَ إِلَىٰ أَن تَزَكَّىٰ (18) १८. त्याला सांगा की, काय तू स्वतःची दुरुस्ती आणि सुधारणा इच्छितो |
وَأَهْدِيَكَ إِلَىٰ رَبِّكَ فَتَخْشَىٰ (19) १९. आणि हे की मी तुला तुझ्या पालनकर्त्याचा मार्ग दाखवू यासाठी की तू (त्याचे) भय बाळगू लागावे |
فَأَرَاهُ الْآيَةَ الْكُبْرَىٰ (20) २०. तेव्हा त्याला मोठी निशाणी दाखविली |
فَكَذَّبَ وَعَصَىٰ (21) २१. तर त्याने खोटे ठरविले आणि अवज्ञा केली |
ثُمَّ أَدْبَرَ يَسْعَىٰ (22) २२. मग पुन्हा परतला प्रयत्न करीत१ |
فَحَشَرَ فَنَادَىٰ (23) २३. मग सर्वांना एकत्र करून उंच स्वरात ऐलान केले |
فَقَالَ أَنَا رَبُّكُمُ الْأَعْلَىٰ (24) २४. म्हणाला, तुम्हा सर्वांचा पालनहार मीच आहे |
فَأَخَذَهُ اللَّهُ نَكَالَ الْآخِرَةِ وَالْأُولَىٰ (25) २५. तेव्हा (सर्वोच्च व सर्वश्रेष्ठ) अल्लाहने देखील त्याला आखिरत (मरणोत्तर जीवना) च्या आणि या जगाच्या शिक्षा - यातनेत घेरले |
إِنَّ فِي ذَٰلِكَ لَعِبْرَةً لِّمَن يَخْشَىٰ (26) २६. निःसंशय, यात त्या माणसाकरिता बोध आहे, जो भय राखील |
أَأَنتُمْ أَشَدُّ خَلْقًا أَمِ السَّمَاءُ ۚ بَنَاهَا (27) २७. काय तुम्हाला निर्माण करणे अधिक कठीण आहे किंवा आकाशाला? सर्वश्रेष्ठ अल्लाहने त्याला निर्माण केले |
رَفَعَ سَمْكَهَا فَسَوَّاهَا (28) २८. त्याची उंची वाढविली, मग त्याला यथायोग्य केले |
وَأَغْطَشَ لَيْلَهَا وَأَخْرَجَ ضُحَاهَا (29) २९. आणि त्याच्या रात्रीला अंधकारपूर्ण बनविले आणि त्याच्या दिवसाला प्रकट केले |
وَالْأَرْضَ بَعْدَ ذَٰلِكَ دَحَاهَا (30) ३०. आणि त्यानंतर जमिनीला (समतल) बिछविले |
أَخْرَجَ مِنْهَا مَاءَهَا وَمَرْعَاهَا (31) ३१. त्यातून पाणी आणि चारा काढला |
وَالْجِبَالَ أَرْسَاهَا (32) ३२. आणि पर्वतांना (मजबूत) रोवले |
مَتَاعًا لَّكُمْ وَلِأَنْعَامِكُمْ (33) ३३. हे सर्व तुमच्या आणि तुमच्या जनावरांच्या फायद्यासाठी (आहे) |
فَإِذَا جَاءَتِ الطَّامَّةُ الْكُبْرَىٰ (34) ३४. तर जेव्हा ते मोठे संकट (कयामत) येईल |
يَوْمَ يَتَذَكَّرُ الْإِنسَانُ مَا سَعَىٰ (35) ३५. ज्या दिवशी मनुष्य आपल्या केलेल्या कर्मांची आठवण करील |
وَبُرِّزَتِ الْجَحِيمُ لِمَن يَرَىٰ (36) ३६. आणि (प्रत्येक) पाहणाऱ्याच्या समोर जहन्नम उघडपणे आणली जाईल |
فَأَمَّا مَن طَغَىٰ (37) ३७. तेव्हा, ज्या (माणसा) ने विद्रोह अंगीकारला (असेल) |
وَآثَرَ الْحَيَاةَ الدُّنْيَا (38) ३८. आणि ऐहिक जीवनाला प्राधान्य दिले (असेल) |
فَإِنَّ الْجَحِيمَ هِيَ الْمَأْوَىٰ (39) ३९. (त्याचे) ठिकाण जहन्नमच आहे |
وَأَمَّا مَنْ خَافَ مَقَامَ رَبِّهِ وَنَهَى النَّفْسَ عَنِ الْهَوَىٰ (40) ४०. तथापि, जो मनुष्य आपल्या पालनकर्त्यासमोर उभे राहण्यापासून भीत राहिला असेल आणि आपल्या मनाला इच्छा-अभिलाषांपासून रोखले असेल |
فَإِنَّ الْجَنَّةَ هِيَ الْمَأْوَىٰ (41) ४१. तर त्याचे ठिकाण जन्नतच आहे |
يَسْأَلُونَكَ عَنِ السَّاعَةِ أَيَّانَ مُرْسَاهَا (42) ४२. लोक तुम्हाला कयामत केव्हा घडून येईल असे विचारतात |
فِيمَ أَنتَ مِن ذِكْرَاهَا (43) ४३. ते सांगण्याशी तुमचा काय संबंध |
إِلَىٰ رَبِّكَ مُنتَهَاهَا (44) ४४. तिच्या ज्ञानाची अंतिम सीमा तर अल्लाहकडे आहे |
إِنَّمَا أَنتَ مُنذِرُ مَن يَخْشَاهَا (45) ४५. तुम्ही तर फक्त तिच्याशी भयभीत राहणाऱ्यांना सावधान करणारे आहात.१ |
كَأَنَّهُمْ يَوْمَ يَرَوْنَهَا لَمْ يَلْبَثُوا إِلَّا عَشِيَّةً أَوْ ضُحَاهَا (46) ४६. ज्या दिवशी हे तिला (प्रत्यक्ष) पाहून घेतील तेव्हा असे वाटेल की केवळ दिवसाचा अंतिम भाग अथवा आरंभीचा भागच ते (या जगात) राहिलेत |