هَلْ أَتَاكَ حَدِيثُ الْغَاشِيَةِ (1) १. काय तुम्हालाही, झाकून टाकणाऱ्या (कयामत) ची वार्ता पोहचली आहे |
وُجُوهٌ يَوْمَئِذٍ خَاشِعَةٌ (2) २. त्या दिवशी बहुतेक चेहरे अपमानित असतील |
عَامِلَةٌ نَّاصِبَةٌ (3) ३. (आणि) दुःखांनी पीडित कष्ट - यातनाग्रस्त असतील |
تَصْلَىٰ نَارًا حَامِيَةً (4) ४. ते धगधगत्या आगीत जाऊन पडतील |
تُسْقَىٰ مِنْ عَيْنٍ آنِيَةٍ (5) ५. आणि अतिशय उष्ण झऱ्याचे पाणी त्यांना पाजले जाईल |
لَّيْسَ لَهُمْ طَعَامٌ إِلَّا مِن ضَرِيعٍ (6) ६. त्यांच्यासाठी काटेदार झाडांखेरीज आणखी काही खायला नसेल |
لَّا يُسْمِنُ وَلَا يُغْنِي مِن جُوعٍ (7) ७. जे ना त्यांना धष्ट पुष्ट करील, ना त्यांची भूक मिटवील |
وُجُوهٌ يَوْمَئِذٍ نَّاعِمَةٌ (8) ८. बहुतेक चेहरे त्या दिवशी प्रफुल्ल टवटवीत आणि (सुसंपन्न स्थितीत) असतील |
لِّسَعْيِهَا رَاضِيَةٌ (9) ९. आपल्या कर्मांमुळे आनंदित असतील |
فِي جَنَّةٍ عَالِيَةٍ (10) १०. उच्च (प्रतीच्या) जन्नतींमध्ये असतील |
لَّا تَسْمَعُ فِيهَا لَاغِيَةً (11) ११. जिथे कोणतीही असभ्य निरर्थक गोष्ट ऐकणार नाहीत |
فِيهَا عَيْنٌ جَارِيَةٌ (12) १२. जिथे (शीतल) झरे वाहत असतील |
فِيهَا سُرُرٌ مَّرْفُوعَةٌ (13) १३. (आणि) त्या (जन्नतीं) मध्ये उंच उंच आसने असतील |
وَأَكْوَابٌ مَّوْضُوعَةٌ (14) १४. आणि प्याले ठेवलेले (असतील) |
وَنَمَارِقُ مَصْفُوفَةٌ (15) १५. आणि एका रांगेत लावलेले तक्के असतील |
وَزَرَابِيُّ مَبْثُوثَةٌ (16) १६. आणि मऊ मखमली गालिचे पसरलेले असतील |
أَفَلَا يَنظُرُونَ إِلَى الْإِبِلِ كَيْفَ خُلِقَتْ (17) १७. काय हे उंटाकडे नाही पाहत की त्यांना कशा प्रकारे निर्माण केले गेले आहे |
وَإِلَى السَّمَاءِ كَيْفَ رُفِعَتْ (18) १८. आणि आकाशांना की कशा प्रकारे उंच केले गेले आहे |
وَإِلَى الْجِبَالِ كَيْفَ نُصِبَتْ (19) १९. आणि पर्वतांकडे, की कशा प्रकारे गाडले गेले आहेत |
وَإِلَى الْأَرْضِ كَيْفَ سُطِحَتْ (20) २०. आणि जमिनीकडे की कशा प्रकारे ती बिछविली गेली आहे |
فَذَكِّرْ إِنَّمَا أَنتَ مُذَكِّرٌ (21) २१. तर तुम्ही उपदेश करीत राहा (कारण) तुम्ही फक्त उपदेश करणारे आहात |
لَّسْتَ عَلَيْهِم بِمُصَيْطِرٍ (22) २२. तुम्ही काही यांच्यावर देखरेख ठेवणारे नाहीत |
إِلَّا مَن تَوَلَّىٰ وَكَفَرَ (23) २३. परंतु जो मनुष्य तोंड फिरवील आणि इन्कार करील |
فَيُعَذِّبُهُ اللَّهُ الْعَذَابَ الْأَكْبَرَ (24) २४. त्याला सर्वश्रेष्ठ अल्लाह फार मोठा अज़ाब (शिक्षा - यातना) देईल |
إِنَّ إِلَيْنَا إِيَابَهُمْ (25) २५. निःसंशय, त्यांना तर आमच्याचकडे परतायचे आहे |
ثُمَّ إِنَّ عَلَيْنَا حِسَابَهُم (26) २६. निःसंशय, त्यांचा हिशोब घेण्याची जबाबदारी आमची आहे |