الْحَمْدُ لِلَّهِ الَّذِي لَهُ مَا فِي السَّمَاوَاتِ وَمَا فِي الْأَرْضِ وَلَهُ الْحَمْدُ فِي الْآخِرَةِ ۚ وَهُوَ الْحَكِيمُ الْخَبِيرُ (1) १. समस्त प्रशंसा अल्लाहकरिताच आहे, जो आकाशांच्या आणि जमिनीच्या समस्त वस्तूंचा स्वामी आहे आणि आखिरतमध्येही प्रशंसा त्याच्याचकरिता आहे. तो (मोठा) हिकमतशाली आणि (पूर्णतः) जाणकार आहे |
يَعْلَمُ مَا يَلِجُ فِي الْأَرْضِ وَمَا يَخْرُجُ مِنْهَا وَمَا يَنزِلُ مِنَ السَّمَاءِ وَمَا يَعْرُجُ فِيهَا ۚ وَهُوَ الرَّحِيمُ الْغَفُورُ (2) २. जे काही जमिनीत दाखल होते आणि जे काही तिच्यातून निघते आणि जे आकाशातून अवतरित होते आणि जे चढून त्यात जाते, ते सर्व काही तो जाणतो, आणि तो मोठा दया करणारा, मोठा माफ करणारा आहे |
وَقَالَ الَّذِينَ كَفَرُوا لَا تَأْتِينَا السَّاعَةُ ۖ قُلْ بَلَىٰ وَرَبِّي لَتَأْتِيَنَّكُمْ عَالِمِ الْغَيْبِ ۖ لَا يَعْزُبُ عَنْهُ مِثْقَالُ ذَرَّةٍ فِي السَّمَاوَاتِ وَلَا فِي الْأَرْضِ وَلَا أَصْغَرُ مِن ذَٰلِكَ وَلَا أَكْبَرُ إِلَّا فِي كِتَابٍ مُّبِينٍ (3) ३. आणि काफिर म्हणतात की आमच्यावर कयामत स्थापित होणार नाही. तुम्ही सांगा, मला माझ्या पालनकर्त्याची शपथ! जो अपरोक्ष जाणणारा आहे की ती निश्चितच तुमच्यावर कायम होईल. अल्लाहपासून एका कणाइतकीही वस्तू लपलेली नाही, ना आकाशांमध्ये आणि ना धरतीत, किंबहुना त्याहूनही लहान आणि मोठी सर्व वस्तू (व गोष्टी) एका खुल्या (स्पष्ट) ग्रंथा विद्यमान आहेत |
لِّيَجْزِيَ الَّذِينَ آمَنُوا وَعَمِلُوا الصَّالِحَاتِ ۚ أُولَٰئِكَ لَهُم مَّغْفِرَةٌ وَرِزْقٌ كَرِيمٌ (4) ४. यासाठी की त्याने (अल्लाहने) ईमान राखणाऱ्या आणि सदाचारी लोकांना चांगला मोबदला प्रदान करावा. हेच ते लोक होत, ज्यांच्याकरिता क्षमा, सन्मानपूर्ण आजिविका आहे |
وَالَّذِينَ سَعَوْا فِي آيَاتِنَا مُعَاجِزِينَ أُولَٰئِكَ لَهُمْ عَذَابٌ مِّن رِّجْزٍ أَلِيمٌ (5) ५. आणि आमच्या आयतींचा अवमान करण्यात ज्यांनी प्रयत्न केला आहे, तर ते असे लोक आहेत, ज्यांच्यासाठी अतिशय वाईट प्रकारचा सक्त अज़ाब आहे |
وَيَرَى الَّذِينَ أُوتُوا الْعِلْمَ الَّذِي أُنزِلَ إِلَيْكَ مِن رَّبِّكَ هُوَ الْحَقَّ وَيَهْدِي إِلَىٰ صِرَاطِ الْعَزِيزِ الْحَمِيدِ (6) ६. आणि ज्यांना ज्ञान आहे ते पाहतील की जे काही तुमच्याकडे, तुमच्या पालनकर्त्यातर्फे अवतरित झाले आहे ते (परिपूर्ण) सत्य आहे आणि ते अल्लाहचा मार्ग दाखविते जो मोठा वर्चस्वशाली, प्रशंसनीय आहे |
وَقَالَ الَّذِينَ كَفَرُوا هَلْ نَدُلُّكُمْ عَلَىٰ رَجُلٍ يُنَبِّئُكُمْ إِذَا مُزِّقْتُمْ كُلَّ مُمَزَّقٍ إِنَّكُمْ لَفِي خَلْقٍ جَدِيدٍ (7) ७. आणि काफिर (इन्कारी लोक) म्हणाले, या, आम्ही तुम्हाला एक असा मनुष्य दाखवावा, जो तुम्हाला ही खबर पोहचवित आहे की जेव्हा तुम्ही पूर्णपणे कण कण (चूर चूर) होऊन जाल, तेव्हा तुम्ही पुन्हा एका नव्या जीवनात याल |
أَفْتَرَىٰ عَلَى اللَّهِ كَذِبًا أَم بِهِ جِنَّةٌ ۗ بَلِ الَّذِينَ لَا يُؤْمِنُونَ بِالْآخِرَةِ فِي الْعَذَابِ وَالضَّلَالِ الْبَعِيدِ (8) ८. (आम्ही नाही सांगत) की स्वतः त्यानेच अल्लाहवर असत्य रचले आहे किंवा त्याला वेड लागले आहे, किंबहुना (खरी गोष्ट अशी) की आखिरतवर ईमान न राखणारेच शिक्षा-यातनेत आणि दूरच्या मार्गभ्रष्टतेत पडले आहेत |
أَفَلَمْ يَرَوْا إِلَىٰ مَا بَيْنَ أَيْدِيهِمْ وَمَا خَلْفَهُم مِّنَ السَّمَاءِ وَالْأَرْضِ ۚ إِن نَّشَأْ نَخْسِفْ بِهِمُ الْأَرْضَ أَوْ نُسْقِطْ عَلَيْهِمْ كِسَفًا مِّنَ السَّمَاءِ ۚ إِنَّ فِي ذَٰلِكَ لَآيَةً لِّكُلِّ عَبْدٍ مُّنِيبٍ (9) ९. तेव्हा काय ते आपल्या पुढे मागे आकाश व धरतीला पाहत नाहीत? जर आम्ही इच्छिले तर त्यांना जमिनीत धसवून टाकू किंवा त्यांच्यावर आकाशाचे तुकडे कोसळवू. निःसंशय यात फार मोठे प्रमाण आहे त्या प्रत्येक दासाकरिता, जो (मनापासून) रुजू करणारा असावा |
۞ وَلَقَدْ آتَيْنَا دَاوُودَ مِنَّا فَضْلًا ۖ يَا جِبَالُ أَوِّبِي مَعَهُ وَالطَّيْرَ ۖ وَأَلَنَّا لَهُ الْحَدِيدَ (10) १०. आणि आम्ही दाऊदवर आपली कृपा केली. हे पर्वतांनो! त्यांच्यासोबत (तुम्हीही) माझी तस्बीह (गुणगान) करीत जा आणि पक्ष्यांना देखील (हाच आदेश आहे) आणि आम्ही त्यांच्याकरिता लोखंडास नरम केले |
أَنِ اعْمَلْ سَابِغَاتٍ وَقَدِّرْ فِي السَّرْدِ ۖ وَاعْمَلُوا صَالِحًا ۖ إِنِّي بِمَا تَعْمَلُونَ بَصِيرٌ (11) ११. (यासाठी) की तुम्ही पूरे पूरे कवच (चिलखते) बनवा आणि त्यांच्या कड्या ठीक ठीक अनुमानाने राखा आणि तुम्ही सर्व नेकीची कामे करा (विश्वास राखा) मी तुमचे (प्रत्येक) कर्म पाहत आहे |
وَلِسُلَيْمَانَ الرِّيحَ غُدُوُّهَا شَهْرٌ وَرَوَاحُهَا شَهْرٌ ۖ وَأَسَلْنَا لَهُ عَيْنَ الْقِطْرِ ۖ وَمِنَ الْجِنِّ مَن يَعْمَلُ بَيْنَ يَدَيْهِ بِإِذْنِ رَبِّهِ ۖ وَمَن يَزِغْ مِنْهُمْ عَنْ أَمْرِنَا نُذِقْهُ مِنْ عَذَابِ السَّعِيرِ (12) १२. आणि आम्ही हवेला सुलेमानच्या अधीन केले की सकाळची मजल तिची एक महिन्याची राहात असे आणि संध्याकाळची मजल देखील आणि आम्ही त्यांच्यासाठी तांब्याचा झरा प्रवाहित केला आणि त्यांच्या पालनकर्त्याच्या आदेशाने काही जिन्न देखील, जे त्यांच्या ताब्यात राहून त्यांच्याजवळ काम करीत असत आणि त्यांच्यापैकी जो कोणी आमच्या आदेशाची अवज्ञा करीत असे, आम्ही त्याला भडकत्या आगीच्या अज़ाब (शिक्षे) ची गोडी चाखवित असू |
يَعْمَلُونَ لَهُ مَا يَشَاءُ مِن مَّحَارِيبَ وَتَمَاثِيلَ وَجِفَانٍ كَالْجَوَابِ وَقُدُورٍ رَّاسِيَاتٍ ۚ اعْمَلُوا آلَ دَاوُودَ شُكْرًا ۚ وَقَلِيلٌ مِّنْ عِبَادِيَ الشَّكُورُ (13) १३. सुलेमान जे काही इच्छित असत ते (जिन्नात) तयार करून देत, जसे किल्ला, चित्र (स्मारक), तलावासारख्या पराती आणि चुलींवर कायम टिकून राहणाऱ्या डेगा (मोठे मोठे पातेले) हे दाऊदच्या वंशजांनो! त्याच्याशी कृतज्ञता व्यक्त करण्याकरिता सत्कर्मे करा, माझ्या दासांपैकी कृतज्ञशील दास फार कमीच असतात |
فَلَمَّا قَضَيْنَا عَلَيْهِ الْمَوْتَ مَا دَلَّهُمْ عَلَىٰ مَوْتِهِ إِلَّا دَابَّةُ الْأَرْضِ تَأْكُلُ مِنسَأَتَهُ ۖ فَلَمَّا خَرَّ تَبَيَّنَتِ الْجِنُّ أَن لَّوْ كَانُوا يَعْلَمُونَ الْغَيْبَ مَا لَبِثُوا فِي الْعَذَابِ الْمُهِينِ (14) १४. मग जेव्हा आम्ही त्यांच्यावर मृत्युचा आदेश पाठविला, तेव्हा ती खबर (जिन्नांना) कोणीही दिली नाही, वाळवीच्या किड्याखेरीज, जो त्यांची लाठी खात होता. तर जेव्हा (सुलेमान) खाली कोसळले, त्या क्षणी जिन्नांनी जाणून घेतले की जर ते अपरोक्ष ज्ञान बाळगत असते तर या अपमानाच्या शिक्षेत पडून राहिले नसते.१ |
لَقَدْ كَانَ لِسَبَإٍ فِي مَسْكَنِهِمْ آيَةٌ ۖ جَنَّتَانِ عَن يَمِينٍ وَشِمَالٍ ۖ كُلُوا مِن رِّزْقِ رَبِّكُمْ وَاشْكُرُوا لَهُ ۚ بَلْدَةٌ طَيِّبَةٌ وَرَبٌّ غَفُورٌ (15) १५. सबाच्या जनसमूहाकरिता, त्यांच्या वस्तींमध्येच (अल्लाहच्या सामर्थ्याची) निशाणी होती. त्यांच्या उजव्या डाव्या बाजूला दोन बागा होत्या. (आम्ही त्यांना आदेश दिला होता की) आपल्या पालनकर्त्याने प्रदान केलेली आजिविका खा आणि त्याचे आभार मानत राहा. ही स्वच्छ - शुद्ध भूमी आहे आणि पालनकर्ता क्षमाशील आहे |
فَأَعْرَضُوا فَأَرْسَلْنَا عَلَيْهِمْ سَيْلَ الْعَرِمِ وَبَدَّلْنَاهُم بِجَنَّتَيْهِمْ جَنَّتَيْنِ ذَوَاتَيْ أُكُلٍ خَمْطٍ وَأَثْلٍ وَشَيْءٍ مِّن سِدْرٍ قَلِيلٍ (16) १६. परंतु त्यांनी तोंड फिरविले, मग आम्ही त्यांच्यावर वेगवान महापुराचे (पाणी) पाठविले आणि त्यांच्या (हिरव्या टवटवीत) बागांऐवजी दोन (अशा) बागा दिल्या, ज्या स्वादात कडवट आणि अधिकांश झाडे-झुडपे आणि काही बोरींची झाडे असलेल्या होत्या |
ذَٰلِكَ جَزَيْنَاهُم بِمَا كَفَرُوا ۖ وَهَلْ نُجَازِي إِلَّا الْكَفُورَ (17) १७. आम्ही त्यांच्या कृतघ्नतेचा हा मोबदला त्यांना दिला. आम्ही (अशी सक्त) सजा मोठमोठ्या कृतघ्न लोकांनाच देतो |
وَجَعَلْنَا بَيْنَهُمْ وَبَيْنَ الْقُرَى الَّتِي بَارَكْنَا فِيهَا قُرًى ظَاهِرَةً وَقَدَّرْنَا فِيهَا السَّيْرَ ۖ سِيرُوا فِيهَا لَيَالِيَ وَأَيَّامًا آمِنِينَ (18) १८. आणि आम्ही त्याच्या व त्या वस्तींच्या दरम्यान, ज्यांच्यात आम्ही सुख-समृद्धी प्रदान करून ठेवली होती. काही वस्त्या दुसऱ्या ठेवल्या होत्या, ज्या, मार्गावर दिसून येत होत्या आणि त्यांच्यात चालण्याची (प्रवासाची) ठिकाणे निश्चित केली होती, त्यात रात्री आणि दिवसा शांती सुरक्षापूर्वक हिंडत फिरत राहा |
فَقَالُوا رَبَّنَا بَاعِدْ بَيْنَ أَسْفَارِنَا وَظَلَمُوا أَنفُسَهُمْ فَجَعَلْنَاهُمْ أَحَادِيثَ وَمَزَّقْنَاهُمْ كُلَّ مُمَزَّقٍ ۚ إِنَّ فِي ذَٰلِكَ لَآيَاتٍ لِّكُلِّ صَبَّارٍ شَكُورٍ (19) १९. परंतु त्यांनी दुसऱ्यांदा दुआ (प्रार्थना) केली की हे आमच्या पालनकर्त्या! आमचे प्रवास दूर दूरपर्यंत कर आणि ज्याअर्थी त्यांनी स्वतः आपल्या हातांनी आपले वाईट करून घेतले, यास्तव आम्ही त्यांना (जुन्या) कहाणीच्या रूपात करून टाकले२ आणि त्यांचे तुकडे तुकडे करुन टाकलेत३ निःसंशय, प्रत्येक सहनशील आणि कृतज्ञशील माणसाकरिता या (घटने) त अनेक निशाण्या आहेत |
وَلَقَدْ صَدَّقَ عَلَيْهِمْ إِبْلِيسُ ظَنَّهُ فَاتَّبَعُوهُ إِلَّا فَرِيقًا مِّنَ الْمُؤْمِنِينَ (20) २०. आणि सैतानाने त्यांच्याविषयी आपला इरादा (अनुमान) खरा करून दाखविला, हे लोक (सर्वच्या सर्व) त्याचे अनुयायी बनले, ईमान राखणाऱ्यांच्या एका गटाखेरीज |
وَمَا كَانَ لَهُ عَلَيْهِم مِّن سُلْطَانٍ إِلَّا لِنَعْلَمَ مَن يُؤْمِنُ بِالْآخِرَةِ مِمَّنْ هُوَ مِنْهَا فِي شَكٍّ ۗ وَرَبُّكَ عَلَىٰ كُلِّ شَيْءٍ حَفِيظٌ (21) २१. आणि सैतानाचा त्यांच्यावर कोणताही दबाव (आणि जोर) नव्हता, परंतु अशासाठी की आम्ही त्या लोकांना, जे आखिरतवर ईमान राखतात, त्या लोकांमध्ये (चांगल्या प्रकारे) जाहीर करावे, जे त्याबाबत संशयग्रस्त आहेत, आणि तुमचा पालनकर्ता प्रत्येक गोष्टीचा संरक्षक आहे |
قُلِ ادْعُوا الَّذِينَ زَعَمْتُم مِّن دُونِ اللَّهِ ۖ لَا يَمْلِكُونَ مِثْقَالَ ذَرَّةٍ فِي السَّمَاوَاتِ وَلَا فِي الْأَرْضِ وَمَا لَهُمْ فِيهِمَا مِن شِرْكٍ وَمَا لَهُ مِنْهُم مِّن ظَهِيرٍ (22) २२. सांगा की अल्लाहखेरीज ज्यांचा ज्यांचा तुम्हाला (उपास्य असण्याचा) भ्रम आहे (त्या सर्वांना) हाक द्या. त्यांच्यापैकी ना कोणाला आकाशांमध्ये आणि धरतीत कणाइतकाही अधिकार आहे, ना त्यांचा या दोघांत कसलाही हिस्सा आहे आणि ना त्यांच्यापैकी कोणी अल्लाहचा सहभागी आहे |
وَلَا تَنفَعُ الشَّفَاعَةُ عِندَهُ إِلَّا لِمَنْ أَذِنَ لَهُ ۚ حَتَّىٰ إِذَا فُزِّعَ عَن قُلُوبِهِمْ قَالُوا مَاذَا قَالَ رَبُّكُمْ ۖ قَالُوا الْحَقَّ ۖ وَهُوَ الْعَلِيُّ الْكَبِيرُ (23) २३. आणि शिफारस (ची दुआ - प्रार्थना) ही त्याच्यासमोर काही लाभ देत नाही, त्यांच्याखेरीज, ज्यांच्यासाठी अनुमानित असावी. येथेपर्यंत की, जेव्हा त्यांच्या हृदयातून भय-दहशत दूर केली जाते, तेव्हा ते विचारतात, तुमच्या पालनकर्त्याने काय सांगितले? उत्तर देतात की खरे सांगितले आणि तो मोठा उच्चतम आणि मोठा महान आहे |
۞ قُلْ مَن يَرْزُقُكُم مِّنَ السَّمَاوَاتِ وَالْأَرْضِ ۖ قُلِ اللَّهُ ۖ وَإِنَّا أَوْ إِيَّاكُمْ لَعَلَىٰ هُدًى أَوْ فِي ضَلَالٍ مُّبِينٍ (24) २४. त्यांना विचारा की तुम्हाला आकाशामधून आणि जमिनीतून आजिविका कोण पोहचवितो? (स्वतः) उत्तर द्या की (महान) अल्लाह! (ऐका) आम्ही अथवा तुम्ही, एक तर निश्चितपणे मार्गदर्शनावर आहे किंवा उघड मार्गभ्रष्टतेत आहे |
قُل لَّا تُسْأَلُونَ عَمَّا أَجْرَمْنَا وَلَا نُسْأَلُ عَمَّا تَعْمَلُونَ (25) २५. सांगा की आम्ही केलेल्या अपराधांबाबत तुम्हाला काही विचारले जाणार नाही आणि ना तुमच्या कर्मांसंबंधी आम्हाला विचारले जाईल |
قُلْ يَجْمَعُ بَيْنَنَا رَبُّنَا ثُمَّ يَفْتَحُ بَيْنَنَا بِالْحَقِّ وَهُوَ الْفَتَّاحُ الْعَلِيمُ (26) २६. (त्यांना) खबरदार करा की आम्हा सर्वांना आमचा पालनकर्ता एकत्र करून मग आमच्या दरम्यान सत्यासह फैसला करील आणि तो फैसला करणारा, सर्व काही जाणणारा आहे |
قُلْ أَرُونِيَ الَّذِينَ أَلْحَقْتُم بِهِ شُرَكَاءَ ۖ كَلَّا ۚ بَلْ هُوَ اللَّهُ الْعَزِيزُ الْحَكِيمُ (27) २७. सांगा की बरे मलाही त्यांना दाखवा, ज्यांना तुम्ही अल्लाहचा सहभागी बनवून त्याच्यासोबत सामील करीत आहात. असे कदापि नाही, किंबहुना तोच अल्लाह आहे, जबरदस्त व हिकमतशाली |
وَمَا أَرْسَلْنَاكَ إِلَّا كَافَّةً لِّلنَّاسِ بَشِيرًا وَنَذِيرًا وَلَٰكِنَّ أَكْثَرَ النَّاسِ لَا يَعْلَمُونَ (28) २८. आणि आम्ही तुम्हाला सर्व लोकांकरिता शुभ समाचार ऐकविणारा आणि खबरदार करणारा बनवून पाठविले आहे, परंतु (खरी गोष्ट अशी की) अधिकांश लोक जाणत नाहीत |
وَيَقُولُونَ مَتَىٰ هَٰذَا الْوَعْدُ إِن كُنتُمْ صَادِقِينَ (29) २९. आणि विचारतात की तो वायदा केव्हा पूर्ण होईल? सच्चे असाल तर सांगा |
قُل لَّكُم مِّيعَادُ يَوْمٍ لَّا تَسْتَأْخِرُونَ عَنْهُ سَاعَةً وَلَا تَسْتَقْدِمُونَ (30) ३०. उत्तर द्या, वायद्याचा दिवस अगदी निश्चित आहे, ज्यापासून एक क्षण ना तुम्ही मागे हटू शकता, आणि ना पुढे जाऊ शकता |
وَقَالَ الَّذِينَ كَفَرُوا لَن نُّؤْمِنَ بِهَٰذَا الْقُرْآنِ وَلَا بِالَّذِي بَيْنَ يَدَيْهِ ۗ وَلَوْ تَرَىٰ إِذِ الظَّالِمُونَ مَوْقُوفُونَ عِندَ رَبِّهِمْ يَرْجِعُ بَعْضُهُمْ إِلَىٰ بَعْضٍ الْقَوْلَ يَقُولُ الَّذِينَ اسْتُضْعِفُوا لِلَّذِينَ اسْتَكْبَرُوا لَوْلَا أَنتُمْ لَكُنَّا مُؤْمِنِينَ (31) ३१. आणि काफिर (इन्कारी लोक) म्हणाले, आम्ही तर या कुरआनास मानणारे नाहीत, ना याच्या पूर्वीच्या ग्रंथांना आणि जर तुम्ही पाहिले असते, जेव्हा हे अत्याचारी आपल्या पालनकर्त्यासमोर उभे, एकमेकांवर दोषारोप ठेवत असतील. खालच्या दर्जाचे लोक, उच्च दर्जाच्या लोकांना म्हणतील, जर तुम्ही राहिले नसते तर (खात्रीने) आम्ही ईमान राखणारे असतो |
قَالَ الَّذِينَ اسْتَكْبَرُوا لِلَّذِينَ اسْتُضْعِفُوا أَنَحْنُ صَدَدْنَاكُمْ عَنِ الْهُدَىٰ بَعْدَ إِذْ جَاءَكُم ۖ بَلْ كُنتُم مُّجْرِمِينَ (32) ३२. हे उच्च दर्जाचे लोक त्या दुर्बल लोकांना उत्तर देतील की, काय तुमच्याजवळ मार्गदर्शन येऊन पोहोचल्यानंतर आम्ही तुम्हाला त्यापासून रोखले होते (नाही), उलट तुम्ही (स्वतः) अत्याचारी होते |
وَقَالَ الَّذِينَ اسْتُضْعِفُوا لِلَّذِينَ اسْتَكْبَرُوا بَلْ مَكْرُ اللَّيْلِ وَالنَّهَارِ إِذْ تَأْمُرُونَنَا أَن نَّكْفُرَ بِاللَّهِ وَنَجْعَلَ لَهُ أَندَادًا ۚ وَأَسَرُّوا النَّدَامَةَ لَمَّا رَأَوُا الْعَذَابَ وَجَعَلْنَا الْأَغْلَالَ فِي أَعْنَاقِ الَّذِينَ كَفَرُوا ۚ هَلْ يُجْزَوْنَ إِلَّا مَا كَانُوا يَعْمَلُونَ (33) ३३. (आणि याला उत्तर देताना) हे दुर्बल लोक त्या घमेंडी लोकांना सांगतील (मुळीच नाही) किंबहुना रात्रंदिवस लबाडीने आम्हाला, अल्लाहसोबत कुप्र करण्यास आणि त्याच्यासोबत सहभागी ठरविण्यास तुमचा आदेश देणे, आमच्या बेईमानीचे कारण ठरले आणि अज़ाबला (शिक्षा-यातनेला) पाहताच सर्वच्या सर्व मनातल्या मनात लज्जित होत असतील आणि काफिरांच्या गळ्यात आम्ही तौक (जोखड) टाकू, त्यांना केवळ त्यांच्या कृतकर्मांचा मोबदला दिला जाईल |
وَمَا أَرْسَلْنَا فِي قَرْيَةٍ مِّن نَّذِيرٍ إِلَّا قَالَ مُتْرَفُوهَا إِنَّا بِمَا أُرْسِلْتُم بِهِ كَافِرُونَ (34) ३४. आणि आम्ही ज्या ज्या वस्तीत एखादा खबरदार करणारा पाठविला, तेव्हा तिथल्या सुखसंपन्न अवस्थेच्या लोकांनी हेच म्हटले की ज्या गोष्टीसह तुम्ही पाठविले गेले आहात, आम्ही त्याचा इन्कार करणारे आहोत |
وَقَالُوا نَحْنُ أَكْثَرُ أَمْوَالًا وَأَوْلَادًا وَمَا نَحْنُ بِمُعَذَّبِينَ (35) ३५. आणि म्हणाले की आम्ही धन-संपत्ती आणि संतती अधिक बाळगतो आणि आम्हाला अज़ाब (शिक्षा - यातना) दिलीच जाणार नाही |
قُلْ إِنَّ رَبِّي يَبْسُطُ الرِّزْقَ لِمَن يَشَاءُ وَيَقْدِرُ وَلَٰكِنَّ أَكْثَرَ النَّاسِ لَا يَعْلَمُونَ (36) ३६. सांगा की माझा पालनकर्ता, ज्याच्यासाठी इच्छितो रोजी (आजिविका) व्यापक करतो, आणि ज्याच्यासाठी इच्छितो तंग (संकुचित) करतो, परंतु बहुतेक लोक हे जाणत नाहीत |
وَمَا أَمْوَالُكُمْ وَلَا أَوْلَادُكُم بِالَّتِي تُقَرِّبُكُمْ عِندَنَا زُلْفَىٰ إِلَّا مَنْ آمَنَ وَعَمِلَ صَالِحًا فَأُولَٰئِكَ لَهُمْ جَزَاءُ الضِّعْفِ بِمَا عَمِلُوا وَهُمْ فِي الْغُرُفَاتِ آمِنُونَ (37) ३७. आणि तुमची धन-संपत्ती आणि संतती अशी गोष्ट नव्हे की तुम्हाला आमच्याजवळ (दर्जांनी) निकट करील, परंतु ज्यांनी ईमान राखले आणि जे सत्कर्म करीत राहिले तर त्यांच्यासाठी त्यांच्या सत्कर्मांचा दुप्पट मोबदला आहे आणि ते निर्भय आणि समाधानी होऊन उंच महालांमध्ये राहतील |
وَالَّذِينَ يَسْعَوْنَ فِي آيَاتِنَا مُعَاجِزِينَ أُولَٰئِكَ فِي الْعَذَابِ مُحْضَرُونَ (38) ३८. आणि जे लोक आमच्या आयतींना अवमानित करण्याच्या धावपळीत मग्न राहतात तर अशाच लोकांना अज़ाब (शिक्षा-यातना) ग्रस्त करून हजर केले जाईल |
قُلْ إِنَّ رَبِّي يَبْسُطُ الرِّزْقَ لِمَن يَشَاءُ مِنْ عِبَادِهِ وَيَقْدِرُ لَهُ ۚ وَمَا أَنفَقْتُم مِّن شَيْءٍ فَهُوَ يُخْلِفُهُ ۖ وَهُوَ خَيْرُ الرَّازِقِينَ (39) ३९. सांगा की माझा पालनकर्ता आपल्या दासांपैकी ज्याच्यासाठी इच्छितो रोजी (आजिविका) व्यापक करतो, आणि ज्याच्यासाठी इच्छितो तंग (मोजून मापून) देतो आणि तुम्ही जे काही अल्लाहच्या मार्गात खर्च कराल, अल्लाह त्याचा (पुरेपूर) मोबदला प्रदान करील. तो तर सर्वांत उत्तम रोजी (आजिविका) प्रदान करणारा आहे |
وَيَوْمَ يَحْشُرُهُمْ جَمِيعًا ثُمَّ يَقُولُ لِلْمَلَائِكَةِ أَهَٰؤُلَاءِ إِيَّاكُمْ كَانُوا يَعْبُدُونَ (40) ४०. आणि त्या सर्वांना अल्लाह त्या दिवशी एकत्र करून फरिश्त्यांना विचारेल, काय हे लोक तुमची उपासना करीत होते |
قَالُوا سُبْحَانَكَ أَنتَ وَلِيُّنَا مِن دُونِهِم ۖ بَلْ كَانُوا يَعْبُدُونَ الْجِنَّ ۖ أَكْثَرُهُم بِهِم مُّؤْمِنُونَ (41) ४१. ते म्हणतील, तू पवित्र आहेस, आणि आमचा मित्र - संरक्षक तर तू आहेस, हे लोक नव्हेत. हे तर जिन्नांची उपासना करत होते. यांच्यापैकी बहुतेकांचे त्यांच्यावरच ईमान होते |
فَالْيَوْمَ لَا يَمْلِكُ بَعْضُكُمْ لِبَعْضٍ نَّفْعًا وَلَا ضَرًّا وَنَقُولُ لِلَّذِينَ ظَلَمُوا ذُوقُوا عَذَابَ النَّارِ الَّتِي كُنتُم بِهَا تُكَذِّبُونَ (42) ४२. तेव्हा आज तुमच्यापैकी कोणीही, कोणाच्याहीकरिता (कशाही प्रकारे) लाभ - हानी (पोहचविण्या) चा मालक नसेल आणि आम्ही अत्याचारींना सांगू की त्या आगीची गोडी चाखा, जिला तुम्ही खोटे ठरवित राहिले |
وَإِذَا تُتْلَىٰ عَلَيْهِمْ آيَاتُنَا بَيِّنَاتٍ قَالُوا مَا هَٰذَا إِلَّا رَجُلٌ يُرِيدُ أَن يَصُدَّكُمْ عَمَّا كَانَ يَعْبُدُ آبَاؤُكُمْ وَقَالُوا مَا هَٰذَا إِلَّا إِفْكٌ مُّفْتَرًى ۚ وَقَالَ الَّذِينَ كَفَرُوا لِلْحَقِّ لَمَّا جَاءَهُمْ إِنْ هَٰذَا إِلَّا سِحْرٌ مُّبِينٌ (43) ४३. आणि जेव्हा त्यांच्यासमोर आमच्या स्पष्ट आयती वाचून ऐकविल्या जातात, तेव्हा म्हणतात की हा असा मनुष्य आहे, जो तुम्हाला, तुमच्या वाडवडिलांच्या उपास्य दैवतांपासून रोखू इच्छितो (याखेरीज आणखी काही नाही) आणि असे म्हणतात की हा तर मनाने रचलेला आरोप आहे, आणि सत्य त्यांच्याजवळ येऊन पोहोचले तरीही इन्कार करणारे हेच म्हणत राहिले की ही तर उघड जादू आहे |
وَمَا آتَيْنَاهُم مِّن كُتُبٍ يَدْرُسُونَهَا ۖ وَمَا أَرْسَلْنَا إِلَيْهِمْ قَبْلَكَ مِن نَّذِيرٍ (44) ४४. आणि या (मक्काच्या रहिवाशां) ना, आम्ही ना ग्रंथ प्रदान करून ठेवले आहेत, ज्यांना हे वाचत असावेत आणि ना त्यांच्याजवळ तुमच्यापूर्वी कोणी खबरदार करणारा आला |
وَكَذَّبَ الَّذِينَ مِن قَبْلِهِمْ وَمَا بَلَغُوا مِعْشَارَ مَا آتَيْنَاهُمْ فَكَذَّبُوا رُسُلِي ۖ فَكَيْفَ كَانَ نَكِيرِ (45) ४५. आणि यांच्यापूर्वीच्या लोकांनीही आमच्या गोष्टींना खोटे ठरविले होते. आणि त्यांना आम्ही जे देऊन ठेवले होते, त्याच्या दहाव्या हिश्श्यापर्यंतही हे पोहचले नाहीत. तेव्हा, त्यांनी माझ्या पैगंबरांना खोटे ठरविले, (मग पाहा) माझ्या शिक्षा यातनेची किती (कठोर) अवस्था झाली.१ |
۞ قُلْ إِنَّمَا أَعِظُكُم بِوَاحِدَةٍ ۖ أَن تَقُومُوا لِلَّهِ مَثْنَىٰ وَفُرَادَىٰ ثُمَّ تَتَفَكَّرُوا ۚ مَا بِصَاحِبِكُم مِّن جِنَّةٍ ۚ إِنْ هُوَ إِلَّا نَذِيرٌ لَّكُم بَيْنَ يَدَيْ عَذَابٍ شَدِيدٍ (46) ४६. सांगा की मी तुम्हाला केवळ एकाच गोष्टीचा उपदेश करतो की तुम्ही अल्लाहकरिता (प्रामाणिकपणे, हट्ट सोडून) दोन दोन मिळून किंवा एकट्या एकट्याने उभे राहून विचार तर करा. तुमच्या या साथीदाराला काही वेड वगैरे लागले नाही. तो तर तुम्हाला एका मोठ्या (सक्त) शिक्षा - यातनेच्या येण्यापूर्वी सावध करणारा आहे |
قُلْ مَا سَأَلْتُكُم مِّنْ أَجْرٍ فَهُوَ لَكُمْ ۖ إِنْ أَجْرِيَ إِلَّا عَلَى اللَّهِ ۖ وَهُوَ عَلَىٰ كُلِّ شَيْءٍ شَهِيدٌ (47) ४७. सांगा की जो मोबदला मी तुमच्याकडून मागेन, तो तुमच्याकरिता आहे. माझा मोबदला देण्याची जबाबदारी अल्लाहवर आहे, आणि तो प्रत्येक गोष्टीस साक्षी आहे |
قُلْ إِنَّ رَبِّي يَقْذِفُ بِالْحَقِّ عَلَّامُ الْغُيُوبِ (48) ४८. सांगा, माझा पालनकर्ता सत्य (वहयी) अवतरित करतो. तो प्रत्येक लपलेली गोष्ट (गैब) जाणणारा आहे |
قُلْ جَاءَ الْحَقُّ وَمَا يُبْدِئُ الْبَاطِلُ وَمَا يُعِيدُ (49) ४९. सांगा, सत्य येऊन पोहोचले. असत्याने ना पहिल्यांदा डोके वर काढले आणि ना दुसऱ्यांदा डोके वर काढू शकेल |
قُلْ إِن ضَلَلْتُ فَإِنَّمَا أَضِلُّ عَلَىٰ نَفْسِي ۖ وَإِنِ اهْتَدَيْتُ فَبِمَا يُوحِي إِلَيَّ رَبِّي ۚ إِنَّهُ سَمِيعٌ قَرِيبٌ (50) ५०. सांगा की जर मी मार्गभ्रष्ट होईन तर माझ्या मार्गभ्रष्टतेचे (संकट) माझ्यावरच आहे आणि जर मी सत्य मार्गावर आहे तर त्या वहयीमुळे जिला माझा पालनकर्ता माझ्यावर अवतरित करतो. तो मोठा ऐकणारा, अतिशय निकट आहे |
وَلَوْ تَرَىٰ إِذْ فَزِعُوا فَلَا فَوْتَ وَأُخِذُوا مِن مَّكَانٍ قَرِيبٍ (51) ५१. आणि जर तुम्ही (ती वेळ) पाहाल जेव्हा हे काफिर घाबरलेल्या स्थितीत फिरतील, मग पळून निघून जाण्याची कोणतीही अवस्था (मार्ग) नसेल आणि जवळच्या ठिकाणाहून धरले जातील |
وَقَالُوا آمَنَّا بِهِ وَأَنَّىٰ لَهُمُ التَّنَاوُشُ مِن مَّكَانٍ بَعِيدٍ (52) ५२. आणि त्या वेळी म्हणतील की आम्ही या (कुरआना) वर इमान राखले आहे, परंतु एवढ्या दूरच्या (अपेक्षित वस्तू) कशी हाती येऊ शकते |
وَقَدْ كَفَرُوا بِهِ مِن قَبْلُ ۖ وَيَقْذِفُونَ بِالْغَيْبِ مِن مَّكَانٍ بَعِيدٍ (53) ५३. आणि याच्यापूर्वी तर त्यांनी याचा इन्कार केला होता आणि लांबूनच न पाहता अटकळीचे तीर चालवित राहिले |
وَحِيلَ بَيْنَهُمْ وَبَيْنَ مَا يَشْتَهُونَ كَمَا فُعِلَ بِأَشْيَاعِهِم مِّن قَبْلُ ۚ إِنَّهُمْ كَانُوا فِي شَكٍّ مُّرِيبٍ (54) ५४. आणि त्यांच्या व त्यांच्या इच्छा आकांक्षांच्या दरम्यान आड पडदा टाकला गेला, ज्या प्रकारे यापूर्वीही यांच्यासारख्यांशी केले गेले ते देखील (यांच्याप्रमाणेच) शंका संशयात पडले होते |