×

Surah At-Tawbah in Marathi

Quran Marathi ⮕ Surah Tawbah

Translation of the Meanings of Surah Tawbah in Marathi - الماراثية

The Quran in Marathi - Surah Tawbah translated into Marathi, Surah At-Tawbah in Marathi. We provide accurate translation of Surah Tawbah in Marathi - الماراثية, Verses 129 - Surah Number 9 - Page 187.

بسم الله الرحمن الرحيم

بَرَاءَةٌ مِّنَ اللَّهِ وَرَسُولِهِ إِلَى الَّذِينَ عَاهَدتُّم مِّنَ الْمُشْرِكِينَ (1)
१. ही अल्लाह आणि त्याच्या पैगंबरातर्फे वचनमुक्तीची घोषणा आहे त्या अनेकेश्वरवाद्यांबाबत, ज्यांच्याशी तुम्ही वचन करार केला आहे
فَسِيحُوا فِي الْأَرْضِ أَرْبَعَةَ أَشْهُرٍ وَاعْلَمُوا أَنَّكُمْ غَيْرُ مُعْجِزِي اللَّهِ ۙ وَأَنَّ اللَّهَ مُخْزِي الْكَافِرِينَ (2)
२. तेव्हा (हे अनेकेश्वरवाद्यांनो!) तुम्ही देशात चार महिने प्रवास करून घ्या आणि जाणून घ्या की तुम्ही अल्लाहला विवश करू शकत नाही आणि अल्लाह इन्कारी लोकांना अपमानित करणार आहे
وَأَذَانٌ مِّنَ اللَّهِ وَرَسُولِهِ إِلَى النَّاسِ يَوْمَ الْحَجِّ الْأَكْبَرِ أَنَّ اللَّهَ بَرِيءٌ مِّنَ الْمُشْرِكِينَ ۙ وَرَسُولُهُ ۚ فَإِن تُبْتُمْ فَهُوَ خَيْرٌ لَّكُمْ ۖ وَإِن تَوَلَّيْتُمْ فَاعْلَمُوا أَنَّكُمْ غَيْرُ مُعْجِزِي اللَّهِ ۗ وَبَشِّرِ الَّذِينَ كَفَرُوا بِعَذَابٍ أَلِيمٍ (3)
३. अल्लाह आणि त्याच्या पैगंबरातर्फे हज अकबर (मोठ्या हज) च्या दिवशी१ साफ ऐलान आहे की अल्लाह अनेकेश्वरवाद्यांपासून विभक्त आहेत आणि त्याचा पैगंबरदेखील. जर अत्ताही तुम्ही तौबा (क्षमा-याचना) कराल तर तुमच्यासाठी अधिक चांगले आहे आणि जर तुम्ही तोंड फिरवाल, तर जाणून असा की तुम्ही अल्लाहला अगतिक करू शकत नाही आणि काफिरांना सक्त शिक्षेची खबर द्या
إِلَّا الَّذِينَ عَاهَدتُّم مِّنَ الْمُشْرِكِينَ ثُمَّ لَمْ يَنقُصُوكُمْ شَيْئًا وَلَمْ يُظَاهِرُوا عَلَيْكُمْ أَحَدًا فَأَتِمُّوا إِلَيْهِمْ عَهْدَهُمْ إِلَىٰ مُدَّتِهِمْ ۚ إِنَّ اللَّهَ يُحِبُّ الْمُتَّقِينَ (4)
४. परंतु असे अनेकेश्वरवादी, ज्यांच्याशी तुम्ही वचन करार केलेला आहे आणि त्यांनी तुम्हाला किंचितही नुकसान पोहचविले नाही, आणि तुमच्या विरोधात कोणाची मदत केली नाही, तर तुम्हीदेखील कराराचा अवधी त्यांच्यासह पूर्ण करा. निःसंशय अल्लाह भय राखून वागणाऱ्यांशी प्रेम करतो
فَإِذَا انسَلَخَ الْأَشْهُرُ الْحُرُمُ فَاقْتُلُوا الْمُشْرِكِينَ حَيْثُ وَجَدتُّمُوهُمْ وَخُذُوهُمْ وَاحْصُرُوهُمْ وَاقْعُدُوا لَهُمْ كُلَّ مَرْصَدٍ ۚ فَإِن تَابُوا وَأَقَامُوا الصَّلَاةَ وَآتَوُا الزَّكَاةَ فَخَلُّوا سَبِيلَهُمْ ۚ إِنَّ اللَّهَ غَفُورٌ رَّحِيمٌ (5)
५. मग आदरणीय महिने संपताच अनेकेश्वरवाद्यांना, आढळतील तिथे ठार करा, त्यांना कैदी बनवा, त्यांना घेरा टाका आणि प्रत्येक घाताच्या ठिकाणी त्यांच्यावर टपून बसा परंतु जर ते तौबा (क्षमा याचना) करून घेतील आणि नित्यनेमाने नमाज पढू लागतील आणि जकात अदा करू लागतील तर तुम्ही त्यांचा मार्ग सोडून द्या. निःसंशय, सर्वश्रेष्ठ अल्लाह माफ करणारा, दया करणारा आहे
وَإِنْ أَحَدٌ مِّنَ الْمُشْرِكِينَ اسْتَجَارَكَ فَأَجِرْهُ حَتَّىٰ يَسْمَعَ كَلَامَ اللَّهِ ثُمَّ أَبْلِغْهُ مَأْمَنَهُ ۚ ذَٰلِكَ بِأَنَّهُمْ قَوْمٌ لَّا يَعْلَمُونَ (6)
६. जर अनेकेश्वरवाद्यांपैकी कोणी तुमच्या जवळ आश्रय मागेल तर तुम्ही त्याला आश्रय द्या, येथपर्यंत की त्याने अल्लाहची वाणी ऐकून घ्यावी, मग त्याला त्याच्या शांती-स्थळापर्यंत पोहचवा. हे अशासाठी की ते लोक अजाण आहेत
كَيْفَ يَكُونُ لِلْمُشْرِكِينَ عَهْدٌ عِندَ اللَّهِ وَعِندَ رَسُولِهِ إِلَّا الَّذِينَ عَاهَدتُّمْ عِندَ الْمَسْجِدِ الْحَرَامِ ۖ فَمَا اسْتَقَامُوا لَكُمْ فَاسْتَقِيمُوا لَهُمْ ۚ إِنَّ اللَّهَ يُحِبُّ الْمُتَّقِينَ (7)
७. अनेकेश्वरवाद्यांचा वायदा अल्लाह आणि त्याच्या पैगंबराशी कसा काय राहू शकतो, त्यांच्याखेरीज, ज्यांच्याशी तुम्ही मसजिदे हरामजवळ वचन करार केला आहे, तर जोपर्यंत ते लोक तुमच्याशी करार-पालन करतील, तुम्हीही त्यांच्याशी केलेल्या वायद्यावर कायम राहा. सर्वश्रेष्ठ अल्लाह, भय राखून वागणाऱ्या लोकांशी प्रेम राखतो
كَيْفَ وَإِن يَظْهَرُوا عَلَيْكُمْ لَا يَرْقُبُوا فِيكُمْ إِلًّا وَلَا ذِمَّةً ۚ يُرْضُونَكُم بِأَفْوَاهِهِمْ وَتَأْبَىٰ قُلُوبُهُمْ وَأَكْثَرُهُمْ فَاسِقُونَ (8)
८. त्यांच्या वचन-वायद्यांचा काय भरोसा? त्यांना जर तुमच्यावर वर्चस्व लाभले तर ते ना नातेसंबंधाचा विचार करतील, ना वचन-कराराचा. आपल्या मुखाने हे तुम्हाला रिझवित आहेत, परंतु यांची मने मानत नाहीत आणि त्यांच्यात अधिकांश लोक फासिक (दुराचारी) आहेत
اشْتَرَوْا بِآيَاتِ اللَّهِ ثَمَنًا قَلِيلًا فَصَدُّوا عَن سَبِيلِهِ ۚ إِنَّهُمْ سَاءَ مَا كَانُوا يَعْمَلُونَ (9)
९. त्यांनी अल्लाहच्या आयतींना फार कमी किमतीत विकले, आणि त्याच्या मार्गापासून रोखले. मोठे वाईट आहे, जे हे करीत आहेत
لَا يَرْقُبُونَ فِي مُؤْمِنٍ إِلًّا وَلَا ذِمَّةً ۚ وَأُولَٰئِكَ هُمُ الْمُعْتَدُونَ (10)
१०. हे तर एखाद्या ईमानधारकाच्या हक्कात कसल्याही नात्याची किंवा वचनाची काळजी करीत नाही. हे आहेतच हद्द ओलांडून जाणारे
فَإِن تَابُوا وَأَقَامُوا الصَّلَاةَ وَآتَوُا الزَّكَاةَ فَإِخْوَانُكُمْ فِي الدِّينِ ۗ وَنُفَصِّلُ الْآيَاتِ لِقَوْمٍ يَعْلَمُونَ (11)
११. अजूनही जर ते तौबा (पश्चात्तापयुक्त क्षमा याचना) करतील आणि नमाज नियमितपणे पढू लागतील आणि जकात देत राहतील तर तुमचे धर्म-बांधव आहेत आणि आम्ही तर समंजस लोकांसाठी आपल्या आयतींचे तपशीलपूर्वक निवेदन करीत आहोत
وَإِن نَّكَثُوا أَيْمَانَهُم مِّن بَعْدِ عَهْدِهِمْ وَطَعَنُوا فِي دِينِكُمْ فَقَاتِلُوا أَئِمَّةَ الْكُفْرِ ۙ إِنَّهُمْ لَا أَيْمَانَ لَهُمْ لَعَلَّهُمْ يَنتَهُونَ (12)
१२. जर हे लोक वचन-वायद्यानंतरही आपल्या वचनाचा भंग करतील आणि तुमच्या धर्माची निंदा-नालस्तीही करतील तर तुम्हीही अशा काफिरांच्या सरदारांशी भिडा. त्यांची शपथ काहीच नाही. संभवतः अशा प्रकारे ते (असे करणे) थांबवतील
أَلَا تُقَاتِلُونَ قَوْمًا نَّكَثُوا أَيْمَانَهُمْ وَهَمُّوا بِإِخْرَاجِ الرَّسُولِ وَهُم بَدَءُوكُمْ أَوَّلَ مَرَّةٍ ۚ أَتَخْشَوْنَهُمْ ۚ فَاللَّهُ أَحَقُّ أَن تَخْشَوْهُ إِن كُنتُم مُّؤْمِنِينَ (13)
१३. तुम्ही त्या लोकांची डोकी ठेचण्यासाठी का तयार होत नाही, ज्यांनी आपल्या शपथा तोडून टाकल्या आणि (अंतिम) पैगंबराला देशाबाहेर घालविण्याच्या विचारात आहे, आणि स्वतःच पहिल्यांदा त्यांनी तुमची छेड काढली आहे. काय तुम्ही त्यांना भिता? वस्तुतः अल्लाहलाच सर्वांत जास्त हक्क आहे की तुम्ही त्याचे भय राखावे, जर तुम्ही ईमानधारक असाल
قَاتِلُوهُمْ يُعَذِّبْهُمُ اللَّهُ بِأَيْدِيكُمْ وَيُخْزِهِمْ وَيَنصُرْكُمْ عَلَيْهِمْ وَيَشْفِ صُدُورَ قَوْمٍ مُّؤْمِنِينَ (14)
१४. तुम्ही त्यांच्याशी युद्ध करा. अल्लाह तुमच्या हस्ते त्यांना दुःख यातना देईल, त्यांना अपमानित करील. त्यांच्या विरोधात तुमची मदत करील आणि ईमानधारकांच्या हृदयांना शितलता पोहचवील
وَيُذْهِبْ غَيْظَ قُلُوبِهِمْ ۗ وَيَتُوبُ اللَّهُ عَلَىٰ مَن يَشَاءُ ۗ وَاللَّهُ عَلِيمٌ حَكِيمٌ (15)
१५. आणि त्यांच्या मनाचे दुःख आणि क्रोध दूर करील आणि अल्लाह ज्याच्याकडे इच्छितो दया कृपेने ध्यान देतो आणि सर्वश्रेष्ठ अल्लाह जाणणारा, हिकमतशाली आहे
أَمْ حَسِبْتُمْ أَن تُتْرَكُوا وَلَمَّا يَعْلَمِ اللَّهُ الَّذِينَ جَاهَدُوا مِنكُمْ وَلَمْ يَتَّخِذُوا مِن دُونِ اللَّهِ وَلَا رَسُولِهِ وَلَا الْمُؤْمِنِينَ وَلِيجَةً ۚ وَاللَّهُ خَبِيرٌ بِمَا تَعْمَلُونَ (16)
१६. काय तुम्ही हे समजून बसला आहात की तुम्हाला असेच सोडून दिले जाईल? अद्याप सर्वश्रेष्ठ अल्लाहने तुमच्यापैकी त्यांना उघडकीस आणले नाही, जे जिहादचे सैनिक आहेत, आणि ज्यांनी अल्लाह, त्याचा रसूल आणि ईमानधारकांखेरीज कोणालाही मित्र बनविले नाही, आणि सर्वश्रेष्ठ अल्लाह खूप चांगल्या प्रकारे जाणतो, जे तुम्ही करीत आहात
مَا كَانَ لِلْمُشْرِكِينَ أَن يَعْمُرُوا مَسَاجِدَ اللَّهِ شَاهِدِينَ عَلَىٰ أَنفُسِهِم بِالْكُفْرِ ۚ أُولَٰئِكَ حَبِطَتْ أَعْمَالُهُمْ وَفِي النَّارِ هُمْ خَالِدُونَ (17)
१७. शक्य नव्हे की अनेकेश्वरवादी, अल्लाहच्या मस्जिदीला आबाद करतील, वास्तविक स्थिती ही आहे की हे आपल्या इन्काराचे स्वतः साक्षी आहेत. त्यांची सर्व कर्मे वाया गेलीत आणि ते नेहमीकरिता जहन्नममध्ये राहतील
إِنَّمَا يَعْمُرُ مَسَاجِدَ اللَّهِ مَنْ آمَنَ بِاللَّهِ وَالْيَوْمِ الْآخِرِ وَأَقَامَ الصَّلَاةَ وَآتَى الزَّكَاةَ وَلَمْ يَخْشَ إِلَّا اللَّهَ ۖ فَعَسَىٰ أُولَٰئِكَ أَن يَكُونُوا مِنَ الْمُهْتَدِينَ (18)
१८. अल्लाहच्या मस्जिदीना तर ते लोक आबाद करतात, जे अल्लाहवर आणि आखिरतच्या दिवसावर ईमान राखतील, नमाज नियमित पढतील, जकात देतील आणि अल्लाहशिवाय कोणालाही भित नसतील. संभवतः हेच लोक खात्रीने मार्गदर्शन लाभलेले आहेत
۞ أَجَعَلْتُمْ سِقَايَةَ الْحَاجِّ وَعِمَارَةَ الْمَسْجِدِ الْحَرَامِ كَمَنْ آمَنَ بِاللَّهِ وَالْيَوْمِ الْآخِرِ وَجَاهَدَ فِي سَبِيلِ اللَّهِ ۚ لَا يَسْتَوُونَ عِندَ اللَّهِ ۗ وَاللَّهُ لَا يَهْدِي الْقَوْمَ الظَّالِمِينَ (19)
१९. काय तुम्ही हाजी लोकांना पाणी पाजणे आणि मस्जीदे हराम (काबागृह) ची सेवा करणे, त्याच्यासमान ठरविले आहे, जो अल्लाहवर आणि कयामतच्या दिवसावर ईमान राखील आणि अल्लाहच्या मार्गात जिहाद (संघर्ष) करील. हे अल्लाहजवळ समान नाही१ आणि सर्वश्रेष्ठ अल्लाह अत्याचारी लोकांना मार्ग दाखवित नाही
الَّذِينَ آمَنُوا وَهَاجَرُوا وَجَاهَدُوا فِي سَبِيلِ اللَّهِ بِأَمْوَالِهِمْ وَأَنفُسِهِمْ أَعْظَمُ دَرَجَةً عِندَ اللَّهِ ۚ وَأُولَٰئِكَ هُمُ الْفَائِزُونَ (20)
२०. ज्या लोकांनी ईमान राखले, देशत्याग केला, अल्लाहच्या मार्गात आपल्या धनाने व प्राणाने संघर्ष केला, ते अल्लाहच्या समोर खूप मोठ्या दर्जाचे आहेत आणि हेच लोक सफलता प्राप्त करणारे आहेत
يُبَشِّرُهُمْ رَبُّهُم بِرَحْمَةٍ مِّنْهُ وَرِضْوَانٍ وَجَنَّاتٍ لَّهُمْ فِيهَا نَعِيمٌ مُّقِيمٌ (21)
२१. त्यांचा पालनकर्ता त्यांना आपली दया आणि प्रसन्नता आणि अशा जन्नतींची खूशखबर देतो, ज्यांच्यात त्यांच्यासाठी निरंतर सुख आहे
خَالِدِينَ فِيهَا أَبَدًا ۚ إِنَّ اللَّهَ عِندَهُ أَجْرٌ عَظِيمٌ (22)
२२. तिथे ते सदैवकाळ राहतील अल्लाहच्या निकट, निःसंशय हा फार मोठा मोबदला आहे
يَا أَيُّهَا الَّذِينَ آمَنُوا لَا تَتَّخِذُوا آبَاءَكُمْ وَإِخْوَانَكُمْ أَوْلِيَاءَ إِنِ اسْتَحَبُّوا الْكُفْرَ عَلَى الْإِيمَانِ ۚ وَمَن يَتَوَلَّهُم مِّنكُمْ فَأُولَٰئِكَ هُمُ الظَّالِمُونَ (23)
२३. हे ईमान राखणाऱ्यांनो! आपल्या पित्यांना आणि आपल्या बांधवांना मित्र बनवू नका, जर ते कुप्र (इन्कारा) ला ईमानापेक्षा जास्त चांगले समजतील. तुमच्यापैकी जोदेखील त्यांच्याशी दोस्ती ठेवील, तो पूर्णपणे (अपराधी आणि) अत्याचारी आहे
قُلْ إِن كَانَ آبَاؤُكُمْ وَأَبْنَاؤُكُمْ وَإِخْوَانُكُمْ وَأَزْوَاجُكُمْ وَعَشِيرَتُكُمْ وَأَمْوَالٌ اقْتَرَفْتُمُوهَا وَتِجَارَةٌ تَخْشَوْنَ كَسَادَهَا وَمَسَاكِنُ تَرْضَوْنَهَا أَحَبَّ إِلَيْكُم مِّنَ اللَّهِ وَرَسُولِهِ وَجِهَادٍ فِي سَبِيلِهِ فَتَرَبَّصُوا حَتَّىٰ يَأْتِيَ اللَّهُ بِأَمْرِهِ ۗ وَاللَّهُ لَا يَهْدِي الْقَوْمَ الْفَاسِقِينَ (24)
२४. तुम्ही सांगा की जर तुमचे पिता, तुमचे पुत्र आणि तुमचे बांधव आणि तुमच्या पत्न्या आणि तुमचे कुटुंब आणि कमविलेले धन आणि तो व्यापार, ज्याच्या कमतरतेचे तुम्ही भय राखता आणि ती घरे, जी तुम्हाला फार प्रिय आहेत (जर) हे सर्व तुम्हाला अल्लाह आणि त्याचा पैगंबर आणि अल्लाहच्या मार्गात जिहादपेक्षा जास्त प्रिय आहे तर मग प्रतिक्षा करा की सर्वश्रेष्ठ अल्लाहने आपला अज़ाब (शिक्षा-यातना) आणावी. सर्वश्रेष्ठ अल्लाह दुराचारी लोकांना मार्ग दाखवत नाही
لَقَدْ نَصَرَكُمُ اللَّهُ فِي مَوَاطِنَ كَثِيرَةٍ ۙ وَيَوْمَ حُنَيْنٍ ۙ إِذْ أَعْجَبَتْكُمْ كَثْرَتُكُمْ فَلَمْ تُغْنِ عَنكُمْ شَيْئًا وَضَاقَتْ عَلَيْكُمُ الْأَرْضُ بِمَا رَحُبَتْ ثُمَّ وَلَّيْتُم مُّدْبِرِينَ (25)
२५. निःसंशय, सर्वश्रेष्ठ अल्लाहने तुम्हाला अनेक युद्धभूमीत विजय प्रदान केला आहे आणि हुनैन-युद्धाच्या दिवशीही, जेव्हा तुम्हाला आपल्या जास्त संख्येबद्दल घमेंड होती, परंतु अशाने तुम्हाला काहीच लाभ झाला नाही, तथापि धरती आपली विशालता (बाळगत) असतानाही तुमच्यासाठी संकुचित (तंग) झाली, मग तुम्ही पाठ फिरवून दूर पळाले
ثُمَّ أَنزَلَ اللَّهُ سَكِينَتَهُ عَلَىٰ رَسُولِهِ وَعَلَى الْمُؤْمِنِينَ وَأَنزَلَ جُنُودًا لَّمْ تَرَوْهَا وَعَذَّبَ الَّذِينَ كَفَرُوا ۚ وَذَٰلِكَ جَزَاءُ الْكَافِرِينَ (26)
२६. मग अल्लाहने आपल्यातर्फे सलामती आपल्या पैगंबरावर आणि ईमानधारकांवर अवतरित केली आणि आपले ते सैन्य पाठविले जे तुम्ही पाहत नव्हते आणि काफिरांना (इन्कारी लोकांना) पूर्ण शिक्षा दिली आणि या काफिरांचा हाच मोबदला होता
ثُمَّ يَتُوبُ اللَّهُ مِن بَعْدِ ذَٰلِكَ عَلَىٰ مَن يَشَاءُ ۗ وَاللَّهُ غَفُورٌ رَّحِيمٌ (27)
२७. मग त्यानंतरही ज्याला इच्छिल, सर्वश्रेष्ठ अल्लाह माफ करील आणि अल्लाहच माफ करणारा दया करणारा आहे
يَا أَيُّهَا الَّذِينَ آمَنُوا إِنَّمَا الْمُشْرِكُونَ نَجَسٌ فَلَا يَقْرَبُوا الْمَسْجِدَ الْحَرَامَ بَعْدَ عَامِهِمْ هَٰذَا ۚ وَإِنْ خِفْتُمْ عَيْلَةً فَسَوْفَ يُغْنِيكُمُ اللَّهُ مِن فَضْلِهِ إِن شَاءَ ۚ إِنَّ اللَّهَ عَلِيمٌ حَكِيمٌ (28)
२८. हे ईमान राखणाऱ्यांनो! निःसंशय अनेकेश्वरवादी नापाक (अस्वच्छ अशुद्ध) आहेत.१ ज्यांनी या वर्षानंतर मसजिदे हराम (आदरणीय मसजिद-काबागृहा) च्या जवळही येता कामा नये जर तुम्हाला गरीबीचे भय असेल तर अल्लाह तुम्हाला आपल्या दया कृपेने धनवान करील जर अल्लाह इच्छिल. निःसंशय अल्लाह सर्वज्ञ आणि हिकमतशाली आहे
قَاتِلُوا الَّذِينَ لَا يُؤْمِنُونَ بِاللَّهِ وَلَا بِالْيَوْمِ الْآخِرِ وَلَا يُحَرِّمُونَ مَا حَرَّمَ اللَّهُ وَرَسُولُهُ وَلَا يَدِينُونَ دِينَ الْحَقِّ مِنَ الَّذِينَ أُوتُوا الْكِتَابَ حَتَّىٰ يُعْطُوا الْجِزْيَةَ عَن يَدٍ وَهُمْ صَاغِرُونَ (29)
२९. त्या लोकांशी लढा जे अल्लाहवर आणि आखिरतवर ईमान राखत नाही. जे अल्लाह आणि त्याच्या पैगंबराद्वारे हराम ठरविलेल्या वस्तूला हराम समजत नाही, ना ते सत्य-धर्माचा स्वीकार करतात. त्या लोकांपैकी ज्यांना ग्रंथ प्रदान केला गेला आहे, येथपर्यंत की त्यांनी अपमानित होऊन स्वहस्ते जिजिया (टॅक्स) अदा करावा
وَقَالَتِ الْيَهُودُ عُزَيْرٌ ابْنُ اللَّهِ وَقَالَتِ النَّصَارَى الْمَسِيحُ ابْنُ اللَّهِ ۖ ذَٰلِكَ قَوْلُهُم بِأَفْوَاهِهِمْ ۖ يُضَاهِئُونَ قَوْلَ الَّذِينَ كَفَرُوا مِن قَبْلُ ۚ قَاتَلَهُمُ اللَّهُ ۚ أَنَّىٰ يُؤْفَكُونَ (30)
३०. यहूदी म्हणतात की उज़ैर अल्लाहचा पुत्र आहे आणि ख्रिस्ती म्हणतात की मसीह अल्लाहचा पुत्र आहे, हे कथन फक्त त्यांच्या तोंडची गोष्ट आहे. पूर्वीच्या काफिरांच्या कथनाची हेदेखील बरोबरी करू लागले आहेत. अल्लाह सर्वनाश करो यांचा, हे कोठे भरकटत चालले आहेत
اتَّخَذُوا أَحْبَارَهُمْ وَرُهْبَانَهُمْ أَرْبَابًا مِّن دُونِ اللَّهِ وَالْمَسِيحَ ابْنَ مَرْيَمَ وَمَا أُمِرُوا إِلَّا لِيَعْبُدُوا إِلَٰهًا وَاحِدًا ۖ لَّا إِلَٰهَ إِلَّا هُوَ ۚ سُبْحَانَهُ عَمَّا يُشْرِكُونَ (31)
३१. त्या लोकांनी अल्लाहला सोडून आपल्या धर्म-ज्ञानी आणि धर्माचार्यांना रब (स्वामी, पालनहार) बनविले आहे, आणि मरियमपुत्र मसीहला वास्तविक त्यांना एकमेव अल्लाहचीच उपासना करण्याचा आदेश दिला गेला होता, ज्याच्याखेरीज कोणीही उपासना-योग्य नाही तो त्यांच्या शिर्क करण्यापासून पवित्र (पाक) आहे
يُرِيدُونَ أَن يُطْفِئُوا نُورَ اللَّهِ بِأَفْوَاهِهِمْ وَيَأْبَى اللَّهُ إِلَّا أَن يُتِمَّ نُورَهُ وَلَوْ كَرِهَ الْكَافِرُونَ (32)
३२. ते अल्लाहच्या दिव्य प्रकाशाला आपल्या तोंडांनी विझवू इच्छितात आणि अल्लाह इन्कार करतो, परंतु हे की आपल्या दिव्य प्रकाशाला पूर्णत्वास पोहचवावे, मग काफिरांना कितीही अप्रिय वाटो.१
هُوَ الَّذِي أَرْسَلَ رَسُولَهُ بِالْهُدَىٰ وَدِينِ الْحَقِّ لِيُظْهِرَهُ عَلَى الدِّينِ كُلِّهِ وَلَوْ كَرِهَ الْمُشْرِكُونَ (33)
३३. त्यानेच आपल्या पैगंबराला सच्चा मार्ग आणि सत्य धर्मासह पाठविले की त्याला इतर सर्व धर्मांवर वर्चस्वशाली करावे, मन अनेकेश्वरवादी लोकांना कितीही वाईट वाटो
۞ يَا أَيُّهَا الَّذِينَ آمَنُوا إِنَّ كَثِيرًا مِّنَ الْأَحْبَارِ وَالرُّهْبَانِ لَيَأْكُلُونَ أَمْوَالَ النَّاسِ بِالْبَاطِلِ وَيَصُدُّونَ عَن سَبِيلِ اللَّهِ ۗ وَالَّذِينَ يَكْنِزُونَ الذَّهَبَ وَالْفِضَّةَ وَلَا يُنفِقُونَهَا فِي سَبِيلِ اللَّهِ فَبَشِّرْهُم بِعَذَابٍ أَلِيمٍ (34)
३४. हे ईमान राखणाऱ्यांनो! बहुतेक धर्म-ज्ञानी आणि उपासक, लोकांचा माल नाहक गिळंकृत करतात आणि अल्लाहच्या मार्गापासून रोखतात आणि जे लोक सोने-चांदीचे खजिने बाळगतात आणि अल्लाहच्या मार्गात खर्च करीत नाही, त्यांना कठोर शिक्षा-यातनेची खबर ऐकवा
يَوْمَ يُحْمَىٰ عَلَيْهَا فِي نَارِ جَهَنَّمَ فَتُكْوَىٰ بِهَا جِبَاهُهُمْ وَجُنُوبُهُمْ وَظُهُورُهُمْ ۖ هَٰذَا مَا كَنَزْتُمْ لِأَنفُسِكُمْ فَذُوقُوا مَا كُنتُمْ تَكْنِزُونَ (35)
३५. ज्या दिवशी त्या खजिन्याला जहन्नमच्या आगीत तापविले जाईल, मग त्याद्वारे त्यांचे कपाळ आणि कूस- बगल आणि पाठींना डागले जाईल (त्यांना सांगितले जाईल) हेच ते, ज्याला तुम्ही आपल्यासाठी जमवून ठेवले होते, तर आपल्या या साठवून ठेवलेल्या खजिन्यांची गोडी चाखा
إِنَّ عِدَّةَ الشُّهُورِ عِندَ اللَّهِ اثْنَا عَشَرَ شَهْرًا فِي كِتَابِ اللَّهِ يَوْمَ خَلَقَ السَّمَاوَاتِ وَالْأَرْضَ مِنْهَا أَرْبَعَةٌ حُرُمٌ ۚ ذَٰلِكَ الدِّينُ الْقَيِّمُ ۚ فَلَا تَظْلِمُوا فِيهِنَّ أَنفُسَكُمْ ۚ وَقَاتِلُوا الْمُشْرِكِينَ كَافَّةً كَمَا يُقَاتِلُونَكُمْ كَافَّةً ۚ وَاعْلَمُوا أَنَّ اللَّهَ مَعَ الْمُتَّقِينَ (36)
३६. महिन्यांची गणना अल्लाहच्या जवळ, अल्लाहच्या ग्रंथात बारा आहे, त्याच दिवसापासून, जेव्हापासून आकाशांना आणि जमिनीला त्याने निर्माण केले आहे. त्यांच्यापैकी चार महिने आदर आणि प्रतिष्ठेचे आहेत. हाच पवित्र धर्म आहे. तुम्ही या महिन्यांच्या काळात आपल्या प्राणांवर अत्याचार करू नका आणि तु्‌ही सर्व अनेकेश्वरवाद्यांशी जिहाद करा जसे ते तुम्हा सर्वांशी लढतात आणि लक्षात ठेवा की अल्लाह भय राखून कर्म करणाऱ्यांच्या सोबत आहे
إِنَّمَا النَّسِيءُ زِيَادَةٌ فِي الْكُفْرِ ۖ يُضَلُّ بِهِ الَّذِينَ كَفَرُوا يُحِلُّونَهُ عَامًا وَيُحَرِّمُونَهُ عَامًا لِّيُوَاطِئُوا عِدَّةَ مَا حَرَّمَ اللَّهُ فَيُحِلُّوا مَا حَرَّمَ اللَّهُ ۚ زُيِّنَ لَهُمْ سُوءُ أَعْمَالِهِمْ ۗ وَاللَّهُ لَا يَهْدِي الْقَوْمَ الْكَافِرِينَ (37)
३७. महिन्यांना पुढे मागे करणे, कुप्र (अधर्म) ला वाढविणे आहे. त्याद्वारे त्यांना मार्गभ्रष्ट केले जाते, जे काफिर आहेत, एका वर्षाला हलाल करून घेतात आणि एका वर्षाला हराम ठरवितात की अल्लाहने जे हराम ठरविले आहे, त्याच्या गणनेत बरोबरीने करून घ्यावे, मग ज्याला हराम केले आहे, त्याला हलाल ठरवावे. त्यांची वाईट कर्मे त्यांना चांगली दाखविली गेली आहेत आणि अल्लाह काफिरांना मार्गदर्शन करीत नाही
يَا أَيُّهَا الَّذِينَ آمَنُوا مَا لَكُمْ إِذَا قِيلَ لَكُمُ انفِرُوا فِي سَبِيلِ اللَّهِ اثَّاقَلْتُمْ إِلَى الْأَرْضِ ۚ أَرَضِيتُم بِالْحَيَاةِ الدُّنْيَا مِنَ الْآخِرَةِ ۚ فَمَا مَتَاعُ الْحَيَاةِ الدُّنْيَا فِي الْآخِرَةِ إِلَّا قَلِيلٌ (38)
३८. हे ईमान राखणाऱ्यांनो! तुम्हाला झाले तरी काय की जेव्हा तुम्हाला सांगितले जाते की चला, अल्लाहच्या मार्गात देशत्याग करा, तर तुम्ही जमिनीला बिलगता. काय तुम्ही आखिरतऐवजी ऐहिक जीवनावर राजी झालात? ऐका या जगाचे जीवन आखिरतच्या तुलनेत अतिशय लहान आहे
إِلَّا تَنفِرُوا يُعَذِّبْكُمْ عَذَابًا أَلِيمًا وَيَسْتَبْدِلْ قَوْمًا غَيْرَكُمْ وَلَا تَضُرُّوهُ شَيْئًا ۗ وَاللَّهُ عَلَىٰ كُلِّ شَيْءٍ قَدِيرٌ (39)
३९. जर तुम्ही देशत्याग (हिजरत) केला नाही तर सर्वश्रेष्ठ अल्लाह तुम्हाला दुःखदायक शिक्षा देईल आणि तुमच्याखेरीज दुसऱ्या लोकांना बदलून आणील. तुम्ही सर्वश्रेष्ठ अल्लाहला कोणतेही नुकसान पोहचवू शकत नाही आणि अल्लाह सर्व काही करण्यास समर्थ आहे
إِلَّا تَنصُرُوهُ فَقَدْ نَصَرَهُ اللَّهُ إِذْ أَخْرَجَهُ الَّذِينَ كَفَرُوا ثَانِيَ اثْنَيْنِ إِذْ هُمَا فِي الْغَارِ إِذْ يَقُولُ لِصَاحِبِهِ لَا تَحْزَنْ إِنَّ اللَّهَ مَعَنَا ۖ فَأَنزَلَ اللَّهُ سَكِينَتَهُ عَلَيْهِ وَأَيَّدَهُ بِجُنُودٍ لَّمْ تَرَوْهَا وَجَعَلَ كَلِمَةَ الَّذِينَ كَفَرُوا السُّفْلَىٰ ۗ وَكَلِمَةُ اللَّهِ هِيَ الْعُلْيَا ۗ وَاللَّهُ عَزِيزٌ حَكِيمٌ (40)
४०. जर तुम्ही पैगंबर (मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम) ची मदत न कराल तर अल्लाहनेच त्यांची मदत केली अशा वेळी जेव्हा काफिर लोकांनी त्यांना (देशा) बाहेर घालविले होते. दोनपैकी दुसरा जेव्हा ते दोघे गुफेत होते, जेव्हा ते आपल्या साथीदारास सांगत होते, चिंता करू नका अल्लाह आमच्या सोबत आहे. तेव्हा अल्लाहनेच आपल्यातर्फे शांती-समाधान उतरवून अशा सैन्यांद्वारे त्यांना मदत पोहचिवली, ज्यांना तुम्ही पाहिलेसुद्धा नाही. त्याने काफिरांचा बोल खाली पाडला आणि मोठा व उत्तम बोल तर अल्लाहचाच आहे. सर्वश्रेष्ठ अल्लाह वर्चस्वशाली आणि हिकमत बाळगणारा आहे
انفِرُوا خِفَافًا وَثِقَالًا وَجَاهِدُوا بِأَمْوَالِكُمْ وَأَنفُسِكُمْ فِي سَبِيلِ اللَّهِ ۚ ذَٰلِكُمْ خَيْرٌ لَّكُمْ إِن كُنتُمْ تَعْلَمُونَ (41)
४१. निघा, उठा हलक्या अवस्थेत असाल तरीही आणि भारी अवजड असाल तरीही आणि अल्लाहच्या मार्गात आपल्या तन-मन-धनाने जिहाद करा. हेच तुमच्याकरिता चांगले आहे जर तुम्ही जाणत असाल
لَوْ كَانَ عَرَضًا قَرِيبًا وَسَفَرًا قَاصِدًا لَّاتَّبَعُوكَ وَلَٰكِن بَعُدَتْ عَلَيْهِمُ الشُّقَّةُ ۚ وَسَيَحْلِفُونَ بِاللَّهِ لَوِ اسْتَطَعْنَا لَخَرَجْنَا مَعَكُمْ يُهْلِكُونَ أَنفُسَهُمْ وَاللَّهُ يَعْلَمُ إِنَّهُمْ لَكَاذِبُونَ (42)
४२. जर त्वरित प्राप्त होणारी धन-संपदा असती, आणि हलकासा प्रवास असता तर हे अवश्य तुमच्या मागे निघाले असते, परंतु त्यांना तर लांब अंतराचा प्रवास मोठा कठीण वाटला आणि आता तर हे अल्लाहची शपथ घेऊन सांगतील की आमच्या अंगी जर शक्ती-सामर्थ्य राहिले असते तर आम्ही अवश्य तुमच्यासोबत निघालो असतो. ते आपल्या प्राणांना स्वतःच विनाशाकडे नेत आहेत. त्यांच्या खोटेपणाचे खरे ज्ञान अल्लाहला आहे
عَفَا اللَّهُ عَنكَ لِمَ أَذِنتَ لَهُمْ حَتَّىٰ يَتَبَيَّنَ لَكَ الَّذِينَ صَدَقُوا وَتَعْلَمَ الْكَاذِبِينَ (43)
४३. अल्लाह तुम्हाला क्षमा करो, तुम्ही त्यांना परवानगी का दिली, याविना की तुमच्या समोर सच्चे व प्रामाणिक लोक स्पष्टपणे जाहीर व्हावेत आणि तुम्ही खोट्या लोकांनाही जाणून घ्यावे
لَا يَسْتَأْذِنُكَ الَّذِينَ يُؤْمِنُونَ بِاللَّهِ وَالْيَوْمِ الْآخِرِ أَن يُجَاهِدُوا بِأَمْوَالِهِمْ وَأَنفُسِهِمْ ۗ وَاللَّهُ عَلِيمٌ بِالْمُتَّقِينَ (44)
४४. अल्लाहवर आणि कयामत (प्रलया) च्या दिवसावर ईमान आणि दृढ विश्वास राखणारे लोक तर धनाने व प्राणाने जिहाद करण्यापासून थांबून राहण्याची परवानगी तुमच्याकडे कधीही मागणार नाहीत आणि सर्वश्रेष्ठ अल्लाह, दुष्कर्मांपासून दूर राहणाऱ्या लोकांना चांगल्या प्रकारे जाणतो
إِنَّمَا يَسْتَأْذِنُكَ الَّذِينَ لَا يُؤْمِنُونَ بِاللَّهِ وَالْيَوْمِ الْآخِرِ وَارْتَابَتْ قُلُوبُهُمْ فَهُمْ فِي رَيْبِهِمْ يَتَرَدَّدُونَ (45)
४५. ही परवानगी तर तुमच्याजवळ तेच लोक मागतात, ज्यांचे ना अल्लाहवर ईमान आहे, ना आखिरच्या दिवसावर अटळ विश्वास आहे, ज्यांची मने संशयग्रस्त आहेत आणि ते आपल्या संशयातच भटकत आहेत
۞ وَلَوْ أَرَادُوا الْخُرُوجَ لَأَعَدُّوا لَهُ عُدَّةً وَلَٰكِن كَرِهَ اللَّهُ انبِعَاثَهُمْ فَثَبَّطَهُمْ وَقِيلَ اقْعُدُوا مَعَ الْقَاعِدِينَ (46)
४६. जर त्यांचा इरादा (जिहादकरिता) निघण्याचा असता तर त्यांनी या प्रवासाकरिता साधनांची तयारी केली असती, परंतु अल्लाहला त्यांचे उठणे प्रिय नव्हते, यास्तव त्यांनी काही करण्यापासून रोखले आणि त्यांना सांगितले गेले की तुम्ही बसून राहणाऱ्यांसोबत बसूनच राहा
لَوْ خَرَجُوا فِيكُم مَّا زَادُوكُمْ إِلَّا خَبَالًا وَلَأَوْضَعُوا خِلَالَكُمْ يَبْغُونَكُمُ الْفِتْنَةَ وَفِيكُمْ سَمَّاعُونَ لَهُمْ ۗ وَاللَّهُ عَلِيمٌ بِالظَّالِمِينَ (47)
४७. जर हे तुमच्याच सोबत निघालेही असते तर तुमच्यासाठी उपद्रवाखेरीज दुसऱ्या कोणत्याही गोष्टीची वाढ केली नसती, किंबहुना तुमच्या दरम्यान उत्पात माजविण्यासाठी धावपळ केली असती आणि तुमच्यात फूट पाडण्याची संधी शोधत राहिले असते, त्यांना मानणारे स्वतः तुमच्यात हजर आहेत आणि सर्वश्रेष्ठ अल्लाह अत्याचारी लोकांना चांगल्या प्रकारे जाणतो
لَقَدِ ابْتَغَوُا الْفِتْنَةَ مِن قَبْلُ وَقَلَّبُوا لَكَ الْأُمُورَ حَتَّىٰ جَاءَ الْحَقُّ وَظَهَرَ أَمْرُ اللَّهِ وَهُمْ كَارِهُونَ (48)
४८. हे तर यापूर्वीही फूट पाडण्याची संधी शोधत राहिले आणि तुमच्यासाठी कार्यात उलटफेर करीत राहिले, येथपर्यंत की सत्य घेऊन पोहोचले आणि अल्लाहचा आदेश प्रभावी झाला, तरीदेखील ते लोक वाईट मानतच राहिले
وَمِنْهُم مَّن يَقُولُ ائْذَن لِّي وَلَا تَفْتِنِّي ۚ أَلَا فِي الْفِتْنَةِ سَقَطُوا ۗ وَإِنَّ جَهَنَّمَ لَمُحِيطَةٌ بِالْكَافِرِينَ (49)
४९. त्यांच्यापैकी कोणी म्हणतो की मला आदेश द्या, मला संकटात टाकू नका. जाणून असा की ते संकटग्रस्त झाले आहेत आणि निःसंशय जहन्नम काफिरांना घेरून टाकणारी आहे
إِن تُصِبْكَ حَسَنَةٌ تَسُؤْهُمْ ۖ وَإِن تُصِبْكَ مُصِيبَةٌ يَقُولُوا قَدْ أَخَذْنَا أَمْرَنَا مِن قَبْلُ وَيَتَوَلَّوا وَّهُمْ فَرِحُونَ (50)
५०. तुम्हाला जर एखादी भलाई प्राप्त झाली तर त्यांना वाईट वाटते, आणि जर कष्ट यातना पोहोचली तर म्हणतात, आम्ही तर आपली व्यवस्था पहिल्यापासून ठीकठाक करून घेतली होती, मग खूप तोऱ्याने ऐट दाखवित परत जातात
قُل لَّن يُصِيبَنَا إِلَّا مَا كَتَبَ اللَّهُ لَنَا هُوَ مَوْلَانَا ۚ وَعَلَى اللَّهِ فَلْيَتَوَكَّلِ الْمُؤْمِنُونَ (51)
५१. तुम्ही सांगा, आम्हाला त्याखेरीज कोणतीही गोष्ट पोहोचू शकत नाही, जी अल्लाहने आमच्यासाठी लिहून ठेवली आहे. तो आमचा स्वामी आहे आणि (तुम्ही सांगा) ईमानधारकांनी अल्लाहवरच पूर्ण भरोसा ठेवला पाहिजे
قُلْ هَلْ تَرَبَّصُونَ بِنَا إِلَّا إِحْدَى الْحُسْنَيَيْنِ ۖ وَنَحْنُ نَتَرَبَّصُ بِكُمْ أَن يُصِيبَكُمُ اللَّهُ بِعَذَابٍ مِّنْ عِندِهِ أَوْ بِأَيْدِينَا ۖ فَتَرَبَّصُوا إِنَّا مَعَكُم مُّتَرَبِّصُونَ (52)
५२. तुम्ही सांगा, तुम्ही आमच्याबाबत ज्या गोष्टींच्या प्रतिक्षेत आहात, ती दोन चांगल्या गोष्टींपैकी एक आहे आणि आम्ही तुमच्याबाबत या गोष्टीच्या प्रतिक्षेत आहोत की एकतर अल्लाहने तुम्हाला आपल्यातर्फे एखादी शिक्षा द्यावी किंवा आमच्या हातून, तेव्हा एका बाजूला तुम्ही प्रतिक्षा करा, दुसऱ्या बाजूला आम्ही तुमच्यासोबत प्रतिक्षा करीत आहोत
قُلْ أَنفِقُوا طَوْعًا أَوْ كَرْهًا لَّن يُتَقَبَّلَ مِنكُمْ ۖ إِنَّكُمْ كُنتُمْ قَوْمًا فَاسِقِينَ (53)
५३. तुम्ही सांगा की तुम्ही खुशीने खर्च करा किंवा नाखुशीने, कबूल तर कधीही केला जाणार नाही. निःसंशय तुम्ही दुराचारी लोक आहात
وَمَا مَنَعَهُمْ أَن تُقْبَلَ مِنْهُمْ نَفَقَاتُهُمْ إِلَّا أَنَّهُمْ كَفَرُوا بِاللَّهِ وَبِرَسُولِهِ وَلَا يَأْتُونَ الصَّلَاةَ إِلَّا وَهُمْ كُسَالَىٰ وَلَا يُنفِقُونَ إِلَّا وَهُمْ كَارِهُونَ (54)
५४. त्यांचे खर्च करणे कबूल न होण्याचे कारण याखेरीज कोणतेही नाही की हे अल्लाह आणि त्याच्या पैगंबराचे अवज्ञाकारी आहेत आणि मोठ्या सुस्तीने नमाजला येतात आणि वाईट मनाने खर्च करतात
فَلَا تُعْجِبْكَ أَمْوَالُهُمْ وَلَا أَوْلَادُهُمْ ۚ إِنَّمَا يُرِيدُ اللَّهُ لِيُعَذِّبَهُم بِهَا فِي الْحَيَاةِ الدُّنْيَا وَتَزْهَقَ أَنفُسُهُمْ وَهُمْ كَافِرُونَ (55)
५५. यास्तव त्यांची धन-संपत्ती आणि संततीने तुम्हाला आश्चर्यात टाकू नये. अल्लाह हेच इच्छितो की त्यांना या जगाच्या जीवनातच शिक्षा द्यावी आणि त्यांच्या इन्कार करण्याच्या अवस्थेतच त्यांचा प्राण निघावा
وَيَحْلِفُونَ بِاللَّهِ إِنَّهُمْ لَمِنكُمْ وَمَا هُم مِّنكُمْ وَلَٰكِنَّهُمْ قَوْمٌ يَفْرَقُونَ (56)
५६. आणि हे अल्लाहची शपथ घेऊन सांगतात की हे तुमच्या गटाचे लोक आहेत, वास्तविक ते तुमच्या गटाचे नाहीत, गोष्ट केवळ एवढीच की हे भित्रे लोक आहेत
لَوْ يَجِدُونَ مَلْجَأً أَوْ مَغَارَاتٍ أَوْ مُدَّخَلًا لَّوَلَّوْا إِلَيْهِ وَهُمْ يَجْمَحُونَ (57)
५७. जर यांना एखादे सुरक्षित स्थान किंवा एखादी गुफा किंवा कोणतीही घुसून बसण्याची जागा मिळाली तर लगेच धाव घेत पळत सुटतील
وَمِنْهُم مَّن يَلْمِزُكَ فِي الصَّدَقَاتِ فَإِنْ أُعْطُوا مِنْهَا رَضُوا وَإِن لَّمْ يُعْطَوْا مِنْهَا إِذَا هُمْ يَسْخَطُونَ (58)
५८. त्यांच्यात तेदेखील आहेत, जे दानाच्या धनाच्या वाटणीबाबत तुमच्यावर आरोप ठेवतात, जर त्यातून त्यांना मिळाल्यास आनंद होतो आणि जर त्यातून काही न मिळाले तर त्वरित नाराज होऊ लागतात
وَلَوْ أَنَّهُمْ رَضُوا مَا آتَاهُمُ اللَّهُ وَرَسُولُهُ وَقَالُوا حَسْبُنَا اللَّهُ سَيُؤْتِينَا اللَّهُ مِن فَضْلِهِ وَرَسُولُهُ إِنَّا إِلَى اللَّهِ رَاغِبُونَ (59)
५९. जर हे लोक अल्लाह आणि त्याच्या पैगंबरानी दिलेल्यावर खूश राहिले असते आणि म्हणाले असते की अल्लाह आम्हाला पुरेसा आहे, अल्लाह आपल्या कृपेने आम्हाला देईल आणि त्याचा पैगंबरही. आम्ही तर अल्लाहकडूनच अपेक्षा राखणारे आहोत
۞ إِنَّمَا الصَّدَقَاتُ لِلْفُقَرَاءِ وَالْمَسَاكِينِ وَالْعَامِلِينَ عَلَيْهَا وَالْمُؤَلَّفَةِ قُلُوبُهُمْ وَفِي الرِّقَابِ وَالْغَارِمِينَ وَفِي سَبِيلِ اللَّهِ وَابْنِ السَّبِيلِ ۖ فَرِيضَةً مِّنَ اللَّهِ ۗ وَاللَّهُ عَلِيمٌ حَكِيمٌ (60)
६०. दान केवळ फकीरांकरिता आहे आणि गरीबांकरिता आणि त्यांचे काम करणाऱ्यांकरिता आणि त्या लोकांकरिता ज्यांची मनधरणी केली जात असेल आणि गुलाम मुक्त करण्याकरिता आणि कर्जदार लोकांकरिता, आणि अल्लाहच्या मार्गात आणि प्रवाशांकरिता, अनिवार्य कर्तव्य आहे अल्लाहतर्फे आणि अल्लाह सर्वज्ञ हिकमतशाली आहे
وَمِنْهُمُ الَّذِينَ يُؤْذُونَ النَّبِيَّ وَيَقُولُونَ هُوَ أُذُنٌ ۚ قُلْ أُذُنُ خَيْرٍ لَّكُمْ يُؤْمِنُ بِاللَّهِ وَيُؤْمِنُ لِلْمُؤْمِنِينَ وَرَحْمَةٌ لِّلَّذِينَ آمَنُوا مِنكُمْ ۚ وَالَّذِينَ يُؤْذُونَ رَسُولَ اللَّهِ لَهُمْ عَذَابٌ أَلِيمٌ (61)
६१. आणि त्यांच्यात असेदेखील आहेत, जे पैगंबराला दुःख यातना पोहचवितात आणि म्हणतात की हलक्या कानाचा आहे (तुम्ही) सांगा, की तो कान तुमच्या भलाईसाठी आहे. तो अल्लाहवर ईमान राखतो आणि ईमानधारकांच्या बोलण्यावर विश्वास ठेवतो आणि तुमच्यापैकी जे ईमानधारक आहेत, हे त्यांच्यासाठी दया कृपा आहेत आणि अल्लाहचे रसूल यांना जे लोक दुःख यातना पोहचवितात, त्यांच्यासाठी दुःखदायक अज़ाब (शिक्षा-यातना) आहे
يَحْلِفُونَ بِاللَّهِ لَكُمْ لِيُرْضُوكُمْ وَاللَّهُ وَرَسُولُهُ أَحَقُّ أَن يُرْضُوهُ إِن كَانُوا مُؤْمِنِينَ (62)
६२. ते केवळ तुम्हाला खूश करण्यासाठी तुमच्यासमोर अल्लाहची शपथ घेतात, वस्तुतः हे ईमान राखणारे असते तर अल्लाह आणि त्याचे रसूल (पैगंबर) खूश केले जाण्यास अधिक पात्र होते
أَلَمْ يَعْلَمُوا أَنَّهُ مَن يُحَادِدِ اللَّهَ وَرَسُولَهُ فَأَنَّ لَهُ نَارَ جَهَنَّمَ خَالِدًا فِيهَا ۚ ذَٰلِكَ الْخِزْيُ الْعَظِيمُ (63)
६३. काय हे नाही जाणत की जो कोणी अल्लाहचा आणि त्याच्या पैगंबराचा विरोध करील, त्याच्यासाठी निश्चितच जहन्नमची आग आहे, जिच्यात ते नेहमी राहतील. हा फार मोठा अपमान आहे
يَحْذَرُ الْمُنَافِقُونَ أَن تُنَزَّلَ عَلَيْهِمْ سُورَةٌ تُنَبِّئُهُم بِمَا فِي قُلُوبِهِمْ ۚ قُلِ اسْتَهْزِئُوا إِنَّ اللَّهَ مُخْرِجٌ مَّا تَحْذَرُونَ (64)
६४. मुनाफिक लोकांना अर्थात ढोंगी मुसलमानांना (नेहमी) हे भय वाटत असते की कदाचित त्यांच्यावर (ईमानधारकांवर) एखादी आयत न अवतरित व्हावी, जी त्यांच्या मनातल्या गोष्टी त्यांना सांगून टाकील. तुम्ही सांगा की तुम्ही थट्टा मस्करी करीत राहा. निःसंशय सर्वश्रेष्ठ अल्लाह ते जाहीर करणारा आहे, ज्यापासून तुम्ही भयभीत आहात
وَلَئِن سَأَلْتَهُمْ لَيَقُولُنَّ إِنَّمَا كُنَّا نَخُوضُ وَنَلْعَبُ ۚ قُلْ أَبِاللَّهِ وَآيَاتِهِ وَرَسُولِهِ كُنتُمْ تَسْتَهْزِئُونَ (65)
६५. जर तुम्ही विचाराल तर साफ म्हणतील की आम्ही तर असेच आपसात थट्टा विनोद करीत होतो. त्यांना सांगा की काय अल्लाह त्याच्या आयती आणि त्याचा रसूल एवढेच तुमच्या थट्टा-मस्करीकरिता बाकी राहिलेत
لَا تَعْتَذِرُوا قَدْ كَفَرْتُم بَعْدَ إِيمَانِكُمْ ۚ إِن نَّعْفُ عَن طَائِفَةٍ مِّنكُمْ نُعَذِّبْ طَائِفَةً بِأَنَّهُمْ كَانُوا مُجْرِمِينَ (66)
६६. तुम्ही बहाणे बनवू नका. निःसंशय तुम्ही आपल्या ईमान राखल्यानंतर काफिर (इन्कारी) झाले. जर आम्ही तुमच्यापैकी काही लोकांना माफ जरी केले तरी काही लोकांना त्यांच्या अत्याचाराची सक्त सजा देणारच
الْمُنَافِقُونَ وَالْمُنَافِقَاتُ بَعْضُهُم مِّن بَعْضٍ ۚ يَأْمُرُونَ بِالْمُنكَرِ وَيَنْهَوْنَ عَنِ الْمَعْرُوفِ وَيَقْبِضُونَ أَيْدِيَهُمْ ۚ نَسُوا اللَّهَ فَنَسِيَهُمْ ۗ إِنَّ الْمُنَافِقِينَ هُمُ الْفَاسِقُونَ (67)
६७. सर्वच मुनाफिक (दांभिक) पुरुष आणि स्त्रिया आपसात सारखेच आहेत. ते वाईट गोष्टींचा आदेश देतात आणि भल्या गोष्टींपासून रोखतात आणि आपली मूठ बंद ठेवतात, हे अल्लाहला विसरले, अल्लाहनेही त्यांचा विसर पाडला. निःसंशय मुनाफिक (दुतोंडी) लोकच दुराचारी आहेत
وَعَدَ اللَّهُ الْمُنَافِقِينَ وَالْمُنَافِقَاتِ وَالْكُفَّارَ نَارَ جَهَنَّمَ خَالِدِينَ فِيهَا ۚ هِيَ حَسْبُهُمْ ۚ وَلَعَنَهُمُ اللَّهُ ۖ وَلَهُمْ عَذَابٌ مُّقِيمٌ (68)
६८. सर्वश्रेष्ठ अल्लाहने या मुनाफिक पुरुष-स्त्रियांशी आणि काफिरांशी जहन्नमच्या आगीचा वायदा केलेला आहे, जिथे ते नेहमी राहतील तेच त्यांच्यासाठी पुरेसे आहे. त्यांचा अल्लाहतर्फे धिःक्कार आहे आणि त्यांच्यासाठी कायमस्वरूपी शिक्षा यातना आहे
كَالَّذِينَ مِن قَبْلِكُمْ كَانُوا أَشَدَّ مِنكُمْ قُوَّةً وَأَكْثَرَ أَمْوَالًا وَأَوْلَادًا فَاسْتَمْتَعُوا بِخَلَاقِهِمْ فَاسْتَمْتَعْتُم بِخَلَاقِكُمْ كَمَا اسْتَمْتَعَ الَّذِينَ مِن قَبْلِكُم بِخَلَاقِهِمْ وَخُضْتُمْ كَالَّذِي خَاضُوا ۚ أُولَٰئِكَ حَبِطَتْ أَعْمَالُهُمْ فِي الدُّنْيَا وَالْآخِرَةِ ۖ وَأُولَٰئِكَ هُمُ الْخَاسِرُونَ (69)
६९. तुमच्यापूर्वी होऊन गेलेल्या लोकांप्रमाणे, जे तुमच्यापेक्षा शूर आणि धन-संपत्ती व संतती जास्त बाळगत होते, तर त्यांनी आपला धार्मिक भाग उचलला, मग तुम्हीही आपला हिस्सा उचलत आहात. ज्याप्रमाणे तुमच्यापूर्वीचे लोक आपल्या हिश्यांद्वारे लाभान्वित झाले आणि तुम्हीदेखील त्याचप्रमाणे मस्करीची गोष्ट केली, जशी त्यांनी केली होती. त्यांची कर्मे या जगात आणि आखिरतमध्ये वाया गेलीत आणि हेच लोक तोट्यात आहेत
أَلَمْ يَأْتِهِمْ نَبَأُ الَّذِينَ مِن قَبْلِهِمْ قَوْمِ نُوحٍ وَعَادٍ وَثَمُودَ وَقَوْمِ إِبْرَاهِيمَ وَأَصْحَابِ مَدْيَنَ وَالْمُؤْتَفِكَاتِ ۚ أَتَتْهُمْ رُسُلُهُم بِالْبَيِّنَاتِ ۖ فَمَا كَانَ اللَّهُ لِيَظْلِمَهُمْ وَلَٰكِن كَانُوا أَنفُسَهُمْ يَظْلِمُونَ (70)
७०. काय त्यांना आपल्यापूर्वी होऊन गेलेल्या लोकांची खबर नाही पोहोचली? नूह आणि आद आणि समूदचे जनसमूह आणि इब्राहीमचा जनसमूह आणि मदयनचे रहिवाशी आणि उलटून पालथ्या घातलेल्या वस्त्यांच्या लोकांची. त्यांच्याजवळ पैगंबर स्पष्ट निशाण्या घेऊन पोहोचले तेव्हा सर्वश्रेष्ठ अल्लाह असा नव्हता की त्यांच्यावर अत्याचार करील. उलट त्यांनी स्वतःच आपल्यावर अत्याचार करून घेतला
وَالْمُؤْمِنُونَ وَالْمُؤْمِنَاتُ بَعْضُهُمْ أَوْلِيَاءُ بَعْضٍ ۚ يَأْمُرُونَ بِالْمَعْرُوفِ وَيَنْهَوْنَ عَنِ الْمُنكَرِ وَيُقِيمُونَ الصَّلَاةَ وَيُؤْتُونَ الزَّكَاةَ وَيُطِيعُونَ اللَّهَ وَرَسُولَهُ ۚ أُولَٰئِكَ سَيَرْحَمُهُمُ اللَّهُ ۗ إِنَّ اللَّهَ عَزِيزٌ حَكِيمٌ (71)
७१. ईमानधारक पुरुष आणि स्त्रिया आपसात एकमेकांचे (सहाय्यक आणि) मित्र आहेत. ते चांगल्या गोष्टींचा आदेश देतात, आणि वाईट गोष्टींपासून रोखतात. नमाज नियमितपणे पढतात. जकात अदा करतात. अल्लाह आणि त्याच्या पैगंबरांचे म्हणणे मान्य करतात. अशाच लोकांवर अल्लाह लवकरच दया कृपा करील. निःसंशय अल्लाह वर्चस्वशाली, हिकमत बाळगणारा आहे
وَعَدَ اللَّهُ الْمُؤْمِنِينَ وَالْمُؤْمِنَاتِ جَنَّاتٍ تَجْرِي مِن تَحْتِهَا الْأَنْهَارُ خَالِدِينَ فِيهَا وَمَسَاكِنَ طَيِّبَةً فِي جَنَّاتِ عَدْنٍ ۚ وَرِضْوَانٌ مِّنَ اللَّهِ أَكْبَرُ ۚ ذَٰلِكَ هُوَ الْفَوْزُ الْعَظِيمُ (72)
७२. या ईमानधारक पुरुष आणि स्त्रियांशी अल्लाहने त्या जन्नतींचा वायदा केला आहे, ज्यांच्याखाली प्रवाह वाहत आहेत, जिथे ते नेहमीकरिता राहतील, आणि त्या पाक स्वच्छ घराचा, जे त्या अविनाशी जन्नतमध्ये आहे आणि अल्लाहची प्रसन्नता सर्वांत महान आहे. हीच फार मोठी सफलता आहे
يَا أَيُّهَا النَّبِيُّ جَاهِدِ الْكُفَّارَ وَالْمُنَافِقِينَ وَاغْلُظْ عَلَيْهِمْ ۚ وَمَأْوَاهُمْ جَهَنَّمُ ۖ وَبِئْسَ الْمَصِيرُ (73)
७३. हे नबी! काफिरांशी आणि मुनाफिक लोकांशी जिहाद करीत राहा आणि त्यांच्यावर सक्ती करा. त्यांचे खरे ठिकाण जहन्नम आहे. जे अतिशय वाईट ठिकाण आहे
يَحْلِفُونَ بِاللَّهِ مَا قَالُوا وَلَقَدْ قَالُوا كَلِمَةَ الْكُفْرِ وَكَفَرُوا بَعْدَ إِسْلَامِهِمْ وَهَمُّوا بِمَا لَمْ يَنَالُوا ۚ وَمَا نَقَمُوا إِلَّا أَنْ أَغْنَاهُمُ اللَّهُ وَرَسُولُهُ مِن فَضْلِهِ ۚ فَإِن يَتُوبُوا يَكُ خَيْرًا لَّهُمْ ۖ وَإِن يَتَوَلَّوْا يُعَذِّبْهُمُ اللَّهُ عَذَابًا أَلِيمًا فِي الدُّنْيَا وَالْآخِرَةِ ۚ وَمَا لَهُمْ فِي الْأَرْضِ مِن وَلِيٍّ وَلَا نَصِيرٍ (74)
७४. हे अल्लाहची शपथ घेऊन सांगतात की त्यांनी असे म्हटले नाही. वास्तिवक सत्याचा इन्कार त्यांनी आपल्या तोंडानी केलेला आहे. आणि हे इस्लामचा स्वीकार केल्यानंतरही काफिर झालेत आणि यांनी त्या कामाचा इरादाही केला आहे, ज्याला ते प्राप्त करू शकले नाहीत. हे केवळ याच गोष्टीचा सूड घेत आहेत की त्यांना अल्लाहने आपल्या कृपेने आणि याच्या पैगंबराने धनवान केले जर हे अजूनही तौबा (पश्चात्ताप) करून घेतील तर हे त्यांच्या हक्कात चांगले आहे आणि जर तोंड फिरवतील तर अल्लाह त्यांना या जगात आणि आखिरतमध्ये दुःखदायक शिक्षा देईल आणि संपूर्ण धरतीत त्यांना कोणी मित्र आणि मदत करणारा लाभणार नाही
۞ وَمِنْهُم مَّنْ عَاهَدَ اللَّهَ لَئِنْ آتَانَا مِن فَضْلِهِ لَنَصَّدَّقَنَّ وَلَنَكُونَنَّ مِنَ الصَّالِحِينَ (75)
७५. यांच्यात असेदेखील आहेत, ज्यांनी अल्लाहशी वायदा केला होता की जर तो आम्हाला आपल्या कृपेने धन प्रदान करील तर आम्ही अवश्य दान करू आणि पूर्णतः नेक सदाचारी लोकांपैकी होऊ
فَلَمَّا آتَاهُم مِّن فَضْلِهِ بَخِلُوا بِهِ وَتَوَلَّوا وَّهُم مُّعْرِضُونَ (76)
७६. परंतु जेव्हा अल्लाहने आपल्या कृपेने त्यांना दिले तेव्हा हे त्यात कंजूसपणा करू लागले आणि टाळाटाळ करून तोंड फिरविले
فَأَعْقَبَهُمْ نِفَاقًا فِي قُلُوبِهِمْ إِلَىٰ يَوْمِ يَلْقَوْنَهُ بِمَا أَخْلَفُوا اللَّهَ مَا وَعَدُوهُ وَبِمَا كَانُوا يَكْذِبُونَ (77)
७७. तेव्हा याची शिक्षा म्हणून अल्लाहने त्यांच्या मनात फूटीरता टाकली अल्लाहच्या भेटीच्या दिवसपर्यंत कारण त्यांनी अल्लाहशी केलेल्या वायद्याचा भंग केला, आणि खोटे बोलत राहिले
أَلَمْ يَعْلَمُوا أَنَّ اللَّهَ يَعْلَمُ سِرَّهُمْ وَنَجْوَاهُمْ وَأَنَّ اللَّهَ عَلَّامُ الْغُيُوبِ (78)
७८. काय ते हे नाही जाणत की अल्लाहला त्यांच्या मनातला गुप्त भेद आणि त्यांच्या कानगोष्टी सर्व माहीत आहे आणि अल्लाह सर्व लपलेल्या गोष्टींना जाणणारा आहे
الَّذِينَ يَلْمِزُونَ الْمُطَّوِّعِينَ مِنَ الْمُؤْمِنِينَ فِي الصَّدَقَاتِ وَالَّذِينَ لَا يَجِدُونَ إِلَّا جُهْدَهُمْ فَيَسْخَرُونَ مِنْهُمْ ۙ سَخِرَ اللَّهُ مِنْهُمْ وَلَهُمْ عَذَابٌ أَلِيمٌ (79)
७९. जे लोक अशा ईमानधारकांवर आरोप ठेवता, जे मोकळ्या मनाने दान करतात आणि त्या लोकांवर, ज्यांना आपल्या मेहनतीखेरीज काहीच साध्य नाही, तर हे त्यांची थट्टा उडवितात, अल्लाहदेखील त्यांची थट्टा उडवितो आणि याच लोकांसाठी मोठी सक्त शिक्षा यातना (अज़ाब) आहे
اسْتَغْفِرْ لَهُمْ أَوْ لَا تَسْتَغْفِرْ لَهُمْ إِن تَسْتَغْفِرْ لَهُمْ سَبْعِينَ مَرَّةً فَلَن يَغْفِرَ اللَّهُ لَهُمْ ۚ ذَٰلِكَ بِأَنَّهُمْ كَفَرُوا بِاللَّهِ وَرَسُولِهِ ۗ وَاللَّهُ لَا يَهْدِي الْقَوْمَ الْفَاسِقِينَ (80)
८०. तुम्ही त्यांच्यासाठी तौबा (क्षमा याचना) करा किंवा न करा, जर तुम्ही सत्तर वेळाही यांच्यासाठी तौबा कराल तरीदेखील अल्लाह त्यांना कदापि माफ करणार नाही. कारण त्यांनी अल्लाह आणि त्याच्या पैगंबराचा इन्कार केला आहे आणि अशा दुराचारी लोकांना अल्लाह मार्गदर्शन करीत नाही
فَرِحَ الْمُخَلَّفُونَ بِمَقْعَدِهِمْ خِلَافَ رَسُولِ اللَّهِ وَكَرِهُوا أَن يُجَاهِدُوا بِأَمْوَالِهِمْ وَأَنفُسِهِمْ فِي سَبِيلِ اللَّهِ وَقَالُوا لَا تَنفِرُوا فِي الْحَرِّ ۗ قُلْ نَارُ جَهَنَّمَ أَشَدُّ حَرًّا ۚ لَّوْ كَانُوا يَفْقَهُونَ (81)
८१. मागे राहून जाणारे लोक, अल्लाहचे रसूल (सल्लल्लाहु अलैहि वसल्लम) यांच्याविरूद्ध आपल्या बसून राहण्यावर खूश आहेत. त्यांनी अल्लाहच्या मार्गात आपल्या धनाने व प्राणाने जिहाद करणे अप्रिय जाणले आणि ते म्हणाले की या भयंकर उन्हात निघू नका. त्यांना सांगा की जहन्नमची आग याहून अतिशय तापदायक आहे. यांनी हे समजून घेतले असेल तर बरे झाले असते
فَلْيَضْحَكُوا قَلِيلًا وَلْيَبْكُوا كَثِيرًا جَزَاءً بِمَا كَانُوا يَكْسِبُونَ (82)
८२. तेव्हा त्यांनी हसणे फार कमी आणि रडणे जास्त केले पाहिजे. आपल्या या कृतकर्मांच्या मोबदल्यात
فَإِن رَّجَعَكَ اللَّهُ إِلَىٰ طَائِفَةٍ مِّنْهُمْ فَاسْتَأْذَنُوكَ لِلْخُرُوجِ فَقُل لَّن تَخْرُجُوا مَعِيَ أَبَدًا وَلَن تُقَاتِلُوا مَعِيَ عَدُوًّا ۖ إِنَّكُمْ رَضِيتُم بِالْقُعُودِ أَوَّلَ مَرَّةٍ فَاقْعُدُوا مَعَ الْخَالِفِينَ (83)
८३. तेव्हा जर सर्वश्रेष्ठ अल्लाह तुम्हाला त्याच्या एखाद्या समूहाकडे परतवून नेईल मग हे तुमच्याशी लढाईच्या मैदानात जाण्याची अनुमती मागतील तेव्हा तुम्ही सांगा की तुम्ही माझ्यासोबत कधीही निघू शकत नाही आणि ना माझ्यासह शत्रुशी लढू शकता. तुम्ही पहिल्या खेपेलाच बसून राहणे पसंत केले होते, तेव्हा आताही तुम्ही मागे राहून जाणाऱ्यांमध्येच बसून राहा
وَلَا تُصَلِّ عَلَىٰ أَحَدٍ مِّنْهُم مَّاتَ أَبَدًا وَلَا تَقُمْ عَلَىٰ قَبْرِهِ ۖ إِنَّهُمْ كَفَرُوا بِاللَّهِ وَرَسُولِهِ وَمَاتُوا وَهُمْ فَاسِقُونَ (84)
८४. आणि यांच्यापैकी कोणी मरण पावला तर त्याच्या जनाजाची नमाज तुम्ही कधीही पढू नका आणि ना त्याच्या कबरीवर जाऊन उभे राहा, हे अल्लाह आणि त्याच्या पैगंबराचा इन्कार करणारे लोक आहेत आणि मरेपर्यंत दुराचारीच राहिले
وَلَا تُعْجِبْكَ أَمْوَالُهُمْ وَأَوْلَادُهُمْ ۚ إِنَّمَا يُرِيدُ اللَّهُ أَن يُعَذِّبَهُم بِهَا فِي الدُّنْيَا وَتَزْهَقَ أَنفُسُهُمْ وَهُمْ كَافِرُونَ (85)
८५. आणि तुम्हाला त्यांची धन-संपत्ती आणि संतती काहीच भली वाटू नये. सर्वश्रेष्ठ अल्लाह हेच इच्छितो की त्यांना या गोष्टीद्वारे या जगात सजा द्यावी आणि हे आपला जीव निघेपर्यंत काफिर (कृतघ्न) च राहिले
وَإِذَا أُنزِلَتْ سُورَةٌ أَنْ آمِنُوا بِاللَّهِ وَجَاهِدُوا مَعَ رَسُولِهِ اسْتَأْذَنَكَ أُولُو الطَّوْلِ مِنْهُمْ وَقَالُوا ذَرْنَا نَكُن مَّعَ الْقَاعِدِينَ (86)
८६. आणि जेव्हा एखादी सूरह (पवित्र कुरआनातील अध्याय) अवतरित केली जाते की अल्लाहवर ईमान राखा आणि त्याच्या पैगंबरासह मिळून जिहाद करा, तेव्हा त्यांच्यापैकी धनवान लोकांचा एक गट तुमच्याजवळ येऊन अनुमती घेतो की आम्हाला तर बसून राहणाऱ्यांमध्येच सोडून द्या
رَضُوا بِأَن يَكُونُوا مَعَ الْخَوَالِفِ وَطُبِعَ عَلَىٰ قُلُوبِهِمْ فَهُمْ لَا يَفْقَهُونَ (87)
८७. हे तर घरात राहणाऱ्या स्त्रियांना साथ देण्यावर राजी झाले, आणि त्यांच्या हृदयांवर मोहर लावली गेली. आता ते कसलेही समज उमज बाळगत नाही.१
لَٰكِنِ الرَّسُولُ وَالَّذِينَ آمَنُوا مَعَهُ جَاهَدُوا بِأَمْوَالِهِمْ وَأَنفُسِهِمْ ۚ وَأُولَٰئِكَ لَهُمُ الْخَيْرَاتُ ۖ وَأُولَٰئِكَ هُمُ الْمُفْلِحُونَ (88)
८८. परंतु स्वतः पैगंबर आणि त्यांच्यासोबतचे ईमानधारक आपल्या धनाने व प्राणाने जिहाद करतात. त्यांच्याचसाठी भलाई आहे. आणि हेच लोक सफलता प्राप्त करणारे आहेत
أَعَدَّ اللَّهُ لَهُمْ جَنَّاتٍ تَجْرِي مِن تَحْتِهَا الْأَنْهَارُ خَالِدِينَ فِيهَا ۚ ذَٰلِكَ الْفَوْزُ الْعَظِيمُ (89)
८९. याच लोकांसाठी सर्वश्रेष्ठ अल्लाहने ती जन्नत तयार केली आहे, जिच्याखाली प्रवाह वाहत आहेत. ज्यात ते नेहमी राहतील आणि हीच फार मोठी सफलता आहे. १
وَجَاءَ الْمُعَذِّرُونَ مِنَ الْأَعْرَابِ لِيُؤْذَنَ لَهُمْ وَقَعَدَ الَّذِينَ كَذَبُوا اللَّهَ وَرَسُولَهُ ۚ سَيُصِيبُ الَّذِينَ كَفَرُوا مِنْهُمْ عَذَابٌ أَلِيمٌ (90)
९०. ग्रामीण भागातील अशिक्षित, बहाणा करणारे लोक हजर झाले की त्यांना अनुमती दिली जावी आणि ते बसून राहावेत ज्यांनी अल्लाहशी आणि त्याच्या पैगंबराशी असत्य कथन केले होते. आता तर त्यांच्यात जेवढे काफिर (अधर्मी) आहेत त्यांना दुःखदायक अज़ाब पोहचल्याविना राहणार नाही
لَّيْسَ عَلَى الضُّعَفَاءِ وَلَا عَلَى الْمَرْضَىٰ وَلَا عَلَى الَّذِينَ لَا يَجِدُونَ مَا يُنفِقُونَ حَرَجٌ إِذَا نَصَحُوا لِلَّهِ وَرَسُولِهِ ۚ مَا عَلَى الْمُحْسِنِينَ مِن سَبِيلٍ ۚ وَاللَّهُ غَفُورٌ رَّحِيمٌ (91)
९१. कमजोर दुबळे आणि आजारी असलेल्यांवर आणि अशा लोकांवर जे खर्च करण्यास असमर्थ आहेत दोष नाही, जोपर्यंत ते अल्लाह आणि त्याच्या पैगंबराचे शुभचिंतक असतील. अशा नेक सदाचारी लोकांवर कसलीही कारवाई केली जाऊ नये आणि अल्लाह मोठा माफ करणारा मेहरबान आहे
وَلَا عَلَى الَّذِينَ إِذَا مَا أَتَوْكَ لِتَحْمِلَهُمْ قُلْتَ لَا أَجِدُ مَا أَحْمِلُكُمْ عَلَيْهِ تَوَلَّوا وَّأَعْيُنُهُمْ تَفِيضُ مِنَ الدَّمْعِ حَزَنًا أَلَّا يَجِدُوا مَا يُنفِقُونَ (92)
९२. आणि ना त्या लोकांवर जे तुमच्याजवळ येतात की तुम्ही त्यांच्यासाठी वाहनाची व्यवस्था करून द्यावी, तेव्हा तुम्ही त्यांना उत्तर देता की मला तुमच्या वाहनासाठी काहीच आढळत नाही, तेव्हा ते दुःखाने रडत, अश्रू ढाळीत परत जातात की त्यांना खर्च करण्यासाठी काहीही प्राप्त नाही.१
۞ إِنَّمَا السَّبِيلُ عَلَى الَّذِينَ يَسْتَأْذِنُونَكَ وَهُمْ أَغْنِيَاءُ ۚ رَضُوا بِأَن يَكُونُوا مَعَ الْخَوَالِفِ وَطَبَعَ اللَّهُ عَلَىٰ قُلُوبِهِمْ فَهُمْ لَا يَعْلَمُونَ (93)
९३. निःसंशय, आरोप अशा लोकांवर आहे जे धनवान असूनही तुमच्याजवळ अनुमती मागतात. स्त्रियांसोबत घरी बसून राहण्यावर हे खूश आहेत आणि अल्लाहने त्यांच्या हृदयांवर मोहर लावली आहे. ज्यामुळे ते अजाण बनले आहेत
يَعْتَذِرُونَ إِلَيْكُمْ إِذَا رَجَعْتُمْ إِلَيْهِمْ ۚ قُل لَّا تَعْتَذِرُوا لَن نُّؤْمِنَ لَكُمْ قَدْ نَبَّأَنَا اللَّهُ مِنْ أَخْبَارِكُمْ ۚ وَسَيَرَى اللَّهُ عَمَلَكُمْ وَرَسُولُهُ ثُمَّ تُرَدُّونَ إِلَىٰ عَالِمِ الْغَيْبِ وَالشَّهَادَةِ فَيُنَبِّئُكُم بِمَا كُنتُمْ تَعْمَلُونَ (94)
९४. जेव्हा तुम्ही त्यांच्याजवळ जाल तेव्हा तुमच्यासमोर सबबी मांडतील. (हे पैगंबर!) सांगा की बहाणे बनवू नका. आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवणार नाही. अल्लाहने तुमच्या करतुतींशी आम्हाला अवगत केले आहे आणि अल्लाह आणि त्याचा पैगंबर तुमचे आचरण पाहतील, मग तुम्ही अदृश्य आणि दृश्य गोष्टी जाणणाऱ्याकडे परतविले जाल, मग तो तुम्हाला सांगेल की जे काही तुम्ही करीत होते
سَيَحْلِفُونَ بِاللَّهِ لَكُمْ إِذَا انقَلَبْتُمْ إِلَيْهِمْ لِتُعْرِضُوا عَنْهُمْ ۖ فَأَعْرِضُوا عَنْهُمْ ۖ إِنَّهُمْ رِجْسٌ ۖ وَمَأْوَاهُمْ جَهَنَّمُ جَزَاءً بِمَا كَانُوا يَكْسِبُونَ (95)
९५. जेव्हा तुम्ही त्यांच्याजवळ परत जाल तेव्हा ते तुमच्यासमोर अल्लाहची शपथ घेतील, यासाठी की तुम्ही त्यांना त्यांच्या दशेवर सोडावे, यास्तव तुम्ही त्यांना त्यांच्या दशेवर सोडा. निश्चितच ते मोठे अपवित्र आहेत आणि त्यांचे ठिकाण नरक (जहन्नम) आहे, त्यांच्या त्या कर्मांच्या मोबदल्यात, जे ते करीत होते
يَحْلِفُونَ لَكُمْ لِتَرْضَوْا عَنْهُمْ ۖ فَإِن تَرْضَوْا عَنْهُمْ فَإِنَّ اللَّهَ لَا يَرْضَىٰ عَنِ الْقَوْمِ الْفَاسِقِينَ (96)
९६. हे तुमच्याजवळ अशासाठी शपथ घेतील की तुम्ही त्यांच्याशी राजी व्हावे. तेव्हा जर तुम्ही त्यांच्याशी राजीही झालात तर अल्लाह अशा दुराचारी लोकांशी राजी होत नाही
الْأَعْرَابُ أَشَدُّ كُفْرًا وَنِفَاقًا وَأَجْدَرُ أَلَّا يَعْلَمُوا حُدُودَ مَا أَنزَلَ اللَّهُ عَلَىٰ رَسُولِهِ ۗ وَاللَّهُ عَلِيمٌ حَكِيمٌ (97)
९७. ग्रामीण लोक इन्कार आणि वरकरणीपणात खूपच सक्त असतात, आणि त्यांनी असे असलेही पाहिजे की त्यांना त्या आदेशांचे ज्ञान नसावे, जे आदेश अल्लाहने आपल्या पैगंबरावर अवतरित केले आहेत आणि अल्लाह खूप खूप ज्ञान बाळगणारा, मोठा हिकमतशाली आहे
وَمِنَ الْأَعْرَابِ مَن يَتَّخِذُ مَا يُنفِقُ مَغْرَمًا وَيَتَرَبَّصُ بِكُمُ الدَّوَائِرَ ۚ عَلَيْهِمْ دَائِرَةُ السَّوْءِ ۗ وَاللَّهُ سَمِيعٌ عَلِيمٌ (98)
९८. आणि त्या ग्रामीण लोकांपैकी काही असे आहेत की जे काही खर्च करतात त्याला सजा समजतात आणि तुम्ही ईमानधारकांसाठी वाईट दिवसाच्या प्रतिक्षेत असतात. वाईट प्रसंग तर त्याच्यावरच येणार आहे आणि अल्लाह ऐकणारा आणि जाणणारा आहे
وَمِنَ الْأَعْرَابِ مَن يُؤْمِنُ بِاللَّهِ وَالْيَوْمِ الْآخِرِ وَيَتَّخِذُ مَا يُنفِقُ قُرُبَاتٍ عِندَ اللَّهِ وَصَلَوَاتِ الرَّسُولِ ۚ أَلَا إِنَّهَا قُرْبَةٌ لَّهُمْ ۚ سَيُدْخِلُهُمُ اللَّهُ فِي رَحْمَتِهِ ۗ إِنَّ اللَّهَ غَفُورٌ رَّحِيمٌ (99)
९९. आणि ग्रामीणांपैकी काही असेही आहेत, जे अल्लाहवर आणि कयामतच्या दिवसावर ईमान राखतात आणि जे काही खर्च करतात त्याला अल्लाहचे सान्निध्य आणि पैगंबरांच्या दुआ- प्रार्थनेचे साधन मानतात. लक्षात ठेवा की त्यांचे हे खर्च करणे, निश्चित त्यांच्यासाठी, अल्लाहची निकटता प्राप्त करण्याचे साधन आहे. त्यांना अल्लाह अवश्य आपल्या कृपा-छत्रात दाखल करील. अल्लाह मोठा माफ करणारा, दया करणारा आहे
وَالسَّابِقُونَ الْأَوَّلُونَ مِنَ الْمُهَاجِرِينَ وَالْأَنصَارِ وَالَّذِينَ اتَّبَعُوهُم بِإِحْسَانٍ رَّضِيَ اللَّهُ عَنْهُمْ وَرَضُوا عَنْهُ وَأَعَدَّ لَهُمْ جَنَّاتٍ تَجْرِي تَحْتَهَا الْأَنْهَارُ خَالِدِينَ فِيهَا أَبَدًا ۚ ذَٰلِكَ الْفَوْزُ الْعَظِيمُ (100)
१००. आणि हे मुहाजिर (मक्केहून मदीना येथे आलेले) आणि अन्सार (मदीना येथील मूळ रहिवाशी) प्रथम आहेत आणि जेवढे लोक, कसल्याही गरजेविना त्यांचे अनुयायी आहेत अल्लाह त्या सर्वांशी राजी झाला आणि ते सर्व अल्लाहशी राजी झाले आणि अल्लाहने त्यांच्यासाठी अशा बागांची व्यवस्था करून ठेवली आहे ज्यांच्याखाली प्रवाह वाहत आहेत, ज्यात ते सदैव राहतील. ही फार मोठी सफलता आहे
وَمِمَّنْ حَوْلَكُم مِّنَ الْأَعْرَابِ مُنَافِقُونَ ۖ وَمِنْ أَهْلِ الْمَدِينَةِ ۖ مَرَدُوا عَلَى النِّفَاقِ لَا تَعْلَمُهُمْ ۖ نَحْنُ نَعْلَمُهُمْ ۚ سَنُعَذِّبُهُم مَّرَّتَيْنِ ثُمَّ يُرَدُّونَ إِلَىٰ عَذَابٍ عَظِيمٍ (101)
१०१. आणि काही तुमच्या जवळपासच्या ग्रामीणांपैकी आणि मदीनेच्या वस्तीत असे ढोंगी ईमानधारक आहेत, जे दांभिकतेवर अटळ आहेत. तुम्ही त्यांना नाही जाणत, त्यांना आम्ही जाणतो. आम्ही त्यांना दुहेरी शिक्षा देऊ, मग ते फार मोठ्या शिक्षा- यातनेकडे पाठविले जातील
وَآخَرُونَ اعْتَرَفُوا بِذُنُوبِهِمْ خَلَطُوا عَمَلًا صَالِحًا وَآخَرَ سَيِّئًا عَسَى اللَّهُ أَن يَتُوبَ عَلَيْهِمْ ۚ إِنَّ اللَّهَ غَفُورٌ رَّحِيمٌ (102)
१०२. आणि काही दुसरे लोक आहेत, जे आपल्या चुका मान्य करतात, ज्यांनी मिश्र स्वरूपाची कर्मे केलीत. काही चांगली तर काही वाईट. अल्लाहकडून आशा आहे की त्यांची तौबा (क्षमा-याचना) कबूल करील. निःसंशय, अल्लाह मोठा माफ करणारा आणि दया करणारा आहे
خُذْ مِنْ أَمْوَالِهِمْ صَدَقَةً تُطَهِّرُهُمْ وَتُزَكِّيهِم بِهَا وَصَلِّ عَلَيْهِمْ ۖ إِنَّ صَلَاتَكَ سَكَنٌ لَّهُمْ ۗ وَاللَّهُ سَمِيعٌ عَلِيمٌ (103)
१०३. तुम्ही त्यांच्या धनातून सदका (दान) स्वीकार करा, ज्याद्वारे तुम्ही त्यांना स्वच्छ- शुद्ध कराल आणि त्यांच्यासाठी दुआ- प्रार्थना करा, निःसंशय तुमची दुआ त्यांच्यासाठी समाधानाचे साधन आहे, आणि अल्लाह चांगल्या प्रकारे ऐकतो, चांगल्या प्रकारे जाणतो
أَلَمْ يَعْلَمُوا أَنَّ اللَّهَ هُوَ يَقْبَلُ التَّوْبَةَ عَنْ عِبَادِهِ وَيَأْخُذُ الصَّدَقَاتِ وَأَنَّ اللَّهَ هُوَ التَّوَّابُ الرَّحِيمُ (104)
१०४. काय त्यांना हे माहीत नाही की अल्लाहच आपल्या दासांची तौबा (क्षमा-याचना) कबूल करतो आणि तोच दान कबूल करतो आणि हे की अल्लाहच तौबा कबूल करण्यात आणि दया करण्यात परिपूर्ण आहे
وَقُلِ اعْمَلُوا فَسَيَرَى اللَّهُ عَمَلَكُمْ وَرَسُولُهُ وَالْمُؤْمِنُونَ ۖ وَسَتُرَدُّونَ إِلَىٰ عَالِمِ الْغَيْبِ وَالشَّهَادَةِ فَيُنَبِّئُكُم بِمَا كُنتُمْ تَعْمَلُونَ (105)
१०५. आणि सांगा की तुम्ही कर्म करीत राहा. तुमचे कर्म अल्लाह स्वतः पाहील आणि त्याचा पैगंबर आणि ईमान राखणारे (ही पाहतील) आणि निश्चितच तुम्हाला अशाजवळ जायचे आहे जो सर्व लपलेल्या व उघड गोष्टी जाणणारा आहे. यासाठी की तो तुम्हाला तुम्ही केलेले प्रत्येक कर्म दाखवून देईल
وَآخَرُونَ مُرْجَوْنَ لِأَمْرِ اللَّهِ إِمَّا يُعَذِّبُهُمْ وَإِمَّا يَتُوبُ عَلَيْهِمْ ۗ وَاللَّهُ عَلِيمٌ حَكِيمٌ (106)
१०६. आणि काही दुसरे लोक आहेत, ज्यांचा मामला अल्लाहचा आदेश येईपर्यंत स्थगित आहे. एक तर तो त्यांना सजा देईल किंवा त्यांची क्षमा-याचना कबूल करील आणि अल्लाह मोठा जाणणारा, फार हिकमतशाली आहे
وَالَّذِينَ اتَّخَذُوا مَسْجِدًا ضِرَارًا وَكُفْرًا وَتَفْرِيقًا بَيْنَ الْمُؤْمِنِينَ وَإِرْصَادًا لِّمَنْ حَارَبَ اللَّهَ وَرَسُولَهُ مِن قَبْلُ ۚ وَلَيَحْلِفُنَّ إِنْ أَرَدْنَا إِلَّا الْحُسْنَىٰ ۖ وَاللَّهُ يَشْهَدُ إِنَّهُمْ لَكَاذِبُونَ (107)
१०७. आणि काही असे आहेत, ज्यांनी या हेतूने मस्जिद बनविली की नुकसान पोहचवावे आणि इन्कारपूर्ण गोष्टी कराव्यात आणि ईमानधारकांमध्ये फूट पाडावी, आणि अशा माणसाच्या राहण्याची व्यवस्था करावी, जो याच्या पूर्वीपासून अल्लाह आणि त्याच्या पैगंबराचा विरोधक आहे, आणि शपथ घेतील की भलाईखेरीज आमचा कोणताही हेतु नाही आणि अल्लाह साक्षी आहे की ते पूर्णतः खोटे आहेत
لَا تَقُمْ فِيهِ أَبَدًا ۚ لَّمَسْجِدٌ أُسِّسَ عَلَى التَّقْوَىٰ مِنْ أَوَّلِ يَوْمٍ أَحَقُّ أَن تَقُومَ فِيهِ ۚ فِيهِ رِجَالٌ يُحِبُّونَ أَن يَتَطَهَّرُوا ۚ وَاللَّهُ يُحِبُّ الْمُطَّهِّرِينَ (108)
१०८. आपण त्या मस्जिद कधीही उभे न राहावे, परंतु ज्या मस्जिदीचा पाया पहिल्या दिवसापासूनच तकवा (अल्लाहचे भय राखण्या) वर ठेवला गेला असेल, तर ती यायोग्य आहे की तुम्ही तिच्यात उभे राहावे. यात असे लोक आहेत की ते अधिक स्वच्छ-शुद्ध (पाक) होणे चांगले समजतात, आणि सर्वश्रेष्ठ अल्लाह अधिक पाक राहणाऱ्यांना प्रिय राखतो
أَفَمَنْ أَسَّسَ بُنْيَانَهُ عَلَىٰ تَقْوَىٰ مِنَ اللَّهِ وَرِضْوَانٍ خَيْرٌ أَم مَّنْ أَسَّسَ بُنْيَانَهُ عَلَىٰ شَفَا جُرُفٍ هَارٍ فَانْهَارَ بِهِ فِي نَارِ جَهَنَّمَ ۗ وَاللَّهُ لَا يَهْدِي الْقَوْمَ الظَّالِمِينَ (109)
१०९. मग काय असा मनुष्य अधिक चांगला आहे, ज्याने आपल्या इमारतीचा पाया अल्लाहचे भय राखण्यावर आणि अल्लाहची प्रसन्नता प्राप्त करण्यावर ठेवला असेल किंवा तो मनुष्य, ज्याने आपल्या घराचा पाया एखाद्या उतार असलेल्या दरीच्या (घाटाच्या) किनाऱ्यावर, जी कोसळण्याच्या बेतात असावी, त्यावर रचला असेल; मग तो त्यासह जहन्नमच्या आगीत जाऊन पडावा आणि सर्वश्रेष्ठ अल्लाह अशा अत्याचारींना मार्ग दाखवित नाही
لَا يَزَالُ بُنْيَانُهُمُ الَّذِي بَنَوْا رِيبَةً فِي قُلُوبِهِمْ إِلَّا أَن تَقَطَّعَ قُلُوبُهُمْ ۗ وَاللَّهُ عَلِيمٌ حَكِيمٌ (110)
११०. त्यांचे हे घर, जे त्यांनी बनविले आहे, नेहमी त्यांच्या मनाला संशयामुळे (काट्यासरखे) बोचत राहील. परंतु हे की त्यांची हृदयेच क्षत-विक्षत व्हावीत, आणि अल्लाह ज्ञान बाळगणारा आणि हिकमतशाली आहे
۞ إِنَّ اللَّهَ اشْتَرَىٰ مِنَ الْمُؤْمِنِينَ أَنفُسَهُمْ وَأَمْوَالَهُم بِأَنَّ لَهُمُ الْجَنَّةَ ۚ يُقَاتِلُونَ فِي سَبِيلِ اللَّهِ فَيَقْتُلُونَ وَيُقْتَلُونَ ۖ وَعْدًا عَلَيْهِ حَقًّا فِي التَّوْرَاةِ وَالْإِنجِيلِ وَالْقُرْآنِ ۚ وَمَنْ أَوْفَىٰ بِعَهْدِهِ مِنَ اللَّهِ ۚ فَاسْتَبْشِرُوا بِبَيْعِكُمُ الَّذِي بَايَعْتُم بِهِ ۚ وَذَٰلِكَ هُوَ الْفَوْزُ الْعَظِيمُ (111)
१११. निःसंशय, अल्लाहने ईमानधारकांकडून त्यांच्या प्राणांना व धनांना जन्नतच्या मोबदल्यात खरेदी केले आहे. ते अल्लाहच्या मार्गात लढतात ज्यात ते ठार करतात आणि ठार केले जातात, याबाबत सच्चा वायदा आहे तौरात, इंजील आणि कुरआनामध्ये आणि अल्लाहपेक्षा जास्त आपल्या वायद्याचे पालन कोण करू शकतो? यास्तव तुम्ही आपल्या या विकण्यावर, जो (सौदा) तुम्ही करून घेतलात, आनंदित व्हा आणि ही फार मोठी सफलता आहे
التَّائِبُونَ الْعَابِدُونَ الْحَامِدُونَ السَّائِحُونَ الرَّاكِعُونَ السَّاجِدُونَ الْآمِرُونَ بِالْمَعْرُوفِ وَالنَّاهُونَ عَنِ الْمُنكَرِ وَالْحَافِظُونَ لِحُدُودِ اللَّهِ ۗ وَبَشِّرِ الْمُؤْمِنِينَ (112)
११२. हे असे लोक होते, जे तौबा (क्षमा-याचना) करणारे, अल्लाहची उपासना करणारे, त्याची स्तुती-प्रशंसा करणारे, रोजा (उपवास-व्रत) राखणारे (किंवा सत्य मार्गावर चालणारे) रुकूअ (झुकणारे) सजदा करणारे (माथा टेकणारे), चांगल्या गोष्टींचा उपदेश करणारे, आणि वाईट गोष्टींपासून रोखणारे आणि अल्लाहच्या नियमांना ध्यानात राखणारे आहेत आणि अशा ईमान राखणाऱ्यांना शुभ समाचार द्या
مَا كَانَ لِلنَّبِيِّ وَالَّذِينَ آمَنُوا أَن يَسْتَغْفِرُوا لِلْمُشْرِكِينَ وَلَوْ كَانُوا أُولِي قُرْبَىٰ مِن بَعْدِ مَا تَبَيَّنَ لَهُمْ أَنَّهُمْ أَصْحَابُ الْجَحِيمِ (113)
११३. पैगंबर आणि इतर ईमानधारकांना अनुमती नाही की अनेकेश्वरवाद्यांकरिता माफीची दुआ- प्रार्थना करावी, मग ते नातेवाईक का असेनात. हा आदेश स्पष्ट झाल्यानंतर की ते लोक नरकात जातील
وَمَا كَانَ اسْتِغْفَارُ إِبْرَاهِيمَ لِأَبِيهِ إِلَّا عَن مَّوْعِدَةٍ وَعَدَهَا إِيَّاهُ فَلَمَّا تَبَيَّنَ لَهُ أَنَّهُ عَدُوٌّ لِّلَّهِ تَبَرَّأَ مِنْهُ ۚ إِنَّ إِبْرَاهِيمَ لَأَوَّاهٌ حَلِيمٌ (114)
११४. आणि इब्राहीमचे आपल्या पित्याकरिता माफीची दुआ-प्रार्थना करणे हे केवळ त्या वचनाच्या सबबीवर होते, जे त्यांनी आपल्या पित्यास दिले होते, मग जेव्हा त्यांना ही गोष्ट स्पष्टतः कळाली की तो (पिता) अल्लाहचा शत्रू आहे, तेव्हा ते त्याच्यापासून दूर झाले. वास्तविक इब्राहीम मोठे कोमलहृदयी सहनशील होते
وَمَا كَانَ اللَّهُ لِيُضِلَّ قَوْمًا بَعْدَ إِذْ هَدَاهُمْ حَتَّىٰ يُبَيِّنَ لَهُم مَّا يَتَّقُونَ ۚ إِنَّ اللَّهَ بِكُلِّ شَيْءٍ عَلِيمٌ (115)
११५. आणि अल्लाह असे नाही करत की एखाद्या जनसमूहाला मार्गदर्शन केल्यानंतर मार्गभ्रष्ट करील, जोपर्यंत त्या गोष्टी स्पष्टतः सांगून टाकत नाही ज्यांच्यापासून त्यांनी अलिप्त राहावे. निःसंशय अल्लाह प्रत्येक गोष्ट चांगल्या प्रकारे जाणतो
إِنَّ اللَّهَ لَهُ مُلْكُ السَّمَاوَاتِ وَالْأَرْضِ ۖ يُحْيِي وَيُمِيتُ ۚ وَمَا لَكُم مِّن دُونِ اللَّهِ مِن وَلِيٍّ وَلَا نَصِيرٍ (116)
११६. निःसंशय, आकाशामध्ये व धरतीत अल्लाहचीच राज्य-सत्ता आहे. तोच जिंवत ठेवतो आणि मृत्यु देतो आणि तुमचा अल्लाहखेरीज कोणीही मित्र नाही आणि ना कोणी मदत करणारा
لَّقَد تَّابَ اللَّهُ عَلَى النَّبِيِّ وَالْمُهَاجِرِينَ وَالْأَنصَارِ الَّذِينَ اتَّبَعُوهُ فِي سَاعَةِ الْعُسْرَةِ مِن بَعْدِ مَا كَادَ يَزِيغُ قُلُوبُ فَرِيقٍ مِّنْهُمْ ثُمَّ تَابَ عَلَيْهِمْ ۚ إِنَّهُ بِهِمْ رَءُوفٌ رَّحِيمٌ (117)
११७. सर्वश्रेष्ठ अल्लाहने पैगंबरांच्या स्थितीवर दया-दृष्टी केली आणि देशत्याग करून आलेल्यांवर आणि त्यांना मदत करणाऱ्या अन्सार लोकांच्या स्थितीवरही, ज्यांनी अशा अडचणीच्या वेळी पैगंबरांना साथ दिली, त्यानंतर की त्यांच्यातल्या एका गटाची मने डळमळू लागली होती. मग अल्लाहने त्यांच्या अवस्थेवर दया केली. निःसंशय, अल्लाह त्या सर्वांवर अतिशय मेहरबान आणि दया करणारा आहे
وَعَلَى الثَّلَاثَةِ الَّذِينَ خُلِّفُوا حَتَّىٰ إِذَا ضَاقَتْ عَلَيْهِمُ الْأَرْضُ بِمَا رَحُبَتْ وَضَاقَتْ عَلَيْهِمْ أَنفُسُهُمْ وَظَنُّوا أَن لَّا مَلْجَأَ مِنَ اللَّهِ إِلَّا إِلَيْهِ ثُمَّ تَابَ عَلَيْهِمْ لِيَتُوبُوا ۚ إِنَّ اللَّهَ هُوَ التَّوَّابُ الرَّحِيمُ (118)
११८. आणि तीन माणसांच्या अवस्थेवरही, ज्यांचा मामला स्थगित केला गेला होता येथपर्यंत की जेव्हा जमीन आपल्या (विशाल) विस्तारानंतरही त्यांच्यासाठी संकुचित (तंग) होऊ लागली आणि ते स्वतः आपल्या अस्तित्वाशी हैराण झाले आणि त्यांनी समजून घेतले की अल्लाहपासून कोठेही आश्रय लाभू शकत नाही, याखेरीज की त्यांच्याकडे वळले जावे. मग त्यांच्या अवस्थेवर दया केली. यासाठी की त्यांनी भविष्यातही क्षमा-याचना करावी. निःसंशय सर्वश्रेष्ठ अल्लाह तौबा (क्षमा-याचना) कबूल करणारा आणि अतिशय दया करणारा आहे
يَا أَيُّهَا الَّذِينَ آمَنُوا اتَّقُوا اللَّهَ وَكُونُوا مَعَ الصَّادِقِينَ (119)
११९. हे ईमान राखणाऱ्यांनो! सर्वश्रेष्ठ अल्लाहचे भय बाळगा आणि खऱ्या लोकांसोबत राहा
مَا كَانَ لِأَهْلِ الْمَدِينَةِ وَمَنْ حَوْلَهُم مِّنَ الْأَعْرَابِ أَن يَتَخَلَّفُوا عَن رَّسُولِ اللَّهِ وَلَا يَرْغَبُوا بِأَنفُسِهِمْ عَن نَّفْسِهِ ۚ ذَٰلِكَ بِأَنَّهُمْ لَا يُصِيبُهُمْ ظَمَأٌ وَلَا نَصَبٌ وَلَا مَخْمَصَةٌ فِي سَبِيلِ اللَّهِ وَلَا يَطَئُونَ مَوْطِئًا يَغِيظُ الْكُفَّارَ وَلَا يَنَالُونَ مِنْ عَدُوٍّ نَّيْلًا إِلَّا كُتِبَ لَهُم بِهِ عَمَلٌ صَالِحٌ ۚ إِنَّ اللَّهَ لَا يُضِيعُ أَجْرَ الْمُحْسِنِينَ (120)
१२०. मदीना आणि त्याच्या जवळपासच्या गावात राहणाऱ्यांकरिता योग्य नव्हते की अल्लाहच्या पैगंबरांची साथ सोडून मागे राहावे आणि न हे की आपल्या प्राणाला, त्यांच्या प्राणापेक्षा अधिक प्रिय आपल्या प्राणाला, त्यांच्या प्राणापेक्षा अधिक प्रिय जाणावे. हे अशामुळे की त्यांना अल्लाहच्या मार्गात जी तहान लागली आणि जो थकवा पोहोचला आणि जी भूक लागली आणि जे चालत गेले, जे काफिरांकरिता क्रोधाची सबब बनली असावी आणि शत्रूंचा जो काही समाचार घेतला, त्या सर्वांबद्दल त्यांच्या नावे (एक एक) सत्कर्म करणाऱ्यांचा मोबदला वाया जाऊ देत नाही
وَلَا يُنفِقُونَ نَفَقَةً صَغِيرَةً وَلَا كَبِيرَةً وَلَا يَقْطَعُونَ وَادِيًا إِلَّا كُتِبَ لَهُمْ لِيَجْزِيَهُمُ اللَّهُ أَحْسَنَ مَا كَانُوا يَعْمَلُونَ (121)
१२१. आणि जो काही लहान मोठा खर्च त्यांनी केला आणि जेवढी मैदाने त्यांना पार करावी लागली, हे सर्वदेखील त्यांच्या नावे लिहिले गेले यासाठी की सर्वश्रेष्ठ अल्लाहने त्यांच्या कामांचा चांगल्यात चांगला मोबदला प्रदान करावा
۞ وَمَا كَانَ الْمُؤْمِنُونَ لِيَنفِرُوا كَافَّةً ۚ فَلَوْلَا نَفَرَ مِن كُلِّ فِرْقَةٍ مِّنْهُمْ طَائِفَةٌ لِّيَتَفَقَّهُوا فِي الدِّينِ وَلِيُنذِرُوا قَوْمَهُمْ إِذَا رَجَعُوا إِلَيْهِمْ لَعَلَّهُمْ يَحْذَرُونَ (122)
१२२. आणि ईमान राखणाऱ्यांनी सर्वच्या सर्व मिळून निघू नये. तेव्हा असे का न केले जावे की त्यांच्या प्रत्येक मोठ्या गटामधू लहान गट निघावा यासाठी की त्यांनी दीन (धर्मा) ची समज प्राप्त करून घ्यावी आणि यासाठी की त्यांनी आपल्या जनसमूहाच्या लोकांना, जेव्हा ते यांच्याजवळ येतील (अल्लाहचे) भय दाखवावे, यासाठी की त्यांनी भ्यावे
يَا أَيُّهَا الَّذِينَ آمَنُوا قَاتِلُوا الَّذِينَ يَلُونَكُم مِّنَ الْكُفَّارِ وَلْيَجِدُوا فِيكُمْ غِلْظَةً ۚ وَاعْلَمُوا أَنَّ اللَّهَ مَعَ الْمُتَّقِينَ (123)
१२३. हे ईमान राखणाऱ्यांनो! त्या काफिरांशी (इन्कारी लोकांशी) लढा जे तुमच्या भोवती आहेत आणि त्यांना तुमच्या अंगी कठोरता आढळली पाहिजे. आणि हा विश्वास राखा की सर्वश्रेष्ठ अल्लाह तकवा (धैर्य-संयम) राखणाऱ्यांच्या सोबत आहे
وَإِذَا مَا أُنزِلَتْ سُورَةٌ فَمِنْهُم مَّن يَقُولُ أَيُّكُمْ زَادَتْهُ هَٰذِهِ إِيمَانًا ۚ فَأَمَّا الَّذِينَ آمَنُوا فَزَادَتْهُمْ إِيمَانًا وَهُمْ يَسْتَبْشِرُونَ (124)
१२४. आणि जेव्हा एखादी सूरह (अध्याय) अवतरित केली जाते, तेव्हा काही ढोंगी ईमानधारक म्हणतात की या सूरहने तुमच्यापैकी कोणाचे ईमान वाढविले आहे? तेव्हा जे (सच्चे) ईमानधारक आहेत, या सूरहने त्यांच्या ईमानात वृद्धी केली आहे आणि ते आनंदित होत आहेत
وَأَمَّا الَّذِينَ فِي قُلُوبِهِم مَّرَضٌ فَزَادَتْهُمْ رِجْسًا إِلَىٰ رِجْسِهِمْ وَمَاتُوا وَهُمْ كَافِرُونَ (125)
१२५. आणि ज्यांच्या मनात रोग (विकृती) आहे, या सूरहने त्यांच्यात त्यांच्या गलिच्छतेसह आणखी गलिच्छता वाढवून दिली आहे आणि ते कुप्र (इन्कार करण्या) च्या स्थितीतच मरण पावले
أَوَلَا يَرَوْنَ أَنَّهُمْ يُفْتَنُونَ فِي كُلِّ عَامٍ مَّرَّةً أَوْ مَرَّتَيْنِ ثُمَّ لَا يَتُوبُونَ وَلَا هُمْ يَذَّكَّرُونَ (126)
१२६. आणि काय त्यांनी पाहिले नाही की हे लोक दरवर्षी एकदा किंवा दोनदा कोणत्या न कोणत्या संकटात टाकले जातात, तरीही ते ना तौबा (क्षमा-याचना) करतात, ना बोध प्राप्त करतात
وَإِذَا مَا أُنزِلَتْ سُورَةٌ نَّظَرَ بَعْضُهُمْ إِلَىٰ بَعْضٍ هَلْ يَرَاكُم مِّنْ أَحَدٍ ثُمَّ انصَرَفُوا ۚ صَرَفَ اللَّهُ قُلُوبَهُم بِأَنَّهُمْ قَوْمٌ لَّا يَفْقَهُونَ (127)
१२७. आणि जेव्हा एखादी सूरह (अध्याय) अवतरित केली जाते तेव्हा एकमेकांना पाहू लागतात की तुम्हाला कोणी पाहत तर नाही, मग चालू लागतात. अल्लाहने यांचे मन फिरविले आहे या कारणाने की ते समजून न घेणारे लोक आहेत
لَقَدْ جَاءَكُمْ رَسُولٌ مِّنْ أَنفُسِكُمْ عَزِيزٌ عَلَيْهِ مَا عَنِتُّمْ حَرِيصٌ عَلَيْكُم بِالْمُؤْمِنِينَ رَءُوفٌ رَّحِيمٌ (128)
१२८. तुमच्याजवळ एका अशा पैगंबराचे आगमन झाले आहे, जे तुमच्यापैकीच आहेत, ज्यांना तुमच्या हानीविषयक गोष्टी खूप क्लेशदायक वाटतात जे तुमच्या लाभाचे मोठे इच्छुक असतात. ईमान राखणाऱ्यासाठी अतिशय स्नेहशील व मेहरबान आहेत
فَإِن تَوَلَّوْا فَقُلْ حَسْبِيَ اللَّهُ لَا إِلَٰهَ إِلَّا هُوَ ۖ عَلَيْهِ تَوَكَّلْتُ ۖ وَهُوَ رَبُّ الْعَرْشِ الْعَظِيمِ (129)
१२९. मग जर ते (लोक) तोंड फिरवतील तर तुम्ही त्यांना सांगा की माझ्यासाठी अल्लाह पुरेसा आहे, त्याच्याखेरीज कोणीही सच्चा माबूद (उपास्य) नाही. मी त्याच्यावरच भरोसा केला आणि तो फार मोठ्या अर्श (सिंहासना) चा मालक (स्वामी) आहे
❮ Previous Next ❯

Surahs from Quran :

1- Fatiha2- Baqarah
3- Al Imran4- Nisa
5- Maidah6- Anam
7- Araf8- Anfal
9- Tawbah10- Yunus
11- Hud12- Yusuf
13- Raad14- Ibrahim
15- Hijr16- Nahl
17- Al Isra18- Kahf
19- Maryam20- TaHa
21- Anbiya22- Hajj
23- Muminun24- An Nur
25- Furqan26- Shuara
27- Naml28- Qasas
29- Ankabut30- Rum
31- Luqman32- Sajdah
33- Ahzab34- Saba
35- Fatir36- Yasin
37- Assaaffat38- Sad
39- Zumar40- Ghafir
41- Fussilat42- shura
43- Zukhruf44- Ad Dukhaan
45- Jathiyah46- Ahqaf
47- Muhammad48- Al Fath
49- Hujurat50- Qaf
51- zariyat52- Tur
53- Najm54- Al Qamar
55- Rahman56- Waqiah
57- Hadid58- Mujadilah
59- Al Hashr60- Mumtahina
61- Saff62- Jumuah
63- Munafiqun64- Taghabun
65- Talaq66- Tahrim
67- Mulk68- Qalam
69- Al-Haqqah70- Maarij
71- Nuh72- Jinn
73- Muzammil74- Muddathir
75- Qiyamah76- Insan
77- Mursalat78- An Naba
79- Naziat80- Abasa
81- Takwir82- Infitar
83- Mutaffifin84- Inshiqaq
85- Buruj86- Tariq
87- Al Ala88- Ghashiya
89- Fajr90- Al Balad
91- Shams92- Lail
93- Duha94- Sharh
95- Tin96- Al Alaq
97- Qadr98- Bayyinah
99- Zalzalah100- Adiyat
101- Qariah102- Takathur
103- Al Asr104- Humazah
105- Al Fil106- Quraysh
107- Maun108- Kawthar
109- Kafirun110- Nasr
111- Masad112- Ikhlas
113- Falaq114- An Nas